(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की तृतीय कड़ी अथांग …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
सहज डोकावले… तसं डोकावायचं काही कारणही नव्हतं… पण किती वर्षांपासून हे करायचं राहूनच गेलं होतं… राहून गेलं होतं की मी ते मुद्दामून करत नव्हते…?
त्याने काय फरक पडणार आहे? गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात… मग उगाच दोष, आरोप वगैरे कशाला…?
असो, तर मी काय म्हणत होते?
काहीच नाही गं, तू आता काही बोलूच नकोस… फक्त ऐक…
पण काय ऐकू?
शांत हो, गप्प बस, डोळे बंद कर आणि ऐक सगळं…
म्हणजे?
काहीच बोलायचं नाही?
…………………….
सगळं कसं शांत झालं होतं. थोडंसं कोरडं कोरडं वाटत होतं. मी जरा अस्वस्थच झाले होते. पण आज पर्याय नव्हता. एकेक आवाज नाहीसा होऊ लागला, तशी माझी उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक क्षणी काय घडतंय ह्याकडे लक्ष जायला लागलं. हळू हळू रंगही नाहीसे झाले, तरंग शांत झाले, तसे शहारे बोलू लागले.
सुरुवातीला अर्थ लागत नव्हते, पण आता काठावर बसून समोरच्या डोहातील माझं प्रतिबिंम्ब दिसत होतं, ते माझं आहे ह्यावर विश्वास ठेवताना अनेक गोष्टींनी
मनाभोवती फेर धरायला सुरुवात केली आणि… आणि पुन्हा गोंधळ, आरडा ओरडा, कोलाहल… असं वाटायला लागलं जणू कडेलोट होतोय, त्या डोहात जर मी पडले तर नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरेल.
नाही, नाही, मला ह्यातून बाहेर काढा, मला जगायचं आहे, हा आक्रोश सुरू झाला… जगण्याच्या धडपडीमध्ये, गटांगळ्या खात खात, त्या थंड पाण्याची बोच सहन करत पोहत राहायचे होते, थांबले तर, होत्याचं नव्हतं होणार हेच माहीत होतं.
आजही नेमकं तेच झालं… हात पाय मारत राहिले, पण एक वेळ अशी आली की माझ्या संघर्षामध्ये मी कुठेच नव्हते… हे लक्षात आलं…
म्हणजे?
ह्याचं उत्तर शोधायलाच हवं. ह्या संघर्षात मी नाही, असं कसं होईल ?
म्हणजे, बघ हं, ह्या डोहाकडेच बघ ना… पाऊस पडला की ह्यात पाणी साठणार, मग लोकं ते पाणी वापरणार, कोणी दगड मारतील, कोणी पोहायची मजा घेतील, कोणी माझ्यासारखे असतील, जे पाण्यात उतरायला कदाचित घाबरतील. आणि पाण्यात उतरले तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहताना जीव मेटाकुटीला येईपर्यंत जीव वाचवायचा.
हाच डोह जेव्हा नदीला जाऊन मिळतो, तेव्हा आपल्याला फार कष्ट घ्यायला लागत नाहीत, नाही का! वाहणे आपोआप चालू राहते. तेव्हा एकच दिशा असते, समुद्राची अथांगता गाठणे, होय ना !
फारसं काही कळत नव्हतं. म्हणून मग पाण्यातून बाहेर येऊन काठावर बसले. आणि डोकावू लागले.
प्रपंचरूपी डोहाला सर्वस्व मानून, जगण्याच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले होते. ह्यातून मार्ग काढत भक्तिमय नदीचा एक भाग बनून परमेश्वराच्या अथांगतेमध्ये झोकून द्यायचं आहे, ह्याची जाणीव झाली, आणि… सगळं शांत झालं, एक अनुभूती मनाचा ताबा घेऊ लागली, जीवाला सतत अस्वस्थ करणारी भावना नष्ट होऊन सगळं हलकं वाटू लागलं, जणू मी पाण्यावर तरंगते आहे. अथांग… !
(स्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की द्वितीय कड़ी स्वतःपण… । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )
स्वतःशी बोलता आलं पाहिजे,
बोलता बोलता थांबता आलं पाहिजे…
हे कसं जमायचं?
ह्याच विचारात स्वतःशी कधी बोललेच नाही,
आणि जेव्हा बोलले, तेव्हा,
स्वतःची ओळख पटेना !
मी कशी आहे, कशी असायला पाहिजे, कशी होते,
का होते, असे अनेक प्रश्न रुंजी घालतात…
उत्तरांच्या जंजाळात मी स्वतःचं स्वतःपण विसरून जाते…
(हमें आपको यह सूचित करते हुए अत्यंत प्रसन्नता का अनुभव हो रहा है कि सुश्री आरुशी दाते जी को हाल ही में साहित्य संपदा द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा में उनकी कविता “वसंत” को द्वितीय पुरस्कार से सम्मानित किया गया है। e-abhivyakti की ओर से आपको हार्दिक बधाई।
आप e-abhivyakti में प्रकाशित पुरस्कृत कविता “वसंत” को इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं >>> http://bit.ly/2YTTIFX )
प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की प्रथम कड़ी Space । इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे।
ती रुसली आहे हे त्याला माहित होतं, त्यानेही तिचा रुसवा जाण्याची वाट पाहिली… ह्या वाट पाहण्यात दोघांनी स्वतःला योग्य वाटली ती उत्तर घेऊन पुढे वाटचाल केली… मागे फिरण्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला…
योग्य अयोग्य ठरवायला मौनातल्या शब्दांना आधारच उरला नव्हता… स्वतःच स्वतःचे पाऊल त्या वाटेकडे न्यायचे नाही हा निर्धार पक्का झाला होता… ती म्हणते हेही माझे प्रेमच आहे, त्याला स्वातंत्र्य देण्याचे …
पण त्याला काही सांगायचं होतं का? असेल तर मग तो काही बोलला का नाही… ? तिच्या मनात हे प्रश्न अजूनही रुंजी घालत आहेत …
तो बोलला नाही, म्हणजे त्याची संमती होती का? की ती त्याची वाद संपवण्याची नवीन युक्ती होती?
Space… space…
की दोघांमधील अंतर?
सामनजस्यातून निर्माण केलेलं?
विचारांच्या स्पेस मधून फिरणं फार कठीण आहे…
ह्याची जाणीव होईल तेव्हा वेळ आणि काळ आपली कामं उरकून पुढे गेलेली असतील का?
अनेकविध प्रश्नांच्या गुंत्यातून बाहेर पडताना एक गोष्ट नक्की लक्षात येईल की आपण विणलेलं जाळं, आणि त्याचं गारुड आपल्यावर नक्की परिणाम करतं हे नक्की !
☆डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्यातील नाते☆
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा राष्ट्र निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर जी के १२८ वीं जंयती पर “काव्य विचार मंच द्वारा राज्यस्तरीय लेख प्रतियोगिता हेतु रचित शोधपूर्ण लेख जिसमें डॉ आंबेडकर जी एवं रमाई जी के सम्बन्धों का उल्लेख मिलता है।) )
उजेडाच्या झाडाखाली, रमा मातेची पाखर.
शब्दा शब्दांतून झरे, तिच्या स्नेहाचा पाझर.. . !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक उजेडाच झाड. रमाबा ई आंबेडकर या नावाची पखरण वैवाहिक जीवनात होताच हे उजेडाच झाड आपल्या कार्य कर्तृत्वाचा परीघ वाढवीत गेलं. रमा वलंगकर हे रमाबाईचे माहेरचे नाव. भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये इ. स. 1906 मध्ये रमाबाई आणि भीमराव आंबेडकर विवाह बद्ध झाले. चौदाव्या वर्षी बाबासाहेबांचे दोनाचे चार हात झाले. अवघ्या नऊ वर्षाची रमाई बाबासाहेबांची सहचारिणी झाली आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले.
गतीमान आयुष्याची, नितीमान वाटचाल
भवसागरी झेलली, सुख दुःखे दरसाल. . .!
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. माहेरची परीस्थिती जेमतेम होती. कुठलाही डामडौल नाही दिखावा नाही. अत्यंत साधेपणाने हा विवाह संपन्न झाला आणि रमाबाईच आयुष्य गतीमान झालं. दाभोळच्या बंदरात वडील मासेमारी करायचे. तीन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार असताना घरच्या जबाबदाऱ्या लहानग्या रमा ला स्वीकाराव्या लागल्या. फुलत्या वयात आई, वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून या उजेडाच्या झाडाखाली विसावली.
वैवाहिक जीवन सुरू झाले पण कष्टमय जीवन पाठराखण करीत होते. सासू, सासरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यावेळी रमाई ने बाबासाहेबांना वयाने लहान असूनही खूप मोठा आधार दिला. मायेचं छत हरवलेली रमा प्रतिकूल परिस्थितीचा प्रत्येक वार पावसाची सर झेलावी इतक्या सहजतेने झेलत होती.
जेव्हा रमा वयात आली तेव्हापासून हे मृत्यू सत्र ती अनुभवीत होती. ‘पोटच्या मुलाचे निधन’ हा ही धक्का रमाबाई ने कणखर पणे पचवला.
मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या अजाण वयात रमाईच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. इ.स. १९१३ साली बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार यांचे निधन झाले. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना मुलगा रमेशचा याचे अकाली निधन झाले. १९१७ सालच्या ऑगस्ट मध्येच बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई यांचे निधन झाले. याच दरम्यान मुलगी इंदू, रमाईचा दिर, आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा यांचे निधन झाले . हे मृत्यू सत्र एकोणीशे सव्हीस पर्यंत चालूच राहिले इ.स. १९२१ मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू अविस्मरणीय दुःख या काळात पचवावे लागले. भीमराव आणि रमाई दोघांनी परस्परांना धीर देत,स्वतःला सावरत या परिस्थितीतून मार्ग काढला. रडत बसण्यापेक्षा पडेल ते काम करून संसार सावरण्याची रमाई ची जिद्द महत्वाची ठरली.
संसारात प्रतिकूल परिस्थिती पाठ सोडत नव्हती. प्रसंगी शेणी,गोव-या थापून त्या बाजारात विकून संसार सावरला. भल्या पहाटे उठून रस्त्यावर पडलेले शेण उचलून आणायचे काम सोपे नव्हते पण मोठ्या जिद्दीने रमाई कष्ट करीत राहिले. तिने केलेले हे कष्ट भीमस्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक वेळी उपयोगी पडले.
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी अतिशय बिकट परिस्थिती आलेली. कुटुंबाची खूपच वाताहत होत होती. दुष्काळाच्या आगीत सारे कुटुंब होरपळत होते भीमरावांच्या समकालीन निष्ठावान कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही आर्थिक मदत रमाई ला देऊ केली. . तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्विकारले नाहीत. स्वाभिमानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी झगडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर.
अनेक नातलगांचे मृत्यू पहाताना रमाई खचत गेली. पण हार न मानता भीमस्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बाबा साहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून काही दुःखे स्वतः पचवीत गेली.त्यांना तातडीने कळविले नाही. परदेशा गेलेल्या बाबासाहेबांना रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. ज्ञानसाधना करताना कुठलाही अडथळा नको म्हणून काही परिवाराचे हालअपेष्टा, संसार खस्ता रमाई ने स्वतः सहन केल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशी असताना . रमाई एकट्याने संसाराचा डोलारा सांभाळत होती.. घर चालवण्यासाठी तिने शेणी, गोवर्या विकल्या .. सरपणासाठी वणवण फिरत, पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत ती जायची. त्या वेळी बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते या बातमीने बाबासाहेबांना कमी पणा येईल . म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर, रमाई वरळीला जाऊन गोवर्या थापायची काम करायची. मुलांसाठी उपास तापास करत रमाई भीमरावाच्या भीमस्वप्नांना आकार देत गेली.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेले बाबासाहेब जेव्हा समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले,तेव्हा ही रमाई अर्धपोटी उपाशी राहून बाबासाहेबांना भक्कम साथ देत गेली. तिच्या सहयोगाने बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करु लागले, पण रमाई ने त्या ज्ञानसाधनेत कधी व्यत्यय येऊ दिला नाही. रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने ,स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत तर केलीच पण पत्नीची सारी कर्तव्ये चोख पार पाडली.
संकटांचा केला नाश, ध्येय पूर्तीचाच ध्यास
कधी ऋतू विरहाचा, कधी सौभाग्याचा श्वास. . !
नाही धडूत नेसाया,तरी हार ना मानली.
भरजरी फेट्यातून, परिस्थिती हाताळली. . !
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या स्वागताला सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर मुंबई बंदरात आले होते. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी देखील नव्हती. अशावेळेस बोभाटा न करता रमाई ने मोठ्या शिताफिने हा प्रश्न सोडवला. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा त्याची साडी नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी रमाई सामोरी गेली.
डॉक्टर बाबासाहेब रमाई ला रामू म्हणून हाक मारायचे. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने संपूर्ण बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना शुभेच्छा देत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र या सा-यातून लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते त्या गर्गेदीतून वाट काढीत रमाई जवळ गेलेत्यांनी विचारले,” रामू तू लांब का उभी राहीलीस? ” तेव्हा रमाई म्हणाली,” तुम्हाला भेटण्यासाठी समाज बांधव आतूर झालेले असताना मी तुमचा इथे वेळ घेणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. आपण एकमेकांना कधीही भेटू शकते” हे पारिवारीक नात रमाई ने जीवापाड जपले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाई प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायची. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर , प्रत्येकाशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात, वाचनात , महत्वाच्या कामात आहेत, नंतर सवडीने भेटा.” असे सांगे. अशी पाठवण करताना रमाई प्रत्येकाचे त् नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत त्या व्यक्तीला नोंद करून ठेवण्यास सांगत.
मानव्याची उषःप्रभा, असणारी, तमाम भीमलेकरांची संजीवनी रमाई संस्काराचे ज्ञानपीठ, मनोमनी रूजवीत गेली. संसार करताना आलेले अडीनडीचे दिवस, शिताफीने दूर केले. अनेक छोट्या मोठ्या गृहोपयोगी वस्तूची सचोटीने विक्री करून पै पे जोडत परीस्थिती सावरणारी रमाई बाबासाहेवांच्या जोडीने समाज कार्यात सहभागी झाली.दागदागिन्यांचा सोस नसलेली रमाई दुसर्याला आनंद देण्यासाठी जगली.
रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली रमाईचे शरिर अतोनात केलेल्या कष्टाने पोखरुन गेल होते.दरम्यान रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच गेला. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. पण कुठल्याच औषधोपचारारला रमाईचे शरीर साथ देईना. या काळात बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे ती बोलू शकत नव्हत्या. आपल्या रामूला बाबासाहेब स्वतः औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असे. पण काही केल्या रमाईचा आजार बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला . २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांची रामू बाबासाहेबांना सोडून गेली.
बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात बाबासाहेबांनी या भावना शब्दांकित केल्या आहेत. . ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला तेव्हा अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’ आपल्या पत्नीबद्दलच्या,रमाई बद्दलच्या या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या. आणि रमाई भीमराव यांच नात समाज बांधवांच्या काळजात घर करून राहिल.
मान द्यावा, मान घ्यावा, ही रमाईची शिकवण आजही भीम लेकरांच्या मनी, एक एक साठवण.. म्हणून शिलकीत आहे पोलादी पुरूष झालेली रमाई जीवनाच्या वादळात कधी डगमगली नाही. भीमरावाच्या कार्याला, तीन दशकांची साथ देणारी रमाई, अनाथांची नाथ… झाली. अशी, माता, पत्नी, गुणी कन्या जगती आदर्श ठरली. ‘रमा ची रमाई झाली’ तिला समाजाने, मान दिला. तिचे स्वागत सहर्ष… सर्व ठिकाणी केले गेले. तिच्या कर्तृत्वात, संस्काराची मोतीमाळ हीती. तिच्या कार्याची प्रेरणा, सदा सर्वकाळ… मना मनात तेवत राहिल.
घटनेचे शिल्पकार डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जेव्हा जेव्हा घेतल जाईल तेव्हा तेव्हा ही माता रमाई आसवांची शाई बनून जगताला सांगत राहिल.
(सुश्री प्रभा सोनवणे जी हमारी पीढ़ी की एक ज्येष्ठ मराठी साहित्यकार हैं । उनका यह संस्मरण आलेख/संस्मरण निश्चित ही हमारी समवयस्क पीढ़ी को अस्सी के दशक के दिन याद दिला देगा। )
मनस्वी, अविचाराने, अव्यवहार्य असं मी अनेकदा वागलेली आहे.
आई वडिलांची भीती वाटायची, धाक होता. खरंतर चाकोरीबध्द आयुष्य असायला हवं होतं, पण मी चाकोरी बाहेरचे अनुभव घेतले,आठवीत असताना मुली म्हणाल्या कुठेतरी सहलीला जाऊ, एक मैत्रीण म्हणाली, “हिच्या शेतावर जाऊ” – म्हणजे माझ्या, आई परवानगी देणं शक्य नव्हतं, मैत्रिणीच्या शेतावर, जवळच जाणार असं सांगितलं, आमचं गाव, शेत पंधरा किलोमीटर होतं, एसटी नं जावं लागणार होतं जवळ कंपासबॉक्स साठी वडिलांनी दिलेले पैसे होते ते खर्च केले, ट्रीप चा आनंद घेतला, सहाजणी गेलो होतो, सहल छान झाली, त्या सहलीवर आशा देव नावाच्या आमच्या मैत्रिणीने कविताही केली, अर्थातच संध्याकाळी आईला समजलं, बोलणी खावी लागली, पण एक वेगळा अनुभव घेतला! लग्न अतिशय जुन्या मताच्या घरात झालं, हातात बांगड्या, डोक्यावर पदर! मैत्रिणीबरोबर ब्युटीपार्लर मध्ये गेले तिथे ब्युटीशियन म्हणाली, कुरळ्या केसांसाठी बॉयकट बेस्ट, मैत्रीण म्हणाली तिच्या घरी चालणार नाही!पण मी एक दिवस जाऊन बॉयकट करून आले, पण स्ट्रीक्टली डोक्यावर पदर घेऊन वावरले! १९८३ सालची गोष्ट!
कवितेमुळे बाहेरचं जग दिसलं, बॉयकट, बांगड्या न घालणं याला मान्यता मिळाली….म्हणजे कुणी नावं तरी ठेवली नाहीत! कवितेच्या कार्यक्रमांना जाणं हे माझ्यासाठी दिव्यच होतं, विरोध पत्करून बाहेर पडले!
येरवड्याच्या शाळेत नोकरी साठी अर्ज करा,नंतर सुट्टीत बी.एड.करा असे एका सुहृदाने सुचवलं! पण जिद्द, महत्वाकांक्षी काहीच नव्हतं,
पुढे स्वतःचा दिवाळी अंक सुरु केला तिथेही चिकाटी कमी पडली, पुढे एका मोठ्या अंकाच्या संपादकाने स्वतः फोन करून संपादकीय विभागात आमंत्रित केलं, दोन महिने बिनपगारी काम केले, पैसे त्यांनी दिले नाहीत मी मागितले नाहीत, हा अव्यवहारीपणा!
पण त्याची खंत वाटली नाही, तो एक चांगला अनुभव होता, बस रिक्षाचे पैसे अक्कल खाती जमा!
अविचाराचे अनेक प्रसंग घडले, पण मी हे स्वतःच मान्य करते मी आळशी आणि बिनमहत्वाकांक्षी बाई आहे त्या मुळे *जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया*
स्वतः कष्ट करून अर्थार्जन करायला हवे होते असे वाटते कधी तरी, पण फार खंतही वाटत नाही! कारण तसं सुखवस्तू आयुष्यच वाट्याला आलं कुठलं ही चॅलेंज नसलेलं!
माझ्या इतर जावांपेक्षा माझं आयुष्य वेगळं आहे, फक्त घरात रमले असते तर आयुष्य वेगळं झालं असतं, मी शिस्तबद्ध, गृहकृत्यदक्ष, संसारी अजिबात नाही, पण गृहिणीपद ब-यापैकी सांभाळले, रांधा वाढा उष्टी काढा इती कर्तव्य अजूनही चालूच आहेत!
(श्री सुजित कदम जी का यह आलेख वास्तव में हमें पुस्तकों की दुनिया से रूबरू कराता है। यह एक शाश्वत सत्य है कि आज पुस्तकों के पाठक कमतर होते जा रहे हैं और यहाँ तक कि पुस्तकालयों का अस्तित्व भी खतरे में है। यह आलेख समाज में पुस्तकों के महत्व को अवगत कराता है।)
आयुष्यात आपण किती कमवलं ह्या पेक्षा किती वाचलं हा विचार जोपर्यंत आपण करत नाही..तो पर्यंत आपण फक्त श्वास घेण्यापूरता जन्माला आलोय असं समजावं..,कारण पुस्तके वाचताना आपल्याला पुस्तकातली एखादी व्यक्तीरेखा आपलीशी वाटू लागते..
ती व्यक्तीरेखा आपण जगत जातो.. किबंहूना जगत असतो..,अशा एक ना अनेक पुस्तकातून आपणच आपल्याला नव्याने घडवत जातो.
ही जडण घडण होताना समाजाचा एक भाग बनून रहाता आल पाहिजे. जहालाशी जहाल आणि मवाळाशी मवाळ संवाद साधता आला की माणस आपोआप जवळ येतात. पुस्तकांसारखे ती ही बरंच काही शिकवून जातात.
आवडत्या पुस्तकाची तर आपण कित्येक पारायण करतो .. का? तर त्यात कुठेतरी, आपल्याला मनासारखं जग, जगण्याची जिद्द, समाधान, वास्तवतेचं भान, आणि योग्य दिशा असं बरचं काही मिळत जातं ..
आपण माणसं… एक वेगळ्याच विश्वात वावरत असतो..जोपर्यंत आपल्याला आपला फायदा दिसत नाही तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही…,!
वाचनाचे फायदे म्हणाल तर…,ते माणसांच्या स्वभावा प्रमाणेच बदलत जाणारे आहेत.., काहीना पुस्तक जिवापाड आवडतात तर काहींना पुस्तकं वाचताना झोप येते..,!
आयुष्यास कंटाळून आत्महत्ये सारखा विचार करणाऱ्यानी…एकदा तरी पुस्तकांना आपलंस करून पहावं…! आजकालच्या मुलांना पुस्तकं वाचता का..?
विचारल्यावर.., आम्ही फक्त आभ्यासाची पुस्तकं वाचतो हेच उत्तर मिळत..खरतरं…,शाळेच्या पुस्तका बाहेर ही पुस्तकांच भलमोठं जग आहे हे त्यांना कळतच नाही..!
शाळेची पुस्तकं आपल्याला चौकटीतलं जग दाखवतात तर साहित्यिक पुस्तकं आपल्याला चौकटी बाहेरच जग दाखवतात….!
एकदा वाचनाची आवड निर्माण झाली की आपोआप वाचनाची सवय लागते. वाचनाची सवय व्यासंगात रूपांतरित होते. सुखाच्या दुःखाच्या काळात ही पुस्तके समाजातील आपले स्थान बळकट करतात.
आपण जे वाचतो ते विचारात येतं. विचारातून आचारात येतं, आणि आचारातून कृतीत येतं. वाचनाचे संस्कार व्यक्तीला अनुभवाचे विचार म॔थन करायला शिकवतात. ज्ञान देण्याच कार्य पुस्तके करतात. ते स्वीकारण्याचे कार्य आपले आहे. मत परिवर्तन आणि समाज प्रबोधन करण्याचे प्रचंड सामर्थ्य वाचनात आहे.
म्हणूनच जाणकारांनी म्हणून ठेवलय, ”ज्याने वाचल तो वाचला आणि ज्याने साचवलं तो सडला!”
आणि म्हणूनच …, आयुष्यात आपण किती कमवलं ह्या पेक्षा, किती वाचलं ? हा विचार जोपर्यंत आपण करत नाही..तो पर्यंत आपण फक्त श्वास घेण्यापुरते आणि आपल्या प्रथमिक गरजा मागविण्यात पुरते जन्माला आलोय असं समजावं..,!
(सुश्री ज्योति हसबनीस जी की लेखनी में एक अद्भुत क्षमता है किसी भी वस्तु, शब्द अथवा भावों को परिभाषित करने की अथवा किसी भी विधा में साहित्य रचने की। संभवतः ‘मोरपीस’ अथवा ‘मोरपंख’ अथवा ‘मोर का पंख’ अनायास ही हमारे नेत्रों के समक्ष न केवल मोर के उस कोमल पंख की झलक दिखलाता है अपितु यह आलेख बचपन से लेकर अब तक की हमारी स्मृतियों में विस्मृत करने हेतु पर्याप्त है।)
एखाद्या शब्दाची कशी आपली एक स्वतंत्र ओळख असते, अस्तित्व असतं. त्याचं दिसणं, असणं, जाणवणं, अगदी रंग, रूप, स्पर्शासकटच अगदी खास त्याचं त्याचंच असतं . गुलाब म्हटला की पाकळ्या पाकळ्यातून डोकावणारा राजबिंडा रूबाब अगदी रूतणाऱ्या काट्यासकट डोळ्यासमोर येतो, तर मोगरा म्हटला की अगदी श्वासा श्वासात भरभरून तनमन धुंद करणारी मोगऱ्याची ओंजळच नजरेसमोर येते, तर प्राजक्त बकुळीचं नाव जरी उच्चारलं तरी नाजुक फुलांचा अंगणभर पडलेला सडा आणि तो नाजूक दिमाख मिरवणारं श्रीमंत अंगणच डोळ्यासमोर साकारतं! रंग रूप स्पर्श गंधाचं अवघं जगच त्या त्या शब्दांमध्ये सामावलेलं असतं.
असाच एक शब्द मोरपीस ! माझ्या फार फार आवडीचा ! कुणी स्तुती केली, जरा शब्दांनी मला कुरवाळलं की अगदी गालावर मोरपीसच फिरवल्याचा भास मला होतो. मोरपीसाचा मुलायम स्पर्श, त्याच्या लोभस रंगछटा, त्याच्या सौंदर्याचं गारूड इतकं आहे ना मनावर की ते सारं मला त्याक्षणी जाणवतं आणि ते शब्द जणू मोरपीसच होऊन माझ्या गालावर आणि नकळत मनातच रूंजी घालू लागतात !!
मोरपीस…बालपणातला अमूल्य खजिना ! पुस्तकात दडवलेलं /दडपलेलं मोरपीस म्हणजे जणू कुबेराची श्रीमंतीच आपली! केवढा तोरा ते ऐश्वर्य मैत्रिणीला दाखवतांना ..बालपणीचा मुलायम स्पर्श ल्यालेलं श्रीमंतीची पहिली ओळख घडवणारं सुंदर मोरपीस …!
मोरपीस ….मेघांनी व्यापलेल्या नभाकडे बधून उत्फुल्लतेने पिसारा फुलवून बेभान नाचणाऱ्या मोराचं पीस ! पावसाची चाहूल लागताक्षणी जलधारांचा उत्सव डोळ्यात जागवत आनंदविभोर होऊन नृत्य करणारा मोर आणि त्याचा सुंदर पिसारा ..किती मोठा आशावाद सूचित करणारा ..!
मोरपीस …इतिहासातली किती तरी प्रेमपत्रे ह्याने खुलवली असणार, प्रेमाच्या जगातले सारे शब्द आपल्या स्निग्ध आर्जवासकट ह्याच्याच मदतीने इष्ट स्थळी पोहोचले असणार, प्रेमी जनांच्या विश्वात अनोखे रंग भरणारं मोरपीस …!
‘मोरपीस’ …..चायनाला’ गेले असतांना तिथे ‘Su embroidery’ हा अनोखा प्रकार बघितला . त्यात कलाकुसर करतांना जे धागे वापरले होते ना त्यात एक मोरपीसाचा धागा पण होता. कित्ती नाजूक, सुंदर, रेखीव आणि नीळ्या हिरव्या रंगांची कलाकुसर डोकवत होती मधून मधून …!
या विषयावर विचार प्रकट करताना, आठवतात ओळी, ‘पाण्या तुझा रंग कसा? ‘ एखाद्या व्यक्तीवर जीव जडतो. त्याचं शारीरिक, मानसिक, वैचारिक सौंदर्य मनाला भुरळ घालत. अशा व्यक्तीच्या सहवासात मन रमत. आणि सुरू होतो प्रेमाचा प्रवास. प्रेम हे पाण्याइतकच जीवनावश्यक. जीवनदायी. प्रेमाचा अविष्कार नसेल तर, आयुष्य निरर्थक, निरस, कंटाळवाणे होईल.
प्रेम दिसत नसले तरी, त्याचे रंग अनुभुतीतून जाणवतात. कुणाच्या नजरेतून, कुणाच्या स्पर्शातून, कुणाच्या काळजीतून, कुणाच्या आचारातून , कुणाच्या विचारातून, कुणाच्या सेवेतून, कुणाच्या त्यागातून, कुणाच्या आधारातून प्रेमरंगाच्या विविध छटा अनुभवता येतात. असं हे रंगीबेरंगी प्रेम, ह्रदयात जाणवत. . . आणि व्यक्त होताना कुणाचं तरी ह्रदय हेलावून टाकत. हा प्रवास असतो. . सृजनाचा. माणूस माणसाशी जोडला जातो. परस्परात नातं निर्माण होत. अनेक विध नात्यातून व्यक्त होणारे प्रेम माणसाला पदोपदी एकच संदेश देत. . . तो म्हणजे. . . ”तू माणूस आहेस. . ”
एकदा का व्यक्तीला स्वत्वाची जाणिव झाली कि तो स्वतःवर, नात्यांवर, देशावर प्रेम करायला लागतो. प्रेम हे एक रेशमी कुंपण असते. आपणच आपल्या आत्मीयतेने हा परीघ स्वतःभोवती निर्माण करतो. नात्यांचे भावबंध गुंफत असताना, गुणदोषासकट आपण प्रेमाची बांधिलकी स्विकारतो. वेळ, काळ, पद, पत, पैसा प्रतिष्ठा, तन, मन, धन, सारं काही पणाला लावतो. या प्रेमाच्या रंगात आपण स्वतः तर रंगतोच पण इतरांनाही रंगीत करतो.
एकतर्फी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर, यांच्या पलीकडे जाऊन दुसर्या वर हक्क प्रस्थापित करू पहात. . . तेव्हा ते घातक ठरत. कुंपण शेत खात या म्हणीनुसार, एकतर्फी प्रेम आधी व्यक्ती, मग कुटुंब, मग समाज, यांना गोत्यात आणत. प्रेमाचा उगम हा सरितेसारखा. प्रेम ह्ददयातून उत्पन्न होत असलं तरी त्याचं मूळ नी प्रिती च कूळ शोधायला जाऊ नये. ही सहज सुंदर तरल भावना, आपले जीवन उत्तरोत्तर अधिकाधिक रंगतदार करत असते.
प्रेमाच्या विविध छटा, त्याचे पैलू, नानाविध अविष्कार हे आपलेच जीवन रंग असतात. जीवना तू असा रे कसा, याचा शोध घेतला की आपोआपच या प्रेमरंगाच्या रंगान आपण निथळू लागतो. विविध ऋतूंप्रमाणे हे जीवन स्तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. . फक्त ते अनुभवता आले पाहिजेत. अडीच अक्षरात सामावलेलं हे प्रेम, वळल तर सूत, नाही तर भूत. . या म्हणीचा प्रत्यय देते. प्रेमाचा रंगीत अविष्कार कुणाला मानव करतो. . तर कुणाला दानव. . . हे प्रेम रंग किती द्यायचे, किती घ्यायचे. . . अन् कसे किती उधळायचे, इतकेच फक्त कळले पाहिजे.
स्वतःचे मी पण हिरावून नेणारे हे प्रेम रंग जात्यातच असतात मनोहारी. . . ! आईचे काळीज म्हणजे प्रेमरंगाचा वात्सल्य भाव. आठवणींचा पसा पसरून संस्काराचा वसा वेचत माणूस घडविण्याचं कार्य हा प्रेमरंग करतो. बापाचं काळीज म्हणजे फणसाचा गरा. त्याची आठळी म्हणजे अमृताचा कोष. . पण ती आठळी सदैव बाजूला पडते. त्याच्या नजरेचा धाक वाटतो पण त्या धाकात त्याच्या लेकराचा घट घडत असतो. बाप लेकाचे प्रेम हे सुई दोरा सारखे. . फक्त जोडणीचा होरा चुकायला नको.
बहिण भावंडे यांच रेशमी कुंपण, प्रेमाच्या गुंफणीत माया ममतेचं अलवार नातं निर्माण करत. ही गुफण मग सुटता सुटत नाही. आज्जी, आजोबा काका, काकू, मामा, मामी, हे आधाराचे हात बनून जीवनात येतात. अनेक संकटांवर लिलया मात केली जाते. ती याच हातांकरवी. सारे आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्या प्रेमरंगाच्या अंतराला जाणवणारा दंगा हा वर्णनातीत आहे. . . तो ज्यान त्यान अनुभवण्यात जास्त रंगत आहे.
गुरू शिष्य नाते स्नेहभावाचे. पैलू विना हिर्याला चमक नाही तसे ज्ञानार्जन माणसाला ज्ञानी करते. सारे जग प्रेमाच्या रंगात रंगत जाताना आपले अंतरंग फुलून येते. जाणिवा नेणिवा, साद, प्रतिसाद, राग, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, सारे षड्विकार प्रेमरंगाला आपापल्या जाळ्यात ओढू पहातात. हे जीवनरंग अनुभवताना काळजाची भाषा उमजायला हवी.
प्रेमरंगात रंगताना त्यात होणारी देव घेव प्रेमाचं यशापयश ठरवते. फक्त प्रेमात व्यवहार नसावा. रोख ठोक हिशोब नसावा. . . शेवटच्या श्वासापर्यत स्वतःवर आणि प्रिय व्यक्तीवर विश्वास ठेवला की हे सारे प्रेमरंग अनुभवता येतात. हा जीवन रस, हे जीवन सौख्य अखेर पर्यंत आपल्या सोबत असत. त्याचा अविरत प्रवास
(विगत दिवस आदरणीया श्रीमति रंजना जी को मशाल न्यूज़ नेटवर्क स्पर्धा में पुरस्कार के लिए अभिनंदन। आपने इस आलेख में मेरे लिए सम्मान जाहिर किया है उसके लिए मैं आपका हृदय से आभारी हूँ। आप सभी साहित्यकार मित्रगणों का स्नेह ही मेरी पूंजी है। पुनः आपका अभिनंदन एवं लेखनी को सादर नमन)
आज मशाल न्यूज नेटवर्कने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि मला या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला . स्पर्धेला जाताना एक सादरीकरणाची संधी म्हणून गेले. प्रचंड तणाव असताना सादरीकरण केले. शुभांगी यशस्वी झाले. व्हिडीओ तयार झाला. त्याची लिंक आली.
सुरुवातीला भीत भीत मित्र मंडळींना फॕमिली मेंबरला ती लिंक शेअर केली ,हळूहळू शैक्षणिक समुह काव्य समुहात सुद्धा फिरू माझी कविता घराघरात वाजू लागली .भेटणारा प्रत्येकजण आवर्जून त्या बद्दल बोलू लागला , आणि नकळत आयुष्यातील चाळीशीचे वळण आठवले. या वयात जवळपास आपली मुलं साधारणपणे मोठी झालेली असतात . अगदी दहा पंधरा वर्षे आई आई करत मागेपुढे घुटमळणारी मुलं शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने एकाएकाने दूर जाऊ लागतात.
सुरूवातीला शरीराने आणि हळूहळू मनाने कार्यक्षेत्र बदलते चर्चेचे विषय बदलतात. बरेच वेळा आपल्याला त्यांची चर्चा समजत ही नाही मग मुलं बाबांशी, मित्रांशी थोडीफार चर्चा करतात, त्यांचा सल्ला घेतात, ही गोष्ट सुद्धा मनाला नक्कीच खटकत असे .
आज पर्यंत आपल्या आवडीने कपडेलत्ते खाणे पिणे करणारी मुलांना मित्र, मैत्रीणींचा , सल्ले घ्यावे लागतात हे पाहून कुठतरी चुकल्या सारखं वाटे. प्रत्येक बाबींवर मनसोक्त चर्चा करणारी मुलं मित्रांना फोनवर नंतर बाहेर आल्यावर बोलू म्हणतात, पुरणपोळी खीर आवडीने खाणारी मुलं पिझ्झा बरगर आवडीने खातात आणि कुठेतरी नवरा देखील त्यांना साथ देतो ही आशा अनेक गोष्टी ज्या आजवर फक्त आपल्या मनाप्रमाणे चाललेल्या होत्या त्यात बदल झालेला असतो कुठेतरी आपल्या हातातून सत्ता निसटून जात आहे पेक्षा आता आपली कुणालाही गरज राहिली नाही ही भावना अंतरंगात डोकावत असते . आपण एकटे पडत चालल्याची जाणीव वाढायला लागते. यातून चिडचिड वाढायला लागते आणि घरातील माणसे दुरावत जातात . कारण आपल्या चिडण्या पेक्षा आपल्या पासून दूर राहाणेच योग्य असे त्यांना वाटायला लागतं.
अगदी जीवन नकोस वाटायला लागले . रिकामा वेळ खायला ऊठला. ज्या मुलांसाठी घरासाठी आपण रात्रीचा दिवस करतो. स्वतःची प्रकृती, शिक्षण छंद कशाचा ही विचार केला नाही परंतु आज मात्र हळूहळू चित्र बदलताना दिसत होतं मन खट्टू झालं.
थोडंस थांबून शांतपणे विचार केला. आपलं तरूणपण आठवले. हवेत तरंगणारे दिवस आठवले. आणि आर्धी चिडचिड नक्कीच कमी झाली . लक्षात आले की या घराला सावरण्यात आपल्याला स्वतःसाठी करावयाच्या कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या आहेत अनेक छंदांना आपण तिलांजली दिली होती.
आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मग कुरकुरत कशाला बसायचं ऊठा लागा कामाला . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे आता स्वतःसाठी जगायचं असं मनाशी ठरवलं . अगदी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी बी. ए. फायनलचा फॉर्म भरला तेही इंग्रजी ऐच्छिक घेऊन आता आपल्याला झेपेल का भीती होती परंतु जमलं.पुढे बी. एड . सुद्धा केले. गल्लीत महिला बचत गट सुरू केला .यातून बऱ्याच महिलांना शिलाई मशीन मिर्ची पल्वलायझर, शेवयाची मशीन , छोटी गिरणी, छोटे लेडीज एम्पोरियम सुरू करणे अशी अनेक छोटी मोठी कामे यातून सुरू करण्यात आली. मुख्य म्हणजे रिकामा वेळ सार्थकी लागला. नोकरी आणि घर या कसरतीत मैत्री हा प्रकार जीवनातून जणू हद्दपारच झाला होता, तो पुन्हा सापडला .
कामासाठी का असेना पण अनेक जणींशी गप्पागोष्टी वाढल्या आणि एकटेपणा पळून गेला. आठवड्यातून एकदा गुरूवारी व एकादशीला सत्संगाच्या निमित्ताने रात्री एकत्र जमायला लागलो . भजनाच्या निमित्ताने जुना संगिताचा छंद डोकावू लागला वीस वर्षे माळ्यावर ठेवलेली हार्मोनियम खाली आली. नकळत सूर जुळायला लागले. शिक्षणोत्सव सर्व शिक्षा अभियानाच्या निमित्तानं शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे शैक्षणिक साहित्य जत्रेत स्टॉल लावणे, इत्यादीमुळे बाजुला सारलेली चित्रकला पुन्हा उपयोगात आली . ओळखीच्या मोठ्या मुली शिवण काम शिकवणे, रुखवताचे साहित्य शिकवणे, अशा अनेक गोष्टी त्याही विनामूल्य असल्यामुळे सहाजिकच अनेकजणी जवळ आल्या जगण्याचा सूर कुठेतरी गवसला आनंदाचे वारे पुन्हा वाहू लागले.
यात भर पडली ती स्मार्ट फोनची whats app सुरू झाले सुरूवातीला मैत्रीणींचे समुह नंतर शैक्षणिक समुह जॉईन केले. उत्तम सादरीकरणामुळे अनेक समुहात संचालिका म्हणून कामाची संधी मिळाली. आणि अचानक एक दिवस काव्य समुहाची लिंक मिळाली.समुह जॉईन केला आणि पंचवीस वर्षापूर्वीचं कवी मन नकळत जागे झाले. हा कदाचित दैवयोग असेल परंतु मला या समुहात सुद्धा संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली . आयुष्यात कधी काव्य संमेलन पाहायला जाण्याचं सुद्धा स्वप्न न पाहिलेली मी परंतु नागपूर शिलेदार समुहाच्या संमेलनात कविता सादरीकरणाची संधी मिळाली आणि खूप आनंद झाला . राज्यस्तरीय समुहातून अनेक कवी कवयित्रींची ओळख झाली .आणि स्वतःचे समुह तयार केले . दररोज लेखन वाढले .
अनेक दिग्गज लेखक कवी कवयित्रींच्या ओळखी झाल्या कवी संमेलनातील सहभाग वाढला आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला . यातच मशाल न्यूज नेटवर्क ने काव्य स्पर्धा ठेवली आणि गुपचूप लिहिणारी मी नकळत घराघरात पोहचले. या स्पर्धेत सुद्धा राज्यात दुसरा नंबर मिळाल्या मुळे झालेला आनंद नक्कीच शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे.
दरम्यानच्या काळात हेमंतजी बावनकर यांच्या वेबसाईटवर ब्लॉक लेखिका म्हणून लेख कथा लेखनाची संधी मिळाली. आयुष्यातील पन्नास वर्षात अनुभवलेले अनेक अनुभव नकळत कागदावर उतरायला लागले.मुख्य म्हणजे हेमंतजींच्या प्रोत्साहनामुळे लेखनास चालना मिळाली.
आज मला प्रश्न पडला की आयुष्यात एवढं भरभरून करण्यासाठी बरच काही असताना आपण म्हातारे झालो . आपली कुणाला गरज नाही या विचाराने कुढत का बसावं आपले ज्ञान अपडेट करा . भरपूर वाचन करा ,जमेल तसे लेखन करा. भरपूर व्यायाम करा. तुमच्याकडे इतरांसाठी वेळ नाही हे लक्षात आल्यानंतर घरातल्यांना सुद्धा तुमची किंमत कळेल . मुख्य म्हणजे हे सर्व हसत खेळत करा.
आयुष्यातील या वळणावर जसा जसा वेळ मिळत जाईल तसे तसे एकेक उपक्रम वाढवत जा म्हणजे आयुष्यातील ही पोकळी जाणवणार नाही . मुख्य म्हणजे रडणारी आणि चिडणारी माणसं कुणालाही आवडत नाहीत त्यामुळे संयमाने वागा. लहानात लहान , तरूणांत तरूण होऊन वागावं आपलीच रट लावून धरता.
आपण इतरांचे जर ऐकायला शिकलो तर पाहा जे आनंदाचे फुलपाखरू पकडण्यासाठी तुम्ही अकांड तांडव करत होतात . ते फुलपाखरू नकळत तुमच्या खांद्यावर येऊन बसेल अगदी सहजपपणे . . . . !
एक आनंदी सर्व समावेशक समाजशील प्रौढत्व आकाराला येईल जे अगदी प्रसंन आणि परिपूर्ण असेल.
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा लिखित मराठी आलेख ☆ स्त्री कालची आणि आजची ☆ जो आपको हमारे पुरातन एवं नवीन साहित्य और समाज में वर्णित नारी के विभिन्न रूपों के साथ ही पुरुष प्रधान समाज में उसके संघर्ष से अवगत कराएगा )
रामायण आणि महाभारत ही आपली महाकाव्ये. या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या. यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो असे संस्कार या काळात केले गेले.
संत वाङमय, पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री, समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री त्याग, समर्पण आणि विश्वास या त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला, समाजाला घडवीत गेली.
पौराणिक काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री, कुंती गांधारी, सुनिती, सुरूची, आदिती, छाया, अनुसया, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, यशोदा, देवकी, रूक्मिणी सुभद्रा या, सर्व स्त्रियांनी उत्पत्ती, स्थितीआणि लय यांचा समतोल राखण्यासाठी वेळीवेळी सत्व परीक्षा दिली. पुरुष प्रधान संस्कृती चा संघर्ष त्या काळापासून आज तागायत ही स्त्री करीत आहे.
कालची स्त्री जेव्हा जेव्हा बंड पुकारून जागृत झाली तेव्हा तेव्हा ती समाजासाठी आदर्श ठरली. पण हे आदर्श पण टिकवायला तिला स्वतःला अतोनात कष्ट सहन करावे लागले. संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई यांचा जीवन प्रवास अत्यंत कष्टमय होता. यांच्या शब्द सुमनांची वैजयंती माळा विठ्ठलाच्या गळ्यात पडली पण त्यासाठी समाजकंटकाची वासनांध नजर, कर्मठ रूढी परंपरांची तीक्ष्ण धारधार सुई काळजात आरपार टोचून घ्यावी लागली.
ऐतिहासिक कालखंडात स्त्री ने पौराणिक काळातील शस्त्र विद्येचा अभ्यास करून न्यायासाठी, संघर्षासाठी रणांगणात उतरली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदात्री एकमेव ठरली. यानंतर अशी स्त्री जन्मली नाही असे खेदाने म्हणावे लागेल. कारण आजतागायत प्रति शिवाजी जन्माला आलेला नाही. शिवाजी महाराजांनंतर शिवशाहीतील दोन स्त्रीयांनी वर्षानुवर्षे तुरूंग वास भोगला. महाराणी येसूबाई, आणि ताराबाई या दोन स्त्रिया होत. एकीने स्वराज्यासाठी यवनी कैद स्विकारली तर ताराबाई सवती सुभ्यामुळे स्वराज्यातच कैदेत होत्या. महाराणी जोधाबाई, झाशीची राणी, राणी चन्नमा, चांदबिबी, मुमताज, रमाबाई, आनंदी बाई या स्त्रिया शेवटपर्यंत लढा देत गेल्या.
या सर्व इतिहासाचा मागोवा घेत सावित्री, रमाई,अहिल्याबाई, आनंदी जोशी, रमाबाई रानडे या स्त्रिया स्वतः साक्षर झाल्या. मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीदवाक्य इतिहासात कोरले गेले ते यांनी केलेल्या समाज कायामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अत्यंत विश्वासाने मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कला,उद्यम आणि संस्कृती या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पण चार भिंतीच्या आत आजची स्त्री अजूनही असुरक्षित आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्या स्त्रिया त्यांच्या वेदना आजही कुठेतरी धुमसत आहेत.
कालची स्त्री आणि आजची स्त्री रूपे आणि स्वरूप बदलले आहे. पण त्याग, समर्पण, अवहेलना स्री ला आजही चुकलेली नाही. आजची स्त्री समाजात अर्थार्जनासाठी बाहेर पडताना आजही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुरूषी अहंकाराचा सामना करीत कुटुंबाला सावरीत आहे. सत्ता, पैसा आणि वासना यांचा उपभोग घेण्यासाठी आजही स्त्री वापरली जाते, विकली जाते, रूढी परंपरांच्या नावाखाली नागवली जाते.
विभक्त कुटुंबाची वाढत जाणारी संख्या सासू सून संघर्ष, माहेरचे अती लाड, इगो प्रोब्लेम, पैशाची गुर्मी यात अजूनही स्त्री प्रमुख पात्र म्हणून खेळवली जाते.
अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, पाळणाघर या समस्येला सामोरे जाणारी स्त्री समाजाकडून आजही दोषी ठरवली जाते. माता, भगिनी, पत्नी, सखी या रूपात समोर येणारी स्री आजही पुरूषी अत्याचाराला बळी पडत आहेत.
काळ बदललाय, माणूस बदललाय , जमाना बदललाय. . .असः नेहमी ऐकतो आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली आणि दोष बदलत्या काळाला आणि स्त्री ला पुरूष वर्ग परस्पर देऊन मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . . ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले अन तिथेच नात्यात परकेपणा आला.
☆ चार पायाच्या प्राण्यांना ☆
☆ हौसेने पाळतात माणसं ☆
☆ दोन पायाच्या आप्तांना ☆
☆ मोलानं सांभाळतात माणसं ☆
हे आजचं वास्तव आहे. विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा एक” चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात. अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते. एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात. वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद आणि दरी निर्माण करतात.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार, नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
वृद्धापकाळी हवा असलेला मायेचा ओलावा, समदुःखी, समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो. प्रत्येक व्यक्ती आपला राग आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते. वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.
नवीन पिढीला घडविण्यात आजची स्त्री कुठेतरी कमी पडत आहे का? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी,आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला, कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
मी माणसाचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी आद्यर्तव्य आहे हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं स्री ला आधार द्यायचा की भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.
कालची स्त्री आणि आजची स्त्री हा विचार करताना मन खालील काव्यपंक्तीवर स्थिर होते.
☆ थोर महात्मे होऊन गेले, चरीत्र त्यांचे पहा जरा ☆
☆ आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा ☆
या नररत्नांना जन्मणारी ही माऊली आज समाजात सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर राहण्याचा मान मिळूनही ☆आजची स्त्री☆ उपभोग्य वस्तू समजली जाते हे आपले दुर्दैव आहे. विश्वबंधुतेचा आणि समानतेच्या नारा देऊन आपण ही नारीशक्ती आद्य ईश्वराचे रूप मानून स्त्रीला संघटीत आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. तरच आपण अभिमानाने म्हणू शकू.