मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 57 – आपसुक…! ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #57 ☆ 

☆ आपसुक…! ☆ 

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही… . .

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजणं

होत नाही

आता फक्त

मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही ;

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो.

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला . . .

तुझ्याही गालावर

नकळत का होईना

पाऊस ओघळत असेल…!

 

© सुजित शिवाजी कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तत्वज्ञान ☆ श्री ओंकार कुंभार

☆ कवितेचा उत्सव ☆ तत्वज्ञान ☆ श्री ओंकार कुंभार ☆

हे बरं आहे

 

सुचतात दोन ओळी

भरल्या पोटी मजला

 

त्याला काय सुचते

जो दोन घासांना भुकेला.

 

उदराची भ्रांत संपता

जगण्यात तत्वज्ञान शोधतसे

भुकेल्या पोटीचे तत्वज्ञान काय असे.

 

निवारा पूर्ण होता वस्तूंची गर्दी जमतसे

निवारा नसतानाही कोणत्या वस्तूंची यादी मन करतसे.

 

©  श्री ओंकार कुंभार

मो 9921108879

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पैंजण ☆ सौ.नीलम माणगावे

सुश्री नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव पैंजण ☆ सुश्री नीलम माणगावे ☆

दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून

माझी आजी स्वयंपाकघरातून माजघरात

माजघराततून स्वयंपाकघरात

एखाद्या सम्राज्ञीसारखी

ठुमकत फिरायची.

ओझ्याने तिचे पाय भरून यायचे.

दुखायचे. खूपायचे.

घोटे काळे ठिक्कर पडायचे.

कधी जखम व्हायची, चिघळायची . रक्त वहायचं

पण नादाच्या भूलभुलैय्यातून बाहेर न पडता

पैंजणाखाली फडकं बांधून

जखमांना ऊब देऊन ती राज करायची.

 

माझ्या आईने पैंजण सोडून

नाजूक, हलक्या, तोरड्या घालायला सुरुवात केली

ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं

आपल्याच तोर्‍यात ती

स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची

सगळीकडे मनमुराद फिरायची

अधनं मधनं का होईना, तोरड्या टोचायच्या.

साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे.

पण सारे दुर्लक्षून

ती राज-राणीसारखी भिरभिरायची.

 

मी तर….अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं

काहीच नको म्हणून

पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं.

हलक्याशा चपला, बूट, सॅंडल घालता घालता

घरच नव्हे तर अंगणही ओलांडून

मी बाहेर पाऊल टाकलं

पण कधी कधी माझ्याही नकळत

चपला घसरतात. सॅंडल बोचतात. बूट चावतात.

पण मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी

मी सारे सहन करते.

 

आता मात्र माझी मुलगी म्हणते

आई, पैंजण नको, तोरड्या नको,

चप्पल, बूट, सॅंडल नको.

ते पकडणं नको. घसरणं नको.

काही काही काहीच नको.

अग पायाखालचे काटे मोडण्यासासारखे

पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी

पुढल्या का होईना शतकाआधी.

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 9 – शब्दांचं नातं हळुवार ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 9 ☆

☆ शब्दांचं नातं हळुवार ☆

शब्द -एक आविष्कार

शब्द -एक नवं हत्यार

शब्द म्हणजे एक वार

शब्द म्हणजे तलवार

शब्द करतो काळजावर घाव

शब्दच म्हणतो माझं मलम लाव

शब्द घडवतो बिघडवतो

शब्द लढवतो, भांडतो, मारतो

शब्द जगायलाही शिकवतो

शब्द असा-शब्द तसा

कसा?-तर वापराल जसा

शब्द तोलतात शहाणपण

शब्द खोलतात गाढवपण

शब्द करतो बदनाम

मुक्या जनावरांनाही

राग येतो माणसांना

कुत्रा प्रामाणिक असतो तरीही

म्हणून म्हणतो शब्दांनो तुम्हीच

वेळेवर शहाणे व्हा

माझ्यातल्या शब्दवेड्याला

शहाणपणाचं भान द्या

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

07/06/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव : कोरोना मी नाराज आहो तुझ्यावर ….. खरे आहे ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

संक्षिप्त परिचय 

  • सेवानिवृत्त प्राचार्य,  महाराष्ट्र शासन द्वारा राज्य पुरस्कार से सम्मानित.
  • रक्तदान कार्य मे विशेष योगदान हेतू डॉ. बद्रिप्रसाद श्रीवास्तव पुरस्कार तथा राज्य रक्त संक्रमण परिषद से सम्मानित.  50 बार रक्तदान तथा रक्तदान शिविरों का आयोजन.
  • सामाजिक तथा संस्कृतिक संस्थाओं से संबधित. जेसीआय संस्था के पूर्व अध्यक्ष, लायन्स क्लब अध्यक्ष.
  • Personality Development के राष्ट्रीय प्रशिक्षक. 500 से अधिक शिविरों मे मार्गदर्शन.
  • महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे में अभ्यास मंडळ सदस्य के रूप मे कार्य. पाठ्य पुस्तक निर्मिती मे योगदान.
  • संताजी शिक्षण मंडळ के सहसचिव. एसपीएम माझी विद्यार्थी संघ के अध्यक्ष.
  • वृत्तपत्र लेखन कार्य तथा आकाशवाणी से कई बार विभिन्न कार्यक्रमों की प्रस्तुति.

☆ कवितेचा उत्सव : कोरोना मी नाराज आहो तुझ्यावर ….. खरे आहे ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

कोरोना मी नाराज आहो तुझ्यावर …..खरे आहे,

पण तू  जीव घेतो म्हणून नव्हे.

मित्रांच्या त्या कंपूत

सुख दुःखाच्या देवघेवित

रक्तसंबंधा पलीकडचा धीर अन्  सांत्वनाची  वाट

तू हिरावून घेतली ना रे…..

जिव्हाळ्याचा कंपू संपविलास की रे बाबा तू…..

 

मी नाराज नाही….. तुझ्यावर

की तू लग्न समारोह नीरस केले म्हणून.

पण  दिवसरात्र राबणाऱ्या त्या माय माऊलीच्या मुखमंडला वरील श्रमपरिहाराचे निरागस हास्य तू हिरावून घेतले ना तू,

 

मी नाराज नाही तुझ्यावर

की तू सांस्कृतिक कार्यक्रम बंद केले म्हणून

पण त्या कलावंताच्या निरागस कलाना दाद देण्याच्या आनंदापासून वंचित केलेस ना तू

 

मी नाराज नाही तुझ्यावर

की तू आजारी करतोस आप्तांना

पण खांद्यावर हात ठेवून

 

लढ म्हणण्याचा हक्क हिरावून घेतला ना तू…..

 

मी नाराज नाही तुझ्यावर

की तू मृत्यू देतो म्हणून

पण मानवतेचा शेवटचा खांदा अन्

हृदयाच्या रुदनाने दिलेला मुखाग्नी हिरावून घेतलास ना तू…..

 

हो रे कोरोना मी नाराज आहे तूझ्यावर, तू जीवन संपवतो म्हणून नव्हे

जगण्याचा आत्माच संपविलास ना रे…..

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गनीम ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ गनीम ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

 

स्पर्धा जगण्याची ही,

की संघर्ष म्हणावे याला.

बनाव युद्धाचा जर हा,

मग मोल काय लढण्याला?

 

जिंकलो हरुन कितीदा ,

अन् जिंकुनी हरलो होतो.

अर्थहीन विसंगतीने तरीही ,

युयुत्सुच ठरलो होतो.

 

उशिराने थोड्या कळले,

जो अनर्थ घडला होता.

माझ्यातच खोल लपूनी,

गनीम दडला होता.

 

©  श्री शरद कुलकर्णी

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 67 – गझल – वृत्त – पीनाकी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 67 ☆

☆ गझल – वृत्त – पीनाकी ☆

(लगागागा लगागागा लगागागा लगागा)

 

अता वाटे खरेतर हे जगा माहीत होते

कशाला मी उगाचच लपविले का भीत होते

 

असावे पूर्वजन्मीचे ऋणादीबंध काही

जसे राधा मुरारीही जुने मनमीत होते

 

गझल अद्यापही ज्यांची मना वेढून आहे

कळाले नाव ते चित्रा सहित जगजीत होते

 

मला आल्या पुन्हा हाका दिशा दाही उजळल्या

तुला सांगू कसे हे काय धुंडाळीत होते

 

अशी आहे नशा जगण्यात गझलेचीच सारी

थवे आजन्म शब्दांचेच कुरवाळीत  होते

 

फुले वाट्यास आलेली जरी बेरंग  होती

तरीही  क्षण सुखाचे पूर्ण गंधाळीत होते

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कळी ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  कळी ☆ श्री मुबारक उमराणी ☆

 

कळी गळाली फुल गळाले

गळाली सारी झाडांची पाने

रक्तरंजीतात कोकिळा मुकी

जीवन सुके अबोल गाणे

 

झाले ते मुके अंधारी रात्री

निशब्द धुके, कोणी लुटला

वारा सुटला भयान राती

पाय पडता, पाला कुटला

 

जागे झाले काटे चीत्कारीत

नाचले कळ्यांच्या त्या राशीत

तुडवीत तुडवीत गेले

सुगंध फुलांचा पित पित

 

निशब्द चराचर निशब्द

थांबले झरे, थांबला चंद्र

थांबले रातकिडे चंचल

थांबला ढगा अाड तो चंद्र

 

भकास वाणी, भकास गाणी

ढग थेंब अश्रूंची ती धार

अश्रूथेंबच, कोणी करेना

अन्यायाविरूद्ध प्रहार

 

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 66 ☆ प्रीतिचा झरा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता  “प्रीतिचा झरा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 66 ☆

☆ प्रीतिचा झरा 

 

डावी खिडकी हृदयाची या उघडायाला हवी

शुद्ध येईल हवा प्रीतिची तेव्हा हृदयी नवी

 

शृंगाराचा ऐवज माझा मी तर आहे परी

सुरूंग लावू आभाळाला बरसतील या सरी

 

चिरून घेते हृदय कोवळे फाळाकडुनी धरा

पाटामधुनी वहात आहे कसा प्रीतिचा झरा

 

अंधाराचे राज्य संपले वाटतोस तू रवी

प्रकाश किरणें मला खुलवती साथ तुझी रे हवी

 

असे गीत हे गाऊ आपण असेल त्याला गती

तुझ्या नि माझ्या मधे यायला नको कधीही यती

 

प्रीत सागरा नसे किनारा अधी वाटले बला

सहज पोहून गेलो नंतर छान वाटली कला

 

जमवू काड्या बांधू घरटे घरात लावू दिवा

कुणी तरी हा पुढे वारसा सांभाळाया हवा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी कविता ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ ☆ माझी कविता ☆☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 

मूक रहावी माझी कविता

आक्रोश कशाला उगा करावा

दुःखाचेही पचवून डोंगर

संतोषाचा झरा वहावा.

 

प्रतिक्षेतली जणू आर्तता

बंद पापणीमधले पाणी

हुरहूर सारी मनात ठेवून

आनंदाची गावो गाणी.

 

आठवणींचा जपून ठेवा

जाण असावी तिला आजची

भविष्य उज्वल पहात जाईल

स्वप्ने सजवून कधी उद्याची.

 

लिहीले त्याने तसे म्हणूनी

मी ही का हो तसे लिहावे

पाऊल माझ्या कवितेचे ते

चुकूनही ना कधी घसरावे.

 

नकाच सांगू मजला कोणी

अशी असावी,तशी असावी

समईमधल्या वातीसम ती

तम सर्वांचा उजळीत जावी.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print