मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दरवळ ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ दरवळ ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆

 

आठवणींचा सुटला दरवळ

देहांमध्ये  होते खळबळ

 

श्वासांमध्ये श्वास मिसळता

जुन्या ऋतूंची व्हावी हिरवळ

 

बाग मनाची अशी बहरली

सुगंधामधे भिजली ओंजळ

 

दुःख मनाचे विसरुन सगळे

हसत रहा तू केवळ खळखळ

 

बंध गुलाबी जपेन मीही

तु पण जप हे नाते प्रेमळ

 

© सौ. मनीषा रायजादे-पाटील

सांगली

9503334279

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 70 ☆ छोटे छोटे वऱ्हाडी.. ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 70 ☆

☆ छोटे छोटे वऱ्हाडी .. ☆

 

घरी चार बाहुल्या करी टिवल्याबावल्या

भातुकलीच्या खेळात खोटं खोटं जेवल्या

 

छोटी होती चूल त्यावर शिजवला भात

छोट्याशा बाहुल्यानं मारला आडवा हात

 

भात खाऊन बाहुला देतो मोठी ढेकर

घरी नव्हतं पीठ केली मातीची भाकर

 

साखर देऊन थोडीशी आई म्हणे खेळा

निरोप नव्हता मुंग्यांना तरी झाल्या गोळा

 

नकट्या ह्या बाहुलीचं ठरलं होतं लग्न

काय सांगू लग्नातमध्ये सतराशे विघ्न

 

बाहुला हा शिकलेला नव्हता काही शाळा

तरीसुद्धा मागत होता सोनं एक तोळा

 

नकटीच्या लग्नामध्ये कमी पडले लाडू

छोटे छोटे वऱ्हाडी हे लागले होते रडू

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चक्रव्यूह ☆ श्री अनंत गाडगीळ

☆  कवितेचा उत्सव ☆ चक्रव्यूह ☆ श्री अनंत गाडगीळ  ☆ 

(- अनंता.)

मला वाटले होते

जन्म घेतलाय मी

माणसांच्यात ….

 

पण हीच माझी

मोठी गैरसमजूत

झाली होती.

 

जागा झालोय मी

आता केव्हाचाच

पण करू काय?

 

बाहेर नाही शकत

पडू मी इथून.. ..

पुनर्जन्मच हवाय!

 

तुमची परिस्थिती

पण अशीच आहे?

या माझ्याबरोबर.

 

पण लक्षात ठेवा..

जाण्यापूर्वी आपण

माणुसकीही पेरू!

 

एकतर आपण सर्व..

माणसांच्यात येऊ किंवा

सर्वजण पुनर्जन्मात जाऊ!

 

© श्री अनंत नारायण गाडगीळ

सांगली.

मो. 92712 96109.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 22 ☆ माझा जोडीदार.…. ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 22 ☆ 

☆ माझा जोडीदार.…. ☆

आहे तो सावळा

सदैव कोवळा

ऐसा माझा जोडीदार… १

 

जीवाचा कैवारी

वाजवी बासरी

ऐसा माझा जोडीदार… २

 

कर्ता करविता

सृष्टीचा निर्माता

ऐसा माझा जोडीदार… ३

 

द्वापारी प्रगटला

कारागृही अवतरला

ऐसा माझा जोडीदार… ४

 

पांडवांचा कैवारी

प्रगटला भूवरी

ऐसा माझा जोडीदार… ५

 

गीता उपदेश करी

शस्त्र न हाती धरी

ऐसा माझा जोडीदार… ६

 

सतत माझ्या पाठी

कर्म त्याच साठी

ऐसा माझा जोडीदार… ७

 

तयासी मी नमितो

स्मरण सदैव करितो

ऐसा माझा जोडीदार… ८

 

कृष्ण तयाचे नाम

मनस्वी प्रणाम

ऐसा माझा जोडीदार…९

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वळणवाट ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ वळणवाट ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆ 

पाय चालते वळणावरती अलगद वळत होते

मन पाखरू मात्र तयाला प्रश्न विचारित होते

सरळ रेषा ठाऊक मजला कुठे न वाटे वळावे

सरळ कोन हा आयुष्याचा दुभंग न त्याने व्हावे…

 

मी म्हणालो सरळ वाट ही नसते कधी कुणाची

वळसे घेता चहू दिशांना छेडिते तार मनाची

संकटांस या उभ्या आडव्या चुकवित जाते पुढे

वळणारी ही वाट शिकविते आयुष्याचे धडे…

 

जोवर आहे साथ मनाची सरळ पुढे चालावे

जिथे भेटते प्रांजळ अंगण तिथे चांदणे व्हावे

अडथळ्यांचा श्वास रोखूनी प्राण दिशेला द्यावे

वळणावरच्या वाटेचे मग काळीज आपण व्हावे…

 

©  श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

मिरज, जि. सांगली

मोबाईल : 9922048846

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “संधीप्रकाशात” ☆ स्व. बा. भ. बोरकर

स्व. बा. भ. बोरकर

दिनविशेष : आंनदयात्री कवी बा. भ. बोरकर – eNavakal

 ☆ कवितेचा उत्सव ☆ “संधीप्रकाशात” ☆ स्व. बा. भ. बोरकर ☆ 

(संधीप्रकाशात या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये सौ अमृता देशपांडे यांनी केले आहे.)

संधीप्रकाशात अजुन जो सोने

तो माझी लोचने मिटो यावी

 

असावीस पास जसा स्वप्नभास

जीवी कासावीस झाल्याविना

तेव्हा सखे आण तुळशीचे पान

तुझ्याघरी वाण नाही त्याची

तूच ओढलेले त्या सवे दे पाणी

थोर ना त्याहुनि तीर्थ दुजे

रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी

तशी तुझी मांडी मज देई

वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल

भुलीतली भूल शेवटली

जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे

सर्व संतर्पणे त्यात आली

 

कवी: बा. भ. बोरकर

या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे. 

सौ अमृता देशपांडे

पर्वरी, गोवा.

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खोटी खोटी रुपे तुझी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ खोटी खोटी रुपे तुझी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(मागे एकदा देशातील काही भोंदू रत्नांची नवे जाहीर झाली आणि मग आम्हालाही त्यांची अशी आरती करण्याचा मोह आवरला नाही.)

 

खोटी खोटी रुपे तुझी खोटे डेरे मठ सारे

कुठे कुठे ठोकू तुला, तुझे अघोरी कृत्य सारे ।।धृ।।

 

नीच गोष्टी ज्या ज्या काही, तिथे तुझा वास

तुझा आशीर्वाद देतो, गुंडांना निवास

चरा  चरा गंडविशी संग तुझा कशाला रे ।।

 

खरे रूप भोंदू बाबा कोणते कळेना

नको जामिनावरी तूच , तुरुंगी रहा ना

तुला अडकवाया घ्यावा, पिनल कोड कोणता रे ।।

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मिलन ☆ सौ. मुग्धा कानिटकर

☆ कवितेचा उत्सव ☆ मिलन ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆ 

 

सरितेसी भेटावे अधीर निर्झराने

सागरी खळाळणे तिचे आतुरतेने

पवित्र संगम  असे  अवनीवरचे

या सम मिलन का न घडे आपुले?

 

पानोपानी सळसळे लहरींचे गाणे

लाटांमागून लाटांचे किनारी फेसाळणे

भेट ती आपुलकीने एकटेपण न उरले

या सम मिलन का न घडे आपुले?

 

सुंदर गोफ इंद्रधनुचे लेणे नभीचे

मोहक पूनवेचे जळी शोभे बिंब शशीचे

मिलन निसर्गाचे व्यर्थच  का ठरले

या सम मिलन  न घडे  जर आपुले?

 

© सौ. मुग्धा कानिटकर

सांगली

फोन 9403726078

23/10/2020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – माझं माहेर गोंदावली ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होत आहे रे ☆

??? माझं माहेर गोंदावली ???

!! श्रीराम!!

चला माहेरा जाऊया

आला आईचा सांगावा

कंदी पेढे घेऊनिया

चला माहेरा जाऊया !!धृ.!!

 

काय वर्णावं माहेर

गोंदवलीच्या कुशीत

भेटायाला जातं मन

माझं सारखं खुशीत

मंदिरात आहे उभी

चैतन्याची ग ती छाया

होई आनंद मनाला

चला माहेरा जाऊया!!१!!

 

चला माहेरा जाऊया

महाप्रसाद घेऊया

तीर्थप्रसादाने येते

शुद्धी अंत:करणाला !

शिरु कुशीत आईच्या

तिला गुपित सांगूया

माता चैतन्य भेटली

खूप आनंदी होऊया!!२!!

 

महाप्रसाद इथला ,

जणू काला पंढरीचा !

भक्तीभावाने खाताना ,

लाभे प्रसाद रामाचा !!

इथं आल्यावर पडे,

घरादाराचा विसर !

झूल्यावर बसूनिया ,

झोके सुंदर घेऊया !!३!!

 

चला माहेरा जाऊया

श्रींची आरती ऐकूया

सामुदायिक जपाला

सहभागी होऊनिया!!

नाम सहस्त्र विष्णूंचे

घेती भक्त येऊनिया

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!४!!

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वेदना ☆ श्री शरद दिवेकर

 ☆  कवितेचा उत्सव ☆ वेदना ☆ श्री शरद दिवेकर☆ 

 

नेहमीच तुझं वागणं गूढ असायचं,

तुला कुणालाच काहीच सांगायचं नसायचं.

 

तू स्वतःला बदल असं सांगून,

काळही गेला बराच पुढे निघून.

 

आज एवढी वर्षे होऊन गेली,

तुझी झुरत रहाण्याची सवय नाहीच गेली.

 

तुला आज बोलतं करायला गेलो

आणि तुझे पुर्वीचेच रूप पाहून स्तंभितच झालो.

 

तुझे एकच  सांगणे होते,

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.

 

वाट बघतो आहे वेदना संपण्याची,

डोळ्यांना ओढ आहे महाकाव्य वाचण्याची.

 

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print