डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ हॕलो..sss मी वड बोलतोय..! आवाज येतोय ना…! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
मी खूप गुदमरलोय, दमलोय आज, मलाच
आॕक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे.
माझ्याभोवती किती ही गर्दी…!
कोरोना विषाणू नाही गेला ना अजूनही..!
सोशल डिस्टन्सींग तर दिसतच नाही
मास्क सुद्धा कुणाच्या तोंडावर मी पाहिला नाही.
मला कोंडल्यासारखं वाटतंय
श्वास घेणं अवघड झालंय
ही कोण सावित्री ? सत्यवानाची सावित्री
कधी माझ्या सावलीत आली..!
ती माझ्याच सावलीत का आली ?
सावली शोधत असेलही आली माझ्या सावलीत..!
मुर्च्छित तिच्या पतीला मिळाला असेल विसावा !
खूप हैराण होतोय मी दरवर्षी या दिवशी..
माझ्या सावलीत आणि माझ्या सारख्या अनेकांच्या
सावलीत सावित्रीजोतीबांची काही दिवस
मुलींची शाळा भरली होती हे मला आठवतंय..!
रविंद्रनाथ टागोरांची शाळा… शांतिनिकेतनही
आमच्या सारख्यांच्या सावलीतच की हो..!
ते खूपच छान, उत्साही, आशादायी दिवस.
मुलांचं बागडणं, पारंब्यांशी झोका घेणं
लपंडावात माझ्या भल्या खोडामागं लपणं
वाह..वाह.. ! खूप अफलातून वाटायचं तेव्हा..!
नका गुंडाळू मला दोऱ्याने
नका करु माझी पूजा
विनातक्रार सात पावलंतरी चाला
जोडीदाराच्या सुखदुःखात सहभागी व्हा !
प्रेमपूर्वक जगण्याचा उत्साह वाढवा..!
मरेपर्यंत एकमेकांना आनंदी ठेवण्याचा
प्रयत्न मिळून करा..!
रोगमुक्त करुन जीवदान देणारे डॉक्टर्स, नर्सेस्
तुमचा अंत काहीकाळ लांबणीवर टाकणारे
हाॕस्पीटलस् यांना आदर द्या..!
दवाखान्याचा खर्च गरीबांना परवडावा यासाठी
काही पावलं उचला..!
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, हे प्रश्न कुठे सुटलेत अजून !
विधायक कामासाठी, अनेकांच्या भल्यासाठी
मानवतेकडील वाटचालीसाठी
चर्चेच्या, संवादाच्या अनेक फेऱ्या मारा..!
ग्लोबल वाॕर्मिंग वाढतंय मित्र-मैत्रींणींनो
झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा समतोल साधा
तुम्ही माणसं ग्रेट आहात तुमच्या हातात बरंच काही
काही चुकल्यास क्षमा करा
धन्यवाद …!
© डॉ.सोनिया कस्तुरे
24/06/2021
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/ सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈