मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तू फक्त मोकळं व्हावस….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “तू फक्त मोकळं व्हावस…. ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

पेन हातात घेतला

वाटलं

झरझर सारं

उतरवून काढावं मनातलं….

पेन वहीवर टेकण्याआधीच

त्यांनी घाई केली

थेंब थेंब उतरत

वही… पार ओली केली..

मग पाहिलं मी त्या वहिकडे

म्हणलं शब्दांपेक्षाही

जास्त काही

बोलून हे अश्रू गेले

पण तुला कळली का ग यांची भाषा

तर वही म्हणाली….

शब्द किंवा अश्रू

तुझ्यासाठी असतील वेगवेगळे

मला तर वाटतं ते येतात तुझ्यातून माझ्याकडे फक्त तुला करण्या मोकळे…..

कधी तू शब्द निवडतेस

कधी अश्रू तुला निवडतात

ते येतात आणि तुला मोकळे करून जातात…

मी फक्त एक माध्यम आहे

तुझ्या बंद मनाची कवाडे उघडून

तुझं मन तू खुलं करण्याच

मग तुझं तूच ठरवत जा

कधी शब्दांनी आणि कधी अश्रूंनी माझ्यावर लिहायचं…

मला दोन्हीही प्रियच

तू फक्त मोकळं व्हावंसं वाटतं मला इतकचं…

 शब्दकळी विजया हिरेमठ मोकळं व्हावंस… 

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुलामी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ गुलामी ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मनासी मनांचे पटू लागले

बखेडे जरासे मिटू लागले

*

किती छान आली नवी बातमी

विरोधीच मागे हटू लागले

*

नवा जोम येता मनाला पुन्हा

करायास धंदा झटू लागले

*

मिळू लागले चार पैसे तसे

जुने कर्ज काही फिटू लागले

*

इरादेच सारे नवे बांधले

तसे स्वप्न साधे नटू लागले

*

हसू लागले दैव कामा मुळे

खुळे दु:ख सारे घटू लागले

*

सुखाचा दिलासा मिळू लागता

व्यथांचे पसारे कटू लागले

*

गुलामी कुणाची नको वाटली

तसे बंध खोटे तुटू लागले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #264 ☆ भेटतो चांदवा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 264 ?

भेटतो चांदवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

माझ्या प्रीतीच्या फुलात, रात्री पाहतो चांदवा

आकाशात नाही तरी, आहे भेटतो चांदवा

 *

मीही भाग्यवंत आहे, चांदण्यांच्या सोबतीने

आहे अंगणात माझ्या, पिंगा घालतो चांदवा

 *

आडवाटेचा हा मार्ग, नाही साथ सोडलेली

रोज सोबतीने माझ्या, रस्ता चालतो चांदवा

 *

काही दिवसांचा खाडा, ठेवे अंधारात मला

चंद्र किरणेही स्वतःची, देणे टाळतो चांदवा

 *

आकाशाच्या गादीवर, त्याला झोप येत नाही

घरी जाण्याच्याचसाठी, घटका मोजतो चांदवा

 *

माझी आठवण ठेवली, नाही दुर्लक्षित झालो

माझ्या दारात येऊन, कायम थांबतो चांदवा

 *

हाती त्याच्या ना घड्याळ, तरी पाळतो तो वेळा

कामावरती वेळेवर, आहे पोचतो चांदवा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘अवघा रंग एक झाला…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘अवघा रंग एक झाला… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त मुद्रिका १ला चरण १०+११, २रा चरण १४+१३)

पांडुरंग द्वारी रंग एकचि जमला

अवघा रंग एक झाला विठू भक्तगण नाचला

*

नाही याति धर्म मुखातचि एक नाम

विठोबाच्या दरबारात भक्ताचेच काम धाम

*

टाळ मृदुंग गजर चंद्रभागेतीरी

वारकरी हरीचा दास शुद्ध भावे स्नान करी

*

तुळशीमाळ गळा शोभतसे पितांबर

चंदनाचा टिळा भाळी विराजे तेज मुखावर

*

साजिरा गोजिरा उभा जो विटेवरी

भक्ताच्या काजासाठी धावतसे तो श्रीहरी

*

पांडुरंग विठ्ठल नामी दंग झाला

अवघा रंग एक झाला रंग रंग एक झाला

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – भान – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – भान – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

मतदान केले | वाढूनिया टक्का |

निर्धाराने पक्का | मतदार ||१||

*

शिस्तीत रांगेत | केले मतदान |

लोकशाही भान | ठेवुनिया ||२||

*

गरीब श्रीमंत | एकाच रांगेत |

पवित्र गंगेत | न्हाण्यासाठी ||३||

*

लोकशाही नांदे | राजा मतदार |

बने सरकार | बहुमत ||४||

*

संघराज्य रीत | चालवती राज्य |

लोकशाही पूज्य | जनतेला ||५||

*

आघाडी बिघाडी | युती महायुती |

नाना करामती | खेळ सारा ||६||

*

राजकारण्यानो | दिला आम्ही कौल |

नका मांडू चूल | दुज्या संगे ||७||

(चित्र – साभार श्री आशिष  बिवलकर)

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समाधीस्थ ज्ञानदेव… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ समाधीस्थ ज्ञानदेव… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आळंदी सोडून चालली ती,

चार सान गोजिरी मुले !

काट्याकुट्यांच्या मार्गामध्ये,

अडखळत होती त्यांची पाऊले!…. १

*

 आळंदीकरांनी हिणविले तयांना,

‘संन्याशाची मुले’ म्हणूनी!

 व्याकुळलेली मने घेऊनी,

 चालली लेकरे हतबल होऊनी!.. २

*

निवृत्तीचा स्वभाव संयत,

ज्ञानाची त्या होती साथ!

सोपान मुक्ता पाठी त्यांच्या,

 चालू लागले अवघड वाट!… ३

*

 पैठण क्षेत्री गेली भावंडे,

 मिळेल काही न्याय म्हणूनी!

 मोठे पण त्यांचे नाही आले,

 शास्त्री पंडित यांच्याही ध्यानी!.. ३

*

दुःखी होऊनी परत निघाली,

घेऊन आली शुद्धिपत्रास !

आता तरी मिळेल का हो,

 करण्या आम्हा आळंदीत वास!.. ४

*

पैठण, नेवासे वाट चालता,

 केले काही चमत्कार जनी!

कळून येता त्यांची महती,

 अवाक् झाली सारीच मनी!… ५

*

आळंदीला परतून येता,

 ज्ञाना म्हणे कार्य ते झाले!

गुरु निवृत्तीची आज्ञा होता,

 समाधी घेण्या सिद्ध जाहले!.. ६

*

तिथे पाहिली जागा सत्वर,

 खोल विवर शोधिले त्यांनी!

ज्ञानदेव त्या विवरी शिरता,

 शिळा ठेवली निवृत्तीनाथांनी!… ७

*

योगेश्वर रूप ते ज्ञानदेव,

आळंदीस समाधीस्थ झाले!

अजून त्याची साक्ष देत हा,

 सोन्याचा पिंपळ त्यावरी झुले !… ८

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

आयुष्याच्या होकाराला, कौल जरासा लाविन म्हणतो

वाट संपली वाटचाल पण, अजुन जराशी करीन म्हणतो

*

जागविल्या मी कितीक राती, नभांगणीचे मोजत तारे

जपमाळेमधि स्वप्नांच्या ह्या, नवीन तारे ओविन म्हणतो

*

अंतर्यामी कुसुमांच्या मी, शिरता वाटे कवी जाहलो

ह्रदयकवाडे काट्यांचीही, जरा किलकिली करीन म्हणतो

*

नकार होता ह्या मातीचा, बीज उधळले वाऱ्यावर मी

सुदूर कोठे असेल रुजले, शोध तयाचा घेइन म्हणतो

*

कालपरत्वे गहाळ झाली, काळजातली काही गावे

प्राणप्रतिष्ठा पुन्हा तयांची, नकाशात मी करीन म्हणतो

*

द्यावी बुडवुन भोगशिदोरी, तळ नसलेल्या अथांग डोही

पुन्हा लिहाया नवी कहाणी, कागद कोरा होइन म्हणतो

*

विलया न्यावी कशी सागरा, मलीन अजुनी इतुकी गंगा

कुठे अजूनी स्वर्ण कसाला, अजुन जळत मी राहिन म्हणतो !

(वनहरिणी )

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांगा बाई कधी रिकामी असते का? ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ सांगा बाई कधी रिकामी असते का ? ☆ सौ. वृंदा गंभीर

सांगा बाई कधी रिकामी असते का?

कुठेतरी ठेवलेली पोटली

सापडतेच ना?

डाळींच्या डब्यात गव्हाच्या पोत्यात

कुठे न कुठे पैसे सापडतात ना?

बाई ची नजर आणि भविष्याचा विचार खराच असतो ना?

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

डबा जरी रिकामा असला तरी वळचणीला सापडतच ना,

पोत्याची थप्पी नसली तरी उतरंडीत धान्य असतंच ना,

भाजी नसेलतर आमटी शिजतेच ना.

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

घर सांभाळून काम करतेच ना,

बरोबरीने काम करून शेरडं, करडं सांभाळतेच ना,

ठेवती जपून पैसापाणी वेळेनुसार देतेच ना,

जेव्हा कुणाचा आधार मिळत नाही तेंव्हा मदत करतेच ना

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

का होते पुरुषांचेच कौतुक नेहमी?

 बाई कौतुकाची अधिकारी असतेच ना,

संकटाना तोंड देऊन तीही संसार सावरतेच ना,

गोड बोलून नाती जपून एकोप्याने राहतेच ना,

तरीही बाईच दोषी असं म्हणतात च का?

सांगा बाई कधी रिकामी असते का?

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 196 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 196 ? 

अभंग…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

बालपण गेले, निघूनिया माझे

झाले पहा ओझे, तारुण्याचे.!!

*

बालपणा सवे, खूप काही गेले

मनात स्मरले, सर्व कोष.!!

*

खोड्या आठवल्या, काड्या आठवल्या

जागा आठवल्या, रमलेल्या.!!

*

काळा फळा सुद्धा, स्मृतीत राहिला

अधांतरी झाला, आता फळा.!!

*

काळा होता फळा, हिरवा जाहला

खडू बदलला, रंगा-सवे.!!

*

पाटी नि लेखणी, आणि उजळणी

घरी शिकवणी, होतं नाही.!!

*

दफ्तर फाटले, वह्याही फाटल्या

शाळेच्याही खोल्या, मृत-झाल्या.!!

*

असंख्य चित्रण, मनात बंदिस्त

जवळचे दोस्त, फितूरले.!!

*

कविराज म्हणे, लिहितांना शब्द

मनं हे निःशब्द, होते आहे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आगंतुक… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ आगंतुक… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

बागेच्या कोपर्‍यात एका वेलीवर अचानक नकळत त्यांचे अंकुरणे,

दुर्लक्षित वेलीला त्याने नवचैतन्य येणे

किती तो त्यांचा कसोशीचा प्रयत्न म्हणावा ?

 

न राहावून मी त्यांच्याजवळ गेले

नाजूक, पितवर्णी त्यांना निरखितच राहीले.

दुर्लक्षित अवहेलित त्या वेलीले

त्या आगंतुक फुलांनी मातृत्व बहाल केले.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print