श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ तंबाखू मुक्ती दिन – गुटका नको ग बाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
गुटका नको ग बाई
बाई बाई बाई!
काय झालं बया?
बया बया बया…..
काय झालं बया…..
बया बया बया……
सांग की ग बया……
मला गुटका नको ग बाई
मला तंबाखू नको ग बाई..
अग पण का ग बाई…
असं केलं तर काय त्यानं…
या गुटक्याची घेली मी चव…!
समद जग दिसाया लागलं नवं नवं…..
अगं मग बेस झालं की….
दमडी खिशात टिकनं बाई….।।१।।
मला गुटका नको ग बाई……
या गुटक्यानं नादावली सारी आळी…..
अन् मग ग…
घरादारात अन् गल्ली बोळात..
अग झालं तरी काय….
काढली पिचकारीची रांगोळी …..
मग छानच झालं की…
बायाच्या शिव्याला दमच नाई
कुठं बसाया जागा नाही….
मला गुट का नको ग ……।।२।।
या गुटक्यान …
या या गुटक्यानं,.
अग पर केलं तरी काय,,,..
या या गुटक्यानं लावली माझी कड….
म्हंजी ग…
या या गुटक्यानं लावली माझी कड….
अन् कॕन्सर झोपवील माझं मडं……
आग ग ग ग ….
अग परं ….
तू sss तर …
हे जिणं …
बी काय जिणं …
हाय व्हय……
अन् दिवसा ढवळ्या ….
दिसाया लागलं मरणं…..
लई वंगाळ झालं बघ….
पोरं बाळ ती भिकंला जाई….।।४।।
मला गुटका नको ग बाई…..
एका जनार्दनी समरस झाले….
एका जनार्दनी समरस झाले…..
अन् शरण व्यसन मुक्तीला ssss गेले…..
आता गुटक्याचं नावच नाई,……
मला गुटका नको ग बाई…..
मला गुटका नको ग बाई…..
मला तंबाखू नको ग बाई..,..
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105