image_print

मराठी साहित्य – मराठी कविता – पाहुणा – सुश्री नीलम सक्सेना चंद्रा

सुश्री नीलम सक्सेना चंद्रा पाहुणा (जीवन के कटु सत्य को उजागर करती सुश्री नीलम सक्सेना चंद्रा जी की  मराठी कविता।) मी स्वत: आली आहे या जगात एखाद्या पाहुण्या सारखी, मला कुठे हक्क आहे घराला आपलं म्हणण्याचा, सामानाला आपलं म्हणण्याचा, दागिन्यांना आपलं म्हणण्याचा?   संबंध पण माझे नाहीत, नातेवाईक पण माझे नाहीत, तू पण माझा नाही, मी पण तुझी नाही; फक्त एक भ्रामक कल्पना आहे!   सत्य एकच आहे, थोड्या वेळा साठी आपण आलो आहोत जगात, आणि त्यात जर असेल, फक्त प्रेम व स्मित हास्य, की मग मी भरून पावले!  ...
Read More

मराठी साहित्य – कविता – स्मृति-गंध  – श्री सदानंद आंबेकर 

श्री सदानंद आंबेकर            (श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास। हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस अत्यंत  भावप्रवण मराठी कविता के लिए) पाहुनि इवल्याश्या चोची,               चीव-चीव ऐकोनि, स्मृति उजळली आईची ती, अश्रु गेले वाहोनि। स्नेहाची ती मधुर छाया,                     वर्षणारी सतत माया, निर्मिली माझी ही काया,                     राहुनि तुझियाच पाया, आज दरवळला स्मृतिंचा- गंध- दृश्य पाहोनि. . . . . . हात धरुनि चालवीले,                     कष्ट सोसुनि वाढवीले, तम जगाचा घालवीला,                     जन्म माझा सुखद झाला, व्यक्त करितो भाव माझे- स्मृति तुझ्या रेखाटुनि. . . . . ©  सदानंद आंबेकर...
Read More

मराठी साहित्य – कविता – मेघ सरले – सुश्री स्वप्ना अमृतकर

कवयित्री : स्वप्ना अमृतकर (पुणे) आत्मकथ्य : लिखाणाच्या शैलीत, शब्दसुमनांच्या वेलीत, विचारांच्या स्वरचित, मनाच्या काल्पनिक, माझा प्रवास सुरु आहे.   साहित्यिक लिखाणांत कविता, चारोळी, गजल, लेख, कथा लिखाण, प्राचीन आणि नव नव्या गोष्टी, तंत्रज्ञान समजुन त्यावर स्वरचित विचारमांडणी करणे. विशेष : पालकांकडुन लाभलेल्या स्वच्छ विचारसरणी आणि लिखाणाची कला शैली जोपासता यावी हाच प्रयत्न .. - स्वप्ना अमृतकर   मेघ सरले   मेघ सरले, मोर हासले, थेंब थांबले, वादळ हरवले,   नकळत तेव्हांच तू माझ्याकडे पहिले, आणि मी माझे सर्वस्व गमावले, तुझ्या बघण्याचा इशारा होता जणू, पाऊस पडल्यानंतर होणारा आनंद, ओल्या मातीचाही चोहीकडे दरवळलेला सुगंध, वाऱ्यानेही कहर केला होता मनी, कोमल अंगालाही शहारल्या लहरी बेधुंद, मनाला पालवी फुटावी एवढा गजर झाला त्या क्षणी, हरवलेल्या राधेला मिळावा तिचा कृष्ण, असाच काही आहे तू माझ्यासाठी परमानंद, आपल्या दोघांमध्ये होत होता संवाद केवळ त्या मेघांमुळे, आता शेवट जरी केला तरी तो केवळ तुझ्या माझ्या प्रेमामुळे,   म्हणूनच, मेघ सरले, मोर हासले, थेंब थांबले, वादळ हरवले....!   © स्वप्ना अमृतकर   ...
Read More
image_print