श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ हरिनामाची शाळा – कवी -अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
☆
हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात
विट्ठल रखुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत ||धृ||
*
शाळेमध्ये हो शिकण्या आले वारकरी संत
सावळ्या हरीचे नाम घेऊ्नी झाले भाग्यवंत
पुंडलिक तो मॉनिटर होता पंढरीच्या शाळेत || १ ||
*
पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर
युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर
अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात ॥२ ||
*
एकनाथ नामदेव तुकोबा चोखोबा भजनी होति दंग
विठ्ठल विठ्ठल पाढे पाठ करती सावता ही त्यांच्या संग
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अंखंड हरिपाठ ||३ ||
*
जनाई मुक्ताई सखु कान्होपात्रा भक्ती मध्ये रंगती
भक्ती पाहुनी साऱ्यांची विट्ठल त्यांना पास करती
फर्स्ट क्लास घेऊन तुकाराम ते गेले वैकुंठात ||४ ||
*
अभंग कीर्तन भारुड ओवी गाती हो शाळेत
पांडुरंगाचे नाम घेता सुटेल जीवनाचे गणित
एकदा तरी जाऊन पहा हो पंढरीच्या शाळेत ||५ ||
☘️
कवी – अज्ञात
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर