मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 17 ☆ हे भरलं आभाळ… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी)  मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ प्रकाशित कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना  “हे भरलं आभाळ…)

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 17 ☆ 

☆ हे भरलं आभाळ… ☆

हे भरलं आभाळ…

सहज रिचवलं

उष्णता क्षमली

वातावरण बहरलं…०१

 

हे भरलं आभाळ…

किमया देवाची

थेंब थेंब पाणी

कहाणी जीवनाची…०२

 

हे भरलं आभाळ…

अंधार पडला क्षणात

जलधारा बरसल्या

पाऊस आला जोरात…०३

 

हे भरलं आभाळ…

कधी तसंच राहिलं

माणसाचे क्रूरकर्म

आभाळाला डागलं… ०४

 

हे भरलं आभाळ…

तसं मायेचं असावं

सुजलाम सुफलाम

सर्व जग बनावं…०५

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मध्यमवर्ग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मध्यमवर्ग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

यावेळचा पाऊस

खूप खूप मोठ्ठा होता.

काऊचं शेणाचंच नव्हे, तर

चिऊचं मेणाचं घरही वाहून गेलं.

काऊ चिऊकडे धावला

मदत मागायला.

पण चिऊ स्वतःच झाली होती बेघर.

 

काऊ गेला परत, विचार करत

आता काय करू?

कोणा हाक मारू?

तोच  काऊकडे  आला  कोणी

घेऊन बिस्कीटे -चहापाणी.

दुसरा आला खिचडी घेऊन

तिसरा आला कपडे घेऊन

एकेकजण येतच गेला

काऊला मदत देतच गेला

काऊ रिलिजियसली रांगेत उभा.

कधी  रॉकेलच्या

कधी अंथरुणाच्या

कधी कपड्यांच्या

कधी पांघरुणांच्या

हळूहळू काऊचं घर उभं राहिलं.

 

चिऊकडे कोणीच नाही आलं

रांगेत उभं राहणं,  नव्हतं

तिच्या प्रतिष्ठेला शोभणारं

जवळच्यांनी केली मदत प्रथम

नंतर चिऊलाच ऑकवर्ड वाटू लागलं,

रोज रोज त्यांची मदत घ्यायला.

त्यांनाही वाटायचं हिला विचारलं

तर हिचा इगो दुखावणार  नाही ना?

उगीच रिलेशन्स  नको स्पॉईल  व्हायला.

चिऊला  वाटायचं, कसं मागू?

शरमेने भरून जायचं तिचं मन.

 

काऊचं  घर केव्हाच उभं राहिलं

-पूर्वीपेक्षाही चांगलं.

चिऊ मात्र अजून

जमवतेय काड्या काड्या

घर बांधायला.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋतूरंग ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ऋतूरंग ☆ सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆ 

 

संपता संपता शिशिराने वसंताला साद दिली .

गोड गुलाबी थंडीतून  पानझडी संपून गेली .

जुनीपुराणी पिवळी पाने गळून

आता पाचोळा झाली.

उघड्या बोडक्या झाडावरती नवी वस्त्रे लेवू लागली.

हिरवी कोवळी छान पालवी झाडे आता पांघरु लागली.

वसंत ऋतुचे वैभव सारे हिरवाई हीघेऊ लागली  .

 

आम्रतरूवर मोहर फुलतो

गंधा संगे सूरही जुळतो .

कोकीळ सुस्वर पाना आडून रंगामध्ये तान मिसळतो.

ग्रीष्म तापला तरीही येथे फुले बहावा गुलमोहर तो

आषाढाचा काळा मेघही अमृतधारा इथे बरसतो.

सप्तरंगी ते इंद्रधनू नभी मोर हीनाचे पिसेफुलारूनी

 

निसर्ग पटला वरती उधळण नवरंगाची वर्षा ऋतुनी.

 

शरद ऋतूचे शुभ्र चांदणे दुधात न्हाली धरतीओली

समृद्धीचा रंग पसरला धनधान्याची रास ओतली.

हेमंताचा प्रेम गोडवा संक्रांतीचा रंगीत हलवा

फळा फुलांनी तरु बहरले ऋतू रंगाचा कुंचला नवा.

कृपाछत्र हे सहा ऋतूंचे नेम याचा कधीन चुकला

जीवनात ते रंग बहरती सुख-समृद्धी या जगताला.

 

© सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 56 – मला वाटले… ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #56 ☆ 

☆ मला वाटले … ☆ 

 

मला वाटले ,भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही,कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

येते म्हणाली ,होतीस तेव्हा जाता जाता

किती वाढले,दोघांमधले अंतर अंतर…!

 

रोज वाचतो,तू दिलेली ती पत्रे बित्रे

भिजून जाते,पत्रांमधले अक्षर अक्षर…!

 

तूला शोधतो,अजून मी ही जिकडेतिकडे

मला वाटते,मिळेल एखादे उत्तर बित्तर…!

 

स्वप्नात माझ्या,येतेस एकटी रात्री रात्री

नको वाटते,पहाट कधी ही रात्री नंतर…!

 

उभा राहिलो,ज्या वाटेवर एकटा एकटा

त्या वाटेचाही,रस्ता झाला नंतर नंतर…!

 

विसरून जावे,म्हणतो आता सारे सारे

कुठून येते,तूझी आठवण नंतर नंतर…!

 

मला वाटले,भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही,कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

© सुजित शिवाजी कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोंदण ☆ सुश्री पूजा दिवाण

 ☆ कवितेचा उत्सव ☆ कोंदण ☆ सुश्री पूजा दिवाण ☆ 

सळसळत्या पानांवर लिहिती

थेंब थेंब सृजनाची नक्षी

गर्द  राईच्या हिरवाई सह

शांत-निवांत  मनाचा पक्षी

 

तू न कुणाचा मी न कुणाची

स्नेह परी मग कसा जुळे हा

आयुष्याच्या वळणावरती

कसा घुमे हा मैत्र पारवा

 

किती पाहिली नवलाई अन्

किती साधले  गप्पांचे क्षण

खळाळत्या हास्याच्या संगे

आठवणींचे मखमाली क्षण

 

मैत्र जीवांचे असे जुळावे

सहवासाचे मोती व्हावे

दिल्या घेतल्या आनंदाचे

त्या मोत्याला कोंदण  व्हावे

 

© सुश्री पूजा दिवाण

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 66 – राष्ट्रपिता ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  महात्मा गांधी जी के जन्मदिवस पर एक समसामयिक एवं विचारणीय कविता राष्ट्रपितामुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे। आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 66 ☆

☆ गांधी जन्मोत्सव विशेष – राष्ट्रपिता ☆

 

कळू लागलं लहान मुलाला की,

पहिले राजकिय नेते—-

येतात समोर ते गांधीजीच !

पद्धत आहे आपल्याकडे…

लहान मुलांच्या हाती नोट द्यायची!

 

मलाही भेटले गांधीजी

लहानपणी,

आजीने सांगितलेल्या गोष्टीत,

आजीही सहभागी झाली होती म्हणे,

स्वदेशीच्या चळवळीत!

 

ऐकलं जायचं, बोललं जायचं,

खुपच भक्तीयुक्त प्रेमभावाने गांधीजींबद्दल—-घरी, दारी, शाळेत, सिनेमा गृहात!

 

“ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती, तारकांच्या सुमनमाला  देव त्यांना वाहताती”

ही कविताही तोंडपाठ होती,

एकसूरात म्हणत असू खुप आदराने!

गांधीजी भेटायचे कवितेत, धड्यात, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या एखाद्या नाट्यच्च्छटेत, पंधरा ऑगस्टच्या भाषणात!

 

अगदी आमच्या गावातला,

गणपत गायकवाड ही करायचा दावा, “येरवडा जेल मध्ये मी केली आहे गांधीजींची दाढी !”

हजामती करता करता मारायचा फुशारकी!

 

एकूण काय तर—

जनमानसात खुपच भक्तिभाव गांधीजींविषयी!

नंतर गांधीजी भेटले, आगा खान पॅलेस मध्ये,

बेन किंग्जले च्या ‘गांधी ‘ या सिनेमात

त्यानंतर अहमदाबाद ला गेले असताना,

साबरमती च्या आश्रमात!

मला सप्रेम भेट मिळालेल्या,

सविता सिंग लिखित “सत्याग्रहा”या इंग्रजी पुस्तकातही !

 

अलिकडे गांधीजी भेटतात इंटरनेटवर, बदलत्या विचारधारेत

लोकापवादात, उलट सुलट चर्चेत!

पण मला -आमच्या पिढीला,

ते माहित आहेत,

महात्मा, राष्ट्रपिता, गांधीजी म्हणूनच,

आणि त्यांची ती तीन माकडं आहेत आदर्श आमच्यासाठी—-

“बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो ।” सांगणारी!

 

© प्रभा सोनवणे

२९ सप्टेंबर २०२०

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 8 – कवितेशी बोलू काही ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 8 ☆

☆ कवितेशी बोलू काही ☆

अनामिक हे सुंदर नाते

तुझ्यासवे ग जुळून यावे

तुझ्याच साठी माझे असणे

तुलाच हे ग कळून यावे

आनंदाने हे माझे मन

सोबत तुझ्या ग खुलून यावे

दुःखाचे की काटेरी हे क्षण

कुशीत तुझ्या ग फुलून यावे

भेटावी मज तुझी अशी ही

घट्ट मिठी ती हवीहवीशी

अथांगशा या तुज डोहाची

अचूक खोली नकोनकोशी

रुजावेस तू मनात माझ्या

प्रेमळ नाजूक सुजाणतेने

तूच माझे जीवन व्हावे

अन तुच असावे जीवनगाणे

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

05/06/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू बांध ना रे झुला … ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ तू बांध ना रे झुला … ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

 

प्राजक्ताच्या फुलांनी तू न्हाऊ घाल मला

कदंबाच्या झाडाखाली झुलव तू मला झुला ….

 

झुल्यावर झुलव तू प्रेमाने पाहिन

माझ्या डोळ्यामध्ये मीच तुला झुलविन

डोळ्यातच घर तुझ्या बांधीन रे मला …

कदंबाच्या ….झुला….

 

जाईजुई चाफ्याचे रे बांधू या तोरण

हातामध्ये हात घेऊ गाऊ चल गाणं

प्रेम आपले साजरे सजव तू मला

कदंबाच्या ….झुला….

 

कृष्ण सखा माझा तू रे मी तुझी राधा

झाली पहा तुझी मला पहा प्रेम बाधा

चंद्र सूर्य ते साक्षिला घेऊ चला चला

कदंबाच्या ….झुला…..

 

स्वप्न पाहू सुंदर ते आभाळाचे निळे

जन सारे म्हणतील आपल्याला खुळे

स्वर्ग माझ्या बोटावर सांगू कसे तुला

कदंबाच्या ……झुला….

 

प्रेम रसात डुंबता स्वर्ग हाती येई

केशराच्या शेतात ते घर बांधू नवलाई

वास्तवाच्या जगातून नेई दूर मला

कदंबाच्या झाडाखाली……

झुलव तू मला झुला…..

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: १५/०८/२०२०, वेळ:रात्री: १०/२५

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – फुलपाखरू ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता  “फुलपाखरू )

☆ विजय साहित्य – फुलपाखरू

फुल पाखरू

रंग हवेचे

इवले डोळे

चित्र मजेचे….!

 

फुल पाखरू

नाजुक काया

मकरंदाची

जमवी माया….!

 

फुल पाखरू

थवे फुलांचे

भिरभिरणारे

पंख मुलांचे….!

 

फुल पाखरु

पंख रेशमी

हाती बसता

आनंद मनी…..!

 

फुल पाखरू

मना मोहवी

रंग सावली

कुणा बोलवी…!

 

फुल पाखरू

माझे मीपण

आठवणींचे

दैवी रिंगण…!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावित्री ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ कवितेचा उत्सव ☆ सावित्री ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

 

सत्यवानाला घेऊन

वडाखाली बसायला

वेळच नाही सावित्रीला

 

लाईट पाण्याच्या बीला बरोबर

किराणा आणायचा असतो तिला

घर ऑफिस सांभाळत

सांभाळते ती मूलांना

 

कर्तव्य बजावताना

विचार नसतो मनाचा

ढाली सारखी उभी असते

संसार ती करताना

 

किती दिवसात

नाही पाहिला आरसा

शृंगार तर दूर राहिला

 

तो कसा ही वागला

तो कसा ही असला

तरी

वड पुजावा लागतो तिला

त्याच्या आयुष्याचे दान

पदरी पाडावे लागते तिला

तिला नसतो चाॅईस

 

सावित्री बनता बनता

ती….सत्यवान तर..बनली नाही…. ना…?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print