मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-8 – निसर्ग चक्र आहार आणि आपली संस्कृती ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। अब आप उनकी अतिसुन्दर रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनके द्वारा  विज्ञान पर आधारित सांस्कृतिक आलेख   निसर्ग चक्र आहार आणि आपली संस्कृती ।)

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-8  ? 

 

?  निसर्ग चक्र आहार आणि आपली संस्कृती ?

 

उन्हाळ्यात जठराग्नी उत्तम कार्य करतो त्यामुळे जास्त उपवास नसतात परंतु आषाढी नंतर  मात्र पावसाळा म्हटलं की भूक मंदावते पोटाचे विकार टाळण्यासाठी काहीजण चातुर्मास तर काही लोक श्रावण महिना उपवास करतात .या काळात एक वेळेस जेवण घेतले जाते  ज्यांना शक्य नसेल ते दूध फल आहार किंवा पचायला हलके पदार्थ सेवन करतात .या महिन्यात बहुतेक सणाला नैवेद्य म्हणून उकडीचे पदार्थ जसे कडबू ,फळं, दिवे, मोदक, कढी ,खिचडी, दुधातली दशमी, मुगाची डाळ घालून भाजी असे जे पचायला सहज सुलभ असतात . *या काळात मौसाहार वर्ज्य  मानला जातो*  कारण मुळात माणूस हा शाकाहारी प्राणी आहे . मुळात हे समजून घेणे गरजेचे आहे की हे कुणी धर्म पंडीतांनी सांगितलेले नसून नैसर्गिक आहे गाईला, घोड्याला, शेळी, बकरी यांना कोणत्याही पंडीताने गवत खायला सांगितले नाही तर ते निसर्ग नियम पाळतात . जे प्राणी ओठ लावून पाणी पितात ते सर्व शाकाहारी व जे जिभेने पाणी पितात ते मौसाहारी त्यांच्या दातांंची रचना वेगळी असते माणसाला वाघ कुत्रा यांच्यासारखे सुळे नसतात . शिवाय निदान पावसाळ्यात आपण ज्यांना खातो त्यांना होणारे आजार माशा जंतू संसर्ग इत्यादी बाबींचा विचार करून वैज्ञानिक दृष्टीने ठरवलेला हा  नियम आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध हे तत्त्व सोडून कुठलीही टोकाची भूमिका नसावी, कालसापेक्ष यात  काही बदल नक्कीच ग्राह्य असतात.  महालक्ष्मी नवरात्री पासून हळूहळू तळीव पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवणारे सण येतात जसे महालक्ष्मी, दसरा, दिवाळी, नागदिवे मकर संक्रांत कारण शरीराला स्निग्धते सोबत उष्मांक मिळणे सुद्धा गरजेचे असते. म्हणून जवळजवळ सर्वच सणांना भरपूर तळलेले गोड पदार्थ (फक्त एक सुचवावेसे वाटते पूर्वी हे सर्व पदार्थ गूळ वापरून केले जात असत तसे ) असावेत .

पुढे उन्हाळ्याची चाहूल लागली की, पन्हे मठ्ठा ताक लस्सी सरबत आंब्याचा रस कुरवडी पापड लोणची या पदार्थांची रेलचेल सुरू होते . एकूणच काय तर आपली संस्कृती म्हणजे जे देहाला ते देवाला अशी आहे . स्थल काल परत्वे यात  भेद नक्कीच आहेत जसे देशावरच्या देवाला बिन मिठाचा भात तर कोकणातील देवाला भात मासे , तरीसुद्धा नारळी पौर्णिमेला नारळी भातच असतो भात मासळी नाही हे विसरू नये.

बिन मिठाचा भातच का? सुरुवातीला साधं वरण भातच का? खावा शेवटी दहीभातच का? खावा या सर्वांनाच धार्मिक सोबतच वैज्ञानिक सुद्धा कारणे आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा .केवळ धर्माला विरोध म्हणून सगळ्याला विरोध ही बाब नक्कीच मानवासाठी घातक ठरेल .जगातला कुठलाही धर्म वाईट कर्माचे समर्थन करत नाही तर आपण स्वार्थासाठी त्याचे हवे तसे अर्थ लावत असतो. हे सर्वांसाठीच घातक आहे याचा विचार होणे गरजेचे आहे अर्थातच हे सर्व माझे मत आहे परंतु  विज्ञानाची जोड नक्कीच आहे.

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #13 – Topper… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  तेरहवीं कड़ी Topper… ।  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को  हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। जीवन के सूर्यास्त के पूर्व जब हम आकलन करते हैं कि वास्तव में Topper कौन रहा?  आप भी कल्पना कर के देखिये और आलेख के अंत में कमेंट बॉक्स में अवश्य लिख भेजिये। आरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #13?

 

☆ Topper… ☆

 

दुसरी तिसरीपर्यंत ती वर्गात topper होती… त्यानंतर ती त्यांच्या गावी निघून गेली… मग आमचा संपर्क तुटला… आज जवळ जवळ तीस वर्षांनी भेट झाली, ह्या फेसबुकमुले… भेटल्यावर एवढ्या गप्पा होतील असं वाटलं नव्हतं… ३० वर्षांचा काळ खूप मोठा आहे… कसं, काय कधी अशी चौकशी करत गाडी स्वप्नांवर येऊन थांबली… ह्या स्टेशनवर आम्ही जरा जास्तच मोठा hault घेतला…

साहजिकच होतं ते म्हणा… सुरुवातीला उघडपणे बोलणं थोडं कठीण गेलं… पण मग आतली सगळी जळमटे काढून टाकता आली…

काही नाही गं, एकदा संसारात पडलं की सगळं मागे पडतं, नवरा, मुलं, घर, नातेवाईक, सासू सासरे ह्यांना खुश ठेवण्यात दिवस जातात, आपलं असं काही करता येत नाही… कारण इथेही topper राहायचं असतं… तो मान मिळवायचा असतो… त्यात अयोग्य काहीच नाही… आपणच निवडलेली नाती आहेत ना, मग त्यात काय एवढं…

अशी सुरुवात झाली, आणि आज कालची मुलं किती हुशार आहेत, त्यांना किती साऱ्या गोष्टी माहीत असतात ह्या विषयावर भरभरून बोललो… बोलताना दोघींच्या लक्षात आलं की, कुठे तरी चुकतंय… काही तरी राहून जातंय ह्याची जाणीव तीव्र झाली… आणि मग, जे व्हायला नको होतं तेच नेमकं झालं…

थोडं दुःख वाटू लागलं, आपण करिअर केलं नाही ह्याचं…

मी तिला एक किस्सा सांगितला…

काही वर्षांपूर्वी बंगलोरला असताना मराठी अभिनेत्रीशी गप्पा मारायचा योग आला, तेव्हा त्या जे बोलल्या त्याचा मी माझ्या आयुष्याशी संबंध लावू शकते…

त्या म्हणाल्या… लग्नाआधी सिने सुष्टी असेल, नाटक असेल सगळीकडे खूप काम केलं, पण लग्न झाल्यावर माझ्या जीवनातील priorities बदलल्या, आणि त्या स्वीकारून मी पुढे चालत राहिले, जवळ जवळ 15 वर्ष मी ह्या इंडस्ट्री पासून दूर होते, नवऱ्याची बदली जिथे होईल तिथे त्याच्याबरोबर गेले, घर संसार मुलगा ह्यातच रमले, अभिनयाला विसरले नाही, पण आता त्याच्याकडे बघायची वेळ नव्हती… हे मनाशी पक्क होतं… एवढंच सांगते, माझ्या नवऱ्याला आणि मुलाला जेव्हा माझी साथ हवी होती तेव्हा ती मी दिली… आज मी हक्काने मला जे करायचं आहे ते करते, कारण मी माझी जबाबदारी योग्य वेळी पूर्ण केली आहे, आता मला माझी space हवी आहे… आणि ती मी घरातल्या सगळ्यांकडे मागू शकते… पण त्यासाठी मला 15 वर्ष द्यावी लागली .. आधी द्यावं लागतं निःसंकोचपणे आणि मग जे हवंय ते मिळवणं सोपं जातं… प्रत्येक वेळी माझी space माझी space करून चालत नाही, नाही तर नात्यातील space वाढेल हे लक्षात ठेवायला हवं… धीर सोडून चालत नाही ! अहो, साधं उदाहरण घ्या, एक महिना नोकरी केल्यावरच तुम्हाला पगार मिळतो… अगदी एवढं व्यवहारी राहून पण चालत नाही… तेव्हा येतंय ना लक्षात काय करायचं आहे ते ?

काय, तुम्हालापण पटतंय ना !

आम्ही दोघी ह्या विचारला मनात घोळवत पुढच्या कामाला लागलो…

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प आठवे # 8 ☆ स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! . . . समाज पारावरून . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये  स्त्री भ्रूण हत्या जैसी एक सामाजिक विकृति पर विचारणीय आलेख “स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! . . .  समाज पारावरून . . . !”

 

☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ  – पुष्प  आठवे # 8 ☆

 

☆ स्री भ्रूण हत्या  एक समाजविकृती ! ☆

आजकाल तरूण पिढी विवाह बद्ध झाल्यावर हम दो हमारा एक  असा विचार सर्रासपणे करताना आढळून येते.  मग  अशा वेळी  *आपला वंश पुढे नेण्यासाठी  आपले नाव लावणारा मुलगाच  आपल्याला हवा* अशी मानसिकता प्रत्येकाने  राजरोस पणे करून घेतली आहे.  उच्च शिक्षित समाजात याचे प्रमाण जास्त आहे. या साठी पैशाच्या बळावर गर्भ लिंग तपासणी करून योग्य ती खबरदारी घेण्याची चढाओढ आपापसात लागली आहे. अपत्य जन्माला घालणारी माता देखील कधी कधी स्वेच्छेने या प्रकरणी होकार देऊन दोषी ठरत आहे.  स्वार्थ साधू वृत्ती  असल्याने  मला  अमुक एक हवे आहे त्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार आहे हा दुराग्रह स्त्री भ्रूण हत्या समस्येचे मूळ बनला आहे.

मुलीला पणती मानण्यात धन्यता मानणारे स्वतःवर वेळ आली की  मुलाला जन्म देण्यात जास्त धन्यता मानतात.  आज समाजात *मुलगा झाला* या बातमीत सामावलेला  आनंद  आणि *मुलगी झाली * या बातमीतील खेद विसरून चालणार नाही. ही समाज मानसिकता बदलायला हवी.

गर्भातील  अपत्य जर स्त्री भ्रूण  आहे असे समजले तर तीला  गर्भातच नष्ट करण्यासाठी हजारो प्रयत्न केले जातात. यात समाज विकृती हे महत्वाचे कारण आहे  असे मला वाटते. जोपर्यंत  कुटुंब या प्रकरणात  दोषी ठरत नाही तोपर्यंत मुलगा हवा हा दुराग्रह समाजात पहायला मिळणार.  विवाह करताना जात, पात ,  धर्म  इत्यादी बंधने झुगारून जेव्हा आपण विवाह बंधन स्विकारतो तेव्हा च खर तर  एकमेकांनी शपथ घ्यायला हवी की  गर्भजल परीक्षण न करता  आम्ही  अपत्यास जन्म देऊ.  मुलगा  असो वा मुलगी  आम्ही तितक्याच  आत्मियतेने अपत्याचे पालन पोषण करू.

आज वैद्यकीय सेवेत असलेल्या ब-याच जणांनी या सेवेस व्यवसायाचे स्वरूप दिले आहे.  पैसा फैको नीट तमाशा देखो हा वाक्प्रचार दुर्दैवाने प्रत्येक  क्षेत्रात लागू पडतो  आहे. माणसाला माणूस पैशाच्या बळावर विकत घेतो आहे हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. गर्भपात  करणे,  गर्भलिंग तपासणी हे गुन्हे  आहेत हे मान्य असूनही कित्येक सुशिक्षित तो गुन्हा करून मोकळे होतात.  आज मी समाजाचा आहे  या ही पेक्षा माझ्या मुळे समाज आहे ही भावना  माणसाचं माणूस पण हिरावून नेते आहे.

“लेक द्यावी श्रीमंताघरी अन सून आणावी गरीबा घरची ” हा  विचार केव्हाच मागे पडला आहे.  एकटय़ाच्या  पगारात भागत नाही हे कारण पुढे करून भरमसाठ पैसे कमवायचे  आणि याच पैशाच्या जोरावर हवी तशी मनमानी करायची या वृत्ती मुळे आज मुलींची संख्या कमी होत चालली आहे. जातीत मुलगी मिळत नाही म्हणून परजातीय विवाहास मान्यता दिली जाते. पण तिथे ही मुलगा हवा  असा आग्रह दिसल्याने विचारांचे मागासले पण  या समस्येला  अधिक खतपाणी घालते.

समाजातील विविध ठिकाणी  मुलगी वाचवा म्हणून विविध  उपक्रम राबविले जात आहेत. पण कौटुंबिक पातळीवर मात्र *वंशाचा दिवा* कसा  आपल्या घरात तेवत राहिल या कडे लक्ष दिले जात आहे.  नास्तिक मनुष्य देखील मुलगा झाल्यावर देवदर्शन करायला जातो आहे. ही समाज विकृती बदलायची असेल तर प्रत्येकाने  स्वतःच्या कुटुंबापासून या चळवळीची सुरवात केली पाहिजे.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात # 8 – पंढरीची वारी ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी  पंढरपुर  वारी  से संबन्धित  स्मृतियाँ।  उनकी स्मृतियाँ अनायास ही हमें याद दिलाती हैं कि समय के साथ संस्कार जो हमने विरासत में पाये हैं आधुनिकता, व्यावहारिक एवं स्वास्थ्य कारणों से बदलते जाते हैं। किन्तु,  आस्थाऔर मान्यताएं बनी रहती हैं।  सुश्री प्रभा जी ने इस विषय पर बड़ी ही बेबाकी से अपनी राय रखी हैं एवं मैं भी उनसे पूर्णतः सहमत हूँ। 

आज प्रस्तुत है उनका यह पठनीय आलेख “पंढरीची वारी ”।   

अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 8 ☆

 

☆ पंढरीची वारी ☆

 

वर्षानुवर्षे लोक श्रद्धेने वारीला जातात, इतका काळ ही प्रथा टिकून आहे हे खरोखर विलक्षण आहे, लहानपणापासून आषाढी कार्तिकी एकादशी चा उपवास केला जातो, आमचं ग्रामदैवत सोमेश्वर त्यामुळे घरात सगळे शिवभक्त, नाथपंथिय असल्याने गोरक्षनाथाची बीज आणि शिवरात्र हे घरात होणारे उत्सव! माहेरी कोणी वारीला गेल्याचं स्मरत नाही…नसावंच!

सासरी आल्यावर सासूबाई विठ्ठल भक्त, दर एकादशी चा उपवास करणा-या धार्मिक, सासरे पालखीच्या दिवसात वारक-यांना जेवण देत ती प्रथा मोठे दीर जाऊ बाई अजूनही पाळतात, दोनशे-अडीचशे वारकरी जेवायला येतात !

माझ्या मनातही विठ्ठलभक्ती आहे लग्नानंतर !….संत परंपरेचा आदर आहे पूर्वीपासूनच!

वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण म्हणाली, आपण आळंदी ते पुणे वारी बरोबर येऊ चालत मी हो म्हटलं, पहाटे स्वारगेटहून बसने आळंदीला गेलो आणि वारीत सामिल झालो…. प्रवासात कोणी कोणी खिचडी, पोहे असं काही खायला देत होते ते खात होतो फक्त पाण्याची बाटली बरोबर होती, संध्याकाळी पुण्यात शिवाजीनगर ला पोहोचलो, तिथून रिक्षा पकडून मैत्रीणीच्या घरी गेलो, तिच्याकडे पिठलंभात करून खाल्ला! माझे पाय सुजले होते चालल्यामुळे, त्या मैत्रीणीने तेल गरम करून माझे पाय चोळून  दिले ही तिची सेवा चिरस्मरणात राहणारी…वारीमुळे निर्माण झाली ही मैत्रीतल्या कृतज्ञतेची भावना! वारीतला तो अनुभव- आळंदी ते पुणे… छान होता, पण फार भक्तिभावाने किंवा भारावलेपणाने ओथंबलेला नव्हता!

आता कालच एका मैत्रिणीचा फोन झाला ती आळंदीच्या पालखीबरोबर चालत पंढरपूर ला गेली…वारीतले फोटो, भारावलेपण….. मला स्वतःला आता  यापुढे कधीही वारीत जायची इच्छा नाही…पण जे जातात त्यांच्या स्टॅमिन्याचं विशेषतः साठी ओलांडलेल्यांचं कौतुक आहे, आत्ता एका तरूण मुलाला विचारलं ,”वारी बद्दल तुझं मत काय? “तर तो म्हणाला ” दोन दिवस पुण्यातले रस्ते बंद होतात, वाहतूकीत आडथळे एवढंच मत आहे बाकी काही नाही”, मी आत्ता सोसायटीच्या कृष्णमंदिरात बसलेय आणि हा तरूण अनोळखी, मंदिरात दर्शनाला आलेला, पुजा-याशी मराठीत बोलत असल्यामुळे मी त्याच्याशी बोलले! वारी एक आश्चर्य, अस्मिता…. पण मला स्वतःला वारीचं विशेष आकर्षण नाही, ईश्वरवादी, आस्तिक असूनही!

देह त्यागताना

डोळाभर दिसो

आत्म्या मध्ये वसो

विठ्ठलचि॥

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #12 – अंतर… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  बरहवीं कड़ी अंतर… ।  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  आज पढ़िये अंतर… ।  वास्तव  में सम्बन्धों में दूरी एवं मर्यादा  का  स्थान, काल, समय, उम्र एवं जिम्मेवारी का कितना महत्व है  न । फिर उससे भी अधिक सम्बन्धों में  समर्पण की भावना। आरुशी जी के  संक्षिप्त एवं सार्थकआलेखों का कोई सानी नहीं।  उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #12  ?

 

☆ अंतर… ☆

 

कितीक हळवे कितीक सुंदर,

अपुल्यामधले अंतर…

हे गाणं खूप जवळचं आहे… ह्यातील अपुल्यामधले अंतर हे दोन शब्द मनाचा ठाव घेतात… आणि एक प्रकारचं समाधान देऊन जातात…

मैत्रीला जपत असताना, त्या नात्याला फुलवत असताना, दोघांमधील मर्यादा लक्षात घेऊन त्या मर्यादांचा आदर ठेवणे, खरंच वाटतं तेवढं सोपं आहे का?

नक्कीच नाही ! पण स्थळ, काळ, वेळ, वय, जबाबदारी ह्याचं भान ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे नाही !

हे अंतर जास्त असलं तरी एका हाकेत नष्ट होतं, खूप समजूतदार असतं, खोल असतं, अनेक क्षणांना एकत्रित गुंफलेलं असतं, मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त असतं, ओंजळीत सुरक्षित असतं, बंद डोळ्यात बहरतं, शब्दांमध्ये अबोल असतं, स्वप्नांमध्ये जागं असतं, आठवणींचे झंकार छेडीत स्वरमय होऊन जातं, भरती ओहोटीच्या लाटेवर आरूढ होऊन किनारा शोधत असतं, नदीच्या पाण्याप्रमाणे प्रवाही असतं… !

हे अंतर म्हणजे प्रेमळ मन लागतं, आणि त्यातून निर्माण होणारे समर्पण, अवघ्या विचारधारेला ग्रासून टाकत हृदयस्थ होतं !

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख-संस्मरण – ☆ देवकुंड वारी ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  उनका एक आलेख -संस्मरण  देवकुंड वारी  ।)

 

☆ देवकुंड वारी  ☆

 

वसंतात वसुंधरने

हिरवी शाल ओढली

पावसाच्या अमृत धारेने

अवघी सृष्टी खुलली

कोकण दर्शन तेही पावसाळ्यात करतांना वरिल ओळी सहज सुचुन जातात. आजचे अनुभव हेच उद्याची आठवण बनून रहातात. आणि या आठवण मालिकेचे भाग रोजच अनुभवायला मिळतात. असाच माझा एक अनुभव “देवकुंड वारीचा”. देवकुंड धबधबा तसा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करणारा. आणि आषाढ म्हटला म्हणजे पर्यटकांना ती निसर्ग सफरीची मेजवानीच असते. याच मेजवानीचा आस्वाद मी आणि माझे सवंगडयांनी पुरेपुर घेतला.

मागच्या शनिवारी आमची देवकुंड वारी झाली. माझा मित्र, मित्र काय जिवच म्हणा. मित्र आणि परिवारात भेद न करणारा. आणि घरच्या सदस्यांप्रमाणे मैत्री निभावना-या माणसाला अजुन काय म्हणणार ?  तसं उगाच कोणाला महान बनवणारा माझा स्वभाव नाही. पण माणुस जरी योग्य असला तर बनवायला हरकतही नाही. त्याला बनवण्याची गरज नसते. तो असतो. असो.

शनिवार, रविवार दोन दिवस त्यांच्या कंपनीला सुटी होती. या सुटीचा आनंद घ्यावा. म्हणुन त्याने आणि त्याच्या कंपनीच्या मित्रांनी मिळुन हा भन्नाट प्लॅन केला. मला ज्यावेळी मेहुल आणि सागरने सांगीतलं तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. कारण नवनवीन ठिकाणी विषेशतः निसर्गरम्य ठिकाणी जाणं आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं मला खुप आवडते. म्हणुन माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी सहाला रूमवरून निघालो. खबरदारी म्हणुन सागरने भेळ घेतली. आणि मेहुलने चटणी-पोळ्या घेतल्या. जवळपास एक तास वाट पाहिल्यानंतर एकतानगरच्या बस स्टॉप वर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो. वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेले आमचे मित्रांना सोबत घेतले. तोपर्यंत नऊ वाजले होते. पुण्याच्या बाहेर एका हाॅटेलवर थांबून नाश्ता केला. आणि नऊ वाजेच्या सुमारास आमची गाडी देवकुंडच्या दिशेने निघाली. बाहेरचं वातावरण पावसाचं होतं. पाऊस अधुन मधुन रिमझीम तर कधी जोरदार पडत होता. वातावरणात गारवा, पर्वत माथ्यावर जमलेले ढग, आणि पृथ्वीच्या पाठीवर पसरलेली हिरवाई असं निसर्गाचं सौदर्य न्याहाळत आम्ही निघालो होतो. दरम्यान एका ठिकाणी गाडी थांबवली. तेथे छानपैकी धुकं जमलं होतं. रस्त्याच्या कडेने पाणी वाहत होतं. तेथे काही वेळ घालवला. फोटो सेशनही झाले. आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तत्पूर्वी पाटणुस या गावी आम्हाला गावात नुसतं प्रवेश करण्याचे प्रत्येकी दहा रूपये द्यावे लागले. आम्हाला नवल वाटले. पण ‘जैसा देश वैसा भेस’ असं करत पैसे दिले. आणि पावती घेऊन निघालो.

पुढे गेल्यावर गाडी पार्क केली. धबधब्याकडे जाणा-या मुख्य रस्ताजवळ पोहोचलो. तेथे आमच्याही आधी बरीच गर्दी जमा झालेली होती. तेथे जाऊन आम्हाला कळले कि येथेही प्रत्येकी पन्नास रुपयांची पावती घ्यावी लागेल. त्या पावतीसाठी आम्ही बराच वेळ तेथे उभे राहीलो. अगदी बोअर झालं होतं सगळ्यांना. नंतर कसंतरी आम्हाला पावती भेटली आणि शेवटी आमची स्वारी धबधब्याच्या दिशेने निघाली. जाण्यासाठी पायवाट होती. पाऊस सुरू असल्याने  चिखल झाला होता. तसाच चिखलाचा कधी दगडाचा तर कधी डोंगरातुन वाहत्या पाण्याचा रस्ता तुडवत जंगलातून आम्ही साधारणतः दिड तासाच्या जंगल सफारीनंतर धबधब्याजवळ पोहोचलो. दरम्यान आमचे काही मित्र दुस-या रस्त्याने पळाले होते. ते पोहोचले तेव्हा आमचं फोटोसेशन सुरू होतं. मेहुल आणि त्याच्यासोबत आलेले मुलं पाण्याच्या पलिकडे होते. म्हणुन पाण्यात उतरलो आणि दुस-या बाजुला गेलो.

सगळेजण सोबत झालो तेव्हा आम्ही पाण्याशी मनसोक्त मस्ती केली. फोटो काढत असतांना तोल जाऊन त्या पाण्यात एक माणुस वाहुनही चालला होता. पण काही दुर वाहत गेल्यावर पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तो थांबला. त्याला पाण्यातुन काढण्यात आले. आम्हीही पाण्यासोबत खेळून थकलो होतो.

एक तर वरून पडणारे पावसाचे पाणी आणि धबधब्याचे थंड पाणी यांची जुगलबंदी मला महागात पडली. मला खुप थंडी भरली होती. ती एवढी कि मला पाण्याचा एक थेंबही नको वाटत होता. आणि परततांना पुन्हा ते पाणी पार करून पलिकडे जावे लागणार होते. सर्वांनी केलेही. पण मी मात्र जाण्याच्या स्थितीत नव्हतो. मी जेव्हा सागरला म्हटले कि मला खुप थंडी वाजतेय. तेव्हा मला त्याने परत जायला सांगीतले. दोनदा मी  पाण्यातुन परत आलो. तेव्हा त्यांच्या कंपनीचे प्रोडकशन मॅनेजर विकास सरांनी मला पाण्याच्या बाहेर काढले. आम्ही परत यायला निघालो. यावेळी रस्त्यात चिखल अधिक झाला होता. आणि जाणा-या येणा-यांची गर्दीही वाढली होती. बाकीची मुलं पुढे पळत निघुन गेले. मागे आम्ही विकास सर, आकाश सर, सागर, सुजीत, मेहुल आणि मी असे काही जण राहीलो होतो.

एका ठिकाणी बसुन आम्ही सोबत आणलेली भेळ आणि पोळीवर ताव मारला. सागरने जेव्हा सांगीतले की कपिल कविता लिहीतो. तेव्हा स्वाभाविकच एखादी चारोळी ऐकायचं मन होतंच तसं विकास सरांनी मला म्हटलंही कि या वातावरणात तुला सुचत असलेली एखादी कविता एकवं. पण खरं तर माझी मनस्थिती तशी राहीली नव्हती. म्हणुन त्यांना चारोळी ऐकवू शकलो नव्हतो.

चिंब भिजलीय पावसात अवनी

झाला आहे हिरवाईचा गजर

उंच अशी ही पर्वतराजीही गुलाबी झालीय

घेऊनी लाजेने ढगांचा  पदर

पर्वतमाथ्यावर निर्भिडपणे फिरणा-या ढगांना पाहुन असं वाटत होत कि, एखाद्या नव्या नवरीने लाजुनी डोक्यावर पदर घ्यावा तसा त्या पर्वतावर ते ढग भासत होते. आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ते सौदर्य अगदी मोहक दिसत होते. आम्ही परत गाडीजवळ आलो. ओले कपडे बदलून कोरडे कपडे घातले. आणि परतीच्या  प्रवासाला लागलो. घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले होते. पण दिवसभरात जो अनुभव आला तो अविस्मरणीय होता. अगदी न विसरता येणारा असा. आणि हाच अनुभव उद्याची  अविस्मरणीय आठवण बनून नेहमीच स्मरणात राहील…..

 

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा

जि. नंदुरबार

मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ पुष्प सातवे # 7 ☆ कुठे चाललोय आपण? . . .  समाज पारावरून . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “कुठे चाललोय आपण? . . .  समाज पारावरून . . . !” ।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प सातवे  # 7 ☆

 

☆ कुठे चाललोय आपण? . . .  समाज पारावरून . . . ! ☆

 

*जमाना बदललाय भाऊ* असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या  आपले रहाणीमान बदलले.  चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून  आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.

सासुबाई  नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये  आल्या.  मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता  अशा पेहरावात  आले. नातवंडे मुलांच्या  इच्छेने वाढू लागली.  वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे  आणि वेळप्रसंगी  आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.

मौज मजा,  ऐषोराम,  एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी  उपयोगात  आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर  पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम  आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे  अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली.  गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली.  शेतातल घर  अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले.  आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले.  शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस  आलेले  उत्पन्न वाटून घेताना  उगाचच कुरकुरली.

समाज पारावर देखील  अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे.  आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा.  बदलत्या जमान्यात *माणूस  ओळखायला शिकले पाहिजे*  हेच वारंवार कानी पडते. हा माणूस  ओळखायच्या स्पर्धेत  आपण मात्र  कंपूगिरी करत  आहोत.  आपल्या  उपयोगी पडणारा तो आपला.  गरज सरो नी वैद्य मरो या  उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे.  बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत  असले तरी  आर्थिक विषमता  हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.

आपण सर्व जण ज्या मार्गाने जात  आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार  अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले  अवाजवी महत्त्व माणसाला  एखाद्या वळणावर तो एकटा  असल्याची जाणीव करून देत आहे.

माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला  आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा  आग्रह करणारे  आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत  आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र  एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात  एकमेकांना धरून रहाते.

मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत  असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत  सर्व जीवन प्रवास चालू आहे.  संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी  ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी  सद्य परिस्थिती आहे.  नवीन पिढीला  आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना  आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर  असणाऱ्या छप्पराचे ,  त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.

नव्या वाटेने चालताना  जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा  आपली माणसे  आपल्या सोबत  असावीत.  नव्या जमान्यात वावरताना  आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.  आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा  इतके जरी  आपण ठरवले तरी मला वाटत  आपण माणसांना घेऊन, माणसासोबत  आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. होय ह्रदयापासून ह्रदयापर्यत.

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 7 – आकार…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं। अब आप श्री सुजित जी की रचनाएँ  “साप्ताहिक स्तम्भ – सुजित साहित्य” के अंतर्गत  प्रत्येक गुरुवार को  पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता  “आकार…!”। )

 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #6☆ 

 

☆ आकार…!☆ 

 

कुभाराचं ते मातीची भांडी घडविणारं चाक मला कायमच जवळच वाटत गेलं.   फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देताना त्याचा हात चुकत नाही पण त्याच्या आयुष्याचा आकार  मात्र नेहमीच चुकत गेला. हे अस का होतं? परंपरागत व्यवसाय स्विकारताना त्याच्या  आयुष्याचं मातेरं का व्हावं?

त्याचं  आख्खं आयुष्य गेलं ह्या फिरत्या चाकावर मातीला हवा तसा आकार देण्यात पण हे चाक कधी त्या कुंभाराला  हवं तसं फिरलंच नाही. आणि परिस्थितीला हवा तसा आकार त्याला  कधी देताच आला नाही.

या कुंभाराची लेकरं लहान असताना, त्यांची कित्येक स्वप्न त्याने, नाईलाजास्तव, प्रापंचिक  अडचणींच्या,

पायवाटेवर  चिखलात तुडवताना मी पाहिली आहेत.  तो कुंभार मी कवी. तो निर्मिती करत गेला आणि त्याची तुटपुंजी कमाई पहाताना मी हळवा होत गेलो.

आणि त्या कुंभाराच्या सुखस्वप्नांच्या चिखलाची त्यांच्या साठीच नव नवी हवी तशी  विविध आकाराची भांडी तो बनवत गेला. त्याचं जगण त्याच्या स्वप्नांना आकार  देत गेलं .

तो कुंभार  आता थकलाय. इतकी वर्षे संभाळून ठेवलेल्या परिस्थितीचा घडा आता, हळूहळू पाझरू लागलाय.त्याच्या  पायाखालचा चिखलही आता पहील्या पेक्षा कमी झालाय कारण आता…

त्याच्या लेकरांनी आपआपल्या स्वप्नांचा चिखल

आपआपल्या पायाखाली तुडवायला सुरवात केलीय

पुन्हा नव्याने परिस्थितीला, त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी….!

हे वास्तव मला जाणवलं. ते मनात रेंगाळत  असतानाच माझ्याही मनात  एका कवितेने  आकार घेतला. .

तोपर्यंत तो कुंभार त्याचा जीवनप्रवास साकार झाला होता. मातीच्या भांडयान कलेचा आधार घेतला होता. त्याची मुलही मातीची भांडी बनवतात. वापरण्यासाठी नाही तर सिरॅमिक पॉट शोभिवंत फुलदाणी म्हणून. . . . !

 

© सुजित कदम, पुणे 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ चरखा ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  किन्तु, इस आलेख  में आप उनके स्वराष्ट्र प्रेम की भी झलक पाएंगे। आज प्रस्तुत है उनकी स्मृति में  गांधीजी के चरखे  एवं चरखे से जुड़े ऐतिहासिक तथ्यों को  वर्तमान से जोड़ता हुआ  शोधपूर्ण आलेख   “चरखा ।) 

 

☆ चरखा 

 

दिनांक ५-११-२०१७ च्या सकाळ सप्तरंग मधील प्रा.उत्तम कांबळे यांचा “सेवाग्राम मधील प्रार्थना आणि चरखा” हा लेख वाचला.त्यांचे सर्वच लेख मला खूप आवडतात.कारण लेखनाच्या आधी ते जिथं जिथं फिरस्तीला. जातात आणि तिथं ते जे जे पाहतात त्यावर त्यांचं लगेचंच वास्तववादी व जिवंत प्रतिक्रिया देणारं लेखन असतं, त्यामुळे ते मनाला चटका लावून जातं.

आत्ताचा लेखही म. गांधींच्या चरखा विषयाचा. पवनार येथील पूज्य विनोबांच्या आश्रमातल्या प्रार्थनेचा. मी विचार करु लागले,चरखा हा माझाही अत्यंत जिव्हाळ्याचा. माझ्या लहानपणी मला आठवतं माझे काका – काकू घरी रोज चरख्यावर सूत कातून त्या सुताच्या गुंड्या बनवून पुण्यातल्या खादी ग्रामोद्योग मध्ये देऊन त्यापासून विणलेले सर्व कपडे वापरीत असत.

१९५१ ते १९५८ अखेर माझं प्राथमिक शिक्षण खंडाळा-पारगाव पुणे-सातारा रोडवरचं. येथे झालं.शाळेत त्यावेळी ती बेसिक शाळा होती. तिथं आम्हाला मेंढ्यांची लोकर वर्गवारी करुन, लोकर स्वच्छ करून ती छोट्या धनुकलीने पिंजून त्याचे पेळू तयार करून त्या लोकरीचे सूत चरख्यावर कातून त्यापासून हातमागावर घोंगड्या  विणण्याचा मूलमंत्र मिळाला होता.

घरी आणि शाळेत सतत चरखा सोबतीला असल्यानं तो माझ्या जिव्हाळ्याचा.पण गेली कित्येक वर्षात मला त्याचं साधन दर्शनही झालं नाही, आणि कांबळे सरांनी मला ते त्यांच्या लेखातून करविलं त्यामुळं मला अक्षरशः भरुन आलं स्वातंत्र्यपूर्व काळात चरख्यानं अख्ख्या भारताला,भारतातील खेड्यापाड्यातील आबालवृद्धांना, सुशिक्षीत अशिक्षितांना,सामान्यातील सामान्यांना बापूजींच्या चरख्याने गती दिली होती.

खेडोपाडी स्वदेशीची चळवळ उभी राहिली.स्वदेशी चळवळीने देश व्यापला. एवढासा चरखा पण तो देशव्यापी ठरला. मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र अख्ख्या भारताला  मिळाला तो चरख्यामुळे. समानतेचा संदेश दिला तो चरख्याने !

कित्येकांना रोजगाराची हमी दिली ती चरख्याने. लोकांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण केला गेलातो चरख्यामुळे.

१५  आगष्ट १९४७ ला इंग्रज भारत देश सोडून गेले पण जाताना देशाचे दोन तुकडे करून त्यांची कोट हॅट पॅन्ट आपल्याला ठेऊन गेले जे आजही आपण आवडीने वापरतोय! पण त्यांनी काही आपलं कोट टोपी धोतर त्यांच्या देशात नेलं नाही.

आमच्या साताऱ्यातील ज्येष्ठ समाजसेविका मा.अंजलीताई महाबळेश्वरकर  म्हणाल्या की, आपल्या लोकांना ब्रॅंडेड व इंपोर्टेडच कपडे आवडायला लागले.आपल्या लोकांना स्वदेशी कपडे आवडत नाहीत.आपल्या देशाच्या हवामानाला खरम्हणजे सुती कपडेच योग्य !पण लोकांनी त्याकडे पाठ फिरवल्यानं चरखे व हातमाग आपोआप मागे पडले.

इंग्रजांनी भारतात आल्यावर मुंबईत कापड गिरण्या सुरू केल्या. इथून कच्चा माल तयार करून तो स्वत:च्या देशात नेऊन त्याचा पक्का माल करून ते भारतातल्या लोकांना महागड्या किंमतीला विकून आपल्यालाच लुटत राहिले.

स्वातंत्र्यानंतर आपल्या गिरण्यांच्या मालाला उठाव नसल्याने त्या तोट्यात येवू लागल्या, व एकेकाळी सोन्यासारखं वैभव असलेल्या मुंबईच्या कित्येक गिरण्यांना टाळेबंदी आली व लाखो कुशल कामगार बेकार होऊन अक्षरशः देशोधडीला लागले.

आज हे लिहितानाही माझे डोळे पाणावलेत.तर प्रत्यक्ष ज्यांनी भोगलं त्यांना काय झालं असेल.?

७ आगष्ट रोजी शासनाने हातमागदिन म्हणून साजरा करण्याचे मागीलवर्षी जाहीर केले आहे. तेव्हा देशवासियांना विनंती करावीशी वाटते, की प्रत्येकाने किमान एकदातरी चरखा हातात घेऊन पहावा. त्यावर सूत कातताना आपली होणारी एकाग्रता आपल्याला आयुष्यात किती उपयोगी पडते. मोबाईल व टीव्ही मुळे मंद होत चाललेल्या आपल्या मेंदूला चालना मिळून तो किती कार्यक्षम होतो ते पहा. त्याबरोबरच किमान बंद पडलेले हातमाग व पश्र्चिम महाराष्ट्रातल्या सूतगिरण्या ज्यामध्ये शासनाचे अमूल्य भांडवल वाया जाते आहे त्या पुन्हा सुरू होतील, हजारो बेकार हातांना चांगला रोजगार मिळेल. !

जय हिंद जय महाराष्ट्र!!

 

©®उर्मिला इंगळे, सातारा 

दिनांक :-८-७-१९

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #11 – स्पर्शगंध… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

 

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  ग्यारहवीं कड़ी स्पर्शगंध…  सुश्री आरूशी जी  के आलेख मानवीय रिश्तों  को भावनात्मक रूप से जोड़ते  हैं।  आज पढ़िये स्पर्शगंध… एक वार्तालाप, संभवतः स्वयं से? इस शृंखला की  कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी  – #11  ? 

 

☆ स्पर्शगंध… ☆

 

जाणिवेत पुरून उरतो तो…

कळतंय का, मी काय म्हणत्ये ते?

असाच आहेस, सगळं माझ्याकडून ऐकायचं असतं तुला, हो ना!

पण खरं सांग, हा अनुभव तुलाही आलाय ना !

म्हणजे बघ ना, फुलं हातात घेतली की त्यांचा मुलायम स्पर्श गुदगुल्या करतो, चेहऱ्यावर आपोआप हास्य खुलतं, आणि ह्याचा स्पर्शाचा सुगंध अंगभर पसरतो, दरवळतो… तो परिमळ अवतीभोवती प्रसन्नता ठेवून जातो…

एखाद्या तान्ह्याला उचलून घे, मग बघ काय होतं ते… इंग्लिशमध्ये bundle of joy म्हणतात ते उगीच नाही… ते गोंडस रूप डोळ्यात भरून घ्यावं, त्याच्या इवल्या इवल्या बोटांचा स्पर्श हृदयाचा ठाव घेतो… त्याला खाली ठेवलं तरी निरागसतेचा गंध वातावरण उत्साही करतो… एक निर्मळ आनंद देऊन जातो… नवनिर्मितीचा ध्यास पूर्ण करतो, नवीन नात्यांची वीण गुंफू लागतो…

शाळा सुरू व्हायच्या आधी नवीन पाटी, पुस्तकं, वह्या, दप्तर ह्यांच्या स्पर्शाने जीवनाची दिशा ठरवली जाते, आणि ज्ञानरुपी सुगंधाने आयुष्य समृद्ध होते… हा स्पर्शगंध आयुष्य घडवतो, माणूस घडवतो…

बरसणारी प्रत्येक सर मातीच्या कणाकणाला स्पर्शून जाते, आणि सृजनातल्या तृप्ततेचा गंध आसमंताला गवसणी घालतो…

असाच असतो हा स्पर्शगंध… हवाहवासा… जसा तुझ्या मिठीतील स्पर्शातून भावनांना मोकळं करून जबाबदारीच्या गंधातून आपलं अस्तित्व टिकवणारा…

क्षितिजाला नजरेनेच स्पर्शून स्वप्नांचा दरवळ आयुष्य जगायला शिकवतो…

सूर्योदय, सूर्यास्त ह्यांची बात काही वेगळीच आहे… जन्म ह्या जाणिवेला क्षणोक्षणी फुलवत, विधात्याच्या परीस स्पर्शाने, आपल्या पावलांचे ठसे मागे ठेवत अनुभवाचा गंध मृत्यूला सामोरं जायची शक्ती देणारा असतो…

कळतंय का तुला?

आता तू काय म्हणणार आहेस हे तुझ्या स्मित हास्यातून कळतंय बरं…

माझ्यावरील प्रेमामुळे तू हे बोलतोस, पण तुझा स्पर्शगंध अंग अंग मोहरून टाकतो, जो आर्ततेच्या स्पर्शातून पूर्णत्वाच्या गंधाकडे नेतो… तुझ्या विचारांचा स्पर्श जेव्हा शब्दांमधून गंधाळतो, तेव्हा समर्पणाची गझल बनते, जसा तुझ्या ओठांचा स्पर्श होताच मुरली संगीत सुगंधाचे वेड लावते…

मग तुझं माझं असं काही उरत नाही, कारण तो स्पर्शगंध तुझ्या माझ्यातील अंतर नष्ट करून सावळ्या रुपात विलीन होतो…

 

© आरुशी दाते, पुणे 

Please share your Post !

Shares
image_print