मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 249 ☆ अमरवेल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 249 ?

☆ अमरवेल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

“अमरवेल” किती सुंदर नाव आहे,

पण ही वनस्पती,

दुसर्‍याच्या जीवावर जगणारी,

बिनधास्त, बिनदिक्कत!

नाही आवडायचं ,

तिचं हे दुसऱ्याच्या जीवावर,

उड्या मारणं !

 अचानकच

 जाणवलं—

तिच्यातला चिवटपणाच तिचं

जगणं आहे !

कुणी वंदा कुणी निंदा —-

तिला मिजाशीतच जगायचंय!

आणि असतीलच की,

उपजत काही प्रेरणा स्रोत,

तिच्यातही !

अमरवेल आलेली असते,

काही असे स्थायीभाव घेऊन,

जे असतील ही,

इतरांना त्रासदायक,

पण अमरवेल तग धरून!

 ज्याचं त्यानं

जगावं की हवं तसं!

पण काही संकेत पाळायचेच

असतात सगळ्यांनीच!

तर ….

काही गोष्टींना नसतातच,

कुठले नियम वा अटी,

दुसऱ्यांनी नसतेच

ठरवायची इतर कुणाची,

विचारसरणी !

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निसर्गाची उधळण… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ निसर्गाची उधळण☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

येईल अवचित हस्ताची सर,

नाचत नाचत अवनी वरती!

 थेंब थेंब तो फुटून येतो,

 उधळण करीत धरणी वरती !…१

*

ओले, हिरवे गवत डुलते,

रान फुले ही डोलत वरती!

अवघी अवनी फुलून येते,

नवचैतन्याने गाणी गाती !….२

*

निसर्ग साजरा मनास भुलवी,

फिरवी त्याची अत्तरदाणी!

गंधित ,रंगित रानफुलांची,

कुपी उधळते भवताल झणी!…३

*

कधी वाटते झुळूक बनावे,

‌हाती घेऊन गुलाब दाणी!

शिंपीत जावे गुलाब पाणी,

संध्या समयी वातावरणी!…४

*

कधी वाटते फुलपाखरू व्हावे,

उडत फुलावर रंगबिरंगी !

कधी वाटते भ्रमरच व्हावे,

मिटून जावे कमळाच्या अंगी!…५

*

मनात गुंजन होते कविच्या ,

निसर्ग किमया वर्णू किती!

सहस्र रुपे ओंजळ त्याची,

ओततो तोही या भू वरती !…६

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेम नाही पावसाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नेम नाही पावसाचा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

का शोधावे मी स्वप्नांना,

स्थित होती जी लोचनी.

आठवावे का पुन्हापुन्हा ,

आठवणी जपल्या मनी.

त्या फुलांचे काय झाले,

ओंजळीत जी मी घेतली.

लावला जीव, गुंतलो जिथे,

ती नातीही दुरावली.

कोसले मी कोसल्यांना,

समजावले समजाऊनी.

समजून घेतले स्वत:ला,

चंद्रबळ उसने घेउनी .

भरुन आले आकाश माझे,

कधीतरी तू समजून घे.

नेम नाही पावसाचा,

पाऊस माझा कोसळूदे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सगुण विठ्ठल – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

सगुण विठ्ठल– – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सावळा विठ्ठल,आहे हो निर्गुण

भक्तांसाठी आला, होऊन सगुण ।।ध्रु।।

*

सावळे रूप ते, आहे मनोहर

भक्तांना पावला, घाली अलंकार

मंजुळ नादाचे, सोन्याचे पैंजण

भक्तांसाठी आला ,होऊन सगुण

*

कनकाचा कद, विठोबा सजला

शोभली गळ्यात,मौक्तिकांची माला

माणिक मोत्यात,दिसे भक्तगण

भक्तांसाठी आला,होऊन सगुण

*

भक्तांनी अर्पिले, नाना अलंकार

भक्तांना भावले,भक्तिचे प्रकार

पावतो भक्तांना,सद्गुणाची खाण

भक्तांसाठी आला, होऊन सगुण

*

सावळा विठ्ठल आहे हो निर्गुण

भक्तांसाठीआला, होऊन सगुण ।।ध्रु।।

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #261 ☆ पुरावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 261 ?

☆ पुरावा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

त्याच्या समोर त्याचा जाळला पुरावा

खोटाच त्या ठिकाणी जोडला पुरावा

*

डोळ्यामधील धारा सत्य बोलल्या पण

न्यायास मान्य नाही वाटला पुरावा

*

साक्षी फितूर झाले स्वार्थ जागल्यावर

घेऊन चार पैसे बाटला पुरावा

*

हाती धरून त्याने भ्रष्ट यंत्रणेला

फाईल चाळली अन चोरला पुरावा

*

ह्या न्यायदेवतेने बांधलीय पट्टी

डोळ्यामधेच आहे गोठला पुरावा

*

न्यायालयातसुद्धा हे असे घडावे

पैशासमोर होता वाकला पुरावा

*

भोगून सर्व शिक्षा संपल्याबरोबर

निर्दोष तूच आहे बोलला पुरावा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

निघून जातील घन

ढळत्या थेंबांची वर्षा

नाचती हरित धरा

हळव्या वायूचे स्पर्शा.

*

तिथे कुठेतरी मन

लपून अजून आहे

इंद्रधनू स्पंदनात

दुःखही सजून आहे.

*

म्हणून आवडे ऋतू

स्मृतीत स्वच्छंदी नभ

भिजरे सतत भाव

भुमीस सुखाचा लोभ.

*

किमया निसर्ग माया

कळीचे पाकळी फूल

उमले आयुष्य नवे

जन्माची गतीक भूल.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जरी वाजले सूप ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 जरी वाजले सूप 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

⭐

   आली म्हणता म्हणता

येवून सरली दिवाळी,

ठेवा भरून डब्यात

आता शिल्लक रांगोळी !

*

चिवडा चकली शेवेचा

उरला असेल जर चुरा,

करून रविवारी मिसळ

त्याचा तुम्ही वापर करा !

*

ताट लक्ष्मी पूजनाचे

ठेवा नीट सांभाळून,

पुढच्या वर्षी दुप्पट

भर घालायची ठरवून !

*

धुरात पुन्हा फटाक्याच्या

कधी पैसे टाकू नका,

अनाथांना दान देण्याचे

मनाशी ठरवून टाका !

*

जरी संपला हा दीपोत्सव

तेवत ठेवा स्वप्नांचे दीप,

निर्धार करुनी स्वप्नपूर्तीचा

मान मिळवा जगी खूप !

मान मिळवा जगी खूप !

⭐

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – काय पावसा…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – काय पावसा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

काय पावसा,

मुक्काम वाढवलास तू.

दसऱ्याला सीमोल्लंघन करता करता,

दिवाळीसाठी थांबलास तू.

 

काय पावसा, 

शेतात पिकवलं होतंस तू.

तोंडात घास देता देता,

असं कसं हिसकावलंस तू.

 

काय पावसा,

तहान भागवलीस तू.

धरण भरता भरता,

काठ वाहून नेलास तू.

 

काय पावसा,

छान बरसला होतास तू.

पाय काढता काढता, 

थयथयाट केलास तू.

 

काय पावसा,

सारं हिरवंगार केलंस तू.

पण.. उन्मत्त होऊन कोसळता कोसळता,

डोळ्यात पाणी आणलेस तू. 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहेराची ओढ… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

माहेराची ओढ…  ☆ सौ. वृंदा गंभीर

किती लागली जीवाला ओढ

संसारातून सापडेना कधी वाट

माहेरची जाईना आठवण मनातून

अवघड आहे हा संसाराचा घाट

*

दीपावली ला जावे आईस भेटावे

भाऊबीज करून माघारी फिरावे

आठवणीने वाहे पाणी डोळ्यातून

वेड्या मनाला सांगा कसे सावरावे

*

नको काही भाऊराया फक्त प्रेम

तुझी चटणी भाकरी लागते गोड

माहेरा वाचून नाही उरला राम

भावाबहिणीचे काही सुटेना हे कोडं

*

सुखी आहे सासरी यावे माहेरी

क्षणाचा तो आनंद बळ देई संसारी

एकच आहे अपेक्षा प्रेम कमी नको

वर्षातून एकदा जागा हवी माहेरी

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 193 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 193 ? 

अभंग ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

सायंकाळ होता, पक्षी घरट्यात

गाई ही गोठ्यात, विसावती.!!

*

आयुष्याची होता, सायंकाळ तैसी

जवळीक ऐसी, मिळो मज.!!

*

विझुनिया जाता, आयुष्य पणती

मोक्षाची पावती, प्राप्त व्हावी.!!

*

असत्य संपूनी, सत्यची मिळावे

बाकीचे जळावे, वेशीवर.!!

*

कवी राज म्हणे, इच्छा पूर्ण व्हावी

जीवनात यावी, विरमता.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print