मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निवडणूक ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ निवडणूक… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

धूम धडाका अजब तडाखा निवडणुकीचा वाजे डंका

चला उठा हो मामा काका जाहिर झाल्या पहा तारखा

*

सावध होऊन घ्या कानोसा पत्रकांवरी नको भरोसा

शुभ कार्याला विलंब कैसा मतदारांची यादी तपासा

*

उमेदवार दाराशी येतील हसून मुजरा तुम्हा घालतिल

“मायबाप” तुम्हाला म्हणतील आशीर्वाद वाकून मागतिल

*

ठणकावून सांगावे त्यांना जोगवा मागत नका फिरू

तुंबडी अपुली भरण्यासाठी नका आम्हाला गृहित धरू

*

 सभेतील डरकाळी गर्जना मिळतो टाळ्यांचा नजराणा

झटपट होता तुम्ही धनवान अमुच्या माथी मात्र वंचना

*

उक्ती मनोहर शून्य कृती तळमळतो आहे मतदार

शिकवील तुम्हा धडा चांगला अमुच्या धमन्यातील एल्गार

*

बदल आम्हा अमुलाग्र हवा विचार हा पक्का झाला

या मतपेटीमधून आता, उठतिल क्रांतीच्या ज्वाला

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अपेक्षांच्या वेलीवर… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ अपेक्षांच्या वेलीवर… ☆ 🖋 मेहबूब जमादार

अपेक्षांच्या वेलीवर समस्यांची फुले

स्वप्नांचा झोपाळा मुक्त हवेवर झुले ….

*

मोकळ्या हवेत उडत जाती पक्षी

पहा कशी नभात सुंदरशी  नक्षी

आनंदाच्या तरंगी  नाचती सारी मुले …..1

*

निसर्ग देतो सारे  तरी सारे उणे

सारे असता मनी प्रश्नांचे तुणतुणे

का उठतो कल्लोळ सारे असे  खुले …..2

*

कमी करा गरजा  नाही लागत पैसा

रहा  समाधानी जरी रिकामा खिसा

वठलेल्या  झाडांना कशी येतील  फळे …3

*

पाहिले परी हटेना क्षितीजावरिल धूळ

 समजावले मना तरी धरून तेच  खूळ

सारवले कितीदा तरी उखडून जाते खळे …4.

*

अपेक्षा आणि गरजांचा धरू नको राग

शांतवेल ज्वालामुखी निवळेल  त्याची धग

मृग  बरसता   फुलतील आनंदाचे मळे…5

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दणका ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दणका श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मुखपृष्ठाचा अप्रतिम नमुना 

सादर केला टाइम मासिकाने,

खरा ट्रम्प आणला जगासमोर 

दणका देऊन न्यायमंडळाने !

*

“गिर गया तो भी टांग उपर”

उभा रहाणार निवडणुकीला,

निर्लज्‍जं सदा सुखी म्हणीचा 

म्हणावा कां ताजा मासला ?

*

कळस किळसवाणा त्याने 

काळीकृत्य करतांना गाठला,

तोंड बंद ठेवण्या ‘त्या सखीला’

कोटी रुपयाचा मलिदा चाखला !

*

पट्टी असली जरी डोळ्यावरी 

नसते न्याय देवता आंधळी,

यथा अवकाश सगळ्यांची

बाहेर येती सारी कर्म काळी !

बाहेर येती सारी कर्म काळी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 233 ☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 233 ?

☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(स्मृति शेष स्व अनिता निकम (न्यूयॉर्क) – 1 जून 2024))

अचानक गेलीस निघून पैलतीरावर,

आणि मनात खूप खळबळ,

असं का व्हावं?

तशी तू अलिप्तच,

पण कधी जुळले सूर,

तुझे माझे ?

अगदी लहानपणापासून–

आवडायचीसच,

 खूपच गोड होतीस,

 

कुरळ्या केसाचं साम्य,

तुझ्यामाझ्यात!

आत्तेमामे भावंडांत असतंच,

तसं थोडं बहुत साम्य!

 

 तू वेगळीच होतीस

 लहानपणापासून….

तुला शोभून दिसायचा..

तो अंगभूत अॅटिट्युड!

 

खूप फिरलो,

सिनेमे पाहिले…

वाचली पुस्तकं, ऐकली गाणी !

खूप लाभली तुझी संगत,

सात -आठ वर्षाचं

अंतर असूनही,

जुळले विचार,

 

वाचलं होतं कुठेतरी,

वृषभ-मकर मित्र राशी !

म्हणूनही असेल,

 

लग्नानंतर गेलीस दूरदेशी…..

तरीही भेटत होतो,

पत्रातून, भेटकार्डातून…

नंतर…

फोन..मोबाईल…व्हाॅटस अॅप वर !

 

 ऐकतेय तुझे व्हाॅईस मेसेज,

वाचतेय वारंवार,

काय सांगत होतीस ते !

तुझ्या बरोबरचे हॉस्पिटल मधले 

दिवस आठवतेय   ….

बरी झालीस..असं वाटलं फक्त!

 

गेले तीन महिने,

भासवलंस …

बरी असल्याचं!

मोबाईलवर बोलत होतीस

 भरभरून!

निघालीस परत आत्मविश्वासाने एकटीच….न्यूयॉर्कला  !

 

आणि त्याच दिवशी संपली ईहलोकीची यात्रा ,

 

“डिसेंबर मधे परत भेटू”

म्हणाली होतीस!

नेमकं कोणतं दुःख, वेदना, आजार ??

घेऊन गेला तुला ?

सारं गुढ ,अनाकलनीयच!

 

 गुडबाय, स्वीट प्रिन्सेस,

तिथेही याच दिमाखात रहा —

 

पण दुःख, वेदना विरहित!!

© प्रभा सोनवणे

३ जून २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्मरंगी ऊन… ☆ डॉ. प्राची जावडेकर ☆

डॉ. प्राची जावडेकर

अल्प परिचय 

व्यवसायाने दंत वैद्य, ठाणेकर.

कवयित्री, निवेदिका

श्यामरंग… त्या त्यांचे प्रश्न आणि कृष्ण , राधायन या दोन संगीत नाट्यविष्कारांचे लेखन.

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्मरंगी ऊन... ☆ डॉ. प्राची जावडेकर ☆

उन्हाच्याच गावी, उन्हाचेच रस्ते

उन्हाच्याच वाटांत हरवायचे.

*

रुईच्या फुलांना कुणीही विचारा

उन्हाच्या घराला कसे जायचे?

*

खुळी ‘लाजरी’ अंग झोकून देई

उन्हाच्या झळांनी तिला न्हायचे.

*

सुगंधी उन्हे माखुनी अंगअंगी

सुरंगी म्हणे केशरी व्हायचे!

*

कवे घेतसे शीतपुष्पी उन्हाळा

कवडशांतुनी ऊन झिरपायचे.

*

उठे पेटुनी अग्निशीखा ज्वराने

तिच्या प्रीतीने ऊन वितळायचे.

*

मरुत वाहतो या उन्हाच्या पखाली

उन्हाने उन्हालाच भिजवायचे.

*

उन्हाच्या समुद्री उन्हाच्याच लाटा

किनारे उन्हाचेच चमकायचे.

*

मृदेला उन्हाचा लळा लागलेला

उन्हांनी कसे सांग परतायचे?

*

असे हे उन्हाळे जसे की जिव्हाळे

जीवाला उन्हानेच निववायचे!

© डॉ. प्राची जावडेकर

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #240 ☆ कुटील कावा आनंदकंद… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 240 ?

☆ कुटील कावा आनंदकंद☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

संसार संपदेशी नाही कधीच केला

होकार मी दिलेला निःस्वार्थ भावनेला

*

प्रेमात वादळाचे येणे कमाल नाही

पाहून सख्य अपुले तोही निघून गेला

*

तू सागरात आहे मी टाकलेय जाळे

जाळ्यात मासळीचा दमछाक जाहलेला

*

कटला पतंग होता नव्हते भविष्य त्याला

तू झेलल्यामुळे तो आहेच वाचलेला

*

हुंकार देउनी तो वारा पसार झाला

नाही कुणीच सोबत एकांत जागलेला

*

पसरून चादरीवर आकाश चांदण्यांचे

वाटेवरील डोळे हातात दुग्ध पेला

*

नाही कुटीळ कावा सत्यावरी भरवसा

देऊ कशास थारा नादान कल्पनेला

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घायाळ हरणी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ घायाळ हरणी... ☆ श्रीशैल चौगुले ☆

नको मोहवू हरणी

तुझी जाणीव करणी

उगी काळीज झुरणी

स्मृती मारिच’स्फुरणी.

*

रामायणही घडते

मायाजाळ हे अजाण

मृगजळ तुझे रुप

कस्तुरी गंध बेभान.

*

संसारी तुझे वलय

हरणी विश्व घायाळ

श्रीराम फसतो तेंव्हा

रावण जिंके आभाळ.

*

मनात भाव अजब

नयनी प्राण प्रेमळ

सौंदर्य तुझे सांभाळ

आयुष्य मुक्त सकळ.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ते जात्यात… तू सुपात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– ते जात्याततू सुपात – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

माणूसच कापतो माणसाचा गळा |

निरापराधांचे जीव गेले,

अन सामान्य माणूसच 

नेहेमी सोसतोय झळा |

*

मुर्दाड व्यवस्थेच्या दलालांना,

कुठे पडली सामान्यांची तमा |

टक्के वारी, हप्ते वसुली,

निर्लज्ज करत बसलेत जमा |

*

पैशासाठी बायका मुलांनाही,

बाजारात नेऊन विकतील |

देव देश धर्म सारच काही ,

हाती लागेल ती फुंकतील |

*

राजमान्य भ्रष्टाचाऱ्यांना,

ना कुणाची भीती आहे |

मिल-बाटके सब खायेंगे ,

हीच त्यांची नीती आहे |

*

निरापराध माणसं मेली,

काय दोष त्यांच्या कुटुंबाचा |

दुर्घटनेच्या नावाखाली,

घडा लपवला जाईल पापांचा |

*

बंद डोळे – बंद कान करून,

सामान्य माणसा जगत रहा |

आज ते जात्यात, तू सुपात,

खेळ असाच पहात रहा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 193 – कथा क्रम (स्वगत)… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 193 – कथा क्रम (स्वगत)✍

(नारी, नदी या पाषाणी हो माधवी (कथा काव्य) से )

गरुड़ ने

स्नेहिल स्वरों में

कहा,

‘महाराज

हम

मात्र दर्शन देने नहीं

कुछ लेने आये हैं।

ययाति

सादर बोले-

‘जो मेरे वश में होगा

अवश्य दूँगा

वचन से पीछे

नहीं हदूंगा।

गरुड़ ने

निवेदन किया

‘महाराज

ऋषि गालव को

गुरुदक्षिणा के निमित्त

चाहिये

आठ सौ श्यामकर्ण अश्व ।

विश्वास है

आप

पूर्ण करेंगे

शपथ पूर्वक ।

मनोरथ ।

ययाति ने

कातर भाव से

विनीत वचन उचारे-

क्रमशः आगे —

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निवारा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ निवारा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

प्रियेला निर्दयी आता कशाला काय मागावे

तिचे काळीज दगडाचे तिथे तू नाव कोरावे

*

कशाला थांबतो येथे तुला ती टाळते आहे

तिच्यासाठी तुझे काही खुलासे नीट मांडावे

*

मनाचे पाखरू झाले फिरे आभाळ वाटेने

उगी जाळ्यात आशेच्या कशाला व्यर्थ गुंतावे

*

नको ती गोडवी स्वप्ने नको त्या फालतू आशा

भ्रमाच्या काळनिद्रेला खरे ते सत्य सांगावे

*

मनाचे वादळी वारे सुखाना‌ घेवुनी गेले

जसे आहे तसे जगणे मिठीने घट्ट बांधावे

*

नको थांबायला कोठे ढगांच्या सावली खाली

निवारा शोधताना ही छळाशी सख्य जोडावे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares