मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 35 ☆ अनुभुती… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 35 ☆ 

☆ अनुभुती… ☆

 

स्वतःच्या चुकीतून

बोध घ्यावा मनुष्याने

नेहमी सतर्कता

बाळगावी मनुष्याने…!

 

चुकीतूनच हुशार

होतो पहा मनुष्य

स्वतःअनुभुती घेता

सुज्ञही होतो मनुष्य…!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेम लता ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ प्रेम लता ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

सहजची भेटता तू आणि मी,

काही चमकले हृदयीच्या हृदयी!

बीज अचानक मनी पेरले

प्रीतीचे  का ते काहीतरी!

तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,

बीज अंकुरे मम हृदयी!

प्रेम पाण्याचे सिंचन करिता,

अंकुर वाढे दिवसांमाशी!

मनी वाढली प्रेम न् आशा,

रोप वाढता पाचव्या दिवशी!

प्रीतफूल उमलले त्यावरी,

‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी!

फूल प्रीतीचे मिळे मला,

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,

फूल बदलले फळात तेव्हा,

परिपक्व प्रेम मिळे हृदयी!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान… ☆ सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कर्णासारखा उदार दाता

आजच्या कलियुगात नाही

माझे ते माझे, तुझे तेही माझे

असेही म्हणणारे आहेत काही…

 

तीर्थक्षेत्री करूनी दान

पुण्य मिळवती सारेजण

इतर वेळी पापे करूनी

आनंद मिळवती काहीजण…

 

देवा-धर्माच्या नावाखाली

लूटच करती या जगती

दानाच्या त्या पावित्र्याला

नष्ट करणे ही प्रगती…

 

यापरतेही अनेक दाने

जगी आहेत, जाणूनी घ्या

त्या दानातून मिळणाऱ्या

समाधानाचा लाभही घ्या…

 

दानाचेही प्रकार अगणित

द्रव्यदान वा रक्तदान

या साऱ्याहून श्रेष्ठतम ते

ते म्हणजे हो नेत्रदान…

 

अंधकार तो नयनापुढचा

क्षणात एका होईल दूर

नेत्रदानाचे पुण्य घेऊनी

आनंदाला येईल पूर…

 

त्या दानातून कुणी अभागी

पाहील जग हे डोळेभरूनी

आयुष्याच्या वाटेवरती

चालत राहील दुवा देऊनी…

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – प्रा. तुकाराम दादा पाटील

कवी सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ पानोपानी वनोवनी कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

 

धून बासरीची येता माझ्या कानावर

नकळत डोळ्यांपुढे येई बन्सीधर

 

सरल्या आषाढाच्या धारा आला श्रावण मास

अवचित का गं होती

सांग मला असे भास

हुरहूर वाटे फार

मनोमनी एक आस

जिथे तिथे डोळा दिसे

मला माझ्या श्री निवास

 

प्राण आणून डोळ्यात वाट पाहते तयाची

जीव लावून जीवास जावे सवयही त्याची

कोण घालील फुंकर आता माझ्या मनावर

झाले वेडी मी म्हणती जगसारे जगभर

 

नाही समोर तयाचे

आज रूप जरी माझ्या

चित्र चितारण्या  त्याचे

माझी अपुरी ही वाचा

उगवावा जन्मामध्ये दिसून सोनियाचा एक

त्याच्या दर्शनाने व्हावे माझ्या जन्माचे सार्थक

 

नाही गोकुळची राधा

नाही सखा श्री सुदाम

पण घालू कसा आता

माझ्या मनात लगाम

त्याचे रुपडे दिसावे म

नामध्ये हीच आशा

आळविण्या त्याला आता बोलू कोणती भाषा

 

हृदयाची भाषा माझ्या अधरी येईना

शामवर्ण मेघांचा हा मला जगू ही देईना

हरित जगात हरि भरून राहिला

पानोपानी वनोवनी त्याला मी पाहिला

 

© कवी सुहास रघुनाथ पंडित

सांगली मो. – 9421225491

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति – प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३  दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 59 – सारे सुखाचे सोबती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 59 – सारे सुखाचे सोबती ☆

काठी सवे देते राया

हात तुज सावराया।

बेइमान दुनियेत

आज नको बावराया।

 

थकलेले गात्र सारे

भरे कापरे देहाला।

अनवाणी पावलांस

नसे अंत चटक्याला।

 

तनासवे मन लाही

आटलेली जगी ओल।

आर्त घायाळ मनाची

जखमही किती खोल।

 

मारा ऊन वाऱ्याचा रे।

जीर्ण वस्त्राला सोसेना।

थैलीतल्या संसाराला

जागा हक्काची दिसेना।

 

कृशकाय क्षीण दृष्टी

वणवाच भासे सृष्टी।

निराधार जीवनात

भंगलेली स्वप्नवृष्टी।

 

वेड्या मनास कळेना

धावे मृगजळा पाठी।

सारे सुखाचे सोबती

दुर्लभ त्या भेटीगाठी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 74 – विजय साहित्य – संस्कारांचे ताट ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 74 – विजय साहित्य – संस्कारांचे ताट ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

साहित्य सेवक।

दावितसे वाट।

संस्कारांचे  ताट।

व्यासंगात ।।

 

साहित्य सेवक ।

अक्षरांचे घट ।

अनुभूती  पट ।

साकारीती ।।

 

सुखदुःख  झळ ।

शब्दांकित केली ।

अंतरात नेली।

भावसृष्टी ।।

 

साहित्य सेवक ।

सुख दाखवितो।

दुःख  अव्हेरितो ।

साहित्यात ।।

 

साहित्य सेवक  ।

लेखणीची वाणी  ।

सृजन  कहाणी  ।

नवनीत  ।।

 

साहित्य सेवक ।

सोडी राग लोभ  ।

दुःख, द्वेष क्षोभ ।

भारवाही   ।।

 

कविराजा हाती

शब्दपुष्प माला

केली जीवनाला

समर्पित. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानकाव्य ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ ज्ञानकाव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

थोरांचा आदर  नित्यची ठेवावा

प्रार्थना देवाला  ज्ञानाशी पावावा.

प्रथम  आईचे    वंदावे चरण

गुरुजींचा मान  शिक्षणी लावावा.

ग्रंथांना पुजावे   पुराण भजावे

विचारांचा दिवा  सत्य तेववावा.

चोरी-लोभ त्याग  सद्गुण मार्ग

अध्ययनी प्रज्ञा   चिंती मिळवावा.

निसर्ग नियम   वृक्ष-वल्ली सोयरे

संत, देव -धर्म    नाते जुळवावा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीदत्ता ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

 

☆ कवितेचा उत्सव ☆ श्रीदत्ता… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

रुप तुझेचश्रीदत्ता

माझ्या ह्दयी आहे रे

अंतरिचा धुप दीप

डोळा भरुन पाहे रे

 

भजनात दिनरात

मीही झालो असा दंग

माझ्या जीवनात तूच

देवा भरलास रंग

 

माय माहूर डोंगरी

देई मजसी आशिष

मोद भरे जीवनात

मनी उरला ना रोष

 

सोडुनी अमलझरी

तूच भेटण्या आलास

डोळाभर अश्रूधार

देवा तूच पुसलीस

 

मन झाले देवालय

नाद ब्रम्ही घंटानाद

पायघडी अंथरता

मीच धरी तुझे पाद

 

धुप सुगंधात देवा

कोठे तू रे दडलास ?

मेवा अमृताचा घास

माझ्यासाठी धाडलास

 

माझ्यासाठी चालतांना

नाही थकले रे पाय

तुझ्यासवे आली घरी

अनुसया माझी माय

 

परिमळ त्रिभूवनी

ब्रम्हरसपान फुला

जन्म सार्थकी पालखी

आशिषाचा दिला झुला

 

डोळा भरून पहाता

थांबेनात अश्रूधार

भूलचूक झाली जरी

तुच करी नौका पार

 

पूजाअर्चा  करतांना

शोधते अमलझरी

भाजी भाकरी सेवता

माझ्या घरी दत्त हरी

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 85 – सत्यमेव ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 85 ☆

☆ सत्यमेव ☆

तू आहेस  माझ्या काळजाचा

एक हिस्सा!

जळी,स्थळी, काष्टी, पाषाणी

दिसावास सदासर्वदा

इतका प्रिय !

धुवाधाँर पावसात

भिजावे तुझ्यासमवेत,

एखादी चांदणरात्र

जागून काढावी

तुझ्या सहवासात,

हातात हात गुंफून

पादाक्रांत करावा

सागरी किनारा,

असे भाग्य नसेलही

लिहिले माझ्या भाळी,

पण माझ्या वर्तमानावर

लिहिलेले तुझे नाव–

ज्याने पुसून टाकला आहे,

माझा ठळक इतिहास,

त्याच तुझ्या नावाचा ध्यास

आता मंत्रचळासारखा!

भविष्याच्या रूपेरी वाटेवर

नसेलही तुझी संगत

पण माझ्या कहाणीतले

तुझे नाव

मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतके

प्रखर आणि

सत्यमेव!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधी वाटे मला… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कधी वाटे मला… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆ 

कधी वाटे मला………..

कधी वाटे मला गाणे होऊन जगावे

सुरांच्या धबधब्यात निरंतर न्हावे

कधी वाटे मला फुल होऊन जगावे

वारा नेइल तिथपर्यंत सुगंधरूपी दर्वळावे

कधी वाटे मला वारा  होऊन जगावे

निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे

कधी वाटे मला वारा  होऊन जगावे

निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे

कधी वाटे मला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगावे

दिव्यत्वाची प्रचिती येताच कर माझे जुळावे.

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी,  पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print