सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
चित्रकाव्य
सोनेरी सकाळ
श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
☆
निळ्याशार नभातूनी
सोनेरी कर फाकत
गर्द अशा झाडीतून
चैतन्य आणी रानीवनी
मधुनच डोकावते
निळे कौलारू घर
शेजारीच डोकावते
लाल कौलारू घर
हिरव्या माडाच्या बनात
कुठे नारळ डोकावती
सूर्य स्रोत फैलावत
उजळून टाकी पातीपाती
मधूनच डोकावती
काळे छप्पर, पिवळी भिंत
सौंदर्या आली भरती
वर्णना नसे अंत
☆
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
मावळला ‘अर्थ-सूर्य’…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
अर्थ व्यवस्थेचा | गेला सरदार |
वित्त कारभार | सुधारून ||१||
*
विद्या विभूषित | श्रेष्ठ अर्थतज्ञ |
राष्ट्रासी कृतज्ञ | देशसेवा ||२||
*
विसावे शतक | सरता सरता |
तारणहारता | व्यवस्थेचा ||३||
*
अर्थव्यवस्थेची | सुधारली नीती |
विकासाची गती | शिल्पकार ||४||
*
मुक्त धोरणाने | बदलली दिशा |
पल्लवीत आशा | देशासाठी ||५||
*
राजकारणात | अंगी मौनव्रत |
संयमी इभ्रत | राखुनिया ||६||
*
अर्थ माळेतील | मणी ओघळला |
आज मावळला | अर्थसूर्य ||७||
☆
.. .. जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
चित्रकाव्य
☆ दिनक्रम
☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
☆
फेसाळत्या या लाटा
किनारी भेटाया येती
किनारा तिला भेटता
मिळे त्यांना तृप्ती
*
नभीचे हे सुर्य अन् चंद्र
यांचे त्यांना आकर्षण
भेटण्या त्यांना घेती रूप रौद्र
अन् येताच किनारी होती अर्पण
*
कधी पोटात घेती
कित्येक ते जीव
कधी बाहेर फेकती
परतुन त्यांचे शव
*
नसे त्याची लाटांना
कोणतीच खंत
दिनक्रम हा त्यांना
नसे काही भ्रांत
☆
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
चित्रकाव्य
☆ “अगदी मनातले…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
खाली दगड असोत की वाळू असो
खत – पाणी असो नसो
मनापासून फुलणं मी विसरत नाही
मला कशानेच फरक पडत नाही…
*
रंग नाही रूप नाही
आकर्षित करणारा सुगंध नाही
आणि माझ्याकडे कुणी बघतंय की नाही
याने मला काहीच फरक पडत नाही…
*
बस् निसर्गाची कृपा आहे
किंचित प्राण माझ्यातही फुंकलेला आहे
हे माझ्यासाठी काही कमी नाही
मग फरक मला मुळी पडतच नाही…
*
इवलंसं माझं जग आहे
इवल्याशा डोळ्यांनी मला ते दिसतं आहे
मग मी कुणाला दिसो ना दिसो
मला मुळीच फरक पडत नाही…
*
आयुष्य म्हणजे मुठीतली वाळू
माणसाला कळतं पण वळत नाही
मी मात्र मजेत डोलतांनाही हे विसरत नाही
मग त्याने मला फरक काहीच पडत नाही…
*
मी आज आहे आणि उद्या नसणार आहे
हे त्रिकालाबाधित सत्य मी जाणलं आहे
पण म्हणून मी आजच कोमेजणार नाही
एकदा हे सत्य स्वीकारलं की…
मला ‘आज’ काहीच फरक पडत नाही…
☆
कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
खंडोबाची वारी…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
चंपाषष्ठी आज | डोंगुर जेजुरी |
खंडोबाची वारी | भक्तीमय ||१||
*
मल्हारी मार्तंड | जय खंडेराया |
जेजुरी गडाया | येळकोट ||२||
*
सोन्याची जेजुरी | उधळी भंडारा |
वाजतो नगरा | मार्तंडाचा ||३||
*
हळद खोबरं | भारी उधळण |
पिवळं अंगण | खंडोबाचं ||४||
*
देव साधा भोळा | भरीत भाकर |
चव रुचकर | नैवेद्यासी ||५||
*वाघ्या मुरळीचा | खेळ जागरण |
गोंधळाचा सण | गडावरी ||६||
*
देवा खंडेराया | भरुनिया तळी |
पसरतो झोळी | कृपेसाठी ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
🌹 चौसष्ट घरांचा सम्राट ! 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
गु णांची कदर होते नेहमी
आज ना उद्या जगात
माळ जग्गजेतेपदाची
पडे गुकेशच्या गळ्यात
*
के ला चमत्कार गुकेशने
झाले पूर्वसुरी अचंबित
बने चौसष्ट घरांचा राजा
आज जगी तरुण वयात
*
श ह काटशहाच्या खेळाचा
अनभिषिक्त सम्राट बनला
भारतभूच्या शिरावर त्याने
एक तुरा मानाचा खोवला
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
घ्यावी म्हणतो
आता थोडी विश्रांती
मी पुन्हा येईन बरं
नेहमीप्रमाणे प्रभाती…
*
नवजीवन देतो
अविरत,
नच कधी थकलो
कर्मयोगी म्हणोन
बक्षीसी न कधी पावलो…
*
किरणांनी माझ्या
दाह होतही असेल,
पण, सागराच्या पाण्याची वाफ
होईल तेव्हाच पाऊस बरसेल….
*
मीच मला पाहतो
बिंब माझे सागरात
विश्रांतीस्तव तुमच्या
नभांची चादर पांघरत..
*
गर्भित सूचक
माझे वागणे
येणे जाणे
हेचि जीवन गाणे…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
🙏🌹 उ स्ता द ! 🌹🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
बोलविता धनी तबल्याचा
आज मैफिलितूनी उठला
ऐकून ही दुःखद बातमी
रसिकांचा ठोका चुकला
*
केस कुरळे शिरावरती
बोलके डोळे जोडीला
सुहास्य गोड मुखावरचे
दिसत होते शोभून त्याला
*
मृदू मुलायम बोलण्याची
होती त्याची गोड शैली
जाता जाता करून विनोद
हळूच मारी कोणा टपली
*
आज झाला तबला मुका
तो होता अल्लाला प्यारा
करती कुर्निंसात दरबारी
येता उस्ताद त्यांच्या दारा
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈