image_print

मराठी साहित्य – विविधा ☆ राशी – फटाके – (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर ☆ विविधा ☆ राशी - फटाके - (दिवाळी मनोरंजन) ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆  (गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत रात्री १० नंतर फटाके उडवण्यास बंदी यावर आम्ही एक सर्वे घेतला ज्यात वेगवेळ्या राशींच्या लोकांची मते जाणून घेतली.  राशी प्रमाणे उत्तरे साधारण अशी मिळाली *) मेष: काय वाट्टेल ते होऊ दे रात्री  १० नंतरच फोडणार फटाके. 🤨 वृषभ: व्यवस्थित आवरून तयार व्हायला तसंही दरवर्षी ८ वाजतात च म्हणा 😌 मिथुन: रात्री ८ ते १० इथे आणि सकाळी  ८ ते १० अमेरिकेतील वेळेप्रमाणे  इथेच फटाके फोडू 😁 कर्क: दिवाळीत चंद्र नसताना आकाश दिवा, पणत्या यांचा प्रकाश हीच दिवाळी. लक्ष्मी पुजनाला मात्र मी फुलबाजी लावणारच. 💡 सिंह: खरे बॉम्ब फोडणारे मस्त परदेशात एन्जॉय करतायत आणि शिक्षा कुणाला ? रात्री १० नंतर फुसके फटाके फोडणारी लोकं..... 😡 कन्या : किती ते प्रदूषण सध्या होतंय ना. दिवाळी अंक पण महागलेत. ८ ते १० रोज कुणा कुणा कडे जायचंय. यंदा फटाके खरेदी होईल असं वाटत नाही🙅🏼‍♀ तुळ:  दिवाळीत रोज पाऊस पडावा. फक्त रात्री ८ ते १० पाऊस न पडावा ☔ म्हणजे फक्त...
Read More

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –5 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆  (पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.) जेव्हा माझ्या घरी आई-बाबांना समजले की मी आता काहीच पाहू शकणार नाही, अर्थातच काही करू शकणार नाही, काय बरं वाटलं असेल त्यांना?आता ही चा काहीही उपयोग नाही, अ सा जर त्यांनी विचार केला असता,  तर माझ्यासाठी ते किती अवघड होतं. पण त्यांनी मला इतकं समजून घेतलं, इतकं तयार केलं म्हणूनच आज मी आनंदाने  वावरू शकते. घरामध्ये मी सारखी आईच्या या मागे मागे असायची. किचन मध्ये काहीतरी लुडबुड करायची. आईला सारखं लक्ष ठेवायला लागायचं. एके दिवशी आईनं काय केलं, फुलाची परडी माझ्याकडे घेऊन आली आणि त्यात ली लाल फुलं उजवीकडे आणि पिवळी फुलं डावीकडे अशी ठेवली. माझा हात हातात घेऊन ते मला दाखवलं अर्थात स्पर्शज्ञानान मी पाहिलं. सुई मध्ये दोरा ओवून दिला आणि एकदा उजवीकडच  एक फुल आणि एकदा डावीकडचा एक फूल अस ओवायला शिकवलं आणि झाला कि छान हार तयार. आईचा हा प्रयोग...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ ल‌क्ष्मीपूजन  ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆  दिन दिन दिवाळी—४ !! ल‌क्ष्मीपूजन  !! ॐ  महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !! आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते.  शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो. दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते.  मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो. घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक,  धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी ☆ विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆  आकाशाचा निळा गाभारा सजला चंदेरी चांदण्यांनी थंडीचा अत्तर स्पर्श मऊ- मुलायम बनवला उन्हालाही केला दूर अंधकार केसरी- पिवळसर प्रकाश दिव्यांनी प्रसन्न उत्सव प्रकाशाचा दीपावलीचा चैतन्याच्या पहाटेचा... !!   काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होणे अपरिहार्य आहे. तसाच बदल मुंबईत साजरा होणा-या दिवाळीत झाला आहे... दिवाळी ही धनश्रीमंतांचे इमलेही उजळते व मन श्रीमंतांचे दरवाजेही उघडते..मुंबईची दिवाळी म्हणजे फटाक्यांचा दणदणाट, आतषबाजी,  चमचमीत फराळ, सुगंधी उटणे, दिव्यांची रोषणाई असे बरेच काही असते.. दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढचं नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे उजळला पाहिजे. आज माणसांचं मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा  दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते ना अगदी तसच्चं... मोबाईलच्या जमान्याने शुभेच्छा पत्र, मेसेजेस कालबाह्य झाली आणि आपली मन बँकवर्ड झालीत. एकमेकांच्या संवादाचे सूर धुसर झालेले दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ख-या अर्थाने प्रत्यक्ष जगण्यातचं स्वतःला झोकून द्यावं . चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्यात त्यामुळे जीवनात नवचैतन्य निर्माण होईल. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆  दिन दिन दिवाळी—३ !! नरकचतुर्दशी !! आज 'नरक चतुर्दशी'.  आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो. स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे. आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले.  त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले.  त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆       दिवाळीची चाहूल तर  लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल,वात  घालून प्रज्वलित होऊ लागल्या!या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले. त्याचा प्रकाश मनभर पसरला!  पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या! आमच्या लहानपणी आत्ता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पवित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी मंदिरात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवता येई! कोजागिरी पौर्णिमा  आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे. पहाटेचा गारवा सुखद वाटत असे. घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या! डबे घासणे, अनारसा पीठ तयार करणे, चकली कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे सुरू होत असत! दिवाळीची खरेदी फार मोठी नसे. तरीही खिशाच्या परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडे फटाके आणले जात. कधीकधी घरासाठी म्हणून काही खरेदी असे! दिवाळीची वाट पाहिली जायची ती मुख्यतः फराळासाठी! लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली,  करंजी सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे! दिवाळी अगदी उद्यावर आली की पहिला फटाका कोण, किती वाजता वाजवणार याची...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆  दिन दिन दिवाळी—२  आज ' धनत्रयोदशीचा ' दिवस. दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो. त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते. आज संध्याकाळी धने, गुळ, पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची पूजा करतात.  आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात. समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे 'धन्वंतरी'. याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात. याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात. याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे;ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे. पद्म पुराणानुसार अपमृत्युच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे. याबाबतची एक आख्यायिका सांगतात.  हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. राजाला आणि...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक  ☆ विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆  ‌दीप म्हणजेच दिवा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एक माध्यम, साधन! पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जगाच्या नाशापर्यंत ज्याचे अस्तीत्व असणार आहे तो सूर्य मानवाच्या आयुष्यातला प्रथम दीप, दिवा ! काही दिवे अत्यंत दीप्तीमान असतात तर काही अत्यंत शांतपणे तेवणारे असतात.सूर्य हा असाच अत्यंत दीप्तीमान दिवा ज्याशिवाय आपले जगणे अशक्य! मानवाच्या गरजेतून निर्माण झालेला पहिला दिवा! दिवा म्हणजे गारगोटीच्या घर्षणातून निर्माण झालेली ठिणगी. मानवाला लागलेला अग्नीचा शोध ही दिव्याची सुरवात होय. दिवटी, पणती, सम ई, कंदील, बत्ती आणि विद्युत अशी दीप, दिव्याची अनेक रुपे म.वि. कुलकर्णी यांच्या कवितेत आढळतात. ‌अंधार नष्ट करून प्रकाश देणे हे दिप, दिव्याचे काम असून त्या प्रकाशाने आपल्याला आनंद होतो. मग तो अंधार आसमंतातील असो वा मनातील ! ‌सूर्य अस्ताला गेला की देवापुढे दिवा लावून ' शुभंकरोती कल्याणम्' म्हणायचे संस्कार आपल्यावर लहानपणीच झालेले आहेत. त्यातील 'दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडलं मोतीहार' ही ओळ आपल्याला दीपज्योतीचे महत्व सांगते.देवघरात सम ईत तेवणारी दोन वातींची, दिव्यांची ज्योत म्हणजे देवाच्या कानातील प्रकाशमान कुंडल असावीत आणि त्या  ज्योतीभोवती निर्माण...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆  🪔 दिन दिन दिवाळी---१ 🪔 आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण  मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर 'दिवाळीचा सण' दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे.  हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव,  विजयाचा उत्सव असे  अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे. अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे 'गोवत्स द्वादशी'.  यालाच "वसुबारस " असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते.  लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे "सुरभि". हीच गोमातांची अधिदेवता आहे.  दिवाळीत हिचे पूजन...
Read More

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर ☆ विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर☆ परवा पुस्तकांच्या कपाटातून सारखी खुडबुड ऐकू येऊ लागली. मनात म्हटले ,“एवढा बंदोबस्त करुनही खारुताईने आपल्यावर कुरघोडी केलेली दिसतेय. पुन्हा घरटे बांधले वाटते." असे म्हणून त्या बाजूचे दार उघडले तर खारुताई ऐवजी उंदीरमहाशयांनी दर्शन दिले. मी घाबरून पटकन दार बंद करुन घेतले. आमच्या  कपाटाच्या मागच्या बाजूला खिडकी आहे.   ती एका बाजूने कायम थोडीशी उघडी राहते आणि त्याच चोरवाटेने प्रवेश करुन या खारुताईनी दोन वर्षे आपले बस्तान बसवले होते. बिचारी मोठ्या कष्टाने घरटे बनवते आणि तेव्हा लेकुरवाळी पण असते. म्हणून मी पहिल्या वर्षी तिचे बाळंतपण संपेपर्यंत धीर धरला. नंतर सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त केला. पण बाईसाहेब माझ्यापेक्षा हुश्शार निघाल्या. अगदी लहान राहिलेल्या फटीतून त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा आपला कार्यभाग साधला. यावर्षी मग मी अधिक जोमाने बंदोबस्त केला. आणि बाईसाहेब तिकडे फिरकल्या नाहीत. मी एकदम आनंदात होते. आणि एक दिवस दुसऱ्या बाजूचे कपाट उघडले तर बाईसाहेब दिमाखात घरट्यात बसून माझ्याकडे “ जितम् मया।" अशा अविर्भावात बघत होत्या. तिच्या जिद्दीला मी सलाम केला...
Read More
image_print