सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ तिढा ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
पापपुण्याचा पाढा
किती पुढे जाणार
कर्माच्या सीमा रेषा
अश्याच आडव्या येणार
डिग्री घेवून शहाणपण येते
हे कुठे पहायला मिळते
पाय धरण्यात आयुष्य सरते
तत्वज्ञानावर का पोट भरते ?
लख्ख उजाडले असे वाटते
क्षणात मन स्वर्गात पोहचते
गाडीची हवा इथं संपते
आशेची दोर तुटते
कसे…? किती ..? केव्हा..?
कुठे…? प्रश्न सुटणार
स्वतः च्या हिंमतीवर काही करणार?
काहीच खरं वाटत नाही
नवे काही होत नाही
कर्माच माहित नाही
प्रयत्न करायला संधी भेटत नाही
दात आहेत तर चणे नाही
चणे आहेत तर दात नाही
हे कोड सुटणार ?
कि……
तिढा असाच वाढत राहणार…..?
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
सांगली
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈