मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणसर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणसर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मनी झरे का अवचित झरझर

                     अवखळ श्रावणसर

                              अलगद कानी गुणगुणती अन

                                                    बासरीचे सूर मधुर —–

 

निळे सावळे भासे का नभ

                      प्रसन्न जरी दिनकर

                                निरभ्र असुनी भवती सारे

                                                      मनी दाटे हुरहुर ——

 

जग सारे हे तसेच येथे

                       मनाची परि भिरभिर

                                 शोधू लागले कोठून आली

                                                       नकळत श्रावणसर ——

 

मग क्षणात चमके इंद्रधनू अन

                        सूर्य हसे हळुवार

                                   लख्ख दिसे मज मनी दडलेला

                                                         कृष्णसखा सुकुमार ——

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 76 – गा-हाणं…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #75 ☆ 

☆ गा-हाणं…! ☆ 

वर्षभर आम्ही तुझ्या

येण्याची वाट पाहतो..

तू येतोस आणि आमचं घर

आनंदानें भरून जातं

खरं सांगायचं तर

आमची सारी स्वप्नं तुझ्या

येण्या न येण्यावरच अवलंबून असतात..!

 

मुलांच शिक्षणं

बायकोला नवं लुगडं

आईच्या औषधांचा खर्च

आणखी बरंच काही…

फक्त तुझ्यावरच अवलंबून असतं..!

 

हे माझ्या एकट्याचं नाही

तर असंख्य लोकांच

हेच मनोगत आहे

कित्येकांनी तर तुझ्या

न येण्यानं आपला जीवन प्रवास

अर्धवट सोडून..

अत्महत्ये सारखा अवघड मार्ग

स्विकारलाय..!

 

आताही..तुझ्या येण्यानं..

आम्हांला आनंद होतो पण..

त्या पेक्षा जास्त ..

तुझ्या येण्याची भिती वाटू लागलीय

कारण…

तू येशील आणि सगळीकडे

दु:खाचं सावट पसरवून जाशील..

अन् आम्ही..

काहीच करू शकणार नाही…!

 

तुझ्या अशा वागण्याचं

कारण काय

माहीत नाही पण ..

हे पावसा…,

आम्हा तमाम शेतक-याची

तुला एक विनंती आहे..

आमच्या शेतात

एक वेळ कमी धान्य पिकलं तरी चालेल..

आमची मुलं एखादी इयत्ता

कमी शिकली तरी चालतील

पण …

महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला

तू असं पाण्यात ठेऊ नकोस ..

 

हे पावसा दर वर्षी..

आम्हा शेतकऱ्यांच गा-हाणं तू ऐकतोस

तसंच

आम्हा शेतक-यांच हे ही गा-हाणं

तू ऐकशील ह्याची खात्री आहे..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वे ध ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ वे ध ! ⭐  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

बसलो निवांत पडवीत

झोके घेत झूल्यावर

बघता बघता भरून गेले

काळ्या जलदांनी अंबर

 

सोबतीस त्या घुमू लागता

समीराचा भयावह नाद

वाटे तरु लता उच्चरवाने

गाऊ लागती चारी ते वेद

 

जाई चमकून मधेच चपला

उजळून आसमंत सारा

जीव रानीचे भ्याले सारे

शोधू लागले उबेचा निवारा

 

रचले यज्ञकुंड निसर्गाने

भेगाळल्या धरती वरती

धुवांधार आषाढ सरी

देती त्यावर ओली आहुती

 

हे चक्र कालातीत निसर्गाचे

सदा असेच पुढे जायाचे

वेध लावून सासुरवाशीणींना

हसऱ्या नाचऱ्या श्रावणाचे

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१५-०८-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 99 ☆ गझल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 99 ?

☆ गझल ☆

होता इथून मागे तो वाद संपवावा

 ठेऊ  नको सख्या  तू दोघात हा दुरावा 

 

हातात हात देता झाले तुझीच भार्या

देवा नि ब्राह्मणांचा का लागतो पुरावा ?

 

मेंदीत जीव रंगे, हळदीत देह सारा

सोडून दूर  आले माझ्या सुरेख  गावा

 

आयुष्य नोंदले मी नावे तुझ्याच तेव्हा

लक्षात घेतला ना कुठलाच बारकावा

 

संसार  ,मोह ,माया असतोच एक धोका

त्याच्या पल्याड जाण्या सन्मार्ग आचरावा

 

सौख्यास भोगले की वैराग्ययोग आला

 साराच सोहळा हा आजन्म गौरवावा 

 

सांजावता दिशा या बघ वेध लागले ना

नांदू जरा  सुखाने, दे शेवटी विसावा

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हळवे बंध… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ हळवे बंध… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

नाते बहीण भावाचे

मायेच्या धाग्यात गुंफले..

 गोफ रेशमी हे प्रेमाचे

अलवार राखीने बांधले…

 

अल्लड अवखळ तरीही सजग

किती रंग ते नात्याचे..

क्षणांत भांडण क्षणात सांधण

निर्व्याज बंध हे प्रीतीचे…

 

भरभक्कम आधार भावाचा

जणू वडिलांचे प्रतिरूप..

आईच्या मायेने बहीण ही

सांभाळते भावाला खूप..

 

संकट येता सावराया

धावत येतो भाऊराया..

भावाच्या पाठीशी ही

असते

बहिणीची खम्बीर छाया..

 

बालपणीचे पहिले सवंगडी

या नात्याची अवीट गोडी..

भाऊबीज..रक्षाबंधनाची ओढ वेडी

मनामनाचे हळवे बंध जोडी…

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण नवलाई… ☆ श्री गौतम कांबळे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण नवलाई… ☆ श्री गौतम कांबळे ☆

उद्धव (मात्रावृत्त- २+८+२+२)

सप्तरंगी श्रावणाचा

घ्यावा अंगावर शेला

गाऊ आनंद  तराणे

श्रावण सजूनिया आला

 

रान ओलेचिंब झाले

हिरव्या शालूने नटले

दान निसर्गाचे सारे

झाडे वेलीनी लुटले

 

रानफुलांसंगे आता

माळरानही गंधाळे

गंध पिऊनी पशुपक्षी

वारा वेगे हुंदाडे

 

सोहळाश्रावण मनाला

भूलवून माझ्या जाई

जीवनात आनंदाची

यावी वाटे नवलाई

 

© श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 99 ☆ मोकाट गुरं ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 99 ☆

☆ मोकाट गुरं ☆

मला संपवायचंय, ‘मला’

आणि तिथं पेरायचय तुला

तू उगवतेस झाड होऊन

मी असतो गवतासारखा पसरून

उन्हाळ्यात जातो वाळून

तरीही फिनिक्स पक्षासारखा पुन्हा येतो वर

झाडांच्या अन्नाचे शोषण करणारा

मी एक स्वार्थी जीव

कधीकधी माझीच मला येते कीव…

झाडं फळं विकत नाहीत

सावली दिली म्हणून सेवा शुल्क मागत नाहीत

आॕक्सिजनचं मोलही सांगत नाहीत

सारंच फुकट देतात

माणसाला फुकटचं खायला आवडतं

हे त्याला माहीत असावं

फक्त एक बी पेरा

फक्त एक झाड लावा

अन् मिळवा सारं फुकट, फुकट, फुकट

तसा तर माझा कुणालाच उपयोग नाही

असं वाटत असतानाच

काही मोकाट गुरं

माझा फडशा पाडून गेली

आणि मग लक्षात आलं

कुठलाही जीव निरुपयोगी नाही

आपल्यालाही जगाव लागेल

या मोकाट गुरांच्या पोटासाठी…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सागर हाच बंधू…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सागर हाच बंधू… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

 

सागर हाच बंधू माझा,

 आहे अपार अथांग !

बहिण भावाच्या मायेचे

 तेच आहे अंतरंग !

 

श्रावणाचा उत्कट बिंदू,

  असे नारळी पौर्णिमा !

सागराला भरती येई ,

  जाणू त्याचा मनी महिमा!

 

नात्याची या साद आहे , 

आधार हाच बहिणीचा !

सागरा सम अनंत आहे,

  रेशीम धागा या नात्याचा !

 

रेशीम धागा गुंफून घेई,

 स्नेहल नाते बंधू भावाचे!

मृदु, चिवट   रेशीम धागे,

  बंध बांधती दोन मनाचे!

 

 नात्याचे हे गुळखोबरे,

   एकजीव शिताशितात..

 गोडी त्याची असे अवीट,

  तृप्ती देई मनामनात…

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 44 ☆ वृद्धापकाळातील वेदना ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 44 ☆ 

☆ वृद्धापकाळातील वेदना ☆

वृद्धापकाळातील यातना

बोलक्या, तरी अबोल होती

स्व-अस्तित्व मिटतांना

डोळ्यांत अश्रू तरळती…०१

 

वृद्धापकाळातील यातना

थकवा प्रचंड जाणवतो

आधार हवा, प्रत्येक क्षणाला

जवळचाच तेव्हा, मागे सरकतो… ०२

 

वृद्धापकाळातील यातना

विधिलिखित असतात

परिवर्तन, नियम सृष्टीचा

विषद, लिलया करून देतात…०३

 

वृद्धापकाळातील यातना

भोगल्याशिवाय, गत्यंतर नाही

प्रभू स्मरण करत रहावे

तोच आपला, भार वाही…०४

 

वृद्धापकाळातील यातना

न, संपणारा विषय हा

“राज” हे कैसे, प्रस्तुत करू

अनुभव, प्रत्येकाला येणार पहा…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रक्ष्राबंधन☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रक्ष्राबंधन☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

(सीमेवरील भावांसाठी)

वीरपुत्र तू भूमातेचा

लढत राहसी सीमेपाशी

रक्षण करण्या माॅं भगिनींचे

तळहाती घेऊनी शिराशी

 

नाही तुला प्राणांची पर्वा

पहाड बनुनी उभा ठाकसी

चारी मुंड्या चित करुनिया

शत्रूला तू पाणी पाजीसी

 

छातीवरती घाव झेलिले

थंडी वारा सर्व साहिले

किती रिपू तू गारद केले

आनंदाने प्राण अर्पिले

 

सण आला राखी पुनवेचा

पाठविते धागा प्रेमाचा

मनगटी तुझिया बांधुनिया

पाठीराखा तू भगिनींचा

 

वीर सैनिका भाऊराया

राखीचे हे अतूट बंधन

सीमेवरती पेटून उठला

पावन माती पावन जीवन

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares