☆ “सस्पेन्शन” ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
नॉर्वे हा युरोपमधील एक देश आहे. तिथे कुठेही जाता हे दृश्य सहसा सापडेल…
एक रेस्टॉरंट, एक महिला त्याच्या कॅश काउंटरवर येते आणि म्हणते —
” ५ कॉफी, १ सस्पेंशन “…
मग ती पाच कॉफीचे पैसे देते आणि चार कप कॉफी घेऊन जाते. थोड्या वेळाने दुसरा माणूस येतो, म्हणतो —
” ४ लंच, 2 सस्पेंशन “!!!
तो चार लंचसाठी पैसे देतो आणि दोन लंच पॅकेट घेऊन जातो. मग तिसरा येतो आणि ऑर्डर देतो —
” १० कॉफी, ६ सस्पेंशन” !!!
तो दहासाठी पैसे देतो, चार कॉफी घेतो.
थोड्या वेळाने जर्जर कपडे घातलेला एक म्हातारा काउंटरवर येऊन विचारतो —
” एनी सस्पेंडेड कॉफी ??”
उपस्थित काउंटर-गर्ल म्हणते -” येस !!”–आणि त्याला एक कप गरम कॉफी देते.
काही वेळाने दुसरा दाढीवाला माणूस आत येतो आणि विचारतो – ” एनी सस्पेंडेड लंच ??”
–काउंटरवरील व्यक्ती गरम अन्नाचे पार्सल देते आणि त्याला पाण्याची बाटली देते.
आणि हा क्रम सुरू… एका गटाने जास्त पैसे मोजावेत, आणि दुसऱ्या गटाने पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत,असा दिवस जातो. म्हणजेच, अज्ञात गरीब, गरजू लोकांना स्वतःची “ओळख” न देता मदत करणे ही नॉर्वेजियन नागरिकांची परंपरा आहे. ही “संस्कृती” आता युरोपातील इतर अनेक देशांमध्ये पसरत असल्याचे समजते.
आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना केळी किंवा संत्री वाटली, तर ते सर्व मिळून त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या संघटनेचा ग्रुप फोटो काढून वर्तमानपत्रात छापतो, हो की नाही ???
अशीच “सस्पेंशन” सारखी खाण्या-पिण्याची प्रथा भारतात सुरू करता येईल का किंवा दुसरं काही तरी ???
….. न गवगवा करता
प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डार्ट – DART (Double Asteroid Redirection Test)☆ श्री राजीव ग पुजारी☆
जर तुम्हाला हॉलिवूड सिनेमांची आवड असेल तर तुम्हाला नक्कीच अर्मागेडन हा ब्लॉकबस्टर सिनेमा आठवत असेल. या सिनेमात ब्रुस विलीस आणि बेन ऐक्लेफ एका लघुग्रहापासून पृथ्वीला वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. या सिनेमाच्या कहाणीला अमेरिकन अंतरीक्ष संस्था अर्थात नासा (NASA) मूर्त स्वरूप देत आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी स्पेस एक्स (Space-X)च्या फाल्कन-९ (Falcan-9) या प्रक्षेपकाद्वारे नासाने DART (Double Asteroid Redirection Test) या अंतरिक्ष यानाचे प्रक्षेपण केले. या मोहिमेचा उद्देश डायमॉर्फस या लघुग्रहाला धडक देऊन त्याची कक्षा बदलणे हा होता. या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, पण भविष्यात एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीचे रक्षण करण्याची वेळ आलीच तर त्याची रंगीत तालीम म्हणून या मोहिमेकडे पाहता येईल. नासाने या मोहिमेला ग्रहीय संरक्षण मोहीम (Planetary Defence Mission) असे नाव दिले आहे.
२७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४४ मिनिटांनी या आंतरिक्ष यानाने एक कोटी सहा लाख किलोमीटर दूर असलेल्या डायमॉर्फस या लघुग्रहाला ताशी २४००० किलोमीटर या वेगाने धडक दिली आणि नासाच्या जोन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीतील तंत्रज्ञ व वैज्ञानिक आनंदाने बेभान झाले. कारण मानवी इतिहासातील हा क्षण एकमेवाद्वितीय होता.
संपूर्ण मोहिमेसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. नासाचे ग्रहीय संरक्षण अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणतात, ” सध्याचा विचार केला तर, असा कोणताही लघुग्रह नाही, ज्याच्यापासून पृथ्वीला नजिकच्या भविष्यात धोका संभवू शकेल. परंतु अंतराळात पृथ्वीच्या जवळपास मोठ्या संख्येने लघुग्रह आहेत. नासाचा प्रयत्न असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आहे, की ज्यामुळे भविष्यात प्रत्यक्षात जर एखाद्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका वाटला, तर वेळेअगोदर त्यावर उपाय करता येईल. आम्ही अशी वेळ येऊ देणार नाही की एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येईल व त्यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचे परीक्षण करू.”
डायमॉर्फस हा १६० मिटर व्यासाचा लघुग्रह असून तो डिडीमॉस या ७६० मिटर व्यासाच्या दुसऱ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस व डिडीमॉस ही जोडगोळी सूर्याभोवती ज्या वेगाने परिभ्रमण करते, त्यापेक्षा खूप कमी गतीने डायमॉर्फस डिडीमॉसभोवती फिरतो. त्यामुळे DART ने दिलेल्या धडकेचा परिणाम आपणास सहज मोजता येईल. या धडकेमुळे डायमॉर्फसच्या डिडीमॉसभोवती फिरण्याच्या कक्षेत १% पेक्षा कमी फरक पडेल पण पृथ्वीवरून दुर्बीणीच्या सहाय्याने तो मोजता येण्याजोगा असेल.
DART अंतराळयानाने लिसीयाक्यूब (LICIACube) नावाचा लहान उपग्रह सोबत नेला होता. हा उपग्रह इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. DART च्या धडकेअगोदर तो DART पासून अलग केला गेला व त्याने डायमॉर्फसवरील DART च्या धडकेचे तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या धुळीच्या ढगाचे फोटो घेऊन नासाकडे पाठवले आहेत. पृथ्वीवरील व अंतराळातील दुर्बिणी, धडकेनंतर डायमॉर्फसच्या कक्षेचा वेध घेतील व त्याच्या कक्षेत किती फरक पडला आहे हे नजिकच्या भविष्यात आपणास कळू शकेल.
हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.
कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.
गोष्ट इ.स. १६०० ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.
एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.
सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की “ हा तुलसीदास कोण आहे?”
तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, “ त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.”
अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि “ मलाही त्यांना भेटायचे आहे,” असे सांगितले.
सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की ‘ तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.’ हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, “ मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?” त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.
हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले. आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तरी बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला. पण अकबराला ते मान्य नव्हते, आणि तुळसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.
तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की “ तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करुन घ्या .”
तुलसीदासजी म्हणाले-“ मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.”
हे ऐकून अकबर संतापला. आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.
दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.
लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले,” बिरबल काय चालले आहे?”
तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते. पण तुम्ही सहमत झाला नाहीत. आणि आता करिश्मा बघायचा असेल तर बघा.”
अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले. आणि साखळ्या उघडल्या गेल्या.
तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की “ मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते. हे ४० –चतुर्भुज हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.”
तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, “ ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.”
अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लगेच मथुरेला पाठवले.
आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे. आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.—– म्हणूनच हनुमानजींना “संकट मोचन” असेही म्हणतात.
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री गजानन विजय ग्रंथानुसार श्री निमोणकर हे महाराष्ट्रात राहणारे गृहस्थ होते व यांना योगाभ्यास यावा अशी इच्छा होती. अनेक ठिकाणी फिरून अनेक लोकांना भेटून त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा ते हताश झाले व आपल्या दैवाला दोष देऊ लागले. तेव्हा अहमदनगरजवळ इगतपुरी तालुक्यात कपिलधारा नावाचे तीर्थ आहे, त्या तीर्थाजवळ त्यांना एक योगी भेटले.. त्या योग्यांनी त्यांना एक तांबडा खडा दिला व सांगितलं की या तांबड्या खड्यासमोर रोज योगाभ्यास करत जा…. असं म्हणून ते योगी गुप्त झाले. निमोणकरांना हुरहुर वाटायला लागली की हे योगी कोण होते, यांचं नाव गाव काय, तांबडा खडा दिला याचा अर्थ काय… काही दिवसांनी त्यांना तेच योगी पुन्हा भेटले. निमोणकरांनी विचारलं की “ त्या दिवशी आपली भेट झाली, पण आपण आपलं नावगाव सांगितलं नाही,” तेव्हा महाराज थोडंसं रागवून त्यांना म्हणाले, “ तुला तांबडा खडा दिला होता त्यातच माझं नाव आहे. हा लाल रंगाचा दगड नर्मदेत सापडतो आणि याला नर्मद्या गणपती असे म्हणतात आणि म्हणून माझं नाव गणपती हे मी तुला सुचित केलं होतं. पण तुला ते समजलं नाही. म्हणून आता तुला आदेश आहे या खड्याच्या प्रभावाने तुला योगाभ्यास येईल. हा खडा आपल्या देवघरात ठेवून त्याच्यासमोर योगाभ्यास करत जा”…
एवढे कथानक, एवढा दृष्टांत श्री गजानन विजयामध्ये आहे. परंतु या पुढील कथानक हे आम्हाला निमोणकरांच्या नातसुनेने सांगितले. ती म्हणाली की तेव्हा घरातल्या कोणालाही हे माहिती नव्हतं की यांच्याजवळ म्हणजेच निमोणकर या गृहस्थाजवळ हा तांबडा खडा आहे. ते काहीतरी नेहमी आपल्या कमरेतल्या धोतरात बांधून ठेवायचे. बाह्य अंगावरून काही कोणाला कळत नव्हतं. कालमानाप्रमाणे काही दिवसांनी वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ते अहमदाबादकडे होते. गृहस्थ असल्यामुळे तिथेच त्यांना अग्निसंस्कार करण्यात आला. तो अग्निसंस्कार होत असताना कमरेच्या वरचा व खालचा भाग जळून राख झाला पण कमरेचा तेवढा भाग– त्याला अग्नी लागत नव्हता. तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले व विचार करू लागले की असं का झालं असेल? तेव्हा त्यांच्या मुलाला असं आठवलं की वडील काहीतरी आपल्या धोतराच्या सोग्यात बांधायचे. ते जर आपण काढलं तर कदाचित या भागाला सुद्धा अग्नी लागेल. तेव्हा बास घेऊन तो तांबडा खडा काढला गेला व लगेच त्या भागाला अग्नीस्पर्श झाला. तो तांबडा खडा आणि काही वस्तू त्यांनी अनेक वर्ष पेटीमध्ये जपून ठेवल्या. काही वर्षांनी एक अधिकारी गृहस्थ त्यांना भेटले. निमोणकरांच्या मुलाला त्यांनी असं सांगितलं की ‘ तुमच्या पेटीत तुम्ही काहीतरी कुलूप लावून ठेवलेलं आहे, ते आपण बाहेर काढा व पूजा करा.’ तेव्हा त्यांनी पुन्हा पेटी उघडून तांबडा खडा काढला आणि रोज त्याची पूजा करायला लागले. असा हा ‘ तांबड्या गणपती ‘ ज्याला ‘ नर्मदा गणपती ‘ सुद्धा म्हणतात, तो आज ४० वर्ष त्यांच्या नातवाकडे आहे, जे रतलामला वास्तव्य करून आहेत. असा हा प्रासादिक गणपती. महाराजांच्या कृपेने आम्हा सर्वांना त्याचे दर्शन घडले . जे लोक नाही येऊ शकले त्यांना सुद्धा दर्शन घडावं या हेतूने ही कथा व हा फोटो.
– जय गजानन –
माहिती संग्राहिका : लता निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेलो मी आणि माझी बायको एका बाकावर बसलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना. कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, “असे का वाटते तुला? “
” मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे.”
—आता मी स्वतःला विचारू लागलो की ‘ खरच मी स्वतः आनंदी आहे का?’
काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला – ‘ नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.’
माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे ?—-
आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले, ज्यामुळे माझे समाधान झाले.
त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले, आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.
—-तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-
१. एंडॉर्फिंस
२. डोपामाईन
३. सेरोटोनिन
४. ऑक्सिटोसिन
आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.
इंडॉर्फिंस
–आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो, कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.
–हसणे हा इंडॉर्फिंस निर्मितीसाठी आणखी एक चांगला मार्ग आहे.
–आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.
डोपामाइन
आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.
– जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते, कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.
–यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.
–आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हासुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?
सेरोटोनिन
जेव्हा पण आपण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते. जेव्हा आपण स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो, तेव्हा सिरोटोनिन तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळेसुद्धा सिरोटोनिन तयार होते.
— हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.
ऑक्सिटोसिन
हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो.
–जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा ऑक्सिटोसिन तयार होते. मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते.
–तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होते.
तर मित्रांनो, खूपच सोपे आहे—
दररोज व्यायाम करून इंडॉर्फिंस मिळवा .
छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून डोपामाइन मिळवा.
इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा .
आणि आप्तेष्टांना बिलगून ऑक्सिटोसिन मिळवा !
अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.
आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते.
आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी…
१. कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा…. इन्डॉर्फिन
२. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका….. डोपामाइन
३. जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा…. सेरोटोनिन
४. जवळच्या माणसांना विनासंकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो…. ऑक्सिटोसिन
आनंदी राहा, मस्त जगा !
लेखक – अज्ञात
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सीट बेल्ट… श्री दिवाकर बुरसे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
कार चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळा.
काल टाटा सन्सचे माजी अध्यक्ष श्री सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची वार्ता सर्वांनी वाचली असेल. ते कारच्या मागच्या आसनावर सीट बेल्ट धारण न करता बसले होते.
मित्रहो, कारच्या मागच्या सीटवर बसणारासाठीही सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करून देणे कार उत्पादकांना अनिवार्य आहे. ते देतातही. कार विकत घेताना आपण त्याचे पैसे देतो. तरीही हे बेल्ट मागे बसणारे सहसा वापरतच नाहीत असे निरीक्षण आहे.
अपघाताच्या वेळी मागे बसणारा ग्रॅव्हिटीच्या ४० पट वजनाने पुढे फेकला जातो. म्हणजे ८० किलो वजन असलेला माणूस ८०x४०=३२०० किलो वजनाने पुढील चालकावर कोसळतो. मागे बसणारे आणि कार चालक यात गंभीरपणे दुखावले जातात. कदाचित त्यांचा मृत्यू ओढवतो. केवढा हा निष्काळजीपणा !
म्हणून मित्रांनो, कारमधून प्रवास करताना ड्रायव्हर आणि मागे बसणाराने कटाक्षाने सीट बेल्ट लावले पाहिजेत. त्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करणे सर्व प्रवाश्यांच्या जिवावर बेतू शकते.
सीट बेल्ट वापरा, सुरक्षित प्रवास करा, ही ‘ यंत्रदासा ‘ची सर्व प्रवाशांना कळकळीची विनंती.