मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूर्योदय स्वातंत्र्याचा  ☆ सौ. जस्मिन रमजान शेख

? कवितेचा उत्सव ?

☆ सूर्योदय स्वातंत्र्याचा  ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆ 

छाताडावरी झेलूनी ‘वार’

ते  धारातिर्थी  पडले,

भारतमातेसाठी किती

 स्वातंत्र्यवीर हे लढले… !!

 

कुणी पुत्र ,कुणी पिता

कुणाचा कुंकू भाळीचा,

मातेच्या स्वातंत्र्यासाठी

त्याग सर्व या नात्यांचा… !!

 

‘साखळदंडी’ पाहुनी माता

वीरपुत्रांची गर्जे ललकारी,

देऊनी आहुती सर्वस्वाची

मातेचा जयजयकार करी… !!

 

नका विसरू तरुणांनो,

गाथा शूरवीर रत्नांच्या,

सूर्यास्त करुनी प्राणांचा

सूर्योदय दिला स्वातंत्र्याचा… !!

 

एकात्मतेचा ध्यास धरुनी

प्रगतीने उंचवू आपली मान,

सातासमुद्रापार चला वाढवू

जननी ‘जन्मभूमीची’ शान… !!

 

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ म्हणींचा कविता .. माती ☆ सौ.स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ तिरंगा ☆ सौ.स्वाती रामचंद्र कोरे ☆ 

(द्रोण काव्य प्रकार)

उंच गगनात लहरतो,,,,,,,,10

 तिरंगी उत्सव सजतो,,,,,,,9

   नभांगणी झळकतो,,,,,,8

     वाऱ्याने लहरतो,,,,,,,7

      नमन करतो,,,,,,,6

        सेवा करीन,,,,,, 5

          मायभूमीची,,,4

            शपथ,,,,,,,3

              घेतो,,,,2

                मी,,,1

 

© सौ.स्वाती रामचंद्र कोरे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देश माझा देवभूमी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

देश माझा देवभूमी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

दिन स्वातंत्र्योत्सवाचा

करू आनंदे साजरा

महामारी रोखूनिया

आश्वासिले घराघरा ||१||

 

देश आपुला महान

शूरवीर नररत्नं

ज्ञान विज्ञान अध्यात्म

साऱ्या कलांचीही खाण ||२||

 

कार्यक्षम युवाशक्ती

आहे संपत्ती देशाची

राखू देश सुरक्षित

कास धरू प्रगतीची ||३||

 

हक्कांसाठी भांडताना

कर्तव्यास नित्य स्मरू

स्वतःआधी देश हीत

ऐसे आचरण करू ||४||

 

विसरूनी भेदाभेद

बळ एकीचे जाणत

देशासाठी संघटीत

राहू नित्य कार्यरत ||५||

 

नैसर्गिक संपन्नता

देश आहे भाग्यवान

निसर्गास या जपून

करू देश बलवान ||६||

 

नाव देशाचे उज्ज्वल

त्याग, शौर्याने करूया

देश माझा देवभूमी

तिचे श्रेष्ठत्व राखूया ||७||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सप्तदशी स्वातंत्र्याची ☆ श्री हरिश्चंद्र कोठावडे

? कवितेचा उत्सव ?

☆ सप्तदशी स्वातंत्र्याची ☆ श्री हरिश्चंद्र कोठावडे ☆ 

मध्यरातिच्या घन अंधारी

उष:काल हो स्वातंत्र्याचा

लख्ख उजळल्या दहा दिशाही

अनुपम उत्सव नवस्वप्नांचा !

 

किती हुतात्मे,क्रांतिवीरही

झिजले, भिडले शतमरणांना

देशभक्तिचा उरी निखारा

अर्पण समिधा शतयज्ञांना !

 

देश दुभंगे,भिजले रुधिरी

निशाण अर्धे स्वातंत्र्याचे

दिव्यप्रभेवर स्वातंत्र्याच्या

पडले सावट शोककथेचे !

 

पुसून अश्रू, विसरुन जखमा

तिमिर निघाला प्रकाशाकडे

सर करण्याला उन्नत शिखरे

धाव मातिची नभापलिकडे !

 

संविधान मग येता जन्मा

सार्वभौम हा देश जाहला

शतकोटीच्या क्षितिजावरती

पुन्हा नव्याने सूर्य उगवला !

 

संविधान हे तंत्र न केवळ

गणराज्याचा मंत्र हा महा

समान संधी ,अभिव्यक्तीचा

विशाल व्यापक मंच हा महा !

 

शुभ्र कबूतर विश्वशांतिचे

नीलाकाशी मुक्त सोडले

पण सीमेवर त्रयदा त्याचे

पंख फाटले,रक्त सांडले !

 

अवर्षणाचा शाप भयंकर

शापावर उ:शाप शोधले

महानद्यांना बांध घालुनी

क्षेत्र कृषीचे सिंचित केले !

 

पोखरणीचा धूमधडाका

‘बुद्धहि हसला’ गालोगाली

व्यर्थ अहिंसा बलहीनांची

शांति राखितो शक्तीशाली !

 

प्रज्ञा,प्रतिभा उदंड येथे

देशविदेशी अपुले झेंडे

सक्षम, उत्सुक तरुणाईही

जिंकायाला सारी क्षितिजे !

 

प्रबोधनाचे सूर्य तळपले

तरी न सरली पुरती राती

अजून येथे खुशाल शाबुत

धर्मजातिच्या विषाक्त भिंती !

 

‘आहे’ आणिक ‘नाही’ मधले

सरावयाचे कधि रे अंतर

शाप भुकेचा अन् दास्याचा

दारोदारी अपरंपार !.…..

 

उत्थानास्तव पददलितांच्या

कोट्यवधींचे भरले रांजण

सदैव गळका रांजण रांजण

शुक्राचार्या झारी आंदण !

 

कायद्यातले उरले ‘लेटर’

बाष्पीभुत रे ‘स्पिरीट’ सारे

न्यायव्यवस्था संपन्नांस्तव

बंद विपन्ना तिची कवाडे !

 

पदी निखारे धगधगणारे

अजून यात्रा ती अनवाणी

स्वातंत्र्याच्या गंगौघाचे

जिथे पोचले नाही पाणी !

 

सप्तदशीचा प्रवास सरला

वळुन पाहिले थोडे मागे

किती विणले नि किती उसवले

भारतभूचे रंगित धागे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावडे

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ति रं गा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ?

⭐ ?? ति रं गा ! ?? ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

असे अनोखा आमचा तिरंगा

किती करू मी त्याचे वर्णन

भगवा सांगे प्रतीक त्यागाचे

येई ऐकतांना उर भरून

 

शांतता प्रिय सारे भारतीय

आमचा शांततेवर विश्वास

जगास देतसे शांती संदेश

धवलं रंग तिरंग्याचा खास

 

सत्यमेव जयते ब्रीदवाक्य

कास धरली आम्ही सत्याची

अशोक चक्र ते तिरंग्यातले

देते ग्वाही जगास त्याची

 

चला करू समृद्ध भारत

असे प्रतीक हिरव्या रंगाचे

नव नवीन लावून शोध

नांव उज्वल करू देशाचे

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१५-०८-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ।।शुभंम् भवतु ।।☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ ।।शुभंम् भवतु ।। ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

 

धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद “अभिव्यक्ती”

वाढदिवसाच्या शुभेच्छा,जडवलीत भक्ती …

फुलो, फळो नि वाढो मासिक हीच मनोकामना

बदलत्या काळाशी आहे, साऱ्यांचा सामना ..

 

मात करूया परिस्थितीवर लिहिते राहू सारे

बदलतील हो नक्की पहा हो एक दिवस वारे

ग्रहण लागते ढग ही येती, असते निव्वळ छाया

दवडती न चंद्र सूर्य हे क्षण एक तरी ना वाया ..

 

अव्याहत हो कार्य चालते छाया विरून जाती

कुणी न धरावी व्यर्थ कशाची मनातून ती भीती

व्यस्त असावे, आपल्या कार्यी लेखणीस चालवू

सारस्वत हो आपण सारे नवा मनू घडवू ..

 

लेखणीतून घडते क्रांती,विचार उदया येतो

नेतृत्वाने समाज सारा प्रगती पथावर जातो

खारीचा आपण उचलू वाटा, ध्येयपथावर चालू

शब्दसुमने मोलाची ती भर त्यात हो घालू …

 

“अभिव्यक्ती” स्वातंत्र्याचा घेऊ पुरा फायदा

नवनविन ती विचारपुष्पे करू पहा वायदा

उंचीला नेऊ या मासिक,होऊ वचन बद्ध

सारस्वत हो आपण सारे, देऊ आज शब्द …

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 98 ☆ भारतमाते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 98 ☆

☆ भारतमाते ☆

भारतमाते तुला वाहिले

सारे माणिक मोती

नका रे विसरू आपली माती

 

मिळूनच सारे लढले होते

विसरून धर्म अन् जाती

 

फासावरती हसत चढले

किती विझल्या प्राणांच्या ज्योती

 

माता म्हणूनी पुजे धरणीला

या जगतात आमची ख्याती

 

तिन्ही बाजूने सागर डोलतो

अन् गंगा यमुना वहाती

 

शुभ्र असा हा उंच हिमालय

त्याच्या समान आमची नीति

 

सौंदर्याचीच हे खाण काश्मीर

निसर्गाशीच जुळती नाती

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॐ नम: शिवाय ! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ ॐ नम: शिवाय ! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सदा तुला प्रार्थिते मी

सदाशिवा शंभो हरा

करी जगाचा उद्धार

त्रिपुरारी हे शंकरा !!

 

समुद्रमंथन झाले

रत्नांमध्ये विष आले

प्राशुनी ते विष सारे

भूमंडळास रक्षिले !!

 

तप केले भगीरथे

गंगा आणण्या भूवरी

तिचा आवेग रोखण्या

धारिले तू जटेवरी !!

 

डळमळे भूमंडळ

तुझ्या रुद्र तांडवाने

भावनांचे नियमन

केले या नटराजाने !!

 

लयतत्व तूची देवा

विश्व नियमन करी

रंजल्या-गांजल्या वरी

कृपाछत्र नित्य घरी !!

 

ॐनमः शिवाय कथिते

वंदुनिया तव पायी

देई आशिष कृपेचा

ध्यान लागो तुझे ठायी !!

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्य दिनी स्मरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्य दिनी स्मरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

स्वातंत्र्याच्या वेदीवरती,

    किती आहुती पडल्या होत्या!

नाही त्यांची गणती काहीच,

   आज घडीला स्मरू या त्या!

 

आद्यजनक ते स्वातंत्र्याचे,

  लक्ष्मीबाई अन् तात्या टोपे!

त्यांचीच धुरा हाती घेती ,

  शूरवीर वासुदेव फडके!

 

टिळक आगरकर जगी  आले,

  स्वातंत्र्य सूर्याची आस घेऊनी!

गांधीजींचे आगमन झाले,

 सत्त्याची ती कास धरूनी!

 

स्वातंत्र्यनभी सावरकर तळपले,

 क्रांतीची ती मशाल घेऊनी !

भगत, राजगुरू सुखदेव गेले,

  फासावरती दान टाकुनी !

 

चौ-याहत्तर वर्षे स्वातंत्र्याची,

 कशी उलटली वेगाने !

घोडदौड देशाच्या प्रगतीची,

 मोदी चालविती नेटाने !

 

देशाची प्रगती सर्वांगीण,

  ध्येय हेच धरू या ऊरी!

शतकाची  वाटचाल ही,

  जगास दावू स्वप्ने खरी!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनोगत…ख-या स्वातंत्र्य सैनिकाचे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ मनोगत…ख-या स्वातंत्र्य सैनिकाचे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आयुष्याची केली आम्ही हासत हासत होळी

सरणावरती अमुच्या त्यांनी भाजियली पोळी

 

सत्तांधांचा सूर्य गाडला ज्या धरणीवर आम्ही

त्या धरणीवर स्वातंत्र्याचा सूर्य ग्रासिला यांनी

 

स्वदेशीसही जपले आम्ही नेसून अंगावर खादी

‘ खादी’ चे  हे  भक्त तयांना ठावे एकच गादी

 

लाठीचे वण अजून ओले,अजून ओल्या जखमा

या चोरांचे वर्णन करण्या अपुरी पडते उपमा

 

स्वातंत्र्याच्या  यज्ञामध्ये समिधा  अमुचे  प्राण 

भूमी कसली ही तर होती नररत्नांची  खाण

 

अपुल्या आई साठी मरणे  हा होता  अभिमान 

नव्हत्या फुसक्या शपथा अमुच्या ‘मेरा देश महान’

 

चुकली अमुची  गणिते, आता उत्तर  येते  शून्य 

या डोळ्यांनी बघवत नाही,आई,रूप तुझे हे छिन्न

 

सुटला बापू तुम्ही,अहिंसा  क्षणभर  हरली  होती 

आम्ही रोजच हरतो आहो, तत्वांची झाली माती

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares