सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “चालत रहावं लागतं…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
चालत रहावं लागतं
थांबून कुठे का चालतं
जगून पहावं लागतं
जगणं अनुभवातूनच असतं….
*
जग खूप सुंदर
आयुष्य ही सुंदर
जगणं सुंदर
आपणच करावं लागतं….
*
काट्यातून गुलाब
चिखलात कमळ
उमलताना, दरवळताना
तक्रार करत नसतं…..
*
उन्हाचा तडाखा
थंडगार वारा
पावसाच्या सरीत
जीवांचा पसारा…..
*
विशाल ब्रम्हांड
विपुलताच सारी
कणभर अस्तित्वासाठी
का मारामारी?
*
जगण्याचा हक्क
प्रत्येकाला असतो
ज्याच्या त्याच्या वाट्याचे
मिळूनही भांडत बसतो…
*
अपेक्षांचे डोंगर
आपणच उभारतो
निराशा आणि दुःखाने
मन आपलेच पोखरतो….
*
बघ डोळे उघडून
सारे काही भरभरून
तुझ्यातच सापडेल तुला
मग का जायचे कोलमडून….
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈