मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #166 ☆ ना चूक पाखरांची… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 166 ?

ना चूक पाखरांची … ☆

झालीत यंत्र साऱ्या मुडदाड माणसांची

किंमत कुठे कुणाला डोळ्यांतल्या झऱ्यांची

 

बैलास काम आता उरलेच फार नाही

बैला विनाच चाके पळतात ह्या रथाची

 

देहास अर्थ नाही काहीच हा कसा तो

जळतो तरी दिसेना का राख कापराची ?

 

मातीस खोल खड्डे लोखंड पेरलेले

उगवून छान आली स्वप्ने इथे घरांची

 

सोडून सर्व गेले सरणावरी मला ते

जळतेय सोबतीला मोळीच लाकडांची

 

सारेच उच्च शिक्षित शेती कुणी करावी

शेते उपेक्षतेने बघतात वाट त्यांची

 

आकाश झेप घ्यावी माझीच तीव्र ईच्छा

गेले उडून पक्षी ना चूक पाखरांची

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांगता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ बेपत्ता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

किती दिसांनी त्यक्त मंदिरी

येवुन कोणी दिवा लावला

घंटानादे ढळे समाधी

मूर्तीमधला देव जागला !

 

तुडुंब भरल्या कृष्णघनांचे

किती दिसांनी ऊर मोकळे

चिंब धरित्री भिनल्या धारा

नवसृजनाचे पुन्हा सोहळे 

 

इतिहासाची गहाळ पाने

पत्ता शोधित आली दारी

दंतकथांचे हो पारायण

नवसमराची पुन्हा तयारी !

   

 किती दिसांनी दुभंग वारुळ

 एक तपाची होय सांगता

 नवीन स्पंदन,नव संजीवन

 नवा अनंत नि उरात आता !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 108 ☆ अभंग… (गीता जयंती) ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 108 ? 

☆ अभंग… (गीता जयंती) ☆

अर्जुनासी मोह, गीतेचा उगम

साधला सुगम, श्रीकृष्णाने.!!

 

अठरा अध्याय, सार जीवनाचे

कर्म भावनांचे, नियोजन.!!

 

विषाद योगाने, होते सुरुवात

मोक्ष संन्यासात, पूर्णकार्य.!!

 

गीता जागविते, गीता शिकविते

गीता उठविते, पडतांना.!!

 

कवी राज म्हणे, गीता अध्ययन

करा पारायण, नित्यानेम.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवा… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवा… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

दिव्यांच्या झगमगाटाने उजळून गेलं गाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव  …

 

जेथे नको तेथे आपण असते सांडलेले

नको असलेले सारे  नको तेथे मांडलेले

पाहिली गरिबी की खरंच काळीज घेत ठाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…1

 

पाहिले जगाकडे पण त्यांची रीतच न्यारी

समजावले किती पण सर्वांना संपत्ती प्यारी

मतलबी या दुनियेत सापडेना एकही साव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…2

 

सुसंस्कृत विचाराचं नाही राहील झाड

कितीही बोललो तरी निघेना  जुनीच राड

इच्छित स्थळी जाण्यास  अपुरी पडते धाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव…3

 

हल्ली पाऊस  कसाही केव्हाही पडत असतो

चतकोर तुकड्यासाठी माणूसही  नडत असतो

पहा कुठल्या यादीत दिसतय का? गरिबाचं नाव

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव  ...4

 

करा तुम्ही दीपोत्सव पण  झोपडीकडे हि पहा

जा वृद्धाश्रमाकडे आणि तिथे एक दिवस राहा

सेवा करता त्यांची तुम्हाला तिथेच सापडेल देव…5

जिथे अंधार आहे तिथे एक तरी दिवा लाव …

 

– मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनमोर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मनमोर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

असा मोर नाचे

फुलवून पिसारा

रंगून जाई धरा

नि सृष्टीचा पसारा.

 

तृण-तृण मन

भाव होई गगन

नाचता नाचता

अश्रू जीव सृजन.

 

पाखर परती

सांज धुंदल्या वाटा

मोरची हृदय

सजल्या घन छटा.

 

हरित नक्षिचे

बहार रंग अंग

ऊंच मान डौल

प्रीय तुरा श्रीरंग.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – किनारा शोधत राही – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? ⛵– किनारा शोधत राही 🚤 ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

अथांग सागर भवताली

आकाशाची जली निळाई

दिशा द्यायला नाही वल्हे

नाव एकटी टिकून राही

बोलवी का कुणी किनारा?

शाश्वत सहारा नीत देणारा

त्याच किनार्‍याच्या विश्वावर

मिठीत घेईल पुर्ण सागरा

सागराची निळी नवलाई

भूल पाडत हाकारत जाई

भरकटण्याचे भय होडीला

म्हणून किनारा शोधत राही

किनारा मिळे बंधन येते

बंधन विश्वहर्तता देते

प्रेमरज्जू साथीला मिळता

होडी सागरी खुशाल फिरते

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “द्वैत…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ “द्वैत…” ☆ श्री आशिष मुळे ☆

खेळून खेळून लपंडाव कंटाळलो आहे

घेऊन सारखं सारखं राज्य वैतागलो आहे

भिंतीमागे कधी साद देतोस अनाहत नादात

नेहमी भासवतोस भास शब्दांच्या गवतात

धरायला जातो तुला जेव्हा झाडामागे

दिसतात तेव्हा विंचू लपलेले दगडामागे

ती माया मला नेहमी लांबून खिजवते

धावतो मग चिडून तुझ्या त्या मैत्रिणीच्या मागे

 

तुला फसवून बाहेर आणायला काय नाही केलं

गोड गोड स्तुती करणारी तुझी गाणी म्हटली

मंत्रमुग्ध करणारी सुगंधी काडी जाळली

पण तू आहेस आपल्या सगळ्यात हुशार

घेत नाहीस सहजी कोणाचाही कैवार

खरं सांगू, मला तुझा फायदा नको आहे

फक्त हात तुझ्या दोस्तीचा हवा आहे

 

पुरे झाला रे आता हा लपंडावाचा त्रागा

फिरवल्यासना मला सगळ्या जागा

किती काळ झाला आपण खेळतोय

याचा काहीच हिशोब नाहीये

किती वेळ अजून खेळणारे

याचा काहीच अंदाज नाहीये

जाऊ रे आता परत आपल्या घरी

संपव क्षणात तुझ्या माझ्यातली दरी…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 130 – हवा अंत ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 130 – हवा अंत ☆

मनी वाचतो मी तुझा ग्रंथ आता।

जिवाला जिवाची नको खंत आता।

 

असावी कृपा रे तुझी माय बापा।

नको ही निराशा दयावंत आता।

 

पताका पहा ही करी घेतली रे।

अहंभाव नाशी उरी संत आता ।

 

सवे पालखीच्या निघालो दयाळा।

घडो चाकरी ही नवा पंथ आता।

 

तुला वाहिला मी अहंभाव सारा।

पदी ठाव देई कृपावंत आता।

 

चिरंजीव भक्ती तुला मागतो मी ।

नको मोह खोटा हवा अंत आता

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवडसा… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

कवडसा असा

“तो” धावत  येई

सायं-संध्या त्यास

किती, घाई घाई

 

देव्हाऱ्यात देव

भेटता लोळण

चरण स्पर्शूनी

गोड आळवण

 

तेजाळती क्षण

भारावले मन

नेत्र ही दिपले

ओजस हा दिन

 

गवसला सूर

तृप्तीत सुखाचा

सृजन सोहळा

अजब सृष्टीचा

 

“देव” ही हसले

भाग्य उजळले

नतमस्तक मी

निःशब्द बोलले

 

आशीर्वाद मज

द्यावा हो सत्वर

सुख शांती नांदो

इथे निरंतर

 

सेवा कामी तन

सतत झिजावे

इतुकेच आता

मनात ठसावे.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #152 ☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 152 – विजय साहित्य ?

☆ चालक तूं ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

दत्त दत्त कृपा निधी

वेद चारी तुझ्या पदी..

गोमाताही देवगणी

दत्तात्रेय नाम वदी..१

 

गुरुदेवा दिगंबरा

सत्व रज तम मूर्ती..

निजरुपे लीन होऊ

द्यावी चेतना नी स्फूर्ती..२

 

अनुसूया अत्रीऋषी

जन्म दाते त्रैमुर्तीचे..

ब्रम्हा विष्णू आणि हर

तेज आगळे मूर्तीचे..३

 

दत्त दत्त घेता नाम

भय चिंता जाई दूर

लय, स्थिती नी उत्पत्ती

कृपासिंधु येई पूर..४

 

अवधुता गुरू राया

तुझ्या दर्शना आलो‌ मी..

काया वाचा पदी तुझ्या

आनंदात त्या न्हालो मी..५

 

हरी,हर नी ब्रम्हा तू

साक्षात्कारी पालक तू

ज्ञानमूर्ती पीडाहारी

संसाराचा चालक तू..६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares