प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ निखळला तारा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
निखळला तारा अद्भूत एक
जयाची गगनावेरी झेप..
निखळला….
अस्सल होती प्रीत तयाची
सेवा करी भारतमातेची
नीतिही होती त्याची नेक…
निखळला….
आदर्शाचा महान मेरू
उभा ठाकला जणू कल्पतरू
उद्धरूनी गेले ते कित्येक..
निखळला…
माणुसकीचा खराच पाझर
कल्पतरू तो होता सागर
चालला, वापरून विवेक…
निखळला….
जन्म घेई बा पुन्हा एकदा
तू होता तर नव्हत्या आपदा
देशिल… पुन्हा का तू संकेत…
निखळला….
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
दि: १० ॲाक्टोबर २०२४
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈