मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवीमन ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कवीमन ☆ श्रीशैल चौगुले ☆

मना सावर आता वादळे

स्मृतीत होशील घायाळ

बेट आयुष्याचे सुख-दुःख

दैव वेदनांचे  आयाळ.

 

किती प्रसंगे नाती नि गोती

विरले क्षणात तुझिया

झडतात फुले तसे ऋतू

तुटले सारे पंखबळ.

 

हताश होऊ नको तरिही

अजून,आशा या क्षितीजा

प्रबळ काळीज भाव निष्ठा

घरटे शब्दांचे सकळ.

 

नजर जिथवरती जाई

लाटा डोळ्यात मेघ होतील

घाव सोसता कविता होई

वादळाची शमेल झळ.

 

प्रतिभेचा दास थोर कवी

संघर्षाची होई ऐसी तैसी

अलौकीक ज्ञान तुजपाशी

गगनभेदी संपदा दळ.

 

सुर्य चंद्र तारका गातील

गुणगान अमर तेजस्वी

जीवन धन्य तुझिया जन्मा

सरस्वती प्रसन्न प्रांजळ.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवरंगी दसरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ नवरंगी दसरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

पिवळ्या रंगाने आरंभ झाला,

शेवंती, झेंडू ने रंग भरला!

पीत रंगाची उधळण झाली,

पिवळ्या शालूत देवी सजली!

 

प्रसन्न सृष्टी हिरवाईने नटली,

दुसऱ्या माळेच्या दिवशी!

करड्या रंगाने ती न्हाली,

देवी तिसऱ्या माळेची !

 

चवथीची सांज केशरी

रंगात न्हाऊन गेली !

पाचवीची शुभमाळ,

शुभ्र पावित्र्याने उजळली!

 

कुंकवाचा सडा पसरला

देवीच्या सहाव्या माळेत!

आभाळाची निळाई दिसे,

दुर्गेच्या सातव्या माळेत!

 

गुलाबी, जांभळा आले

आठव्या माळेला !

शुभ रंगांची बरसात

करीत देवीला !

 

हसरा,साजरा देवीचा चेहरा,

खुलविला नऊ रंगाने !

सिम्मोलंघनी दसरा सजला,

झळाळी घेऊन सोन्याने!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 76 – आई अंबाबाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 76 – आई अंबाबाई ☆

अगं आई ,अंबाबाई

तुझा घालीन गोंधळ ।

डफ तुण तुण्यासवे

भक्त वाजवी संबळ।

 

सडा कुंकवाचा घालू

नित्य आईच्या मंदिरी।

धूप दीप कापूराचा

गंध दाटला अंबरी.

 

ताट भोगीचे सजले

केळी, मध साखरेने।

दही मोरव्याचा मान

फोडी लिंबाच्या कडेने .

 

ओटी लिंबू  नारळाची-

संगे शालू  बुट्टेदार।

केली अलंकार पूजा

सवे शेवंतीचा हार.

 

धावा ऐकुनिया माझा

आई संकटी धावली।

निज सौख्य देऊनिया

धरी कृपेची सावली।

 

माळ कवड्यांची सांगे

मोल माझ्या जीवनाचे।

परडीत मागते मी

तुज दान कुंकवाचे।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सिध्दीदात्री… ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ सिध्दीदात्री… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

नवव्या दिवशी सिध्दीदात्री

पूजन मन समृध्दीसाठी

तू मारिलेस राक्षस रिपू

आम्ही संपवू विकारशत्रू

 त्यासाठी  सिध्दीदात्री

तुझे करितो पूजन !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 92 – आरती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 92 – विजय साहित्य ?

☆ ? आरती ?  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(स्वरचित  आरती. निर्मिती  विजया दशमी 18/10/2018.)

आरती सप्रेम जय जय जय अंबे माता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||धृ||

सदा पाठिशी रहा उभी मुकांबिका होऊनी

शिवशक्तीचे प्रतिक तू सिंहारूढ स्वामींनी

कोल्लर गावी महिमा गाई  भक्त वर्ग मोठा .

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||1||

ब्राम्ही रूप हे तुझेच माते चतुर्मुखी ज्ञानी

सप्तमातृका प्रातः गायत्री हंसारूढ मानी

सृजनदेवता ब्रम्हारूपी रक्तवर्णी कांता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||2||

माहेश्वरी रूप शिवाचे , व्याघ्रचर्म धारीणी

जटामुकूट  शिरी शोभतो तू सायं गायत्री

त्रिशूल डमरू त्रिनेत्र धारी तू वृषारूढा.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||3||

स्कंदशक्ती तू कौमारी तू नागराज धारीणी

मोर कोंबडा हाती भाला तू जगदोद्धारीणी.

अंधकासूरा शासन करण्या आली मातृका

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||4||

विष्णू स्वरूपी वैष्णवी तू ,शंख, चक्र, धारीणी

माध्यान्ह गायत्री माता तू शोभे गरूडासनी.

मनमोहिनी पद्मधारीणी तू समृद्धी दाता.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||5||

नारसिंही भद्रकाली तू,पानपात्र धारीणी

गंडभेरूडा , शरभेश्वर शिवशक्ती राज्ञी

लिंबमाळेचा साज लेवूनी शोभे अग्नीशिखा.

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||6||

आदिमाया,आदिशक्ती,विराट रूप धारीणी

रण चंडिका शैलजा  महिषासूर मर्दिनी

महारात्री त्या दिव्य मोहिनी ,शोभे जगदंबा .

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||7||

सप्तमातृका रूपात नटली देवी कल्याणी

भगवती तू, माय रेणुका  शोभे नारायणी

स्तुती सुमनांनी आरती  कविराजे सांगता

कृपा रहावी  आम्हां वरती, दे आशिष आता .||8||

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कौसल्येचा राम…. – महाकवी ग.दि. माडगूळकर ☆ प्रस्तुति – श्री विकास मधुसूदन भावे

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ कौसल्येचा राम…. – महाकवी ग.दि. माडगूळकर ☆ प्रस्तुति – श्री विकास मधुसूदन भावे☆  

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम

भाबड्या या भक्तासाठी देव करी काम 

 

एक एकतारी हाती भक्त गाई गीत

एक एक धागा जोडी जानकीचा नाथ

राजा घनश्याम!

 

 दास रामनामी रंगे, राम होई दास

एक एक धागा गुंते,रूप ये पटास

राजा घनश्याम!

 

विणुनिया झाला शेला ,पूर्ण होई काम

ठायी ठायी शेल्यावरती दिसे राम नाम

राजा घनश्याम!

 

हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर

विणुनिया शेला गेला सखा रघुवीर

कुठे म्हणे राम ?

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

गीतकार- महाकवी ग.दि. माडगूळकर

प्रस्तुति – श्री विकास मधुसूदन भावे

चित्र : साभार Gajanan Digambar Madgulkar – Wikipedia

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कठीण होत आहे ☆ श्री नारायण सुर्वे

? कवितेचा उत्सव ?

☆ कठीण होत आहे ☆ श्री नारायण सुर्वे ☆ 

दररोज स्वतःला धीर देत जगणे;

कठीण होत आहे.

 

किती आवरावे आपणच आपणाला;

कठीण होत आहे.

 

भोकांड पसरणा-या मनास थोपटीत झोपवून येतो

भुसा भरलेले भोत दिसूनही;थांबणे;

कठीण होत आहे.

 

तडजोडीत जगावे.जगतो:

दररोज कठीण होत आहे

 

आपले अस्तित्व असूनही नाकारणे;

कठीण होत आहे.

 

समजून समजावतो, समजावूनही नच मानलो

कोठारात काडी न पडेल,हमी देणे;

कठीण होत आहे.

 

© श्री नारायण सुर्वे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महालक्ष्मी ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ महालक्ष्मी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

आठव्या दिवशी महालक्ष्मी

करितो आम्ही तुझे पूजन

दिलेस समृध्द जीवन

तुझे व्हावे सतत स्मरण

त्यासाठी हे पूजन !

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 82 – ती…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #82 ☆ 

☆ ती…! ☆ 

आजपर्यंत तिनं

बरंच काही साठवून ठेवलंय ..

ह्या… चार भिंतींच्या आत

जितकं ह्या चार भिंतींच्या आत

तितकंच मनातही…

कुणाला कळू नये म्हणून

ती घरातल्या वस्तूप्रमाणे

आवरून ठेवते…

मनातला राग..,चिडचिड,

अगदी तिच्या इच्छा सुध्दा..,

रोजच्या सारखाच

चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचा

खोटा मुखवटा लाउन

ती फिरत राहते

सा-या घरभर

कुणीतरी ह्या

आवरलेल्या घराचं

आणि आवरलेल्या मनाचं

कौतुक करावं

ह्या एकाच आशेवर…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कालरात्री ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कालरात्री… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

रुप तुझे असे भयंकर

कार्य करिसी तू शुभंकर

शुभंकरीच म्हणती तुज

संपविलास तू रक्तबीज !

सातवे दिवशी पूजन

कृष्ण वर्णी तू नेत्र तीन

हाती खड्ग गर्दभ वाहन

करीसी भक्तांचे रक्षण !

होवो अज्ञान तिमिर दूर

 कालरात्री देई ऐसा वर !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares