मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 100 ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 100 ?

☆ गझल ☆

 

आज सा-या तारकांनो हे जरासे  नोंदवा

रात्र होता काजळी मिरवून जातो काजवा

 

मी कशाला त्या सुखाची आर्जवे केली पुन्हा

दुःख माझे राजवर्खी ना कशाची वानवा

 

या जगाचे मुखवटे फाडून होते पाहिले

मैफिलीचे रंग खोटे, बाटलेल्या वाहवा

 

चित्रगुप्ता तू म्हणाला, नांदली आहेस ना

नांदताना भोगलेले आज येथे गोंदवा

 

जन्म सारा संभ्रमातच काढला आहे जरी

संत सज्जन कोण ते आता मलाही दाखवा

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पक्षी ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ पक्षी ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

पंख वेगळे रंग वेगळे

या पक्ष्यांचे ढंग वेगळे

झेप चिऊची चिमणी चिमणी

गरुडाचे आभाळ वेगळे !

 

     पाझरणाऱ्या मेघासाठी

     सदैव चातक आसुसलेला

     परी प्राशण्या टिपुर चांदणे

     चकोर कोणी तहानलेला !

 

इंद्रधनूचे रंग पाखरां

पण एखादा कोकिळ शापित

दिव्य सुरांची करी साधना

दुःख आपुले काळे झाकित !

 

     हिरव्या रानी धो धो धारा

     थुइथुइ चाले मयूरनर्तन

     कुणा दिसावा रम्य पिसारा

     विरुप पदांचे कुणास दर्शन !

 

कुणी अंगणी टिपती दाणे

कुणास लाभे मोतीचारा

कुणा नभांगण कुणा पिंजरा

दैवगतीचा खेळच न्यारा !

 

     ज्या पक्ष्यांना नसती घरटी

     त्यांचे जगणे दुसरे मरणे

     कवेत घेई गगन तयांना

     रुजवी कंठी अभाळगाणे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गोपाळकाला ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गोपाळकाला ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

हरी आला हो हरी आला

मम मन-अंगणी हरी आला

जमवून मनीचे सगे सोयरे

केला नि गोपाळकाला——

 

दया-क्षमा-शांतीच्या आणल्या

स्वच्छ शुभ्र या लाह्या

प्रेम नि सद्भावाचे जमले

दही त्यात घालाया——

 

खोड्या हरीच्या, खेळ मजेचे

लवण चिमूटभर त्यात

उगीच लपे अन उगीच पळे, मग

लटका राग ही मिरची त्यात—–

 

निरपेक्ष अशा मम प्रेमाचे

मग निरसे दूध घातले

सात्विक शुद्ध विचार-फळांचे

काप करून मिसळले ——-

 

स्वतःस विसरून कालविता हा

शुद्ध भक्तीचा काला

भान हरपले, न कळे हरीने

कधी तो स्वाहा केला ——

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 100 ☆ पक्व जांभळे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 100 ☆

☆ पक्व जांभळे ☆

दाटुन आले मनात माझ्या

इवले इवले शब्द कोवळे

गंध कागदावरी उतरला

आज साजरे करू सोहळे

 

या वृक्षाचे रूप देखणे

सांडत होता विपुल चांदणे

देठ कोवळे मला भासती

मऊ मुलायम जसे सापळे

 

या पानांच्या ओंजळीतुनी

अलगद आले निसटुन खाली

अन् मातीतच विलीन होती

ठेवुन मस्तक तिथे मोकळे

 

बांधावती वेल पसरली

अडवे तिडवे पाय पसरुनी

त्या वेलीच्या कुशीत शिरले

वजनदार हे कसे भोपळे

 

तारुण्याने झाड लगडले

मस्तीतच ते डुलू लागले

नव्या पिढीचे कौतुक भारी

रस्त्यावरती पक्व जांभळे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्र माझा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्र माझा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

शांत आहे झोपलेला चंद्र माझा

स्वप्न बघण्या गुंतलेला चंद्र माझा

 

मालकीचा मानते मी फक्त माझ्या

मी करांनी झाकलेला चंद्र माझा

 

पाहताना राग आला कैक वेळा

चांदण्यांनी वेढलेला चंद्र माझा

 

या तुम्हीही कौतुकाने पाहुनी जा

दावते मी जिंकलेला चंद्र माझा

 

श्वास आहे ध्यास आहे प्राण‌आहे

काळजातच कोंडलेला चंद्र माझा

 

सावराया साथ देतो हात देतो

सोबतीने वाढणारा चंद्र माझा

 

भाग्य आहे थोर माझे  मानते मी

छान आहे लाभलेला चंद्र माझा

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – नंदलाल ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – नंदलाल ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

(आर्या वृत्त)

 

वसुदेवाचा सुत हरी

नंदाचा तो असे कान्हा

जन्मदात्री देवकी

माता यशोदेस फुटला पान्हा

 

श्रावण वद्य अष्टमी

यमुनेसी हो आला पूर

मध्यरात्री तान्ह्यास

वसुदेवे नेले गोकुळी दूर

 

बाळ वाढे गोकुळी

आनंदित यशोदामाई

नंदलालाची कीर्ति

त्रिखंडात दूरवर ही जाई

 

चोरी नवनीताची

गोकुळवासी होती तंग

केव्हा लोणी खाऊ

गाई राखण्यात मी तर दंग

 

उघड उघड मुख बाळा

दाव मजसी काय ते असे

उघडताना मुखासी

यशोदेसी विराटची रूप दिसे

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 45 ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – अभंग… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 45 ☆ 

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – अभंग… ☆

आखीव रेखीव, रूप मनोहर

निर्मळ सुंदर, कृष्ण माझा…!!

 

राजस वेल्हाळ, सुकुमार देवा

मोहक बरवा, कृष्णनाथ…!!

 

द्वापार-युगात, शेवट चरण

धर्माचे रक्षण, शुद्ध हेतू…!!

 

द्रौपदी बहीण, करितो रक्षण

आम्हा हे भूषण, सदोदित…!!

 

कवी राज चिंती, कृष्णप्रेम सदा

न येवो आपदा, आयुष्यात…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फेर श्रावणाचा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ फेर श्रावणाचा ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आला श्रावण सणांचा

बरसणाऱ्या धारांचा

नाना रुपी फुलणाऱ्या

निसर्गाच्या किमयेचा ||

 

क्षणी उन क्षणी धारा

इंद्रधनुचा नजारा

सुवासिक फुले पाने

गर्द हिरवा फुलोरा ||

 

दरवळे पारिजात

लक्ष फुलांचा नवस

बेल पत्रींनी सजली

देवघराची आरास ||

 

नागपंचमीचा सण

मन माहेराला जाते

झोका बांधला लिंबाला

उंच झुलूनिया येते ||

 

आहे शेतात वारूळ

नागराजाचे राऊळ

पूजा करुनी सयांचे

किती रंगतात खेळ ||

 

झिम्मा फुगड्या रासाचे 

भारी वाटे आकर्षण

श्रद्धा भक्ती उत्साहाचा

आला लाडका श्रावण ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हायकू ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हायकू☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

(१)

वादळ वारे

सागराला तुफान

मन बेभान

 

(२)

दाट शीतल

वटवृक्षाची छाया

आईची माया

 

(३)

पुनवेचा चंद्र

गंधाळलेली रात

प्रेमाची साथ

 

(४)

रातराणीचा

दरवळला गंध

मधूर धुंद

 

(५)

निरभ्र नभ

विहरती पांखरे

स्वच्छंद मने

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणसर ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणसर ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

 

अशीच एखादी सर येते

हळुच शिडकावा करून जाते.

भिजणार्या ओल्या भूमीबरोबरच

तप्त मनासही शीतलता देते.

    श्रावणसरीतील ओलाव्याने

     स्रुष्टीसखी न्हाऊन निघते.

    त्रुप्त मनीच्या संतोषाने

    अणुरेणूलाही चिंब करते.

 त्रुप्त धरती गंधित होते

हेमपुष्पही जन्म घेते.

शिवार सारे फुलून जाते

आगळ्या सौंदर्यै धरती नटते..

   स्रुष्टीसखीचा बहार पाहून

   तनमनही रोमांचित होते

   जलधारांना  दुवा देते

   शिवारांतील सोनं वेचू पाहते.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares