मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यज्ञ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ यज्ञ ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

अवचित आठवली

गाथा हृदयी भिडली

द्वाड झाल्या आठवणी

रात ढळाया लागली

*

अंगावरचा धडपा

त्याचा पदर फाटका

झाकू पहातो संसार

माझा फाटका नेटका

*

कुणा मदतीचा हात

नाही मागायचा आता

शब्द सुखाचे गाठोडे

हीच सारी मालमत्ता

*

गेली मरून मनशा

तिचे दु:ख नाही मला

चार दिसाचे जगणे

त्याचा किती बोलबाला

*

नको आवर्तन पुन्हा

जन्म मरणाच्या दारी

आहे पदरी बांधली

आर्धी सुखाची भाकरी

*

नको निवारा आणखी

नको वैभव कसले

लेखणीला आले बळ

त्याने जगाला जिंकले

*

नाही पुजला दगड

तेच आहे समाधान

दिलदार मैत्र माझे

माझ्या जगण्याचे धन

*

राना वनात भेटते

मला माझेच संचीत

जळे चंदनाची चूड

भोवतीच्या वादळात

*

खोड चंदनी जळता

दरवळ मुलुखात

यज्ञ झाला जगण्यचा

हेच घडले आक्रीत

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोक्षमुक्ती धाम… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मोक्षमुक्ती धाम… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पंख परीचे घेउन,

नीज डोळ्यावर आली.

चेटकिणीच्या भयाची,

कथा इथेच संपली.

*

जावळात अजूनही,

तुझी फिरतात बोटे.

हरवल्या शैशवात,

आई अंगाईत भेटे.

*

थोडा निर्मम होउन,

मांड भातुकली डाव.

मोहमायेच्या संसारी,

शोध मोक्षमुक्ती धाम.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मनसंवाद…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “मनसंवाद” ☆ प्रा. भरत खैरकर 

गुढपण माझे मनाचा संवाद

माझाच वाद माझ्यासंगे !

*

गरुडाचे पंखी आकाश अपुरे

तैसे मन उडे चराचरी !

*

सुखदुःख सारे मृगजळी खेळ

साधावा मेळ विवेकाने!

*

परिसाचे संगे लोह झाले सोने

तैसे शब्दाभ्यासे सारस्वत!

*

चित्ती यातायात जगाचा पसारा

मना एक थारा पांडुरंग!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ताल आणि ठेका ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😞 😅  ताल आणि ठेका !  ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

होई बेताल बघा सारे

ठेका चुकता तालाचा,

नाही वेळीच सावरला

रंग उडेल आयुष्याचा !

*

 करू नका श्रीगणेशा

 द्रुत लयीच्या ठेक्याने,

 अन्यथा घात ठरलेला

 धावता जलद गतीने !

*

सोप्पे नसते कधीच

घट्ट पकडणे तालास,

आयुष्य पडते खर्ची

सुंदर सम गाठण्यास !

*

 जो ताल आला नशिबी

 त्या लयीत ठेका धरावा,

 हा मंत्र सुखी आयुष्याचा

 तुम्ही मनावर कोरावा !

 तुम्ही मनावर कोरावा !

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा खेळ सूर्य-चंद्राचा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ हा खेळ सूर्य-चंद्राचा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कालचा सूर्य मावळता

तो आज नव्याने येतो

रोजचा दिवस आपणा

म्हणून वेगळा म्हणतो…..

*

रवि मावळतीला जाता

प्रहर रातीचा हळू येतो

साम्राज्य काळोखाचे तो

हलकेच पसरवून देतो…..

*

 रातीला येणारा अंधार 

 दुसरी पहाट येईतो रहातो

 रवि नव्या दिवसाचा येता

 अंधार कालचा जातो…..

*

 सुख रविसम येते जाते

 आणि ….

अंधारासम मुक्कामाला

 दु:ख वस्ती करून जाते…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घडी छान बसते… ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

🙏🏻 घडी छान बसते… 🙏🏻 सौ. अमृता देशपांडे  

दोन टोकं जुळवली की

घडी छान बसते….

*

दोन टोकं जुळवणं खरंच

अवघड का असते… ?

मधलं काही जरा बाजूला

केलं तर

घडी छान बसते.

*

मागची पिढी पुढच्या पिढीशी

जुळणं अवघड का असते.. ?

मधली जरा बाजूला झाली तर

घडी छान बसते.

*

मागचे दिवस आताचे दिवस

तफावत का दिसते… ?

मधले नको ते काही विसरले तर

घडी छान बसते.

*

कागदावर लिहून दोन्ही टोके

जुळवावीत

आत लिहिलेले लपून रहाते..

मनातली घडी छान बसते.

*

तुझंही नको माझंही नको

मधलं सारं पुसून

परत टोकं जुळवली तर…

घडी छानच बसते.

*

घडीघडीचे आयुष्य

घड्याघड्यांनी भरते…

एक एक टोक जुळवता

घडी छान बसते.

*

घडी छान घालता घालता

हळूच उलगडली… तर

मधली रिकामी जागा

नेहमीच भरलेली दिसते.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सलाम… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

सलाम ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

 कधी दुष्काळ सुका, तर कधी येतो ओला

दुःखाच्याच रेघुट्या, आमच्या नशिबाला.

ठिगळं जोडली सतरा, तरी पदर फाटलेला

शेवटी पिकाचा पंचनामा, कागदावरच उरला.

*

 सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला

**

कुणा ठाव कोण आला अन कोण पडला ?

नाळ आमुच्या कष्टाची, रानच्या बांधाला

धरणीला माय आणि बाप मानतो नभाला

आलेल्या संकटाचं, साकडं घालतो विठूला

*

सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला

**

कष्टाच्या घामात रगडतो, जवा आमुचा पागुटा

तवाच रंगतो पुढाऱ्याचा, चकचकीत फेटा

बळी किती जाती, गोड उसाच्या कडू कहाणीला

तवा झळकतं नाव पुढाऱ्याचं, साखर कारखाणदारीला

*

सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला

**

सोयाबीन, कपासीचा भाव, सदाच ढासळलेला

बांधावरच्या बाभळीला, फास कर्जाचा टांगलेला

अश्वासनाच्या फुक्या हावंत, श्वास गुदमरलेला

मत माझं देऊनशानी, फक्त जागलो लोकशाहीला

*

सलाम आमुचा जिंकला आणि हारलही त्याला

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ करूं या सद्भावाची वारी – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ करूं या सद्भावाची वारी  – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(महापरिनिर्वाण दिन.)

मानवतेच्या मंदिरातील होऊ वारकरी

करूं या सद्भावाची वारी ॥ ध्रु॥

*

मायभूची अम्ही लेकरे सारी

पिता होऊन लढले हे पुढारी

विचाररत्ने लेवून आंबेडकरी

करू या सद्भावाची वारी ॥१॥

*

जातपातीचा भेदभाव सारा

नष्ट करूनी विचार पसारा

भरतभूला उंचवू कळसापरी

करू या सद्भावाची वारी ॥२॥

*

जन्म अमुचा या भूमीमधला

उचनीच कलंक या मातीला

मिटवून टाकू या ही दरी

करू या सद्भावाची वारी

*

मानवतेच्या मंदिरातील होऊ वारकरी

करूं या सद्भावाची वारी ॥ध्रु॥

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ .. चमच्यांची महती… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

.. चमच्यांची महती… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

*

चमच्यांची हो महती किती सांगू मी तुम्हाला

उठसुठ मागे मागे नाही धरबंध तोंडाला

लाळ गळते ती किती नाही लाज नि शरम

पोळी भाजतात रोज स्वार्थाचीच ते गरम…

*

चाटूपणा किती किती पाहताच ये शिसारी

मागे मागे फिरतात हे तर अट्टल भिकारी

बांडगुळे ही झाडांची शोषण करून जगती

बिलगती झाडाला नि करती झाडांची दुर्गती..

*

परस्वाधिन हो जिणे नाही वकुब काडीचा

झेंडा धरावा हो हाती रोज चालत्या गाडीचा

जिथे भाजेल हो पोळी तिथे लागती जळवा

जाती सोडून हे केव्हा नाही भरोसा धरावा…

*

जिथे दिसेल हो तूप तिथे बुडती चमचे

तूप संपताच पहा नाही होणार तुमचे

केव्हा मारतील लाथ केव्हा सोडतील साथ

लाचार नि लाळघोटी निलाजरी ही जमात..

*

दूर ठेवा हो चमचे बदनाम ते करती

तोंडावर गोड गोड खिसे आपुले भरती

गोड गोड जो बोलतो पोटी छद्म असे त्याच्या

फटकळ परवडे हे तर करतात लोच्या..

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवते बालपण… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

 

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवते बालपण☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

आठवते बालपण, मातीतले खेळपण

झटकुनी कपड्यांना, नवा डाव नवेपण

*

लपाछपी खेळताना, अंधारात लपताना

भाता फुले छातीतला, सारे गायब होताना

आता वाटते गंमत, तेव्हा वाटे भीतीपण

आठवते बालपण, मातीतले खेळपण…

*

लंगडीचे लंगडणे, तोल कसा सावरणे

एका पायी धावूनही, नाही कधीच दमणे

राज्य घेण्या सदा पुढे, झूगारुनी दडपण

आठवते बालपण, मातीतले खेळपण…

*

जरी चेंडू कापसाचा, व्रण कधी उठे त्याचा

आई लावता औषध, आव आणे झोम्बल्याचा

किती लागे खूपे तरी, एक साधी फुंकरण

आठवते बालपण, मातीतले खेळपण…

*

अजूनही हाक द्यारे, बघा जमतील सारे

भेटताच एकमेकां, अंगी भरतील वारे

आम्ही विसरलो खरं, शीळ बिन्धास घालण

आठवते बालपण, मातीतले खेळपण…

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares