सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ कोवळे शैशव, पेलीत चाले…
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
कोवळे शैशव, पेलीत चाले
डोक्यावर जडभार
पुस्तक खेळण्याच्या जागी
देई दगडाला आधार
☆
डोळ्यांमधील निरागसता
काळजास जाऊन भिडते
बीनभिंतीची शाळा निष्ठूर
ही कसली परिक्षा घेते
☆
परिक्षा कसली शैशवसारे
भाराखाली दबुन गेले
सुखस्वप्नाचे प्रश्न बोलके
ओझ्याखाली थिजून गेले
☆
चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के