मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – खंडोबाची वारी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खंडोबाची वारी? श्री आशिष  बिवलकर ☆

चंपाषष्ठी आज | डोंगुर जेजुरी |

खंडोबाची वारी | भक्तीमय ||१||

*

मल्हारी मार्तंड | जय खंडेराया |

जेजुरी गडाया | येळकोट ||२||

*

सोन्याची जेजुरी | उधळी भंडारा |

वाजतो नगरा | मार्तंडाचा ||३||

*

हळद खोबरं | भारी उधळण |

पिवळं अंगण | खंडोबाचं ||४||

*

देव साधा भोळा | भरीत भाकर |

चव रुचकर | नैवेद्यासी ||५||

*वाघ्या मुरळीचा | खेळ जागरण |

गोंधळाचा सण | गडावरी ||६||

*

देवा खंडेराया | भरुनिया तळी |

पसरतो झोळी | कृपेसाठी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ इवली बकुळी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ इवली बकुळी ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

इवली बकुळी 

स्वतःही फुलते

गंधदान देते

पवनाशी

*

इवली बकुळी 

फुलते झुलते

नाते जुळतेच

काळजाशी

*

 इवली बकुळी 

 सुगंध केवढा

 गंधीत जाहला

 सारा घरगाडा

*

 इवली बकुळी 

 पहाटे फुलती

 गळून पडता

 सुगंधीत माती

*

 इवली बकुळी 

 कुपी अत्तराची

 जपून स्मृतीत

 ठेवायाची

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चौसष्ट घरांचा सम्राट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🌹 चौसष्ट घरांचा सम्राट ! 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गु णांची कदर होते नेहमी 

 आज ना उद्या जगात 

 माळ जग्गजेतेपदाची 

 पडे गुकेशच्या गळ्यात 

*

के ला चमत्कार गुकेशने 

 झाले पूर्वसुरी अचंबित 

 बने चौसष्ट घरांचा राजा

 आज जगी तरुण वयात

*

ह काटशहाच्या खेळाचा 

 अनभिषिक्त सम्राट बनला

 भारतभूच्या शिरावर त्याने 

 एक तुरा मानाचा खोवला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

घ्यावी म्हणतो

आता थोडी विश्रांती 

मी पुन्हा येईन बरं

नेहमीप्रमाणे प्रभाती…

*

नवजीवन देतो

अविरत,

नच कधी थकलो

कर्मयोगी म्हणोन

बक्षीसी न कधी पावलो…

*

किरणांनी माझ्या

दाह होतही असेल,

पण, सागराच्या पाण्याची वाफ

होईल तेव्हाच पाऊस बरसेल….

*

मीच मला पाहतो

बिंब माझे सागरात

विश्रांतीस्तव तुमच्या

नभांची चादर पांघरत..

*
गर्भित सूचक

माझे वागणे

येणे जाणे 

हेचि जीवन गाणे…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ उ स्ता द ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🙏🌹 उ स्ता द ! 🌹🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

बोलविता धनी तबल्याचा 

आज मैफिलितूनी उठला 

ऐकून ही दुःखद बातमी 

रसिकांचा ठोका चुकला

*

केस कुरळे शिरावरती 

बोलके डोळे जोडीला 

सुहास्य गोड मुखावरचे 

दिसत होते शोभून त्याला

*

मृदू मुलायम बोलण्याची 

होती त्याची गोड शैली 

जाता जाता करून विनोद 

हळूच मारी कोणा टपली 

*

आज झाला तबला मुका 

तो होता अल्लाला प्यारा 

करती कुर्निंसात दरबारी   

येता उस्ताद त्यांच्या दारा 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार-विरोधी दिन… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार-विरोधी दिन? श्री आशिष  बिवलकर ☆

कर्तव्याचा लिलाव,

बिनधास्त चाले |

देण्याघेण्याचे काय

सर्रासच बोले |

*

वाळवी पोखरत,

जाते सर्व काही |

अंतरात्मा कुणाचा,

जिवंत न राही |

*

बुडापासून शेंड्यापर्यंत,

लागलीय ही कीड |

यंत्रणा झाली सर्व भ्रष्ट,

चेपलीय साऱ्यांची भीड |

*

पकडला  जो जाई,

त्यास म्हणते जग चोर |

पण तो सही सलामत सुटे,

कायद्यातल्या पळवाटा थोर |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ धन्य तू गं बहिणाई… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ धन्य तू गं बहिणाई ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

निरक्षर तुज कसे म्हणावे

शब्द खजिना तुजपाशी

सरस्वतीचा हात शिरावर

चराचराशी संवाद साधशी ….. 

*

  चुलीवरचा तवा सांगतो

  तुजला जीवन तत्वज्ञान

  सुगरणीचा खोपा बोलतो

  तुला ग सामाजिक ते भान …… 

*

  कपाळ पडले उघडे पण

  सृजनतेने  शेतात  कष्टता

  सोने पिकवीत तू राबता

  सहजतेने सुचल्या कविता …… 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

असते राजकारण गल्लीतले फारच वेगळे 

तेच असते प्रत्येक हायकमांडचे कल्पनातीत निराळे – –

*

सारे नेते वावरती नेहमी चेहऱ्याचे करून ठोकळे

करून सवरून सदा राहती नामा निराळे – –

*

करू शकत नाही कार्यकर्ते नेत्यांसमोर मन त्यांचे मोकळे

मनांत शिरण्या नेत्यांच्या पहावे लागतात अनेक पावसाळे – –

*

कधी झेलावी लागती कार्यकर्त्यांना अपमानाची ढेकळे

अशा ठिकाणी टिकत नाहीत कोणी कार्यकर्ते दुबळे – –

*

उभे इथे पदोपदी एका पायावर ध्यानस्थ बगळे

कळत नाही कोण नेता कोणता खेळ खेळे – –

*

बोलण्यात असून चालत नाही मोकळे ढाकळे

नाहीतर वेळ नाही लागणार स्वप्नांचे होण्या खुळखुळे – – 

*

पिंड खायला जागो-जागी टपले काळे गोरे कावळे

वाटे राजकारण्यांना निघाले जनतेच्या अकलेचे दिवाळे

शेवटी सत्तेवर येणार “यांचे” नाहीतर “त्यांचे” कडबोळे…

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ज्ञानराजा – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानराजा – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

इंद्रायणी काठी ! विसावला ज्ञाना !

आत्मसमाधाना ! समाधिस्थ !!१!!

*

कृपाळू माऊली ! बुद्धीचा सागर !

मायेचे माहेर ! ज्ञानराजा !!२!!

*

कैसा चमत्कार ! रेड्या मुखी वेद!

गर्विष्ठांचा भेद ! वदवूनी !!३!!

*

बसुनी भावंडे ! चालवली भिंत !

चांगदेवा खंत ! पाहुनिया !!४!!

*

पाठीवरी मांडे ! मुक्ताई भाजती !

क्षुधा भागवती ! जठाराग्नी !!५!!

*

भावार्थ दीपिका ! या गीतेचा अर्थ !

ज्ञानी नाम सार्थ ! ज्ञानेश्वरी !!६!!

*

अमृताचा घडा ! एक एक ओवी !

स्व अनुभवावी ! वाचूनिया !!७!!

(चित्र – साभार श्री आशिष  बिवलकर)

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा खेळ सूर्य-चंद्राचा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ हा खेळ सूर्य-चंद्राचा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कालचा सूर्य मावळता

तो आज नव्याने येतो

रोजचा दिवस आपणा

म्हणून वेगळा म्हणतो…..

*

रवि मावळतीला जाता

प्रहर रातीचा हळू येतो

साम्राज्य काळोखाचे तो

हलकेच पसरवून देतो…..

*

 रातीला येणारा अंधार 

 दुसरी पहाट येईतो रहातो

 रवि नव्या दिवसाचा येता

 अंधार कालचा जातो…..

*

 सुख रविसम येते जाते

 आणि ….

अंधारासम मुक्कामाला

 दु:ख वस्ती करून जाते…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print