मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आली धन त्रयोदशी.. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ आली धन त्रयोदशी.. . !  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

दीपावली सणवार

अश्विनाची  त्रयोदशी

निरामय  आरोग्याची

आली धन त्रयोदशी.. . !

 

आरोग्याची धनवर्षा

वैद्य धन्वंतरी स्मरू

दान मागू आरोग्याचे

प्रकाशाची वाट धरू. . . . !

 

लावू कणकेचा दिवा

करू यम दीपदान

लाभो मनी समाधान

मागू आयुष्याचे दान . .. . . !

 

तन, मन, आणि धन

यांचे वरदान नवे .

धन त्रयोदशी दिनी

स्नान अभ्यंगाचे हवे.. . . !

 

धन, धान्य, आरोग्याने

घरदार सजलेले .

सुखी,  समृद्ध जीवन

अंतरात नटलेले.. . . !

 

धन त्रयोदशी दिनी

माय माउलीचे न्हाणे

अन्नपूर्णा तिच्या ठाई

गाई आनंदाचे गाणे. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 110 ☆ ‘तू’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 110 ☆

☆ ‘तू’ ☆

हासते आहेस तू

लाजते आहेस तू

 

मख्ख माझा चेहरा

वाचते आहेस तू

 

तळ मनाचा खोल पण

गाठते आहेस तू

 

लाज पदराखालती

झाकते आहेस तू

 

सूर्य नाही काजवा

मागते आहेस तू

 

सृजनतेची वेदना

जाणते आहेस तू

 

जीवनाचा अर्थही

सांगते आहेस तू

 

एक भक्तीचा दिवा

लावते आहेस तू

 

सोबतीने आजही

चालते आहेस तू

 

देह आणिक भाकरी

भाजते आहेस तू

 

नाहताना चांदणे

सांडते आहेस तू

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हरीची ऐकताच मुरली.. ☆ स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हरीची ऐकताच मुरली.. ☆ स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर ☆

हरीची ऐकताच मुरली

राधिका राधिका न उरली 

 

आसावरीचे सूर कोवळे

पहाटवारा पिउनी आले

घुसळण करिता हात थांबले

डे-यामधूनी दह्यादुधातूनी यमुना अवतरली

 

वेड असे कैसे विसरावे ?

फुलातुनी गंधा तोडावे

नभातुनी रंगा वगळावे

वेडी राधा,वेडा माधव वेडी ती मुरली.

 

राधिका राधिका न उरली.

 

स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपोत्सव करीत जा.. ☆ श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपोत्सव करीत जा.. ☆ श्री आनंदहरी ☆

 

शोध तू तुझीच आता, प्रकाशाची वाट रे

चाल तूच पुढे पुढेच, ध्येय तुझेच गाठ रे

 

उजळीत जा भवताला स्वयंदीप चेतवुनी

तिमिर जरी दाटला, पथावरी घनदाट रे

 

मातीचे मान ऋण, घे भरारी नभांगणी

अहंकार स्पर्शू नये, भेटले जरी भाट रे,

 

संकटांचा सागर ये, वाट तुझी रोखण्यास

नको थकू, नको खचू, तू गाठ पैलकाठ रे

 

दीप दीप चेतवीत, दीपोत्सव करीत जा

येती पथिक मागुती, देई तू मळवाट रे  

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 54 ☆ आनंदाचा दीपोत्सव ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 54 ? 

☆ आनंदाचा दीपोत्सव ☆

आनंदाचा दिपोत्सव, तनमन हर्षोल्लीत होते

मनातील मरगळ, अनायसे दूर पळते…१

 

संपूर्ण आयुष्य, संघर्ष तो असतो

कधीतरी एखादा, विरंगुळा मिळतो…२

 

तो विरंगुळा, आनंदात जावा

त्यातूनच मग, प्रेमरस पाझरावा…३

 

दिव्यास दिवा लावता, दीपमाळ तयार होते

त्या दीप-साखळीतून, एकात्मतेचे दर्शन घडते…४

 

असा हा दिवा पहा, दुसऱ्या दिव्यास पेटवतो

त्या दिव्यास पेटवतांना, अंधाराला पळवतो…५

 

उजेडाचा हा दीपोत्सव, साजरा प्रेमात करावा

साजरा करतांना सवे, मनातील एकोपा साधावा…६

 

परमेश्वराचे करुनि पूजन, लावावी निरांजन

पाजळून दीप-ज्योति, करावे ईश स्मरण…७

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पेन्शनचे टेन्शन ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ ? पेन्शनचे टेन्शन ! ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

पुण्य नगरीच्या बँकेतली

एक सांगतो तुम्हां गोष्ट,

एका पेक्षा एक पेन्शनर

तेथे राहती सारे खाष्ट !

 

बँकेत शिरतांना बघून

पेन्शनर खडूस साठ्या,

पडती जोशी कॅशरच्या

कपाळी खूप आठ्या !

 

“काय म्हणता साठे,

आज कसे आलात,

गेल्या मासाचे पेन्शन

परवाच घेवून गेलात !”

 

“अरे तेंव्हा बघ विसरलो

शंका ‘मनीची’ विचारायला,

अधिक महिन्याचे पेन्शन

कधी येऊ मी न्यायला ?”

 

ऐकून त्यांचे ते बोलणे

जोश्या मारी कपाळी हात,

या ‘मल’ मासाने माझा

असा करावा ना घात !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाग्य उजळले आज अकल्पित… ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ भाग्य उजळले आज अकल्पित… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

स्वप्नालाही नव्हते माहित ।

भाग्य उजळले आज अकल्पित ॥

???

कोरांटीच्या झाडावरले —

दुर्लक्षित मी फूल एकले —

पांथस्थाने कुण्या तोडिले —

श्रीहरिचरणी मला वाहिले —

 

चरणस्पर्शे तनु रोमांचित —

सार्थक झाले जीवित संचित —

नकळत अायु झाले पूनित —

भाग्य उजळले अाज अकल्पित ॥

भाग्य उजळले आज अकल्पित ॥॥

???

हीनदीन मी शीळा पार्थिव —

कैक युगांचे जीवन निर्जिव —

अतर्क्य घडले काहि अवास्तव —

लाभे दैवत्वाचे वैभव ॥

 

शिल्पकार कुणि येई धुंडित —

घेउनिया जादूचे हात —

अमूर्तातुनी झाले मूर्त —

अवतरला साक्षात भगवंत —

भाग्य उजळले आज अकल्पित ॥

?️?️?️

वाटसरू कुणि ये मार्गावर —

मूर्त पाहाता जोडुनिया कर —

फूल हातिचे कोरांटीचे —

वाहुनि गेला मम चरणांवर ॥

???

मीच वाटसरु शिल्पकार मी —

कोरांटीचे फूल स्वये मी —

शीळाही अन् मूर्तिही मी —

स्थूलात मी सूक्ष्मात मी ॥

☘️☘️☘️

शुभदिवसाच्या मंगल समयी —

मी तू पणही लयास जाई —

द्वैताचे घडले अद्वैत —

भाग्य उजळले आज अकल्पित ॥

भाग्य उजळले आज अकल्पित ॥॥

???

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ इतिहास…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

अलवार पावलाना

हळुवार टाकताना

झाला इतिहास नाही

अजुनी इथे शहाणा

 

आणून आव उसना

बडवून घेत छाती

लाऊन धार घेती

हाती जुनीच पाती

 

येथे सुधारणाच्या

फैरी झडून गेल्या

नाही आवाज कोठे

फुसकेच बार झाल्या

 

केल्या नव्या तरीही

बदलून सर्व नोटा

सवयी नुसार त्यानी

धरल्या जून्याच वाटा

 

वासे नव्या घराचे

फिरले कसे कळेना

सत्तांध भींत आडवी

सांधा कुठे जुळेना

 

अंधार जाळताना

जळतात फक्त बोटे

दिसतात काजवे पण

ते ही तसेच खोटे

 

आता भलेपणाची

उठलीत सर्व गावे

संस्कार वसवण्याला

कसुनी तयार व्हावे

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 78 – जुगार हाटला ☆

गंध मातीचा दाटला

स्वप्ना अंकूर फुटला।

खेळ दैवाचा जाणण्या

पुन्हा  जुगार हाटला।

 

पाणी रक्ताचं पाजून

रान खुशीत डोललं।

मशागती पाई आज

पैसं व्याजानं काढलं।

 

दगा दिला नशिबान

ओढ दिली पावसानं।

सारं आभाळ फाटलं

शेत बुडालं व्याजानं।

 

धास्तावली पिल्लं सारी

दोन पिकलेली पानं।

पाठीराखी बोले धनी

मोडा सार सोन नाण।

 

सावकारी चक्रात या

कसं धिरानं वागावं।

फाटलेल्या आभाळाला

किती ठीगळं लावावं।

 

कसं सांगाव साजणी

सारी सरली ग आस।

वाटे करावा का धीर

गळा लावण्याचा फास।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ भासमय ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ भासमय ☆ सौ राधिका भांडारकर ☆

वाळवंटी हरीण

तहानलेलं धावतं

भासतो जलाशय

परी ना कधी पोहचतं…..

 

तद्वत धाव धावतो

टाकीत धापा जीवनी

नसुन जे भासते

वेध त्याचा मनोमनी……

 

मनी  नसे संतुष्ट

असुनही वाटे नसे

आटापीटा  किती

धाव आभासी असे…..

 

आपुले आपल्यापाशी

परी नजर पल्याडी

उन पाण्याचाच खेळ

वाट खोटी वाकडी….,…

 

जाती घरंगळुनि

कण वाळुचे ते

मृगजळामागे धावलो

नंतर जाणवते….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares