श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ गाठा पैलतीर ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
देह देत चाले हाच समाचार
गुणदोष यांचे भरले कोठार
जनन मरण घडे निरंतर
जन्मजात येथे चाले व्यवहार
मोहमायाजाळ लटका संसार
आशा मनशेचे लाडके माहेर
सुखदुःख येथे आहे सारासार
मन काळाच्याही धावते समोर
बहूकष्टता ही तुटेना अंतर
गाठायाचा कसा सांगा पैलतीर
घडोघडी मिळे लटका आधार
नित्यसत्य आहे प्रपंचाचा सार
येणे जाणे येथे साधची करार
परंपरा थोर जन्म हा संस्कार
बंदिवान आहे जन्मता पामर
मोक्ष हीच आशा मरणा नंतर
कुळ धर्म पाळा पाळा कुळाचार
निर्मळ मनाने करा उपकार
करा शुद्ध मन सोडा अहंकार
खरा हाच आहे “सहज”विचार
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈