मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 71 ☆किंमत अन्नाची…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 71 ? 

☆ किंमत अन्नाची…☆

कण कण अन्नाचा

किती आहे महत्वाचा

केव्हा कळेल याची किंमत

दिवस तो कधी उगावायचा…

 

श्रीमंती आहे म्हणून

पार्ट्या कुठे रंगतात

तिथे जेवणारे गर्विष्ठ

अन्न वाया घालवतात…

 

कधी कळेल मर्म अन्नाचे

समजेल कधी महत्व त्यांना

माज द्रव्याचा भिनला अंगी

घालतात ऐसा, हा धिंगाणा…

 

करावी किंमत अन्नाची

ती गरज, आहे नेहमीची

श्रीमंती नसतेच कायमची

सावली पहा, मध्यानाची…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

 

☆ कवितेचा उत्सव ☆ कबुली  ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

मी आहे

शब्दलंपट-

शब्दांच्या  वारांगना

सज्ज्यावर उभ्या राहून

खुणावतात मला,

कोठल्यातरी दाहक रसायनात

वितळतात सारे प्रतिकार

आणि मी जातो ते बहिष्कृत दरवाजे लोटून

सरळ आत

अर्थाचा हिशेब न करता

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कुसुमाग्रज … ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

| कुसुमाग्रजा ज्ञानपीठ मानकरी तू

  वैविध्याचा असे चित्रकार तू

  तव प्रतिभेची गरुड भरारी

  साहित्य शारदेचा असे पुजारी |

 

| काव्याची फुलवुनी फुलबाग

  विशाखा, जीवनलहरी, वादळवेल

  अन्यायाचा दूर करूनी रोग

  फुलविशी समता बंधुत्वाची वेल |

 

| सामाजिक प्रेमाची ज्योत घेऊन

  जपे माणुसकीचा मंत्र महान

  दुर्दम्य आशेला देउनी अग्रस्थान

 कोलंबसचा गायीला अभिमान  |

| नटसम्राटाचा जणू तू विधाता

  शोकांतिकेचा जणू तू निर्माता

  यशो शिखरावर ही कलाकृती

  रसिक मने जिंकल्याची घेई पावती |

| तव कल्पकतेची किमया भारी

 पृथ्वीच्या प्रेम गीताची उंची न्यारी

 सूर्य पृथ्वीची जोडी गोजिरी

 अमर प्रणय गीताची मूर्ती साजिरी |

 | नाटक, काव्याला यशो मंदिरात बसविले

   कथा कादंबरीला  अंगाखांद्यावर खेळविले

   विविध पुरस्कारांनी तुजला भूषविले

   मातृभाषेचे निशाण उंचविले |

| वर्षा मागून वर्षे सरली

  परी तव कीर्ती ज्योत अमर जाहली

  अजरामर आहे तव साहित्य कलाकृती

  जोवरी आहे शशांक आदित्यची महती |

 

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(रोही पंचाक्षरी रचना)

रोमारोमांत

मनामनांत

माय मराठी

वसे श्वासांत..१

 

असे प्राचीन

भासे नवीन

मायबोलीशी

घट्ट ही वीण..२

 

फुले पालवी

रूप भुलवी

साहित्यातून

मने मोहवी..३

 

नाद घुमतो

नित्य गर्जतो

देश विदेशी

डंका वाजतो..४

 

लोभसवाणे

रूप देखणे

फिके पडते

शुभ्र चांदणे..५

 

भाषा थोरवी

किती वर्णावी

माय माऊली

मनी जपावी..६

 

माज मराठी

साज मराठी

गौरवास्पद

माझी मराठी..७

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

इंग्रज आले राहून गेले

कौतुक त्यांचे ठेवून गेले

त्याचे सण  साजरे करतो

डोक्यावर घेऊन नाचत बसतो

 

होळी झाली गावठी गड्या

डिसेंबर एंडला मारू उड्या

पाडवा गेला अंधारात

जानेवारीचा धरला हात

 

मराठी माऊली विसरून गेलो

इंग्रजी मावशीचे लाडके झालो

फॅशन  फॅशन खेळत बसतो

आपल्या संस्कृतीला आपण हसतो

 

इंग्रजी म्हणतो किती महान

तिच्याकडे ठेवतो डोके गहाण

असे करुन साधले काय

मराठी मायेची आहेना माय

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रविकिरणही मोहात पडले ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? रविकिरणही मोहात पडले  ?   सुश्री नीलांबरी शिर्के ☆ 

चुलीवरच्या खमंग भाकरीचा

खमंग वास हवेत पसरता

रविकिरणही मोहात पडले

जाळीदार झरोक्यातुन येते झाले

उजळून टाकले तयांनी

कष्ट करणारे दोन्ही हात

सोन्यासम झळकु लागली

भाकरीपिठासह तीची परात

चुल आपल अग्निहोत्र

शांतपणे चालुच ठेवते

अन्नपूर्णा समोर बसुन

आयुष्य सरकवत  रहाते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट देवाची ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट देवाची ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

उभी होते भर रस्त्यात

भेदरलेली घाबरलेली

कसा करू रस्ता पार

विचाराने भांबावलेली…..

 

अनपेक्षित कोणीतरी

धरला माझा हात

नको भिऊ उगा अशी

देतो तुला साथ…..

 

होता तो अनोळखी

कसनुसे झाले मला

पण सात्विकता नजरेतली

फारच भावली मला….

 

धोतर पैरण वेष त्याचा

भाळावरती टिळा

छेडत होता एकतारी

माला रुद्राक्षाची गळा….

 

ठसले रूप मनात

वाटले भगवंत भेटला

मदत करून मला

दिसेनासा झाला….

 

नाही उरली भीति

सत्य उमगले मला

नाही कोणी अनोळखी

माणसात देव भेटला….

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 91 – प्रवास ☆

जीवन गाडीच्या प्रवास

संगे साथी नातीगोती।

सारे शोधात फिरती

थांबा सुखाचा जगती।।धृ।।

 

आले आले बालपण होई आनद उधळण ।

हौस मौजेला न तमा जीवनाचे हे कोंदण।

वाटे फिरूनिया यावी बालपणाची प्रचिती।।१।।

 

किशोर ,कुमार वयात मित्र मैत्रिणींची धुंदी ।

पंख आकांक्षाना फुटती जीवन घडण्याची संधी।

मोहापाशाचे हे फासे गळ रस्त्या रस्त्यावरती।।२।।

 

शहाणा तो धरीतसे योग्य वळणाची वाट

शिखर यशाचे मिळता जीवन नक्षत्राचा थाट।

काय वर्णावी माधुरी सहचारी तो सांगाती।।३।

रगं त प्रवासाला आली जीवन बागही फुलली।

चिमण्या पाखरांच्या संगे आज माऊली रंगली ।

काय आनंदाला ऊणे आली सागरा भरती।।४।।

 

पाहून पिलांची उड्डाण माता आनंदली ऊरी।

गरूडाची झेप जणू जाई यशाच्या शिखरी।

मनी सतावते पुन्हा चाहूल एकटेपणाची।।५।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फक्त आमच्यासाठी…… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ फक्त आमच्यासाठी……☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

रक्तबंबाळ पावलांनी

अजून किती शिवार चालायचय.

भ्रष्टाचारी गिधाडाना

अजून कुठवर पोसायचय.

चक्रात घालून माणसांचा चोथा खरणा-याना

आम्ही देशप्रेमी म्हणायचय.

वर लाल दिव्याची गाडी देऊन

त्यांना फिरायला वावरायला.

आमच्या साठी का त्यांच्या साठी……

 

कुणाची पिलावळ पोसायची आम्ही.

आमच्या पोराबाळांचे पाडून फाके.

अरे  ! हा रिवाज आहे काय राजकारण्यांचा.

आई बाप बहिण भावाना गाढण्याचा.

करून खून लोकशाहीचा.

टेंभा मिरवत स्वातंत्र्याचा.

संगनमताने परस्पराना वाचवण्याचा.

आमच्या साठी का त्यांच्या साठी……

 

पाणी आता गळ्यापर्यंत आलंय.

जनतेला तर देशोधडीला लावलय.

आमच्या सौजन्याचं भांडवल केलंय.

पोट फुगून कुणाला अजीर्ण झालय‌.

खाल्लय तेवढं पचवून टाकलंय.

विकासाच तर मुंडकच छाटलय.

आभाळ सगळं चौबाजूनी फाटलय.

फक्त आमच्या साठी……..

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळीमाया ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काळीमाया ☆ श्रीशैल चौगुले ☆

पठाराचं रानं

काळाजर्द वाण

शेंगवेली छान

 ऊंच तुरी मान.

जोंधळा हिरवा

पाखरांचा थवा

थंडवारा पावा

सुखावतो जीवा.

माच्यावर राजा

शेतकरी भारी

भुर्र हार्या फिरी

गोफणीची दोरी.

काळी माया थोर

मिटवील घोर

धान्य दाणं वर

पसा सालभर.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares