1

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 27 ☆ मालतीचं पत्र ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके स्वानुभव  एवं  संबंधों  पर आधारित  कथा  “मालतीचं पत्र”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 27 ☆

☆ मालतीचं पत्र ☆ 

(कथा)

रोजच्याप्रमाणे पोस्टमन दिसल्याबरोबर मंजुळा बाईंनी त्याला विचारलंच ..” आमचं  पत्र आलंय कां.? ” पोस्टमन फक्त गालातल्या गालात हसला व पुढं गेला त्याला हे नित्य परिचयाचं होतं.

पण त्यानंतर चारच दिवसांनी त्याने मंजुळाबाईंच्या हातात एक लिफाफा दिला व म्हणाला घ्या तुमच्या सुनबाईंचं पत्र.! अगदी उत्साहाने त्यांनी ते फोडलं पण वाचता येत नसल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेवढ्यात आमच्या घराच्या ओसरीवर बसायला येणाऱ्या सदाला त्यांनी हाक मारली व म्हणाल्या ” सदा एवढं पत्र वाचून दाखव रं !”

मग ओसरीवरच मंजुळाबाई मांडी घालून डाव्या हाताचा कोपरा गुडघ्यावर टेकवून ऐटीत बसल्या अन् म्हणाल्या “बघ रं काय म्हणतीय मालती ?”

मालती हे माझं माहेरचं नाव पण मला त्या कायम त्याच नावानं बोलवायच्या.

आमचं. लग्न होण्यापूर्वी माझे सासरे वर्षभर अगोदर गेलेले होते. आम्हा दोघांना एकाच खात्यात एकाच दिवशी नोकरी लागल्याने आम्ही परगावी होतो. आणि मोठ्या दिरांच्या बदलीने तेही दूर त्यामुळे गावी त्या व शाळेत जाणारी दोन मुले गावी असायची.

साधारण १९६३ साल खेडेगावात त्यावेळी दुसरा  काही विरंगुळा नसायचा. मुलं शाळेत गेली की त्या एकट्या असायच्या. तशा माझ्या चुलत सासुबाई, आजेसासुबाई तिथंच असायच्या. आमचं घर बऱ्यापैकी ऐसपैस. आमची स्वयंपाकघरं वेगवेगळी पण ओसरी मोठ्ठ अंगण एकच होतं.

आजेसासूबाईंना सर्वजण मोठीआई म्हणायचे. म्हणजे वयाने तर होत्याच पण ओसरीचा अर्ध्या खणाचा भाग त्यांच्या बैठकीने व्यपलेला असायचा.

ओसरीवर बसून जाणायेणाऱ्यांकडे नव्वदाव्या वर्षीही त्यांचं अगदी बारीक लक्ष असायचं. अन् पोस्टमन घराच्या दिशेने येताना दिसला की म्हणायच्या ….

“अगं मंजुळा तुझ्या मालतीचं पत्र आलं गं ऽऽ आलं…!”

मी पोस्टकार्ड वर कधीच पत्र लिहीत नसे. कारण माझा मजकूर त्यावर कधी बसायचाच नाही.फुलस्केप वर पानभर आणि पाठपोठ असा माझा मजकूर असायचा….

माझ्या ठसठशीत अक्षरातला सविस्तर मजकूर वाचून त्यांना खूप आनंद व्हायचा. म्हणायच्या

बघा माझी मालती कशी रेघ न् रेघ कळवती लिहून काय झालं काय नाही…

माझ्या जन्म दिलेल्या मुलालाही नाही पण हिला किती काळजी असते.

माझं आलेलं पत्र त्या दिवसातून दोन तीनदा तरी भेटेल त्याच्याकडून वाचून घ्यायच्या.

माझ्या पत्रात माझं घरातलं सगळं आवरून ऑफिसला जाताना होणारी तारेवरची कसरत, ऑफिसात साहेबांचा खाल्लेला ओरडा. कारण एस एस.सी  झाल्यावर दोन वर्षांतच नोकरी सुरू.त्यामुळे वय आणि अनुभव दोन्ही बेताचेच.! असं सगळं माझं साग्रसंगीत वर्णन त्या पत्रात असायचं. त्याची त्यांना गंमत आणि कौतुक दोन्हीही वाटायचं.

आमची मुलं जरा मोठी झाल्यावर आम्ही उभयता मे १९७९ मध्ये “नेपाळ दार्जिलिंग” सहलीला गेलो होतो. तिथंन मी प्रवासाच्या सुरुवातीपासूनचं संपूर्ण सहलीचं वर्णन वेळोवेळी पाठवत होते.

त्यातल्या एका पत्रात मी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं वर्णन पाठवलं. कैलास पर्वताच नाव ऐकताच त्या म्हणाल्या बघा  कैलासराणा शिवचंद्रमौळी जिथं रहातो ते माझी सून मुलगा बघून आली. त्या रोज ते स्तोत्र म्हणत असल्यानं त्यांनी मला नंतर सांगितलं की तुमच्याबरोबर मी कैलास पर्वताचं दर्शन घेऊन आल्याचं मला जाणवलं.

पत्र म्हणजे तरी काय हो “या हृदयीचे त्या हृदयी.!”  आपल्या मनाच्या कप्प्यातल्या भावना इतरांना समजावून सांगण्याचा एक खूप सुंदर सोपं साधन !

आठवणींना उजाळा देणारी शब्दांजली म्हणजेच पत्र.! अगदी आत्ता हे लिहिताना माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. म्हणून तर म्हणतात ” मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देणारं हळूवार शस्त्र म्हणजे पत्र “!

मग ते पत्र श्रीसमर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले असो, पूज्य साने गुरुजींनी लिहिलेली ,पं.जवाहरलाल यांनी प्रियदर्शनीस लिहिलेली, बॅ.पी.जी.पाटील यांनी पूज्य कर्मवीर भाऊराव पाटील यांना लंडनहून लिहिलेली, सीमेवरच्या वीर जवानाने त्याच्या प्रियजनांस लिहिलेली असो ही एक अत्यंत अनमोल ठेव आहे असे मला. वाटते.!

“पू. मंजुळा स्मृतीस अर्पण”

©®उर्मिला इंगळे

सतारा  मो –  9028815585

दिनांक:-.२१-३-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!
मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #7 ☆ मित….. (भाग-7) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #7 ☆ मित….. (भाग-7) ☆

रिमझिमला समोर पाहताच तो तिच्याकडे फक्त पाहत राहिला. ते छोटे छोटे मांजरीवाणी डोळे, काहीसे लांब मुलायम केस, उंची थोडी कमी होती. पण शरीर रचना अशी की एखाद्या  नटीला मागे टाकावं. आणि चेह-यावरचे तेज असे की झोपलेल्या सृष्टीला जागे करण्यासाठी दिनकराने तेज भरावे असे होते. तिला पाहताच सागरात डोलफ़िनने उंच झेप घेऊन आपला आनंद साजरा करावा. असं त्याचं मन अगदी आनंदाच्या सागरात उड्या मारत होते.

तिची सैरभैर फिरणारी नजर बहूतेक त्यालाच शोधत असावी. चहुबाजुला तिने आपल्या नजरेचा पसारा मांडला होता.  तेवढयात एक पन्नास – बावन वर्षांचा गृहस्थ येऊन तिला काहीतरी बोलू लागले. ती ही त्यांच्या गोष्टींना होकारार्थी मान हलवली. थोडे काळजीचे भाव चेह-यावर होतेच.  तिचे वडिल असावेत. असा मितने कयास बांधला. एक बारा वर्षाचा मुलगा, पंधरा साळा वर्षाची मुलगी, आई, बाबा आणि रिमझिम असा सारा परिवार तेथून जायला निघाला. रिमझिमने मागे वळून प्लॅटफार्मवर नजर भिरकावली. तेव्हा मित तिच्या अगदी जवळ उभा होता. ती थोडी घाबरली. पण तिला आनंद सुध्दा झाला. ते एकमेकांकडे बघतच राहिले. तिचे बाबा जवळ आले तेव्हा मितने त्याना नमस्कार केला.

मित- “नमस्ते अंकल. मै मित.”

ज्योतीप्रसाद – “नमस्ते बेटा. मै ज्योतीप्रसाद. रिमूने आपके बारे मे बताया.”

मित- “जी अंकल. हम दोनो बहोत अच्छे दोस्त है.”

मित त्यांच्यासोबत त्यांना हाटेलला गेला. त्याचा मनमिळाऊ स्वभाव आणि प्रभावी बोलणे यामुळे तो लवकरच त्यांच्या पुरण परिवारात मिसळला. रूमला बॅग वगैरे ठेऊन रिमझिमचे बाबा आणि मित सोफ्यावर गप्पा मारत बसले होते.

ज्योती प्रसाद- “आपकी बातें बहोत अच्छी हैं बेटा. लगता नहीं कि  पहली बार मिले है.”

मित- “जी  शुक्रिया अंकल. बस मम्मी पापा की मेहरबानी और आप जैसे बड़ो की दूवा है.”

गप्पा करत असताना मितचा फोन वाजू लागला. त्याने तो उचलला. प्रियंकाचा होता.

मित- “हॅलो”

प्रियंका- “अरे कुठे आहेस तू. आणि किती फोन केले तुला. कमीत कमी फोन तर रिसिव्ह कर.”

मित- “अगं हो… सोर्री… मी  एका महत्वाचा कामात अडकलो होतो. म्हणून…..”

प्रियंका- “अरे म्हणून काय, येतोयस ना. उशीर होतोय नाटकाला.”

मित- “ओके. तुम्ही पोहोचले का नाट्यगृहाला”

प्रियंका- “नाही. मी आता सी. एस. टी. ला आहे.  आणि लवकरच पोहोचतेय. तू पण जिथे असशील तिथून ये लवकर”

मित – “बरं चल मी येतोय.”

त्याने फोन ठेवला.

मित – “अंकल वो कूछ ज़रूरी काम है मै वो पुरा करता हूँ तब तक आप फ़्रेश हो जाईए.”

ज्योति प्रसाद- “अरे बेटा कहा चल दिए.”

मित- “जी अंकल, वो हमारे कॉलेज का ड्रामा कॉम्पटिशन है. और हमारी कॉलेज जो ड्रामा प्ले कर रही है वो मैने लिखा है और डायरेक्ट भी मै हक कर रहा हूँ. क्या आप आना पसंद करोगे.”

ज्योती प्रसाद- “अरे नही बेटा, हम अभी इतनी दुर से सफर करके आए. अभी कुछ देर आराम करेंगे. फिर बाद मै और भी घुमना है. आप चाहो तो बच्चो को ले जाओ”

त्यांनी नजर वळवून मुलांकडे पाहीले. गिरीष एकदम थकलेल्या अवस्थेत म्हटला

गिरीष- “मै बहोत थक गया हूँ पापा मै नही जाऊंगा”

सागरीकाचेही काहीसे असेच सुर होते. रिमझिमच्या आईला मात्र नाही म्हणणे योग्य वाटले नाही. ती म्हटली

आई- “अगर नही गए तो उन्हे बूरा लगेगा. चलिए ना ”

रिमझिम आईच्या सूरात सूर मिसळून

रिमझिम- हा पापा. और हम आये ही है महाराष्ट्रा घुमने.”

ज्योती प्रसाद ( स्वतःशीच) – हाँ. और ये लडका विश्वास करना के लायक है या नही ये भी पता चल जाएगा. (रिमझिमला) सुनो तुम सब अपना मोबाईल लोकेशन ऑन रखना. मै वो लोकेशन पुलिस मे शेयर करता हूँ. ताकि वो हम पर नजर बनाए रखेंगे ”

कितीही झालं तरी स्वतः आणि एक पिता म्हणून मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे भागच होते. आसामी भाषेत केलेली ही चर्चा मितला काही कळली नव्हती.

मित त्यांना घेऊन शिवाजी नाट्यमंदीर, सी.एस.टी. ला पोहोचला. त्याच्या टीमला भेटला. त्याने टीमसोबत रिमझिमच्या कुटूंबाची ओळख करून दिली. संघरत्नला सगळी कहाणी माहीती होती. तो त्याला बाजूला घेऊन गेला.

संघरत्न- “क्या बॉस तु तर म्हटला होता की फ्रेंडशीप ठेवणार. आणि तू तर उसे घर तक …….”

मित – “ए तसं नाहीये काही….. (थोडं होकारार्थी मान हलवत) तसंच आहे काही….. पण तिला इथे मी नाही बोलावलं. फॅमिली टूर साठी आलीय इथं ती.”

संघरत्न- “अरे असू दे ना. आली ना…. मग कधी सांगतोयस”

मित- “काय?”

संघरत्न – “अरे कधी मारतोयस प्रपोज.”

मित – “काय?”

संघरत्न- “घाबरतोयस. हवं तर मला सांग मी करून देतो. आखिर दोस्त कब काम आयेंगे.”

मित- “ए फालतू कांहीही बरडू नकोस हं…. असं नाही. काहीतरी स्पेशल व्हायला हवं.”

संघरत्न- “मग काय शॅपेनच्या बाटलीत रिंग टाकून देणार आहेस का”

मित- “नाही रे. उलटा लटकून कीस करावी लागेल नाही तर ……”

दोघेही हसले.

  क्रमशः

 © कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #6 ☆ मित….. (भाग-6) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #6 ☆ मित….. (भाग-6) ☆

तासभरापासून मित मुंबई सेंट्रल स्थानकावर उभा होता. मनांत असंख्य शब्दांनी गुंफून ठेवलेल्या शब्दगंधित माला रिमझिमच्या स्वागताला बेचैन होत्या. असंख्य भावांनी चेह-यावर गर्दी केली होती. जस-जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. तिला पाहण्याची ओढ वाढत होता. ती एवढी की त्याला स्वतःचं भान नव्हतं. काहीसा घाबरलेला, काहीसा लाजणारा, काहीसा काळजीत तर काहीसा खुशीत असे असंख्य आविर्भाव लपवून चेह-यावर स्मित त्याने मोठ्या शिताफीने आणले होते. आणि ते टिकवून ठेवण्याचे त्याचे प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगे होते.  अधीरपणे तो रेल्वेची वाट पाहत उभा होता. असंख्यदा तीचा फोटो पाहूनही आणि फोनवर बोलुनही ती कशी दिसते आणि तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तो किती उत्सुक होता.  हे ती बेचैनी स्पष्ट सांगत होती. प्रत्यक्ष भेटण्याची पहिलीच वेळ असल्याने आपण तिला  कसे सामोरे जाणार याच्या विचारात तो होता.

संपुर्ण लक्ष रेल्वेकडे असतांना त्याचा फोन वाजला परंतु त्याचं लक्ष नव्हतं. बाजूलाच जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली आणि म्हटली “हॅलो युवर फोन इज रिंगीग ” त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. पण त्याच्या तंद्रीतून बाहेरच आला नाही. तो फक्त “हं….. ” एवढंच उत्तरला. आणि पुन्हा वाट पाहण्यात गुंग झाला. त्या महिलेला त्याचं असं वागणं आवडलं नसावं बहूतेक.  ती पुन्हा म्हटली ” हॅलो…” आणि दोनदा त्याच्याकडे, एकदा फोनकडे आणि बोटांनीच कानाला फोन सारखं करून इशारा केला. आणि निघून गेली.  तिचं असं तुच्छपणे बघणं मितला भानावर आणलं.पण त्याला त्याचा राग आला नाही. उलट आपल्या अधीरपणावर हसत त्याने स्वतःच हात मारून घेतला.  मोबाईल खिशातून काढेपर्यंत फोन वाजणं बंद झालं. त्याने दुर्लक्ष केलं आणि मोबाईल खिशात ठेवला. तेव्हा आवाज झाला ‘ यात्री कृपया ध्यान दे. गुवाहाटी से मुंबई आनेवाली गाडी कुछ ही देर मे प्लॅटफाॅर्म नं….. पर आनेवाली है. यात्रीयो से निवेदन है की…..’ आणि मित एकच सावध झाला. जेट विमान आपल्या सर्वोच्च वेगाने उडावे तसे त्याच्या काळजाची धड-धड चालू झाली. समोर पाहीलं तर गाडी स्टेशनवर प्रवेश करत होती. तशी त्याची धड-धड वाढत होती. गाडी थांबली. उतरणा-या प्रवाशांची लगबग सुरू झाली.  तसा मितही तीला शोधू  लागला.  पण ती त्याला भेटली नाही. तो निराश होऊन मागे फिरला आणि समोर पाहून अचानक थांबला .

(क्रमशः)

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #5 ☆ मित….. (भाग-5) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #5 ☆ मित….. (भाग-5) ☆

अनोळखी असला तरी त्याच्या बद्दल खुप आपलेपणा वाटू लागला होता. आकर्षणाला ती सहसा भुलली नसती. तीने खुप विचार करून त्याच्यासोबत मैत्री केली होती. तिचा पर्सनल नंबरही दिला होता. त्यांनी फोनवर बोलण्यासाठी  दिवसातली एक विशिष्ट वेळ ठरवून घेतली होती. रोज सायंकाळी गावच्या बाहेर असलेल्या एकांत जागेत जाऊन मित तिच्याशी बोलत असे. येण्या- जाण्याचा रस्ता मुस्कानच्या घरावरून होता. म्हणून त्या वेळी ती त्याची वाट बघत असायची. रोहित सोबत असतांना केलेल्या स्मित हास्याने ती गोंधळली होती.  आणि आता त्याचं रोजचंच दिसणं तीला त्याच्याकडे ओढत होतं.  नाजूक फुलांवर बसण्यास फुलपाखरू उतावीळ असतं. पण इथे फूलच त्या फुलपाखराला आपल्या पाकळ्यामध्ये सामावून घ्यायला उत्सुक होतं.

मितला तिच्या मनात जे काही चाललं होतं त्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पण तिचं असं त्याच्या येण्याने फुलून जाणं, डोळ्यातले भाव त्याला नुसतं पाहिल्याने बदलणं त्याच्या बद्दल  तिच्या मनात गुंफत चाललेलं जाळं तिचे अब्बा आसिफ चाचा यांच्या नजरेतून मात्र सुटलं नाही. ग्रामपंचायत सदस्य असलेले आसिफ चाचा गावातले प्रतिष्ठित गृहस्थ होते. मितचे बाबा  आणि त्यांच्यातली मैत्री सगळं गाव जाणून होते.

एके दिवशी रिमझिम त्याला म्हटली

रिमझिम- मनमीत पहचानिए हम कहाँ है

ती त्याला प्रेमाने मनमीत म्हणत असे.

मित-  कहाँ?

रिमझिम- मै नही बताऊंगी. ये आपको पहचानना होगा.

तीने कोडं पाडत म्हटले.

मित – बताओं न प्लीज

रिमझिम- नही

आणि हसली

मित – कहाँ … कहाँ ….  । अच्छा चलो कोई हिंट तो……

त्याचं वाक्य अपूर्ण राहीलं तेव्हा त्याला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला.  त्याने तिला विचारलं

मित- तुम ट्रेन मे हो?

रिमझिम- जी हाँ. मगर आपने कैसे पहचाना.

मित – ट्रेन का हॉर्न सुना.  कहाँ जा रही हो

रिमझिम- हम हमारी फॅमिली के साथ महाराष्ट्र जा रहे है . टूर पर.

हे एकून मितला आभाळ ठेंगणी वाटू लागले. जणू ढगांना गार हवा मिळाल्याने जसे ते आकाशात उंच जातात.  तसंच त्याला वाटत होते.  हर्षाने अगदी उड्या मारू लागला तो.

रिमझिम- आप दिखाएँगे हमे आपका महाराष्ट्र. हम आपके लिए एक सरप्राईझ भी ले कर आ रहे है .

मित – क्या सरप्राईझ.

त्याला धीर निघत नव्हता.

रिमझिम- सरप्राईझ सरप्राईझ होता है बुद्धू . बताया थोड़े ही जाता है.

मित- अच्छा जी. कब तक पहुँचोगी

रिमझिम- अभी तो गुवाहाटी मे है . तीन दिन तो लग ही जाएँगे .

मित ( स्वतःशीच)- केव्हा जातील हे तीन दिवस

रिमझिम- क्या?

मित- कूछ नही. आपके स्वागत के लिए बेताब हूँ मै.

त्या दिवशी मित खुप खुश होता.

” क्या होगा तुमसे सामना  होगा

दिल रहेगा मेरा या तुम्हारा होगा

थोड़ी-सी शरारत भी नही कर

पायेगा ये नादान

कुछ इस कदर तुझमे डूबा होगा

आपोआपच त्याला ह्या ओळी सुचल्या. अगदी स्वरबद्ध गाऊन त्याने त्याची मनाची स्थिती स्वतःसमोर व्यक्त केली. आणि घरी यायला निघाला. येतांना त्याला मुस्कान दिसली.  त्याने स्मित केले. पण तो त्याच्या धुंदीत होता.  तिला वाटले आपल्याला बघुन केले असावे म्हणून तिने स्वतः च लाजून खाली मान घातली. जे आसिफ चाचानी हेरले.

 (क्रमशः)

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #4 ☆ मित….. (भाग-4) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #4 ☆ मित….. (भाग-4) ☆

रोहित नेहमीच बेफिकीरीने जगणारा, कोणालाही कसल्याही बाबतीत न जुमाननारा मुलगा आज एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून मित चकित होता. तो आपल्या खुर्चीवर येऊन बसला.

मित- हं बोल, काय म्हणतोयस.

रोहित- मित दा, मला भिती वाटतेय. कसं सांगु तेच कळत नाहीये.

मित हसला.

मित – तुला पण भिती वाटते?

मितचं चिडवलेलं रोहितला आवडलं नाही.

रोहित- मजा घेतोयस माझी

मितला आता हसू आवरेना. कसं तरी त्याने स्वतःला आवरले.

मित- अरे मजा नाही घेत. सांग तुला काय म्हणायचंय ते. घाबरू नको.

रोहित – अरे काय झालं सांगू का?

आणि त्याने त्याच्यासोबत घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली.

प्रेम साधारणतः तेरा – चौदा वर्षाचा मुलगा त्याची सकाळची शाळा संपवून सायकलने घरी जात होता. दुपारची वेळ होती. म्हणून बाहेर फारसं कोणी नव्हतं. मुस्कानने त्याला हाक मारून थांबवले. पुजाही तीच्या जवळच होती. दोघीही पळत पळत त्याच्याजवळ आल्या.

मुस्कान- फोन कर त्याला

तीने हाफतच म्हटले. प्रेम तीचं म्हणनं त्याला समजलं. त्याने स्मित करत खिशातून त्याचा साधा फोन काढला. आणि रोहितचा नंबर डायल केला.

रोहित शेतात काम करत होता. त्याचे आई – बाबाही सोबतीला होते.  त्याचा फोन वाजला. त्याने नंबर पाहिला आणि उचलून

रोहित- हं बोल प्रेम.

प्रेम- घे मुस्कान बात करतेय.

मुस्कानचं नाव ऐकताच त्याच्या अंगात थर-थर व्हायला लागले. त्याने तसाच भितीने थरथरत म्हटले-

रोहित- फोन ठेव प्रेम.

शांत वातावरण असल्याने त्याचं बोलणं मुस्कान आणि पुजालाही एकू जात होते.  त्याचं असं बोलणं ऐकून प्रेम आणि मुस्कानही चकित झाले.

प्रेम- का रे ?

रोहित- तू फोन ठेव, मला भिती वाटतेय….

त्याने घाई घाईत फोन बंद केला. आणि हातातलं काम सोडून कुणालाही न सांगता तो चालता झाला. त्याचं असं न सांगता जाणं आईला खटकलं. तिने त्याला रोखले. पण तो थांबला नाही. आई म्हटली

“थांब बेटा ये संध्याकाळी मग दावते तूला”

पण ते ऐकण्यासाठी तो थांबला कुठे होता. आईला शांत करण्यासाठी बाबा म्हटले

“अगं गेला तो जाऊ दे”

आई- हो का. जाऊद्या तर जाऊद्या मग. मला काय ? हे सगळं तुम्हाला एकट्यालाच करायला लावते की नाही ते बघाच”

इकडे त्याचं असं बालिशपणे बोलण्याने मुस्कान, पुजा आणि प्रेम एकमेकांकडे बघून हसले.आणि चालले गेले

रस्ताच्या बाजूला मुस्कानचं घर होतं. रोहित जेव्हा आला. तेव्हा त्याने चोरट्या नजरेने पाहिले. त्या दोघीही ओट्यावरच बसले होते. त्याला पाहून दोघीही हसल्या. रोहितने चालणे अजून जोरात  केले.

त्याने पुर्ण एकून घेतल्यावर मित म्हटला- बरं, मग तुझं काय म्हणणं आहे?

रोहित क्षणभर गोंधळला.

रोहित- म्हणजे. मला काही कळत नाहीये. तू सांग मी काय करू ते.

मित – मी काय सांगणार? बरं फोन कर

रोहित ( पुन्हा गोंधळला) – अरे मित दा. असं नको सांगू ना. मला काहीच कळत नाहीये काय बोलायचं ते.  तू सांग काय बोलू ते

मित- अरे, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? तीने तुला फोन केला तर काहीतरी बोलण्यासाठीच केला असेल ना. तू फक्त हॅलो म्हण. ती बोलेल पुढे काय बोलायचं ते.

सायंकाळी मित आणि रोहित बाहेर गेले फिरायला. मुस्कानचे घराजवळून जातांना रोहितने मितला म्हटले  ” मित दा, ती आहे बघ” मितने वळून पाहिले आणि स्मित केले. आणि पुढे चालता  झाला. मुस्कान गोंधळली. ती त्याच्या हसण्याला काही वेगळंच समजून गेली.

 (क्रमशः)

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #3 ☆ मित….. (भाग-3) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #3 ☆ मित….. (भाग-3) ☆

(मनावर आधीराज्य गाजवणारं, हक्काने रागावणारं, रूसणारं आणि तळमळत असलेल्या मनाला हळूच स्थिर करणारं असं  कोणीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात येतं आणि सा-या जीवनाचा थकवा एका क्षणांत घालवून जातं. अशीच सोशल मिडिया अॅप द्वारे ओळख झालेली रिमझिमही आता मनाने मितच्या जवळ येऊ लागली आहे. आणि मित तर तिचा फोटो पाहताच तिच्या प्रेमात पडलाय. मैत्री पर्यत ठीक पण प्रेम ते ही कधीही न पाहिलेल्या व्यक्तीवर? हे शक्य आहे का?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात उठताहेत. ती खुप विचार करतेय. पण त्याच्या शब्दांवर तीही भाळतेय. हे आकर्षण तिचं प्रेमात बदलू शकतं का?? हे आपण पुढील भागात पाहू…..

एक महिना झाला होता मितला घरी येऊन. बाबांच्या आजाराचं डाॅक्टरांनी नुकतंच निदान केलं होतं. डाॅक्टरांनी त्यांना पुर्णवेळ आरामाचा सल्ला दिला होता. मित शिक्षित होता. म्हणून बाबांना  दवाखान्यात ने-आण करणं. औषध वगैरे वेळेवर देणं हे सगळं मितच बघत होता. म्हणून मागच्या महिन्याभरात तो होस्टेलला परतला नव्हता. विद्यापीठाच्या अगामी युवारंग महोत्सवासाठी त्याने जे नाटक लिहीलं होतं. त्याच्या तयारीसाठी तो संघरत्न आणि बाकीही त्याच्या टीमच्या संपर्कात होताच. त्याच्या गैरहजरीत श्रोतीका  आणि प्रियंका उत्तम प्रकारे ते नाटक बसवत होत्या. पण त्याची कमी सर्वांना जाणवत होतीच. तसं वेळोवेळी त्याची मदत त्या घेत होत्याच. आणि शिक्षकही होते मदतीला.

इकडे रिमझिमशी गप्पा  दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. जेव्हा तीचा ‘hi’  मॅसेज आल्यानंतर तिच्याबद्दल तो जाणून घ्यायला उत्सुक झाला.

मित- व्हेअर आर यु फ्राॅम?

त्याने प्रश्न केला

रिमझिम- आसाम. यु??

तिनेही उत्तर दिले. आणि लगेच प्रश्नही केला.

मित- ओह. वाॅव आसाम इज व्हेरी बेस्ट प्लेस यु नो. इज इन नाॅर्थ इस्ट आय थिंक??

त्याने प्रोत्साहीत करण्यासाठी लगेच म्हटले.

रिमझिम- येस. यु आर फ्राॅम?

मित- महाराष्ट्रा

रिमझिम- नाईस.

एवढं बोलून ती ऑफलाईन चालली गेली. पहिल्यांदा ते बोलले म्हणेन  मितही जास्त बोलला नाही. दुस-या दिवशी त्याने  ‘गुड माॅर्निंग ‘ चा मॅसेज केला. आणि आपल्या कामाला लागला. त्यांचं बोलणं आता रोजच होऊ लागलं.  लवकरच ते चांगले मित्र बनले. एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयी, स्वभाव जाणुन घेऊ लागले. तिलाही त्याच्याशी बोलण्यात दिवसेंदिवस रस वाढत जात होता.

आज मित घरीच होता. आई-बाबा बहीणीच्या घरी गेल्यामुळे आज त्याला दवाखान्यातही जायचं नव्हतं म्हणून दुपारच्या वेळी त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर तो निवांत बसला होता.  Hey तिचा मॅसेज आल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.

मित- आज काॅलेज नही गई

रिमझिम- नही आज छूट्टी है.

मित – ओह. ओके.

रिमझिम- जी.

मित- यार हम इतना दिनो से बाते कर रहे है. और मैने आपका नाम ही नही पूँछा आपका नाम क्या है?

रिमझिम – रिमझिम. लिखा तो है.

मित- अरे एसे नाम के आय डी फेक भी होते है. लडके फेक आय डी बना कर रखते है. इसलिए पूँछा.

रिमझिम- ये तुम लडको की प्रोब्लेम है. इसमे मै क्या कर सकता हूँ . मेरा तो यही नाम है.

आणि हसण्याची इमोजी पाठवली . त्यानेही हसण्याची इमोजी पाठवली.

मित- कोई बात नही. लेकीन नाम बहोत अच्छा है आपका. रिमझिम बरसती सावन की धार पुरे कायनात को ठंडक पहुंचाती हैं और आपकी मुस्कान आँखो को.

त्याचा हा मॅसेज वाचून ती स्मित हसली आणि “शायद” एवढं म्हटली. त्याला वाटलं लाजली असावी.

मित – शायद इसी ठंडक की तलाश मे आँखे बरसों से रिमझिम सी बारिश ढूँढ रही थी. जो आप पर जाकर रूकी.

ये मॅसेजला तीने उत्तर दिले नाही. फक्त स्मित हास्याची एक इमोजी पाठवली. त्याने जास्त वेळ उत्तराची वाट न पाहता वाचनात व्यस्त झाला.

थोडाच वेळ झाला होता. तेव्हा दारावर एक जोराची थाप पडली. “मित दादा, लवकर दार उघड” असा काहीसा घाबरलेल्या आवाजात रोहित दरवाज्यावर दार उघडण्यास सांगत होता. मित उठला आणि दरवाज्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात रोहितने पुन्हा थाप दिली.

 मित- अरू उघडतोय ना. थांबशील की नाही थोडं

मितने दार उघडलं. रोहित घाई-घाईत आत घुसला.

मित- अरे रोहित, एवढ्या कसल्या घाईत आहेस.  काय झालं?

मितने त्याला प्रश्न केला.

रोहित – अरे मित दादा. तू ये लवकर तूला एक गोष्ट सांगायचीय. लवकर ये ना……

त्याला कसलाच धीर निघत नव्हता.मित त्याच्या जवळ खुर्चीवर जाऊन बसला.

मित- हं. बोल

रोहित खुप घाबरल्यासारखा होता. पण कुठेतरी हास्यही त्याच्या ओठांवर तरळत होतं

   (क्रमशः)

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ मित….. (भाग-2) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ मित……  (भाग 2)☆

(मन प्रीतीने भरते आणि प्रेमाचा खेळ सुरू होतो. मग कधीकाळी उजाड वाटणारं रानही मग हिरवे गार मनमोहक वाटायला लागते. एक फोटो पाहून त्यावर भाळलेला मितवर त्याचा काय बदल होतोय……..)

फोटो पाहता त्याला कधी झोप लागली ते त्याला कळलेच नाही. रात्री उशीरापर्यंत तो जागा होता. आणि थंडीचे दिवस होते. म्हणून मित सकाळी उशीरापर्यंत झोपून राहीला. पहाटेची गुलाबी थंडीत त्याला झोपणयाचा अधिक मोह चढत होता. सकाळी फोन वाजला तेव्हा त्याला जाग आली. त्याने उशाखालून मोबाईल घातला आणि न पाहताच फोन उचलला आणि तसाच अर्ध झोपेत बोलायला लागला. समोरचा कणखर आवाज ऐकून त्याची झोपच उडाली. मित ” हो पप्पा मी बसतो गाडीत. सायंकाळपर्यंत पोहोचेन घरी ” आणि फोन ठेवला.

बाबांनी बोलावून घेतलं म्हणून मित घरी आला. सहा सात महिन्यानंतर तो घरी परतला होता. बाबांनी त्याला दहा -पंधरा दिवसांसाठी बोलावले होते. तसा मनमिळाऊ स्वभाव तर त्याचा होताच. पण मोठ्या शहरात शिकतो आणि उत्तम लिखाण करून ब-याच ठीकाणी त्याने बक्षिसे मिळविल्या कारणाने गावातली लोक त्याला विषेश आदराने बघायचे. त्याचं बोलणं एखाद्याला मोटिवेट करण्यासारखं असायचं. म्हणून कधी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून त्याची मित्रमंडळी त्यांच्याकडून कधी सल्ला तर कधी मार्गदर्शन घ्यायचे. गावात आल्यापासून त्याच्या भोवती मित्रमंडळ  असायचे. त्याला तशी क्रिकेटची ही भारी आवड होती. मित आला म्हणून सुमितने त्याला क्रिकेट खेळायला शाळेच्या मैदानावर बोलावले. खेळून झाल्यावर सर्व आपापल्या घरी परतले पण मित मात्र अजूनही तेथेच होता. शाळेच्या आवारात लावलेल्या झाडांजवळ जाऊन तो बालपणातल्या शाळेतल्या आठवणी जागा करू लागला. आणि एकटाच स्वतःशी हसत तर कधी गंभीर मुद्रेत तया झाडाचं आणि शाळेचं  निरीक्षण करू लागला. शेवटी तो एका निलगीरीच्या झाडाजवळ येऊन त्या झाडाला टेकून उभा राहिला. आणि गाणे गायला सुरवात केली. ” ऐ दिल तेरी मर्जी है क्या बता भी दे, खो ना जाऊ जूल्फो मे कही, बचा भी ले ” सुरेल अशा आवाजात तो हे गाणे गात होता. त्याचं आवडतं गाणं होतं म्हणून त्याने ते त्याच्या आवाजात रेकॉर्डही केलं होतं. बाजूलाच रस्त्यावरून जात असलेले रामदास अहिरेंनी ते सुर एकले. आणि त्यांच्याही नकळत त्यांचे पाय मित कडे वळले.

गाणं संपल्यावर त्याने डोळे उघडले. समोरचा अंधूक नजारा आणि डोळयात झालेला गारवा अनूभवून मित प्रसन्न झाला. त्याच्या चेह-यावर हलके स्मित आपसूकच पसरले. त्याचे गाणे एकून जणू वातावरणच रोमँटीक झाले होते. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा समोर रामदासभाऊ दिसले. त्याने स्मित हसून त्यांना नमस्कार वजा मान हलवली.   “सुरेल गातोस तू. मन अगदी प्रफुल्लित करतोस बघ” असं  म्हणून रामदास भाऊंनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. “धन्यवाद. पण तुमच्या एवढे नाही” रामदासभाऊ गावातले गीत गायन पार्टीचे संस्थापक होते. कोणाचाही घरी काही खास कार्यक्रम असला की रामदासभाऊ आणि पार्टीला हमखास बोलावणे असायचं. आणि रामभाऊही कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे सहभागी होत. ” तुझ्या बाबांनी एकदा म्हटलं होतं. पण अपेक्षेपेक्षा अधिक गोड आवाज आहे तुझा आज रात्री छगन आबांच्या घरी गीत गायनाचा कार्यक्रम आहे. ये सहभागी व्हायला ” रामभाऊंनी जास्त न घुमवत सरळ विचारले. त्यानेही स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. ” ये मग रात्री साडेनऊला ” आणि ते तिथून निघून गेले.

 ( क्रमशः )

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – कादंबरी ☆ मित….. (भाग-1) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ मित……  (भाग 1)☆

“Hi”

शेवटी तो मॅसेज आलाच ज्याची मागच्या महिन्याभरापासून मित वाट बघत होता. इंस्टाग्रामवर ” रिमझीम लवर” नाव असलेल्या त्या अकाउंटवर एका मुलीचा फोटो पाहून मित त्यावर मोहित झाला होता. कितीही झूम केला तरी फोटो फूलस्क्रीन होत नव्हता. आणि लहानशा गोलाकारात बघून त्याचे मन भरत नव्हते. म्हणून त्याने त्या अकाउंटला फाॅलो केले. प्रायवैट अकाउंट असलयामूळे “रिक्वेस्टेड” त्याच्या स्क्रिनवर दिसत होते. नाव लक्षात राहावे म्हणून त्याने स्क्रीनशाॅट काढून ठेवला. पुर्ण फोटो पाहण्याची त्याची बेचैनी काही कमी होत नव्हती. पण अशा नावाची अकाउंट्स ही मुलांची पण असतात. फेसबूक, इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल मिडिया अॅप वर बनावट आय डी ओपन करून मुलींच्या शोधात असणा-या मुलांची निव्वळ टर उडवण्यासाठी, कधी कधी जवळच्या मित्राची फजिती  करण्यासाठी अशी अकाउंट तयार केली जातात. हे त्याच्या लक्षात आलेच होते. पण फक्त जाणून घ्यावे या उद्देशाने त्याने फाॅलो रिक्वेस्ट कॅन्सल केली नाही. बेचैनी एवढी होती की क्षणभर ही धीर त्याला निघत नव्हता. पण काय करणार, रिक्वेस्ट स्विकारली तेव्हाच त्याला तिची प्रोफाईल बघता येणार होती.

आज कित्येकदा मितने मोबाईल डाटा चालू करून इंस्टाग्राम नोटीफिकेशन चेक केले होते. एव्हाना सर्वच अॅपची नोटीफिकेशन त्याने बंद करून ठेवली होती. पण आज त्याने ती पुन्हा चालू करून पुन्हा पुन्हा तपासत होता. त्यांच हे बदलणं त्याच्या गृपच्या मुलांनाही नविन होतं. काहीतरी विचारांत राहणारा, शांत शांत एका कोप-यात राहणारा, आणि कोणाचा फोन आल्याशिवाय मोबाईलला न बघणारा मित  आज मात्र मोबाईलला खुपदा चालू करून पाहत होता.

रात्रीच्या जेवणानंतर नित्य सवयीप्रमाने शत पावली करण्यासाठी कॅटीनबाहेर गेला. चालता चालता न राहवून त्याने  पुन्हा मोबाईल डाटा चालू केला.  आणि फायनली त्याला ती नोटीफिकेशन मिळाली “रिमझिम लवर अॅक्सप्ट युवर फ्रेंड रिक्वेस्ट”. ती पाहून तो आनंदुन गेला. अवघ्या काही तासांत त्याची रिक्वेस्ट अॅक्सेस्ट झाली होती. अती उत्साह न दाखवता नेहमीप्रमाणे शांत डोकं ठेऊन तो रूमवर जाऊन बेडवर पडून निवांत फोटो पाहावे असा विचार करून तो रूमवर परतला. आणि कोणाशीही न बोलता आपल्या रूममध्ये घुसला. संघरत्न, महेश आणि मित अशा तिघांची ती रूम होती. संघरत्नला उत्कृष्ट वाद्य वाजवता येत असल्याने त्याच्या बेडच्या आजूबाजू गिटार वगैरे असं त्याचं आवडतं साहित्य पडलेलं होतं. मित रूममध्ये आला तेव्हा संघरत्न कोणती तरी धुन वाजवण्यात मग्न होता. तसाच महेशही उत्तम कलाकार आणि तो छान डान्सरही आहे हे त्याचे कपडे केसांची स्टाईल आणि त्याच्या वागण्यावरून  कोणीही ओळखून घेईल. मित आला तेव्हा संघरत्न त्याला म्हटला “मित अरे बघ तूझ्या नव्या नाटकासाठी मी नविन धून तयार करतोय. ती जरा एकून सांग मला कशी झालीय ते. तुला काही सुधारणा हव्या असतील तर त्या ही सुचव.” पण मित त्याची कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणून त्याने स्मित हसून त्याला म्हटले “अरे बाळं तू आज पर्यंत ज्या धून बनवलेल्या आहेत त्या कधी फेल गेल्या आहेत का? छानच असेल ही पण. तू सुरु ठेव” मितचे असं उत्तर देणं त्याला आवडलं नाही. त्याने रागाने गिटार बाजूला ठेवली. तेव्हा मित त्याच्या जवळ बसला. “अरे डार्लिंग, रागवतोय कशाला.” संघरत्न थोडा चिडलाच होता. ” रागावतोय म्हणजे मी एवढी मेहनतीने ती धून तुझ्यासाठी बनवली आणि हारामखोरा, तू इग्नोर करतोय” आणि त्याने मान तशीच रागात वळवली. त्याची मान स्वत कडे करण्याचा प्रयत्न करत मित त्याला म्हणाला. ” अरे मेरी जान. आय लव यू बोल दे एक बार” पण तो काही मानत नव्हता. म्हणून मितने मोबाईल घेतला आणि त्याच्यापुढे केला. ” अरे बघ इंस्टाग्रामवर एक मुलगी भेटलीय. खुप सुंदर आहे यार तीने आत्ताच फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेस्ट केली म्हणुन……” त्याचं बोलणं अपूर्णच सोडत संघरत्नने मोबाईल त्याच्या हातातुन घेतला. आणि म्हटला “काय? साल्या गुपचूप गुपचूप तू अशी कारस्थाने करतोयस आणि आम्हाला माहितीसुध्दा पडू देत नाही. दाखव कोण आहे ती, कशी आहे” मित ” अरे सावकाश. मी पण पाहिलं नाही तीला अजून पुर्ण” मितने त्याच्या हातातून मोबाईल परत घेतला. आणि नोटीफिकेशन आॅन केली. स्क्रिनवर “रिमझिम लवर” नावाचं अकाउंट दिसतं होतं. साधारण आठराएक फोटो पोस्ट केले होते. अधीर असलेल्या मितने पटकन एक फोटोवर क्लिक केले. फोटो फूलस्क्रीन दिसत होता. फोटो पाहताच त्याच्या अंगावर शहारा उठला. त्याचं. ह्रदय जणू बाहेर निघून नाचू लागलं होतं. तो हसत होता कि आणखी काही. हे त्यालासुद्धा कळत नव्हतं. त्याच्या चेह-यावरचे नेमके भाव काय आहेत हे सांगण्या पलिकडचे होते.  एवढं सुंदर देखणं रूप, जणू तारूण्याची ती मिसालच होती. ते बारीक-बारीक छोटे डोळे, लांबसडक काळेभोर दाट केसं, दिसायला सडपातळ पण सौंदर्याची खाणच होती ती. तिचे ते स्मित अधिकच मोहत होते. हसतांना गालावर पडलेली खळी तीला शोभून दिसत होती. जास्त नाही पण उंच सडपातळ असलेली ती लावण्यवतीच भासत होती. तीला पाहताच त्याचं ह्रदय प्रेमाच्या सागरात हेलकावे खाऊ लागलं होतं. त्याची दिवानगी फोटोगणिक वाढतच होती. संघरत्नचंही काहीसं असंच होतं. पण मितला त्या फोटोत पुर्णपणे बुडालेलं पाहून त्याने खांदा मारत म्हटले  ” अरे साल्या, कुठे भेटला हा कोहिनूर तूला.” मित फक्त स्मित देत होता. संघरत्नला कळाले कि त्याच्या मनात काय सुरू आहे. तो त्याला चिडण्यासाठी म्हटला ” काय? डायरेक्ट विकेट…….” मितने लाजून खाली मान घातली. संघरत्न ” अबे तू पण …….”

तो चकित होता. संघरत्न जेवढा मितला ओळखत होता. त्याला माहीत होतं प्रेम वगैरे या गोष्टींत मितला रस नव्हता. त्याच्या बाबांचं म्हणनं होतं की त्याने इंजिनियरींग करावं पण मितला लिखाणात फार रस होता. त्याने त्याच्या बाबांना सरळ सांगीतलं होतं कि त्याला लेखक, दिग्दर्शक व्हायचंय. त्याच्या निर्णयाचा सम्मान करत त्याच्या बाबांनी त्याला विद्यापिठात ड्रामा डिपार्टमेंटला प्रवेश घ्यायला परवानगी दिली होती. बाबांचा विश्वास सार्थ ठरवत मितने आतापर्यंत अनेक चांगल्या कथा लिहून त्यांना स्वतःच दिग्दर्शित करून अनेक बक्षिसांवर उत्कृष्ट दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नाव कोरले होते. त्याने अनेक भयकथा, प्रेमकथा, प्रेरणादायी कथा लिहिल्या होत्या. त्याच्या शालेय जीवनात त्याने एक काव्य संग्रह ही प्रकाशीत केला होता. त्याला प्रेमकथा लिहीण्याची विशेष आवड होती. हे सांगणे अतिशयोक्तीचे नव्हते कि एवढ्या प्रेमकथा लिहीणारा मित अजूनही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला नव्हता. पण या मुलीचा फोटो पाहून तो तिच्यावर भाळला हे मात्र खरे होते. त्याने ते सर्वच फोटो कितीतरी वेळा झूम करून पाहिले होते.

 ( क्रमशः )

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113
मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 4 ☆ फुलवा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी शिक्षाप्रद कहानी फुलवा

आज भी गांवों में और यहां तक क़ि शहरों में भी लोग अंधश्रद्धावश अपना सब कुछ खो देते हैं .  यह कहानी हमें प्रेरणा देती है क़ि यदि समय रहते किसी को अंधश्रध्दा से बचाया जा सके, तो उसे एक नवजीवन प्रदान किया जा सकता है और इससे बड़ी कोई भी समाजसेवा नहीं है.

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 4 ☆

☆ कथा – फुलवा  ☆

आठवड्याचा बाजार भरला होता. कोणती भाजी घ्यावी अन् काय काय घ्यावं ह्या विचारात शिंदेबाई बाजार बघत फिरत होत्या,तेवढ्यात त्यांच्या समोर एक वयस्कर बाई आली अन् हात जोडत बाईंना म्हणाली,”. तुम्ही शिंदेबाई नां ?मला तुमालाच भेटायचं हुतं ….वाईच बोलायचं हुतं तुमच्यासंगट “!…

शिंदे बाई म्हणाल्या मी ओळखलं नाही ..

तशी ती म्हणाली “आवो ईस बावीस वर्स झाली तुमच्या साळंशेजारी आमचं खोपाट हुतं…मी आन् माज्या दोन पोरी..

माझ्या लेकीला न्हाई कां तुम्ही आक्षी मरनाच्या दारातनं वडून आनलं  देवावानी…’

शिंदेबाईंच्या डोळ्यापुढे त्या बाईच्या दोन मुली, त्यातली मोठी  म्हणजे बाईंची अगदी लाडकी !…. सगळं अगदी सगळ्या घटनांचा पट डोळ्यसम़ोरुन सरकू लागला…..

सालाबादप्रमाणे जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि  पालक शाळेत मुलांची नावं दाखल करायला येऊ लागले.तशीच शेजारच्या खोपटातली एक विधवा तिच्या मुलीला घेऊन आली.

बाईंनी त्या मुलीचं नाव विचारलं..

‘फुलवा धोंडीबा सोनावने ‘ बाईंना हे ‘फुलवा ‘ नाव फारच भावल. त्यांनी तिच्याकडं कौतुकभरल्या नजरेनं  पाहिलं. मग त्या बाईला नाव विचारताच ती म्हणाली “या बया आता मला बी साळंत घालता कां काय ?”…

तशी बाई म्हणाल्या “अहो , आता आईचंही नाव लिहावं लागतं ..”

ही नवीन मुलगी ‘ फुलवा ‘  झोपडपट्टीत रहाणारी पण नाकी डोळी नीटस ,एकदम तरतरीत,बोलके डोळे तिला पहाताक्षणीच बाईंना ती छान वाटली…

ती रोज शाळेत वेळेत यायची. अंगावरचे कपडे साधेच पण नीटनेटके.वर्गात शिकविलेलं तिला लगेचच कळायचं… वर्गातल्या इतर मुलांपेक्षा ही एकदम चुणचुणीत..!…

हळूहळू बाईंच्या लक्षात आलं की हिचं अक्षर, चित्रकला सारंकाही सुंदर आहे. अगदी वर्गाच्या साफसफाईचं काम असो, रांगोळी, तक्ते,पताका चिकटवणं सर्व काम ती मन लावून करते. सर्व उपक्रमात हिचा सहभाग.!..

आता तर ती वर्गाची सेक्रेटरी झाली होती.ती सारखी बाईंच्या मागेपुढे असायची,याचं मुख्य कारण की बाई तिला प्रचंड आवडायच्या !..अन्  दुसरं म्हणजे तिची आई मजूरीवर दूर  जायची त्यामुळे दिवसभर खोपटाला कुलूप..मग बाईच तिचा खूप मोठा आधार ….

एक दिवस नेहमीप्रमाणे शाळा भरली पण फुलवा काही शाळेत आली नाही…बाईंना वाटलं आईंबरोबर गेली असेल येईल उद्या परवा…पण ते चार-पाच दिवसांपासून ती गैरहजर.

दुसऱ्या दिवशी शाळेत येताना बाईंनी तिच्या खोपटाचा उघडलेला दरवाजा पाहून त्या तिथं गेल्या.

पहातात तो ती एकटीच एका गोधडीवर अंगाचं मुटकुळं करून पालथी झोपली होती.

बाईंनी तिच्या आईला निरोप धाडला व बोलावून घेऊन सांगितलं की मुलगी एवढी आजारी असताना तिला एकटीला ठेवून तुम्ही कामावर जाता ? तिला असं एकटीला टाकून जाणं धोक्याचं आहे.त्यापेक्षा तुम्ही तिला शाळेत पाठवा इथं ती सुरक्षित तरी राहील व इतर मुलांबरोबर खेळली तर तिला बरं वाटेल. मग ती शाळेत आली..पण आता ती पूर्वीसारखी हसरी वाटत नव्हती. मुरझल्यासारखी दिसत होती.म्हणून बाईंनी जवळ जाऊन तिला विचारलं तुला काय होतंय गं ? तशी ती एकदम रडायला लागली,  म्हणाली बाईं माझ्या पाठीत दुखतंय..! बाईंनी तिच्या पाठीला हात लावून पाहिलं तर तिथं मोठा फोड आला होता अन् तिचं अंगही तापानं फणफणत होतं.

संध्याकाळी बाई तिच्याबरोबर तिच्या घरी गेल्या. तिची आई नुकतीच मजूरीवरनं आली होती. बाईंनी तिला सांगितलं “अहो, तुमच्या मुलीच्या पाठीवर एवढा मोठा फोड आलाय ती तापलीय, तिला दवाखान्यात न्या लौकर..”

तशी तिची आई म्हणाली “छ्या…छ्या..! आवं.. दवाखान्यात न्हिऊन ती बरी व्हनार न्हाई… तिला  ‘म्होट्टी बाई ‘ झालीया ..!”

आमच्या हितल्या साऱ्यांनी सांगितलंय की हिला औषधपानी केलं तर दुखनं वाढतं..! परवा. तिला देवरुषाकडं न्हेलं व्हतं. त्यो म्हनला हिला म्होटी बाई म्हंजे मोठ्ठा फोड येतो म्हणून ती बरी होन्यासाठी ‘ देवीची मांड’ भरायला सांगितली हाय. त्यासाटनं पन्नास लिंब, पंचीस नाऱ्याळ, याक बकरं, कोंबडं, साडीचोळी असं बरंच काईबाई आनाया सांगितलं हाय.त्यासाटंनच म्या पैकं गोळा करतीया…”

बाईंनी तर कपाळालाच हात लावला अन् म्हणाल्या तुम्ही अगोदर हिला दवाखान्यात न्या.! ती मोठीबाई वगैरे काही नसतं. पण तिची आई काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिचं म्हणणं एकच ‘पैकं जमलं की’ मांड भरनार बाकी काही न्हाई ‘..!

बाई मनात म्हणाल्या या अंधश्रद्ध लोकांना काय व कसं सांगावं..?…

शेवटी शिंदे बाईंनीच धाडस करून तिच्या आईला न सांगता त्या मुलीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉ नी तिच्या पाठीवरच्या गाठीची तपासणी तालुक्याच्या गावाला जाऊन करून आणायला सांगितली. बाईंनी ते सर्व केलं. डॉ नी तिला मणक्यांचा टी‌बी.असल्याचं सांगून तिला स्टेप्टोमायसीनची नव्वद इंजेक्शन व रोजच्या गोळ्या औषधं वेळच्या वेळी दिली व सकस अन्न खायला दिले तर ही वर्षभरात बरी होऊ शकेल असं सांगितलं.

बाईंनी तिची सर्व जबाबदारी घेतली. तिला दिवसाआड इंजेक्शनला नेणं, आणणं, रोजच्या गोळ्या औषधे वेळेवर देणं हे सर्व वर्षभर केलं.

तेव्हा दीड वर्षांने ती पूर्णपणे टीबीमुक्त झाली.

दीड वर्ष बाई रोज तिच्यासाठी डब्यात पौष्टिक आहार, फळं वगैरे आणून तिला मायेनं खाऊ घालायच्या. त्यामुळे ती  खडखडीत बरी होऊन पहिल्यासारखी छान दिसायला लागली.

तिच्या आईच्या हे लक्षात आलं होतं. ती म्हणाली  “अडानी लोकांचं ऐकून म्या पोरीला देवरुषाकडं न्हेलं असतं तर उपेग काईबी झाला नसता पन् माज्या पोरीचा हकनाक बळी मातुर गेला असतां..आन् आमची पोटं मारुन साठवलेला पैका त्या देवरुषाच्या मढ्यावर घालून पश्र्चाताप करायची येळ आली असती ..पन् बाईंनी  पैका न खर्च करता सरकारी दवाखान्यात उपचार देऊन माज्या पोरीला चांगली केली.

फुलवा आता चौथीत गेली होती. ती अभ्यासात हुशार होतीच, अक्षरही सुरेख मग बाईंनी तिला इतर मुलांबरोबर शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवलंअन् ती केंद्रात चक्क पहिली आली. तिच्या आईलाही खूप आनंद झाला. चौथीची परीक्षा झाल्यावर ती पुढच्या वर्गात गेली व बाईंचीही दुसऱ्या शाळेवर बदली झाली अन् संपर्क तुटला….

शिंदे बाई बाजारातून घरी परत आल्या तशी ती मघाची बाजारात भेटलेली बाई घर शोधत आली.बाईंनी तिला पाणी दिलं. घरी आल्यावर तिला काय अन् किती सांगू असं झालं होतं…

ती सांगत होती..बरं कां बाई तुमी जिला वाचवली ती तुमची लाडकी फुलवा ल…ई.. ..शिकून आता मामलेदारीची परीक्षा दिली आन् तिला ती नोकरी पन् मिळनार हाय….! ही आनंदाची बातमी सांगाया  आन् तुमचं तोंड गोड कराया आज मी हितवर तुम्हाला सोधत आले.

खरंच ओ बाई तुमी त्या वक्ताला अक्षी देवावानी धावून आलात माज्या पोरीचा जीव वाचवलात म्हणून माजी “लेक वाचली” असं म्हणून तिला गहिवरुन आलं. बाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला शांत केलं. म्हणाल्या तुमच्यासारख्या अडाणी लोकांना ते देवरुशी लोक फसवतात अन् तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता..! ..पण तसं होण्यापूर्वीच मी तिला उपचार सुरू केले आणि तिचं दैव व परमेश्र्वर कृपा यामुळे ती वाचली. मी फक्त निमित्तमात्र…!

सगळं ऐकल्यावर बाईंना खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं आणि ती धाकटी …?

सरिता व्हय…! हितं न्हाई कां रोज साळा बुडवून माज्यासंगट कामावर मी जाईन तिकडं यायची.तिला नुसतं हुंदडायला आवडायचं.डोंगरावनं खाली पळत यायाचं पुन्ना चडून जायाचं, गुरं चारायला लांबलांब घिऊन जायाचं हेच तिला आवडायचं..!

ती भरभरून बोलत होती. आमी पुन्याला भावाकडं गेलो. तीथं तिला साळत घातली पन् हिचं धावायचं येड काही जाईना. हे तिच्या सरांच्या धेनात आलं. त्यांनी तिला

ते धावपटू का  काय म्हनत्यात त्ये करायचं ठरीवलं. तिनंबी लयी कष्ट घेतलं. आन् बाई ती धावन्याच्या स्पर्धेत पयली आली ती सोन्याचं पदक घीऊनच.

अरे..व्वा…! हे ऐकून तर बाईंना आणखीनच आनंद झाला.

थोडयाच दिवसांत फुलवा बाईंना. भेटायला आली ती मामलेदार होऊनच…!

समोरासमोर दोघींनी एकमेकींना पाहिल्यावर एकदम भरून आलं…तिनं पट्कन बाईंच्या पायाला स्पर्श केला. बाईंनी तिच्या खांद्यांना धरुन हलकेच उठवलं अन् जवळ घेत म्हणाल्या …”किती मोठी झालीस गं..!.” तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला तिला बाईंच्या प्रेमळ कुशीचा खूप छान आधार वाटला.

ती मुळातच छान होती पण आता तारुण्य आणि उच्च शिक्षणाचं एक आगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. बाई तिच्याकडं कौतुकानं पहातच राहिल्या.

फुलवा म्हणाली ..”बाई मी तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळांमधल्या गरीब व गरजू मुलींना शक्य होईल तशी मदत करणार आहे. पू. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेनुसार मुलगी दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा व अन्य खर्च उचलणार आहे…!’

‘हे सगळं करण्यात एक वेगळाच आनंद लपलेला असतो हे उमगलंय मला “.

शिंदे बाईंना तिच्या बोलण्याचं खूप कौतुक अन् तितकंच समाधानही वाटलं.

त्यांच्या मनात आलं  आपण लावलेल्या “आनंदाच्या” छोट्याशा रोपट्याला चैतन्याचे धुमारे फुटून नवं चैतन्याची फुलं बहरली आहेत…अन् ते” बाईंच्या डोळ्यापुढं वाऱ्याच्या झुळुकीनं डोलू लागलं…!!

तेवढ्यात शेजारच्या गाडगीळ काकू तिन्हीसांजेला म्हणत असलेल्या श्लोकातील शब्द कानावर आले…

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

©®उर्मिला इंगळे, सातारा

!!श्रीकृष्णार्पणमस्तु‌!!
मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे.

आज प्रस्तुत है  उनकी एक हृदयस्पर्शी कहानी  वेग वाढला आणि शर्यत संपली. हम सड़क पर भावावेश में  अपने वाहनों की गति बढ़ाकर स्पर्धा  करते हैं  और अचानक एक क्षण आता है जब स्पर्धा, दौड़ , शर्त और जीवन सब समाप्त हो जाता है. हम यह भी भूल जाते हैं क़ि हमारे साथ कई लोग जुड़े हुए हैं जो  जीवनपर्यन्त उस दुर्घटना को जीते हैं.  )

☆ वेग वाढला आणि शर्यत संपली ☆

स्पर्धेच्या मैदानावर धावतांना वेग अतिशय महत्वाचा असतो. आणि त्या वेगाला संयमाची जोड असली कि स्पर्धक स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहतो. आयुष्यही तसंच आहे अगदी स्पर्धेसारखं. इथ प्रत्येक माणुस स्पर्धा करतो आणि पळतो. आणि शर्यत जिंकतो. पण आशा काही शर्यती असतात ज्या जीवावर बेततात. माणसाला आपला प्राण गमवावा लागतो. आणि एकदा जीव गेला म्हणजे शर्यत संपते.

अशीच एक वेगाची शर्यत परवाच झाली. काही दिवसांपूर्वी जल संकटाने महाराष्ट्राला हैराण केलं होतं. त्या जखमातून महाराष्ट्र अजून सावरलेलं नाही तोच महाराष्ट्राच्या उत्तरेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक झाली. आणि वेगाचा या अघोरी खेळात तेरा ते चौदा लोकांचा बळी चालला गेला. औरंगाबादहून शहादा कडे येणारी बस समोरून येणा-या कंटेनर मध्ये अशी काही घुसली जणू बनवणा-याने त्यांना त्यांच्या मर्जी विरूध्द वेगळे बनवले असावे. बसचा निम्म्यापेक्षा जास्त भाग त्या कंटेनर मध्ये घुसला होता. दोन्हीही ड्रायव्हर सोबतच बस मधील प्रवाशांचा यात नाहक बळी गेला. याच रस्त्यावर अशाच बसेस मधुन मी ही कधीतरी प्रवास केला होता. म्हणुन मला हा अपघात जरा मझ्या भावनांना जवळचा वाटून गेला

रक्षाबंधन आणि स्वतंत्र दिवसाचे पावन पर्व साजरे करण्यासाठी मी घरी गावाकडे जाऊन आलो. गावाकडे गेल्यावर शांतता असते. कसलीही वेळ फिक्स नसते.  रोजच्या वेळेवर ऑफिसला जायचे नव्हते म्हणुन मी उशीराच उठलो.  आणि सवयीप्रमाणे हाती मोबाईल घेतला. आणि डेटा चालू केला. रात्रीपासून डेटा बंद असल्यामुळे बरेच मॅसेज पेंडींगवर होते. मी पुर्ण मॅसेज येण्याची वाट पाहू लागलो. तेव्हा कानी आवाज आला. आमच्या शेजारी राहणारी मायाबाई तीच्या एकवीस वर्षीय मुलाच्या  हाती टिफीन देता म्हणत होती कि “वेळेवर जेवून घे. जेवन परत आणू नको. पुर्ण टिफीन संपव”  तो मुलगा आपल्या आईच्या शब्दाना होकार देत चालला गेला. एका आईची आपल्या मुलाबद्दलची काळजी सहाजीकच होती.

मी पुन्हा मोबाईल मध्ये लक्ष देउन एक कवितांचा समुह उघडून साहित्यीकांच्या दर्जेदार कविता आवडीने वाचायला लागलो. काही वेळाने उठलो आणि फ्रेश होऊन मामांच्या घरी गेलो. माझ्या मामांची मोठी मुलगी तीच्या बाळंतपणाला माहेरी आलीय. ती टि.व्ही. बघत बसली होती. मी सवयीप्रमाणे तीची खोडी काढायला लागलो. तेवढ्यात टि.व्ही वर एक बातमी झळकली. *नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील निमगूळ येथे बस आणि कंटेनर मध्ये धडक* . ज्यात ड्रायव्हरसह तेरा ते चौदा लोकांचा मृत्यु झाला असं म्हणत होते. माझं लक्ष आपोआपच तिकडे वेधलं गेलं.

टी. व्ही वर दाखवण्यात येत असलेल्या चित्रफितीमध्ये औरंगाबाद-शहादा  बसची पाटी पडलेली होती. ज्यावर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत होते. निम्म्यापेक्षा  जास्त बसचा भाग कंटेनरमध्ये घुसला होता. समोरचं चित्र अगदी विदारक दिसत होतं.  बातमी पाहून सुन्न झालो. ती रक्ताने माखलेली पाटी जणू हेच सांगत होती.  वेगाची नशा करू नका. कारण वेग फक्त रक्ताची नशा करत असतो.

पाटी आणि मृत झालेल्यांची स्थिती पाहून मला त्या आईची आठवण झाली. जीने कामावर जाणा-या मुलाला काळजीपूर्वक जायला सांगीतले होते. तसंच त्या मृतांच्या आईनेही त्यांना काळजीपूर्वक प्रवास करायला सांगितलं असेल. तिनेही त्यांना पाठवतांना देवाचं नामस्मरण केलं असेल. आणि त्यांनीही आईला तसाच होकार दिला असेल. पण रस्त्यावरच्या वेगाने त्यांचा तो होकार खोटा ठरवला होता. त्यांनी दिलेले  सुखरूप पोहोचायचे आश्वासन फोल ठरले होते. त्या आईची काळजी कधीच अश्रूमध्ये रुपांतरीत झाली होती.

मामांची मुलगी ते समोरील दृश्य पाहून घाबरली होती. तिच्याही उदरात एक प्राण वेगाने वाढत होता. काही दिवसांनी त्यालाही जगाच्या या शर्यतीत पळायचे होते.तो कसं हे सगळं सहन करेल. याच विचाराने  कदाचित ती हादरली असणार.  ती अगदी अधीर होऊन मला म्हटली. “कसं काय चालवतात हे गाड्या काय माहीत. एका क्षणांत एवढ्या लोकांना संपवून टाकले. दैव असं का सूड घेत कोणास ठाऊक. काय चुक होती त्या प्रवाशांची. ड्रायव्हरच्या चुकीमुळे एवढ्या लोकांनी जीव गमवावा लागला” तीच्या या निरागस प्रश्नात मला एका आईची काळजी जाणवली. मी तीला म्हटलं “इथं ना बस ड्रायव्हरची चुकी आहे ना कंटेनरच्या ड्रायव्हरची. इथं चुकी फक्त माणसाची आहे. ते रस्ते माणसाने बनवले. ती बस आणि कंटेनर माणसानेच बनवले. त्यांना वेगही माणसानेच दिला. माणुसच त्या गाड्या वेगाने चालवत होता. आणि त्यात मेलाही माणूसच.त्यात दैव ते काय करणार?” माझ्या ये उत्तराने ती समाधानी झाली की नाही मला माहीत नाही. पण तिच्या चेह-यावरचे भाव सांगत होते. कि माणसाने सुरू केलेली ही जीवानाची शर्यत त्याच्या जीवनासोबतच संपून जाते. आणि रक्ताने माखलेली ती नाही त्याच्या कधीतरी होण्याची ग्वाही देत पडून राहते. रस्त्यावर……..

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113