मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक धागा रेशमाचा… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक धागा रेशमाचा☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(‘मनस्पर्शी साहित्य परिवार‘ यांच्यातर्फे आयोजित काव्यस्पर्धेत या कवितेला पुरस्कार दिला गेला आहे.)

एक धागा रेशमाचा 

सूत्र हे संवेदनांचे 

प्रेम विश्वास कर्तव्य 

नात्यातील बंधनांचे ||१||

*

भावा बहिणीची ओढ 

धागा हळव्या नात्याचा 

स्नेह जिव्हाळा अतूट 

बंध लोभस प्रेमाचा ||२||

*

सांगे बहीण भावाला 

वसे माहेर अंतरी

बंध मायेचे नाजूक

जपू दोघे उराउरी ||३||

*

नाही मागणे कशाचे 

तुला प्रेमाचे औक्षण 

लाभो औक्ष कीर्ति तुला 

मला मायेचे अंगण ||४||

*

जसा कृष्ण द्रौपदीसी 

पाठीराखा जन्मभरी 

नाते आपुले असावे 

सुखदुःख वाटेकरी ||५||

*

तुझ्या माझ्या भावनांना 

लाभे काळीज कोंदण 

नित्य जपून ठेवू या 

अनमोल असे क्षण ||६||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन डोळ्यातील कहाणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन डोळ्यातील कहाणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

दोन डोळ्यातील एक कहाणी 

अंतरीतले दुःख मांडणारी

पापणीवरुनच सांडणारी

पान पुस्तकी प्रत्येक विराणी 

*

किती चाळावेत क्षण फिरुन

पानांची लेखणी वाटते अपूरी

नजरेसमोर मरणा सबुरी

डोळ्यातील शपथा मिटवणे.

*

अशी खुशामत स्मृतींचे ओघ

चमचम तेज शब्द सावर

लेखणी मनातील बावर

आयुष्य वाड्ःमय होताना.

*

आता सुकलेली व्रण सुखे

उगी लपेटून कहाणीला

लिहीत गेलो अश्रकाफीला

व्यथा शोकांतिका स्पंदनांची.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच यावे झणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ तूच यावे झणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(वृत्त : सौदामिनी / भुजंगी – लगागा लगागा लगागा लगा)

जिथे हात कामात रानी वनी

तिथे पावसा तूच यावे झणी॥

*

बळी राजसाला तुझी साथ दे

किती घाम गाळी प्रतीसाद दे 

नवी आस पेरीत भूमीतुनी

तिथे पावसा तूच यावे झणी॥

*

नद्या कोरड्या या न पाणी कुठे

किती कोस ते दूर रे जलवठे

करी दूर दुष्काळ मार्गातुनी

तिथे पावसा तूच यावे झणी॥

*

जिथे प्रेम तेथे नसावे कुणी

असे वाटते प्रेमिकांच्या मनी

करी धुंद युगुलांस एका क्षणी

तिथे पावसा तूच यावे झणी॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ द्विज… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ द्विज… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

आज कसा काय माहीत तो एकटाच दिसत होता झाडावर ,

वेगवेगळे आवाज सतत काढून कसा कोण जाणे नव्हता जात दमून.

*

फार वेळ बसून प्रतिसाद नव्हता ; 

म्हणून तो इकडून तिकडे उडत होता .

प्रतिसादाची अपेक्षा फोल ठरली ; 

तरी ती मूर्ती निराश नाही झाली .

*

सकारात्मक होऊन साद घालत राहीला ,

एरव्ही दुर्वक्षित आज सर्वांच्या मनात राहीला ,

हळूहळू तो कौतुकास पात्र झाला ,

मग तो पक्षी खूप आनंदीत झाला .

*

रोज यावे ह्या समयी असे

नित्यनेमाने वागू लागला तसे ,

म्हणता म्हणता सवय बनली  ,

त्याची व बघणार्‍याची ती दिनचर्या ठरली  .

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

 नका येऊ पुसाया हाल माझे 

सुखांनो, एवढे ऐकाल माझे..?

*

खरा ना आजचा ‘त्यांचा’ जिव्हाळा

हसू त्यांनीच केले काल माझे 

*

मला स्वाधीन केले वादळांच्या 

(म्हणे की, वागणे बेताल माझे)

*

कितीही द्या, कटोरा हा रिकामा

जिणे आजन्म हे कंगाल माझे 

*

दगे या माणसांचे,या ऋतूंचे 

सुकावे रे कसे हे गाल माझे

*

जगाचे…जीवनाचे रंग खोटे

अरे! त्यानेच डोळे लाल माझे

*

नको ते बंगले बंदिस्त त्यांचे

खुल्या दुःखा-सुखांचे पाल माझे

*

शरीराचे तुम्ही सोसाल ओझे

कसे अश्रू तुम्ही पेलाल माझे?

*

जणू मी वादळीवाऱ्याप्रमाणे 

कुठूनी पाय रे खेचाल माझे 

*

भिजावे घाम.. अश्रूंनी पुन्हा मी

असे हंगाम सालोसाल माझे 

*

तुझी गे भेट झाली..प्रीत लाभे

बने आयुष्य मालामाल माझे 

*

कशी सांगू कुणा माझी खुशाली

कधी  डोळे तुम्ही वाचाल माझे?

*

‘तुझा आधार वाटे जीवनाला…’

निनावी पत्र हे टाकाल माझे..?

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हसरी जोडी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ हसरी जोडी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

बुट म्हणून जन्मापासून

हसत असते यांची जोडी

पाय अडकवता  विश्रांती

मिळे हास्या आपसूक थोडी

*

माती चिखल दगड धोंडे

इमानाने तुडवत जातात

पायापासून मुक्त होताच

हास्यमुद्रा आपसूक होतात

*

 जे करायच ते प्रामाणिकपणे

 हसत हसत करत जावं 

 बुटाची  जोडी  शिकवते

 कण्हत की गाणं म्हणत जगावं 

     

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संत समागम… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संत समागम… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

मला हो

सदगुरु भेटले.. |धृ|

 

जिकडे पहावे

तिकडे सदगुरु दिसे

ते पाठीराखा आहे

एवढे मज पुरेसे…

 

एक छोटीसी

निस्तेज चांदणी होतो

प्रकाशमान मी

तूझ्या तेजानी…

 

मुक्या प्राण्यात

चराचरात तूचि

विलक्षण हलचल हृदयी

सरसावतो सेवेसी…

 

आत्मा एकचि

विभिन्न योनी

विषण्ण मन

कधी मिळेल तया मनुष्य योनी…

 

संत संगतीने

जळतील पापे त्यांचे

मिळेल पुढील जन्म

मनुष्य योनीचे…

 

जन्मोजन्मी 

लाभती तेची सदगुरु

कर्मानुसार मिळे योनी

साधने, सत्कर्मे भवसागर पार करू..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुमचं यश तुमच्या हातात… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ तुमचं यश तुमच्या हातात…  ☆ सौ. वृंदा गंभीर

एक वेळ असते त्या वेळेत 

कोणीच साथ देत नसतं 

जवळचेच तोंड फिरून जातात 

तेंव्हा कुणीच कुणाचं नसतं 

*

एक वेळ पुन्हा अशी येते 

प्रगती होऊन यशाचं शिखर 

गाठलेलं असतं, , , , ,

तेव्हा लांबचे नातेवाईक 

सुद्धा सांगतात हे आमचे 

पाहुणे आहेत, , , , ,

*

हेच जीवन असतं संघर्ष 

करत पुढे जायचं असतं 

ठेवायचा असतो एक आदर्श 

समाजासमोर कुणीच कमी नसतं 

*

फक्त वेळ यावी लागते 

न खचता करून दाखवायचं 

एक ध्येय मनात ठेवायचं असतं 

तुमचं यश तुमच्याच हातात असतं 

*

समाजामागे धावायचं नसतं 

समाज आपल्यामागे धावला पाहिजे 

हेच मनात ठेवायचं असतं 

स्वबळावर उभं राहायचं असतं 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुरू वंदना… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

गुरू वंदना… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

माता पिता असती,

आपले पहिले गुरू!

शाळेत जाता आपण,

शिक्षकांचा हात धरू!….१

*

गुरुजनांचा आदर,

हे संस्कृतीचे लक्षण !

समाज असतो थोर,

जिथे गुरूंना प्रणाम !…२

*

जीवनाच्या शाळेत रोज जाता,   

नवनवीन अनुभव घेता!

शिक्षण मिळते क्षणाक्षणाला,

देई आपणा तो बुद्धीदाता!…३

*

सृष्टी समाज शिकवती,

नित्य नूतन गोष्टी !

हे गुरुच पूज्य असती,

आपणास या जगती!…४

*

वंदन करू या आपण,

साऱ्या गुरुजनांना!

अखंड राहू दे विद्यार्थी,

हीच इच्छा आहे मना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगणं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जगणं ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

“शब्दातून जितकं घ्यायचं 

त्याच्याहून अधिक द्यायचं असतं

आपलं बळ वाढवण्यासाठी

धडपडत जगण्यासाठी

आपणच आपल्याशी,

आयुष्याशी प्रामाणिक राहून.

 

साम्राज्य आपल्यासाठी

नसतं उभारायचं

इतरांनाही त्यात

बरोबरीने वाटा द्यावा लागतो 

सुराज्य होण्यासाठी.

 

हे जेव्हा कळेल माणसाला

तेव्हा कोणालाही लागणार नाही 

काही सांगायला

आपलं तुपलं ओळखायला

जबाबदाऱ्या पेलायला 

आपापल्या

 

नाहीतर

पालथ्या घड्यावर पाणी टाकून काय उपयोग.

जेव्हा ते सुलटे होतील

तेव्हाच भरतील.

नाहीतर

आहेच त्यांची उतरंडी रचणं 

कोणाच्यातरी आशीर्वादवर जगणं.

अंधारबनातलं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print