श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ विणकरी ☆ श्रीशैल चौगुले ☆
कसे गुंतले रे
बाहत्तर हजार
धागे या वसनी
सप्तकोटि शृंगार.
अष्टचित्र कोष
सुटेना कसा पाश
मन विणू पाहे
जन्मोजन्मीचा श्वास.
कळेना-टळेना
गुंता जड पेलेना
चिंता ठाई-ठाई
ओठ ‘विठ्ठला’विना.
भाव-भक्ती जोड
तरी ना लागे अंत
आत्मरंगी शोधे
नाम संदेश संत.
म्हणे सुखे सांगू
दुःख हेची लपवू
वसनाची कर्मे
विठू चरणी ठेऊ.
झालाची विसर
धागे वस्त्र नक्षींचा
राहिली कसर
विणकरी साक्षीचा.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈