मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवितेतून उगवून आला हात… ☆ डॉ. प्रेरणा उबाळे ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कवितेतून उगवून आला हात… ☆ डॉ. प्रेरणा उबाळे ☆ 

चित्र काढा रंग भरा 

नाचा-बागडा श्वास घ्या

कवितेतून उगवून आला हात

*

अंकुर फुटवा फुलं फुलवा 

सुगंध घ्या रस प्या 

कवितेतून उगवून आला हात 

*

डोळ्यात साठवा मनात भिजवा 

शाईत बुडवा कल्पनेत रमवा

कवितेतून उगवून आला हात

*

कलरव नुसता मंजुळ गाता 

पुढे पुढे जाता थांबा न आता

कवितेतून उगवून आला हात

*

नटा सजा पृथ्वी व्हा 

उठा लढा आकाश व्हा

कवितेतून उगवून आला हात

*

मुक्त व्हा रममाण व्हा 

सारथी व्हा स्वतःचे स्वतः 

कवितेतून उगवून आला हात

*

कविता ब्रम्हांड असे स्वानंद 

कविता सारंग नवा आरंभ 

कवितेतून उगवून आला हात…

© डॉ प्रेरणा उबाळे

सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), शिवाजीनगर,  पुणे ०५

संपर्क – 7028525378 / [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांग दयाघन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ सांग दयाघन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

चहूबाजूंनी कानी पडती भयकंपीत चीत्कार

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार 

*

धडे घेतले विनम्रतेचे समतेचे बंधुत्वाचे

परस्त्री मातेसमान शिकलो तिजला वंदन करण्याचे

दानव होऊन मानव करतो पाशवी अत्याचार

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार 

*

रक्षाबंधन भाऊबीज हे उत्सव कोणासाठी? 

बहिणी ओवाळिती उजळती मंगलमय ज्योती 

वस्त्र खेचणाऱ्या हातांना कलम कोण करणार 

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार 

*

विवाहिता कोवळी बालिका अथवा वृद्धा साठी ची

झडप तयांवर घालती लंघुन सीमालक्ष्मण रेषेची 

आज आठवे शिवरायांच्या म्यानातील तलवार 

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार 

*

पिता करी बळजोरी मुलीवर पुत्रही सामील 

नरमादीचे नाते न जाणती श्वानच ते केवळ 

दुष्ट वासनाकांड आरोपी सुळी कधी चढणार

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार 

*

हृदयामधी आक्रोश आणखी डोळयांमधि आसवे 

मायबहीणींनी सांगा कुठवर दुःख निमुट सोसणार 

या बलिदानामधून निश्चित रणरागिणी उठणार 

निश्चित रणरागिणी उठणार 

सांग दयाघन धरतीवर अवतार कधी घेणार

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #257 ☆ घ्यावी दीक्षा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 257 ?

☆ घ्यावी दीक्षा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

हिमालयाची वाट धरुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

संसाराचा मोह त्यागुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

कुतरओढ ही झाली आहे आयुष्याची कायम माझ्या

दैना सारी दूर सारुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

पैशासाठी खून दरोडे मारामारी चाले येथे

लोभ भावना ठार मारुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

महंत आता कुणीच नाही समोर माझ्या काय करावे

ईश्वर साक्षी फक्त ठेवुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

कशास लपवू जगापासुनी मनातले मी माझ्या आता

जगात साऱ्या सत्य सांगुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

प्रेमापोटी मला थांबवू पहात होते सखे सोयरे

त्या साऱ्यांचा ऋणी राहुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

ब्रह्मानंदी टाळी आता लागत नाही त्याच्यासाठी

आत्म्यालाही जागे करुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “निर्माल्य…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “निर्माल्य…” ☆ प्रा. भरत खैरकर 

घोषणांनी गाभण

इथला आसमंत

असत्याचे पीक

फोफावले

 

निर्मम शांतता

जागी अचानक

घोषणांचा नाद

दुदुंभला

 

ज्याला त्याला हवे

फुकटाचे सारे

घोषणांचे वारे

गल्लोगल्ली

 

मनोमनी राग

भंगला समाज

द्वेषाचीच आग

दारोदारी

 

विश्वासाचे फुल

निर्माल्य बनले

कोमेजले मन

रामाठायी……..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूमिका… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ भूमिका… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

प्रत्येकजण 

कधी न कधी जातो,

एखाद्या-एखाद्या भूमिकेतून…

ती निभावताना,

कितीतरी वेळा ती आवडते,

कधीतरी नावडतीही होते 

कधी ओझं वाटू लागत,

तर कधी मोरपीस फिरल्यासारखं! 

 

जबाबदारीच्या बेड्या म्हणू की,

सिव्हासन? 

किती काहीही म्हटलं म्हटलं तरी,

स्विकारावंच लागत,

भूमिकेतील आपल अस्तित्व 

तेव्हा कळत,

भूमिकेचं श्रेष्ठत्व,

महत्व,

भूमिकेच्या,

दूरदुरवरून चालत आलेल्या कथा,

थोड्या फार इकडे तिकडे,

कमी जास्त फरकाने…

आपल्या व्यथाही होतात कथा…

 

पण बजावावीच लागते भूमिका,

चेहऱ्यावरचं हास्य शाबूत ठेऊन…

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अस्तित्वाची लढाई / सृष्टीचे एकच उत्तर – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अस्तित्वाची लढाई / सृष्टीचे एकच उत्तर – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

(१) अस्तित्वाची लढाई

तनामनाच बळ

जेंव्हा एकवटत

एवढासा अंकूर

जमिनीतून येतो

*

नाजुक असतो

बीज फुटवा

कोमल नाजुक

जरी दिसतो

*

जगण्याचा प्रयत्न

अस्तित्वाची लढाई

याच सगळयाचा

तो परिणाम असतो

*

प्रयत्नापुढे त्याच्या

भूमीही नमते

मूळ ओटीपोटी धरून

वाढ पिल्ला म्हणते

*

अंकुर मुळे भू ला देते

वरती विस्तार करते

शेवट पर्यंत भूमातेची

 साथ धरूनच रहाते

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर

(२) सृष्टीचे एकच उत्तर 

अंकुरते बीज,

दूर सारून माती |

बीजात असते बळ,

जीवनाला मिळे गती |

*

मातीच्या गर्भात,

काळाकुट्ट अंधार |

थेंब थेंब जीवनाचे,

अंकुरण्यास आधार |

*

मोकळ्या आभाळाखाली,

उन वारा पाणी देई आशा |

उंच वाढवे आणि बहरावे,

उपजत सामर्थ्यांची भाषा |

*

वादळ वारा सोसत,

करी संकटावर मात |

पुढे पुढे वाढत जाई,

जीवनाचे गाणे गात |

*

चराचरात चाले,

बीजरोपण निरंतर |

नावीन्याची सुरवात,

सृष्टीचे एकच उत्तर |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

पंढरीच्या नाथा। भार तुजवरी।

धाध धाव हरी। सावराया।।

*

तुजविना नाही। कोण इथे वाली।

तुझीच सावली । विसावया ।।

*

तुझ्याच नामाचा। लागो आता छंद।

मन व्हावे धुंद। भक्तीभावे ।।

*

येणेच न झाले । देखण्या पंढरी।

सावळा तू हरी। सदा दृष्टि ।।

*

येई न कामाला । सगे गोतावळा ।

व्यर्थ हा सगळा। मायाजाल। ।

*

मुखी पांडूरंग। ध्यानी व्हावे दंग।

घडावा तो संग। तुजनामे ।।

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विसरु कसा मी गुरुचरणांना… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विसरु कसा मी गुरुचरणांना… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

नव्हतो मी आस्तिक फार

सदगुरुंनी धरता हात बदलून गेलो चौफेर…

*

मी माझे एवढेचि होते विश्व

व्यापक झाले माझे भाव..

*

नव्हते धन माझ्या गाठी 

मिटली चिंता सदगुरु असता पाठी..

*

मनात नेहमी विचार नकारात्मक 

सहवासे सद्गुरुंच्या येती विचारही सकारात्मक…

*

गुरफटलो मी नात्यागोत्यात

आता हवाहवासा वाटे एकांत…

*

जगलो मी कुटुंबासाठी

वेळ देतो मी आता स्वतः साठी….

*

बदलली मम् दशा अन् दिशाही

आता सदगुरुशिवाय दिसेना मज काही…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 191 ☆ स्वप्नातलं विश्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 191 ? 

स्वप्नातलं विश्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

तिला बोलावं वाटतं

तिला पहावं वाटतं

तिला छेडावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिला ऐकावं वाटतं

तिला भांडावं वाटतं

तिला स्पर्शावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिच्यात गुंतावं वाटतं

तिच्यात असावं वाटतं

तिच्यात गुंगावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

*

तिला अनुभवावं वाटतं

तिला स्नेह द्यावं वाटतं

तिला हसवावं वाटतं

स्वप्नात कधीतरी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सर… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ सर… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

सर सर सर झडे

रान रानातच झुले 

पंख फुटे पिकांले 

वाऱ्यासंगे पिक डुले

*

सर येई अचानक

अन थांबे आपसुक 

काम मध्ये खोळंबे

उगी जीवा धाकधुक

*

दूर डोंगराशी कसे 

आभाळ पहुडलेले

मग हजारो सरींनी

रान होते उले उले

*

पिक येता रानामंधी 

सारं शिवार फुलतं

पीक आलं कणसात 

रानी गोकुळ नांदतं 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
image_print