मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणरायास विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ गणरायास विनवणी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

विनवी तुजला, श्री गणराया

अज्ञाना मम दूर कराया ||धृ||

*

चतुर्थीला रे पूजिती तुजला

श्रीगणेशा, पावसी सकला

चौदा विद्या, चौसष्ट कला

देशी तू रे, तुज भक्ताला ||१||

*

गजानना रे मंगल कार्या

निमंत्रिती तुज पूर्ण कराया

हेरंबा रे, प्रार्थिती तुजला

वरदहस्त हा द्यावा सकला ||२||

*

भावभक्तीचे पुष्प अर्पण्या

अधीर जाहली अवघी काया

मनोभावे वंदन तुजला 

लोटांगण रे तुझिया पाया ||३||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माझा बाप्पा… घरी येता…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझा बाप्पा… घरी येता… ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

बाप्पा रे बाप्पा 

तू घरी असता 

मला नाही चिंता 

कशाचीच आता…

*

तुझ्या माझ्या गप्पा

होतीलच आता

मनातलं सारं

येईल तुला सांगता…

*

तुझ्याकडे आता वेळच वेळ

तुझा माझा छान बसेल मेळ 

घरीच रंगेल प्रत्येक खेळ

सोबतीला गोड गोड प्रसादाची भेळ…

*

तू घरी आल्यावर

कोणीच नाही मला ओरडत

छोट्या छोट्या खोड्यांनी 

कुणाचे काही नाही बिघडत…..

*

घरी सर्वांना गडबड घाई

मला कोणी ओरडत बसत नाही

गोड खाऊ न मागताच हातावर येई

तुझ्यासोबत माझीही चैन मग होई….

*

तुझी माझी जमते गट्टी

मी ही नाही वागत मग हट्टी

अभ्यासाला हळूच घेऊन सुट्टी

शाळेला ही कधीतरी मारतो बुट्टी….

*

म्हणूनच देवा मी तुझी वाट पाहतो

तुझ्या येण्याची छान तयारी करतो

माझा बाप्पा मला हवाच असतो

गणेश चतुर्थीला तो माझ्याच घरी राहतो….

*

वाजत गाजत येतो

हसत खेळत राहतो

मना प्रसन्न ठेवतो

दुःख सारे संपवून टाकतो….

*

सर्वांना बुध्दी छान देतो

आम्ही सगळे त्याचेच ऐकतो

म्हणूनच मोठ्यांच्या ओरड्यापासून 

मी रोज रोज बचावतो….

*

देव बाप्पा देव बाप्पा

मला वाटते आता

तू नेहमीच आमच्या घरी रहावा

मोठ्यांनाही थोडं लहानपण दे गा देवा….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाई गुणगान आवडीने… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ गाई गुणगान आवडीने ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

आगमन आज | श्री गणपतीचे ||

 प्रसन्न मनाचे | आवडीने ||1||

*

 छान सजावट | बाप्पाच्या समोर ||

रांगोळी सुंदर | रेखीयेली ||2||

*

 लाईट पताका | चमकती भारी |

मूर्ती ही साजरी |. दिसतसे ||3||

*

 मनोभावे पूजा | आज दिनी करी |

नैविद्यास पुरी | अर्पियेली ||4||

*

दुर्वा जास्वनंद | वहावी भक्तीने |

बाप्पा आरतीने | नाचतसे ||5||

*

 मोदक उकडी | गूळ खोबऱ्याचे |

गुण प्रसादाचे | दावीयेती ||6||

*

रूप मनोहर | दिसतसे फार |

जरी पितांबर | नेसलासे ||7||

*

 कंठात माणिक | मोतीयांच्या माळा |

 पायात हो वाळा | शोभतंसे ||8||

*

 गाई गुणगान | आवडीने देवा |

 वृंदाचा ठेवा | सोनियाचा ||9||

 – दत्तकन्या

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दयाघना तूच सांग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ दयाघना तूच सांग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

पाणावले डोळे,

पापणीस पूर.

ऊर फाटून विदीर्ण,

सोडताना घर.

*

असे कसे झाले,

पाणी अनावर.

बंध संयम तोडून,

आला महापूर.

*

उघड्या डोळ्यांनी सताड,

मृत्यू सोहळे पहावे.

अशा निर्दयी पाण्याला,

कसे जीवन म्हणावे?

*

आर्ततेने आता,

हाक कोणास मारावी?

दयाघना तूच सांग,

कशी प्रार्थना करावी.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांग पावसा सांग मला… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांग पावसा सांग मलासौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सांग पावसा सांग मला

काय देऊ मी सांग तुला

फुललेला तू ऋतू दिला

रंग गुलाबी फुला फुला

*

पाकळी मजला मोहविते

कळी कळी उमलून देते

हिरव्या हिरव्या पर्णपाचुच्या

देठासंगे घेई झुला

सांग पावसा……

*

कधी मी बावरुनी जाते

गोड खळी गाली येते

प्रेम झुल्यावर घेताना

हिंदोळा हा खुला खुला

सांग पावसा……..

*

अवचित लाली आलेली

सर ओलेती न्हालेली

कुंतलात मग अलगद माळून

छेड छेढतो कानडुला

सांग पावसा………..

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 244 ☆ गजानन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 244 ?

☆ गजानन☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बनविले खास

सुंदर मखर

बसविले त्यात

गजानन ॥

*

केली पूजाअर्चा

आर्पिली जास्वंद

झाले आनंदीत

गजानन ॥

*

दुर्वा हरळीची

केवडा पाहून

 गेले की मोहून

 गजानन ॥

*

मोदक सुबक

खीर तांदळाची

तृप्त की जहाले

गजानन ॥

*

खिरापत रोज

आवडेच भारी

लाडू पेढे खाती

गजानन ॥

*

आरती म्हणता

दिन-रात आम्ही

झाले की प्रसन्न

गजानन ॥

*

दहा दिवसाचे

असती पाहुणे

दरवर्षी येती

गजानन ॥

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ “देव चिंतामणी… आले हो अंगणी“…  श्री सुहास सोहोनी ☆

भाद्रपद मास, चतुर्थीचा दिस

येति स्वागतास, स्वर्ग साती

हासत नाचत, गायन करीत

आले गजानन, गणपती…

*

आले हो अंगणी, देव चिंतामणी

सुखाची पर्वणी, नेत्रा वाटे

काय वर्णू रूप, काय वर्णू तेज

भाषा शब्दकळा, थिटी वाटे…

*

मेखला कटीस, घुंगरू पायात

नादबद्ध लय, साधतसे…

स्थूलाचे सौष्ठव, नयनी मार्दव

अंतरी लाघव, नांदतसे…

*

नृत्य दर्शविते, लालित्य पदांचे

शुंडा आणि कर्ण, हिंदळती…

प्रसन्न चित्ताने, हासर्‍या मुद्रेने

आनंदाची फुले, उधळिती…

*

एका हाती पुष्प, कमळाची शोभा

तेज परशूचे, दुजातुन

तृतीय करात, मोदक प्रसाद

लाभे आशीर्वाद*, चौथ्यातुन…

*

गृहासि आमुच्या, लावावे चरण

हर्षोल्लासे तुम्ही, गणराया

कृपेचा कटाक्ष, राहो आम्हावरी

असो द्या स्मरणी, देवराया…

*

सानुल्या मूषका, भार वहाण्यासी

देता बळ तुम्ही, गजेंद्राचे

गौरिपुत्रा तैसी, द्यावी शक्ति आम्हा

आणायास राज्य, सद्धर्माचे…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “बोला जय जय गणराया…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बोला जय जय गणराया☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तुझ्या दर्शने हरती विघ्ने,

 जाती लयाला चिंता,

आनंदाची असे पर्वणी,

आगमन तुमचे बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 पूजतो तुजला भावभक्तीने,

 सान-थोर हा मेळा,

पार्थिवातूनी चैतन्याची,

 देसी प्रचिती बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 हात जोडूनी, नमन तुला हे,

 पायी ठेवता माथा,

 सकला देई विवेकबुद्धी,

 विद्याधीश तू बाप्पा! 

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 गोड मानूनी घ्यावे तू रे,

 अर्पियले जे तुजला,

 भक्तिभाव जो मनीमानसी,

 ओळखीसी तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!

*

 चिंतन व्हावे तुझ्या गुणांचे,

 ध्यास जडो ज्ञानाचा,

 जाण राहू दे माणुसकीची,

 माणसात तू बाप्पा!

बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “विश्वनायक” ☆ श्री दयानंद घोटकर ☆

श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्वनायक ☆ श्री दयानंद घोटकर

हे सुमुखा, हे विनायका

विश्वाधिपती, नमो नमः ।।

*

सर्वारंभी, तुझेच पूजन

अग्रभागी, तू देवलोकी

चराचरी तू, अणुरेणुतून

ज्ञान विज्ञानी, तिन्ही लोकी…

*

रक्तवर्णी, जास्वंद पुष्प अन्

दुर्वा, बेल, शमी, प्रिय तुला

शक्ती, भक्ती, अन् संयमाचा

वरदनायक, ऋद्धी सिद्धीचा..

*

स्थूल सूक्ष्म तू, सगुण-निर्गुण

पाशांकुश, धारक योद्धा

सकल कलांचा, तू निर्माता

प्रणवरुपी, शुभ-लाभ पिता…

*

वेद व्यासमुनी, तुज विनविती

महाकाव्याच्या, लेखना

तूच देसी, प्रतिभा-प्रतिमा

साहित्याची, तूच प्रेरणा…

*

नृत्य-नाट्य, रंग-वेष, अभिनय

निर्मिसी, जगती, श्रेष्ठ कला

सूर-ताल, सूर्य-चंद्रासम दिधले

चित्र-शिल्प, दिले या जगताला…

*

आनंद देसी, शांती देसी

मांगल्य देसी, सकल जीवा 

कलावंत तू, विद्याविभूषित 

वंदनीय, सा-या विश्वा…

© श्री दयानंद घोटकर (प्रेमकवी)

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ आल्या गौरी गं ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भक्तिगीत)

आल्या गौरी गं, महालक्ष्मी गं माहेरवाशिणी भादव्यात

लिंबा लोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥ धृ.॥

उंबऱ्यावर माप ओलांडी किणकिण घंटारव त्यात

बालगोपाळ सारे आनंदी घरामध्ये हो चिवचिवतात

देखणी आरास पाहून हसती गौरी गं कश्या मनात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥१॥

 *

देवघरात तेज पसरे लेकुरवाळ्या  आल्या माहेरात

वस्त्र माळा गं, नवे शालू गं, दाग दागिने त्यांच्या गळ्यात

दूर्वा आघाडा सोळा पत्री ही फुल हार पहा सजतात

लिंबलोण गं, औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥२॥

 *

फराळाचा ग केला थाट गेले सारे त्यांच्या पोटात

सोळा भाज्या ग कोशिंबिरीही पुरणाचे जेवण ताटात

चित्रांन्न साखर भात पंचपक्वान्न गौरींच्या थाटात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥३॥

 *

गोविंद विड्याचा मान त्यांना गं, पाणी ठेवले चांदी तांब्यात

त्यांच्या बाळांचे सारे कौतुक पाहून गाली पहा हसतात

गाठी घेऊन खिर कानवला नैवेद्याच्या दहीभातात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥४॥

 *

निरंजने गं, नंदादीप हे समया पहा तेजाळतात

सारी सुमने गंधाळलेली धूप दीप गं दरवळतात

लेकी निघाल्या सासुराला ग मोती हळूच ओघळतात

लिंबलोण गं औक्षवण गं सोनपावली आल्या घरात॥५॥

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print