कालच नाम्याने गणवेश स्वच्छ धुऊन ठेवला होता. चड्डी ला ठिगळं होती पण आज ती त्याला टोचत नव्हती. आज तो आणि त्याची आई आनंदात होते. त्याच्या चेह-यावर बाबा विषयी अभिमान आणि माया ओसंडून वहात होती.
आई सारखे डोळे पुसत होती. आज त्याला बाबा देशासाठी शहीद झाला म्हणजे किती मोठा आहे हे कळलं होतं. देशासाठी त्याने मोठं काम केलं होतं. आज शाळेत झेंडा वंदना ला कोणत्या नेत्याला बोलावलं नव्हतं तर त्याच्या आई ला बोलावलं होतं. आई ठेवणीतली साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन तयार झाली. नाम्याने बाबा चा फोटो छातीशी घट्ट पकडला.
आज मी परत घरी एकटी पडले डोळ्यासमोरुन सुखी, समाधानी, आनंदी प्रतिक्षा हलत नव्हती. त्यामुळे हा एकटेपणा आज तरी मला त्रासदायक वाटत नव्हता.
आता मी नोकरी सोडली होती. गाण्याचा क्लास जाॅईण्ट केला होता. न चुकता जवळच्याच अनाथाश्रमांत एका दिवसा आड जात होते. त्या मुलांना शिकवत होते. त्यांच्या गोकुळात माझे मन रमत होते.ती मुलं पण माझ्या वाटेकडे डोळे लावून बसायची.
मधे मधे प्रतिक्षा नितीन येऊन भेटायचे. कधी मी त्याच्याकडे जायचे. मी, प्रतिक्षा, नितीन त्याचे पप्पा चौघेजण नाटक, सिनेमा, कधी छोटीशी पिकनिकला जात होतो. मस्त मजेत दिवस चालले होते. आणि एक दिवस माझ्याकडे रात्री ही जोडीअचानक आली. इकडच्यातिकडच्या गप्पा झाल्या. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला काहीतरी सांगायचे होतं. पण ते सांगायला कचरत होते. शेवटी मीच म्हटलं “जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा माझी ऐकायची तयारी आहे”
प्रतिक्षा चाचरत सांगू लागली म्हणाली,”आई, नितीनला परदेशी जाण्याची संधी आली आहे. माझ्या कंपनीची पण तिकडे शाखा आहे. तू आणि नितीनचे पप्पां इकडे एकटे रहाणार म्हणून ती संधी स्विकारायची कि नाही अशा द्विधा मनस्थितीत आम्ही आहोत. आई तू फार सोसलं ग. मला एकटीनेच वाढवलसं. आपलं सोन्यासारखं आयुष्य आमच्यासाठी घालवलसं. दोन्ही आजी आजोबांची दुखणी, खुपणी म्हातारपण म्हातारपणाची त्यांची चिडचिड, हे मुकाट्याने सहन केलंस. आता मला म्हणजे नितीनला, म्हणजे मलाआणि नितीनला”
“अग बोल ना प्रतिक्षा काय ते एकदाच सांगून टाक”
“म्हणजे तू आणि नितीनच्या पपानी लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? एक तर तुमचे विचार जुळतात.ते पण एकटे रहाणार आणि इकडे तू पण. आम्ही usला तिकडे गेल्यावर आम्हाला तुमची काळजी पण नाही.”
“नाही प्रतिक्षा तुम्ही तिकडे बिनधास्त जा. मी इकडे माझी काळजी व्यवस्थित घेईनच पण नितीनच्या पपांची पण घेईन. तुम्ही आमच्या दोघांची थोडी सुद्धा चिंता करु नका.निश्चिंत मनाने जा. पण आता ह्या वयांत मला हे स्विकारण्यास सांगू नका. जे मी ऐन तारूण्यात सुध्दा स्वीकारले नाही.”
रात्रभर विचार केला. सकाळी लगेचच मी माझ्या जवळपास राहणारी माझी एक जिवलग मैत्रिण विनीता सध्या सुनेच्या जाचाला कंटाळून वृध्दाश्रमात जायचा विचार करत होती. तिला माझ्याकडे कायम रहायला येण्याबद्दल विचारले. ती एका पायावर तयार झाली.नितीनच्या पप्पांना पण एखाद्या मित्राला घरी रहायला बोलावण्यासंबंधी सांगितले. ते म्हणाले, “मित्र कशाला ? भाऊच माझा येईल की. भावजय हल्लीच वारली आहे. आणि पुतणी सासरी. आम्ही दोघं भाऊ मजेत राहू. खरं म्हणजे तोच मला पुण्याला बोलावत होता. पण नितीनला सोडून जायला मन तयार होत नव्हते. आता त्यालाच इकडे बोलावतो.
मग मी कामाला एक जोडपं शोधलं. ती बाई माझ्या घरी स्वयंपाक करेल. आणि नितीनच्या पपाना आणि काकांना डबा पोचवेल. दोन्ही घरचे घरकाम पण करेल. आणि तिचा नवरा दोन्ही घरची बाहेरची कामें, बाजारहाट आणि इतर सटरफटर कामे करतील. दोघंही आमच्याच घरी रहातील. कारण माझं घर तसं भरपूर मोठं होतं. एक गच्ची होती. त्याला जोडून एक खोली पण होती. तिकडे ती दोघं आरामात राहू शकत होती. मी माझा प्लॅन प्रतिक्षा, नितीन आणि पप्पांनी सांगितला. माझ्या ह्या प्लॅनवर तिघेही खुष.. त्याना पण ते पटलं. वेळा काळाला आपण आहोतच. एकमेकांना.
नितीन आंणि प्रतिक्षा बिनधास्त usला गेले. आता मला अजिबात एकटं वाटत नाही. माझी मैत्रीण सुनिता 24 तास बरोबर असते. मग काय मनसोक्त भटकणं खाणंपिणं. आम्ही अनाथाश्रमांत जातो. त्या मुलांना शिकवतो. गाणी गोष्टी सांगून त्याचं मनोरंजन करतो. नितीनच्या पप्पांना कधी बोलावतो. कधी आम्ही तिकडे जातो. कधी वॄध्दाश्रमांत जातो. आमच्यापेक्षा वृध्द आहेत त्यांची जमेल ती सेवा करतो. त्यांना पुस्तके वाचून दाखवतो. मनोरंजन करतो. आता मी अजिबात एकटी,एकुलती एक नाही.
माझा परिवाराचा परीघ खूप रुंदावला आहे. गोकुळाची कक्षा वाढली आहे. एकुलतं एकपण त्या गोकुळात कधीच विसरुन गेले.
प्रतिक्षा हळूहळू मोठी होत होती. तिच्या बाळलीला बघत आम्ही दिवस काढत होतो.रक्षाबंधन आलं भाऊबीज आली की माझ्या एकट्या पडणा-या प्रतिक्षाला बघून मला आमचं दोघांचं गोव्याच्या ट्रीप मधले गोकुळं बनवण्याचे स्वप्न,ह्यांनी आईला ‘पुढच्या वर्षी बहिणीला रक्षाबंधनाला भाऊ येईलच ‘असं मस्करीत दिलेलं आश्वासन सगळं सगळं आठवयाचं.शेवटी माझ्या प्रतिक्षाला पण नियतीने अशा रितीने माझ्याच सारखं एकटं पाडलं.सासू सासरे,आई बाबा कधी उघडपणे,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दुस-या विवाहाचे सुचवू लागले.सासूबाई तर चक्क मला सांगू लागल्या,”बघ पोरी,आम्ही पिकली पानं कधी गळून पडू सांगता येत नाही.प्रतिक्षा एक दिवस लग्न करुन भुर्र्कन उडून जाईल.मग तू एकटी कशी रहाशील ” प्रतिक्षा सांगायची,” मी मुळी लग्न करणारच नाही.आईला सोडून कुठे जाणारच नाही”.मी पण तो विषय काहीतरी बोलून वेळ मारुन नेत असे.
प्रतिक्षा आता शाळा संपवून काॅलेजात जाऊ लागली.तशी तिला वयाच्या मानानं खूपच समज होती.मला जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी साथ देऊ लागली.आम्ही एकमेकांकडे विचार शेअर करु लागलो.
काॅलेजमध्ये लहानसहान सगळ्या गोष्टी पण मला सांगू लागली.
आईवेगळा पोर होता.वडील बिझनेसमध्ये व्यस्त म्हणून कि काय आईच्या प्रेमाला पारखा झालेला माझ्याकडे जास्त ओढला गेला.जवळपासच राहणारा होता. काॅलेजमध्ये येता जाता प्रतिक्षाला पण सोबत असायची.
दरम्यान एकेक करुन चारही पिकली पानं गळून गेली.आता प्रतिक्षा मला आणि मी प्रतिक्षाला. आता मी तशी मनाने खंबीर झाले होते.ज्या मुलीवर तेव्हा ऐन तारूण्यात वैधव्याचा पहाड कोसळला. आता तर काय भरपूर पावसाळे, वादळ वारे अंगावर घेऊन तन,मन ठणठणीत झालं होतं.
हळूहळू लक्षात येऊ लागलं.प्रतिक्षा नितीनची मैत्री आता वाढली होती.तिचं प्रेमात रुपांतर झालं.दोघांची शिक्षणं पण पूर्ण झाली.आपापली क्षेत्र दोघांनी निवडली होती.त्यात प्रगती करुन दोघंही स्थिर झाली होती.एक दिवस मी प्रतिक्षाचा मूड बघून लग्नाचा विषय काढला.”बघ प्रतिक्षा आता तुम्ही दोघंही सेट्ल झालात आता पुढे विचार काय आहे?”
तर म्हणते कशी,”” कशाबद्दल ”
“अग तुझ्या आणि नितीनच्या लग्नाबद्दल”
“आई मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही.आमची मैत्री आहे ती तशीच कायम राहील”
“ते काहीही चालणार नाही मी आजच नितीनच्या वडिलांशी बोलून घेते.आणि नक्की करून टाकते.आणि कुठे लांब का जाणार आहेस?हांकेच्या अंतरावर तर आहे नितीनचे घर.”
ठरल्याप्रमाणे नितीनच्या वडिलांशी बोलून सगळं नक्की केले.आणि प्रतिक्षा आणि नितीनचा विवाह सुमुहुर्तावर दणक्यात पार पडला.
दोन्ही आजी आजोबांनी नातीचं बारसे दणक्यात केलं. ‘प्रतिक्षा’ नाव ठेवलं. आणि नातवाची प्रतिक्षा करत प्रतिक्षाचे लाड करत होते. तिचे दर महिन्याच्या महिन्याला वाढदिवस काय? प्रत्येक वाढदिवसाला नवनवीन केकचे प्रकार काय? नुसती चढाओढच. फ्राॅक काय, परकर पोलका काय? आपली हौस पुरवू लागल्या. तिचे बोरन्हाण, उष्टावन सगळंच थाटात. आता प्रतिक्षा वर्षाची झाली. तिचा वाढदिवस. हॉल बुक केला. केकची, वाडीची ऑर्डर दिली. आमंत्रण केली. आणिअचानक माझ्या पतीदेवांना दोन दिवसासाठी दिल्लीला अर्जंट कामासाठी जायचं म्हणून कंपनीने सांगितले. पुढे वाढदिवस करुन मग गेलं तर चालणार नाही का? म्हणून विचाराल तर तो म्हणतो कसा, “सगळी तयारी तर झाली आहे. हॉल, केक, तिचा ड्रेस, वाडीची ऑर्डर, कॅटरिंग, फोटोग्राफर, आमंत्रण सगळे सगळे रेडी आहे. दोन दिवसाचा तर प्रश्न आहे. असा गेलो आणि असा आलो. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी हजर.”
हजर राहीन असं म्हणाला खरं पण त्याच्या ऐवजी त्याच्याबद्दलची बातमीच सकाळी घरी हजर झाली. त्याच्या गाडीला दिल्ली मध्ये अपघात झाला. ‘And he is no more’ असं कानावर शब्द आदळले. पायाखालची जमीनच सरकली. माझ्यावर दुःखाचा पहाड कोसळला. सगळे नातेवाईक आले. भेटले गेले. ज्याला त्याला आपापले व्यवहार कामधंदा होताच की त्याना पण. शेवटी मलाच ताठ उभं रहावं लागलं. पदरी एक वर्षाची प्रतिक्षा, वयस्कर सासू सासरे त्यांचा एकुलता एक जिवापलिकडे जपलेला मुलगा दोन दिवसात येतो म्हणून सांगून गेला तो कायमचाच. त्यांना सांभाळू की आपल्या एकुलत्या एका मुलीवर इतक्या लहान वयांत वैधव्य ओढवले म्हणून दुःख करणा-या माझ्या वयस्कर आईबापाची समजूत काढू. प्रतिक्षाचे भवितव्य आठवून तर डोके फुटायची वेळ आली. दुःख गोंजारणं तर सोडा पण विचार करून मन मोकळे करायला पण भक्कम आधारच नव्हता. जो एक होता तोच नेमका पूर्ण कळायच्याओळखायच्या आतच देवाने हिसकावून घेतला. परत मी एकटी पडली. एकदम एकटी.
पण काळ आणि परिस्थिती हेच औषध असतं. सगळं दुःख बाजूला सारुन एका अर्भकाचा आणि चार वयस्करांचा विचार करुन उभी राहिले. नोकरीची गरज नव्हती म्हणून प्रतिक्षा झाल्यावर नोकरी सोडली होती. पण मन कशांत तरी गुंतवायचे म्हणून घराजवळ एका कंपनीत अकाउंटस क्लार्कची पार्टटाईम नोकरी मिळाली. घर सांभाळून मी नोकरी करु शकत होते. प्रतिक्षाला बघायला दोन आज्या, दोन आजोबा होतेच. कारण माझे आईबाबा पण आता आमची बिल्डींग नंतर दोन बिल्डींग सोडून तिकडेच सहा महिन्यापूर्वी रहायला आले होते.
लग्न झालं, पुजा झाली. आधी देवाच्या पाया पडायला गोव्याला, मग केरळ सारख्या मस्त हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी फिरुन आलो. पण तिकडेच मी त्याच्याकडे कबूल करुन घेतले.”तू एकटा मी पण आईबाबांची एकटी मुलगी पण आपल्याला मात्र दोन किंवा तीन तरी बछडी पाहिजेत हा”तर साहेब म्हणतात, “हे इकडे सांगण्यापेक्षा गोव्याला सांगितले असतेस तर बरं झालं असतं मी देवाकडे तरी जुळं तीळं मागून घेतलं असतं. हाहाहा ” नेहमीच्या स्टाईलमध्ये हसून विषय संपवला.
आम्ही मुंबईला आलो. नेहमीचे रूटीन चालू झालं. नव्या नव्यानवलाईचे दिवस. ‘अहो ‘आईंना मला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. माझ्यासाठी कपडा, साडी, दागिना, पर्स, काय काय घेऊन येऊ लागल्या. त्यांचा चॉईस पण छान होता. आम्हाला रविवारी ह्या आत्याकडे पुढच्या रविवारी त्या काकांकडे असे कौतुकानी न्यायच्या. आज हा सण, उद्या दुसरा. नंतर श्रावण आला. मंगळागौर. आमच्याकडे सगळे जमले. रात्रभर जागवली मज्जाच मज्जा. दुस-या दिवशी रक्षाबंधन.ह्याला सख्खी बहीण नसल्यामुळे मानलेल्या. बहिणी राखी बांधायच्या त्या आल्या. ह्यांच्या चुलत, मामे, मावस बहिणी पण मंगळागौरीला आलेल्या सगळ्या राहिल्या.आमच्याकडे मज्जाच मज्जा. आता त्यांच्या लाडक्या भावाची एकुलती एक लाडकी बायको आली होती ना तिच्याशी गप्पा मारायला धमाल करायला. आज मला कळलं ह्याला सख्खी बहीण नसली तरी अशा त्याच्यावर प्रेम, माया करणाऱ्या खूप बहिणी आहेत.
मग श्रीकृष्ण जन्म, गणपती उत्सव सगळे आमच्याकडेच. त्यामुळे घर सतत भरलेले गोकुळ मला हवे असलेले. एकदा ते सणवार झाले कि सगळे आपापल्या घरी गेले कि परत आम्ही एकटेच.
वर्षभराचे सगळे सणवार आईने आणि ‘अहो ‘ आईने अगदी थाटामाटात केले. दोघीने आपापली हौस पुरवून घेतली. म्हणेपर्यंत चिमुकल्या पाहूण्याची चाहूल लागली. दोन्ही घरात माझे नको इतके लाड करण्याची परत चढाओढ सुरु झाली. मनांत विचार आला हे पण अजीर्ण होतंय. किमान आणखी एकेक अपत्य दोन्ही घरांत असते तर माझी लाडाकोडात भागीदारी झाली असती आणि ह्या अजीर्णाचा त्रास कमी झाला असता. चोरओटी झाली, डोहाळे जेवण, झाले. झोपाळ्यावरचे, चांदण्यातले वगैरे वगैरे. आणि एकदाच आमचं पहिलवहिलं कन्यारत्न जन्माला आलं. आजोबा एकदम खूष. त्याना मुलगी नव्हती ती मिळाली. पहिली बेटी धनाची पेटी वगैरे म्हणून आनंदी झाले. आजीचं मात्र तोंड एव्हढंस झाले तिला पहिला नातू हवा होता. हे म्हणतात कसे त्यांना “आई अग आज नात झाली पुढच्या वर्षी राखी बांधून घेण्यासाठी येईल कि छोटासा भाऊ. आमच्या हिला नाहीतरी घराचं गोकुळ करायचं आहे. आम्ही दोघेही एकुलते एक ना. ना तिला भाऊ बहीण, ना मला हे तिचं दुःख आहे.
‘एकुलती एक’ हो खरंच मला ह्या दोन शब्दांचा अगदी वीट आला. लहानपणी कधी कधी आवडायचं कधी कधी राग यायचा.आईस्क्रीम, चाॅकलेटची कधी वाटणी करावी लागायची नाही. अख्खं मलाच मिळायचे.आणि शेजारच्या मंगलला एकच चाॅकलेट चार भावंडांना वाटून एक तुकडा मिळायचा तेव्हा मला एकुलताएक पणाचा आनंद व्हायचा. पण खेळात भांडण झाल्यावर ती चौघं एकत्र आणि मी एकटी पडायची.तेव्हा मला कोणी भावंडं असतं तर असं वाटून रडू यायचं.अजून पण वाटतं एखादी बहीण हवी होती.वाटणी काय ?माझा हिस्सा पण दिला असता पण मनातल्या गोष्टी, सुखदुःखात सहभागी झाली असती.काका काकीचुलत बहिणी घरी रहायला आल्या की इतका आनंद व्हायचा. आणि जायला निघाल्या की माझी रडारड सुरु.”काकी दोघींपैकी एका मुलीला तरी ठेवा ना.”नाहीतर मीच त्यांच्याकडे जायचे.अर्धअधिक माझ्या बालपणातील सुट्टी त्यांच्याकडेच गेली.
जाऊ दे मी कॉलेज मध्ये जायला लागले मला एकापेक्षा एक, जिवाला जीव देणा-या मैत्रिणी भेटल्या. माझ्याचं बरोबरीची माझी चुलतबहीण माझ्याचं कॉलेजमध्ये होती. दुधात साखर. माझंही एकुलते एकच दुःख काही प्रमाणात कमी झाले. मजेत दिवस जात होते. पदवीधर झाले. लगेचच नोकरीं पण चांगली बँकेत मिळाली. त्या वेळच्या रूढी प्रमाणे आई बाबाने वरसंशोधनाला सुरुवात केली. मला विचारण्यात आले, “तू कुठे जमवले आहेस का? तर सांग. नाही तर आम्ही बघतो. तुला नवरा कसा हवा? ते फक्त सांग म्हणजे तसा मुलगा तुझ्यासाठी शोधायला बरे पडेल”.
मी सांगितलं,” तुम्ही शोधाल तो चांगलाच शोधाल. फक्त माझी एकच अट आहे. एकुलता एक मुलगा मला नवरा म्हणून अजिबात नको. त्याचं घर माणसांनी भरलेले असू दे. त्याला भाऊ, बहीण पाहिजे”. आत्याबाई तिकडे होत्या त्यांनी कपाळाला हात लावला “अरे अण्णा, आजकाल मुलींना मोठा गोतावळा नको असतो. ‘मी आणि माझा नारा नको कोणाचा वारा ‘ आणि हिची अट तरी ऐक.”
आई बाबांनी वरसंशोधनाला सुरुवात केली. जर गोतावळावाला मुलगा मिळाला तर तिकडे पत्रिका जुळत नव्हती. पत्रिका जुळली तर मुलगा परदेशात जाणारा.
मला परदेशात अजिबात जायचं नव्हतं भारत देश, आणि माझ्या आईबाबाना सोडून. कारण मी एकच मुलगी होते ना त्यांची. शेवटी आपण एक ठरवतो पण वरचा दुसरंच. लग्नाच्या गाठी ह्या वरचाच मारतो. तसे म्हणा सगळ्याबद्दलच सगळे तोच ठरवत असतो. आपण मी हे केलं, मी ते केलं म्हणतो. पण प्रत्यक्षात तो वरचाच प्रत्येकाच्या बाबतीत सगळं ठरवून त्याला पृथ्वीवर पाठवतो.आपण फक्त कठपुतळ्या, किंवा बुद्धिबळातली प्यादी. माझ्याबाबतीत तेच झाले.
मुलगा चांगला उच्चशिक्षित, सुस्थापित, दिसायला चांगला, मुंबईतच राहणारा. नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते. पण माझ्या मुख्य अटीत तो बसत नव्हता. कारण तो एकुलता एक होता. जे मला मुळीच मान्य नव्हतं. पण आईबाबांनी आणि जिने स्थळ आणले होते त्या माझ्या लाडक्या माई मावशीने माझं ब्रेन वॉश करायला सुरवात केली” इतकं चांगलं स्थळ हातचं सोडू नकोस. एकतर तुझी पत्रिका सहजासहजी जमत नाही. ह्या ठिकाणी छानच जमते. गुणमिलन पण होतयं. शिवाय सासू सासरे हौशी. स्वतःच्या मुलीसारखं तुझे कौतुक लाड करतील. तुला काही कमी पडू देणार नाहीत ” . कारण मुलाची आई ती माई मावशीची जवळची मैत्रीण होती. प्रश्न लाडाकोडाचा नव्हता. ते तर माहेरी भरपूर होत होते. प्रश्न त्याच्या घरांत गोकुळ नव्हते. तोच एकटेपणा, तेच एकुलते एक प्रकरण. जे मला अजिबात नको होतं. पण शेवटी वडीलधा-याच्या व्यवहारी दृष्टिकोनापुढे माझा भावुक विचार दुर्बळ ठरला. ती वरच्याचीच इच्छा असणार. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना आणि अशा रितीने एकुलत्या एक मुलीचा एकुलत्या एक मुलांशी विवाह आनंदात धूमधडाक्यात पार पडला. “छान मस्त लग्न झालं.” “अनुरुप जोडी”.वगैरे वगैरे.
….मग तानीबाई वळली.ग्राम पंचायतीच्या आवारातूनन बाहेर पडून सडकेवर आली. ऊन्हं चढली होती.
पायात चप्पल नव्हती. तांबड्याला विचारलं पाहिजे.
मिळेल का मोतीरामच्या मृत्युचा दाखला?आणि समजा तो मिळाला, तर हे लोक मोतीरामच्या जन्माचाही दाखला मागतील, मग तोकुठून आणू?
तिची पाउलं झपझप खोपटाकडे जाण्यासाठी ऊचलु लागली.
मनात झरत होतं… तानीबाईच्या आयुष्यात मोतीराम कसा आला?
रस्त्यावर भटकणारा एक कुत्रा. तानीबाई ताटलीत भाकरी घेउन बसली की, हा शेपुट हलवत यायचा. तानीबाईही त्याला आपल्यातल्या भाकरीचे तुकडे घालायची.. हळुहळु दोघांनाही एकमेकांचा लळा लागला. तानीबाईनेच त्याचं नामकरण केलं.
“मोतीराम” आणि तिच्या एकाकी जीवनात तिला एक सोबती सवंगडी मिळाला. दुरावलेल्या मुलांची जागा त्याने भरुन काढली.
आणि आता सरकार त्याच्या जन्म मृत्युचा दाखला मागतंय्!! ..कुठून आणू?
सरकार बदललं. प्रगती झाली. नोटाबंदी आली.जी. एस.टी. लागू झाला. महसूल वाढला. पेट्रोल महागलं. शेतकर्यांनी आत्महत्या केली. त्यांना कर्जमाफी झाली. या सगळ्यांशी तानीबाईचा काहीच सबंध नव्हता… तिच्या आयुष्यात काहीच बदल घडला नाही.
गावात कलाबाईचा मेळ होता. तिने निरोप धाडला की तानीबाई शेतात जायची. शेतातले तण ऊपटायचे. बोंडं तोडायची. लोंब्या काढायच्या.. शेंगा खणायच्या…
दिवसाकाठी मजुरी मिळाली की, येतांना तेल तिखट, मीठ पीठ आणायचं.. रांधायचं.. अन् खाऊन झोपायचं….
वस्तीतले लोक चांगले होते. तिची विचारपूस करायचे.
सणावारी कुणी गोडधोड केलं तर तिलाही वाटीतनं द्यायचे… तानीबाईला कुठे होता भविष्याचा विचार…….??
……पावलं रेटत रेटत ती स्वत:च्या खोपटापाशी आली. कोपर्यात भलंमोठं निंबाचं झाड होतं…. पारावर तिनं बुड टेकलं… झाडानं गार सावली दिली. तिने नजरेच्या परिसरातली वस्ती न्याहाळली. बागडणारी, ऊड्या मारणारी, अर्ध्यामुर्ध्या कपड्यातली शेंबडी, मळकट पोरं पाह्यली… पुरुष… बायका.. काही कामांत, काही निवांत.. रिकामी… कुणीतरी लांबून हाकारल….
ऊगीचंच तांबड्यानं या सरकारी योजनेचं भूत डोक्यात घातलं…. पायाखालची जमीन, डोक्यावरचं आभाळ अन् खोपटाभवतालचे हे आपुलकीचे आवाज… त्यांची आभाळागत माया… काय हवं आणखी… बाकी काळजी त्या पांडुरंगालाच की.. मग तानीबाई घरात आली.
भिंतीजवळची पत्र्याची पेटी ऊघडली… दाखला पाहिजे म्हणे……हातातलं रेशनकार्ड, पेटीच्या तळाशी, होतं तिथं ठेऊन दिलं… अन् पेटी बंद केली.
तानीबाईपुरता हा विषय संपला होता….बाकी तांबड्याला सांगूच काय घडले ते….
☆ जीवन रंग ☆ बाळ वाट बघतय ☆ सौ. राही पंढरीनाथ लिमये ☆
प्रिय वर्षा,
तुला काय म्हणू? धन्यवाद म्हणू की साष्टांग नमस्कार घालू? दोन्ही ही माझ्या दॄष्टीने कमी च आहेत. खरं सांगू आज मला धाराऊ आठवतेय संभाजी राजांची दुध आई. तु धाराऊ चा वारसा पुढे चालवलास.
दोन दिवसापासून मी माझ्या बाळाला बाटली ने दुध पाजायचा प्रयत्न करतेय. दुध पिताना बाळा ने खुप त्रास दिला. मला वाटलं मी दुध पाजतेय म्हणून त्रास देतोय. सासूबाई ना हाक मारली आणि मला सगळा उलगडा झाला.
माझी प्रेग्नन्सी पहिल्यापासूनच काॅप्लीकेटेड होती. बेडरेस्ट होती त्यात कोरोना चा महाराक्षस घाबरवत होता. लाॅक डाऊन सुरू झालं आणि सगळं कठीण होऊन बसलं. हाॅस्पिटलला तपासायला जाताना खुप ताण यायचा त्यात बाळाला काही होणार नाही ना ही भिती. त्यामुळे बी.पी. वाढायचं. सगळे सांगायचे मन शांत ठेव. पण कसं ठेवणार?
जगभर कोरोना शिवाय दुसरा विषय नाही. सतत वाढणारे मृत्यू चे आकडे. मदत करणारे डाॅक्टर, नर्स, पोलीस इतर कर्मचारी यांच्या मृत्यू च्या बातम्या ऐकल्या की मन सुन्न व्हायचं. देवा चा राग यायचा. कोरोना चा पेशंट एकटा असतो. जवळ नातेवाईक नसतात. हे सगळं भयानक वाटायचं. कसं मन शांत ठेवणार?
दिलेल्या तारखेला माझं सीझर झालं. बाळ व्यवस्थित होत पण मी कोमात गेले. मी शुद्धीवर येईपर्यंत तु जे केलंस ते मला सासूबाईंकडुन कळलं. बाळ बाटली ने दुध पीत नव्हतं. रडुन रडुन श्वास धरायला लागलं. त्याच वेळी तु तुझ्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन आली होतीस. तुझ्या बाळाला नर्स कडे दिलस आणि सासूबाई ना घेऊन डाॅक्टरांकडे गेलीस. तू त्याना विचारलस मी यांच्या बाळाला माझं दुध दिलं तर चालेल?” “चालेल पण सगळे स्वच्छतेचे नियम सांभाळून “.
“हो मॅडम मी पण नर्स आहे. मला जाणीव आहे त्याची.”
तु बाळाला जवळ घेऊन स्तनपान दिलंस. बाळ शांत झोपला. तिथुन पुढे रोज तु न चुकता माझ्या बाळाच्या दुधाची वेळ सांभाळत होतीस. तुझ्या दुधामुळे बाळाची तब्येत सुधारली. तुला पौष्टिक खाणं करणं जमणार नाही म्हणून सासूबाई नी तुला डिंक, अळीव लाडू करुन दिले. तुझ्या घरी दुधाचा रतीब लावला. तु नको म्हणु लागलीस पण त्या तुझी आई झाल्या आणि तुला प्रेमळ दम दिला.
तु माझ्या बाळाला जगवलस कुठलीही अपेक्षा न ठेवता. तुझं दुध माझ्या बाळासाठी अमृत झालं आणि तु माझ्यासाठी यशोदा. मी शुद्धीवर आल्यावर तु येणं बंद केलंस. असं करु नकोस. बाळाला तुझ्या दुधाची गरज आहे.
येताना तुझ्या बाळाला घेऊन ये. तु जशी माझ्या बाळाची दुधआई आहेस तशीच मी तुझ्या बाळाची दुसरी आई आहे. तो त्याच्या भावासारखाच वाढणार आहे. हा माझा निर्णय आहे.
कोरोना मुळे तुझ्या सारखी मोठ्या मनाची बहीण मिळाली हे माझं भाग्य. आपले मागच्या जन्मी चे काही तरी ऋणानुबंध आहेत. सासूबाईंबरोबर पत्र देतेय. त्यांच्या बरोबरच तुझ्या बाळाला घेऊन ये. माझं बाळ दुधासाठी तुझी वाट बघतय.
“तसं नाही आजी. सरकारी नियम असतात. कागदाला कागद लागतो.मोतीराम कुत्रा होता हे तुला सिद्ध करावं
लागेल.त्याच्या मृत्युचा दाखला आणावा लागेल….”
“कुत्र्याच्या मृत्युचा दाखला? तो कुठुन आणू? मी सांगते न दादा तुला, मोतीराम कुत्रा होता अन् तो मरला…..”
“..तसं नाही चालत आजी.या रेशनकार्डावर तुझं काम नाही होणार.तुला तुझ्या एकलीच्या नावावर नवीन कार्ड
बनवावं लागेल..आणि त्यासाठी मोतीरामच्या मृत्युचा दाखला लागेल…कागदाला कागद लागतो…”
तानीबाई नवलातच पडली.
“आत्ता गो बया..!!”
टेबला जवळच्या माणसांना ती पटवतच राहीली. प्रश्न विचारत राहिली. पण त्या माणसांना तानीबाईंच्या प्रश्नाला ऊत्तर देण्यात काडीचाही रस नव्हता…ए व्हाना रांगेतली
माणसंही कटकट करायला लागली होती. तानीबाई ऊगीचच वेळ खात होती, असेच वाटले सर्वांना..
आरती जरा थांबली. दोन घोट पाणी पिऊन तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“खरं तर हा माझा एकटीचाच प्रश्न नाहीय, आई. हा सगळ्या स्त्रीजातीचाच प्रश्न आहे. त्यात पुन्हा भारतीय कुटुंबपद्धती पुरुषप्रधान असल्यामुळे स्त्रीला नेहमीच नमतं घ्यावं लागलं आहे. बऱ्याच प्रांतातल्या बहुसंख्य उच्चवर्गीय स्त्रिया अगदी पुरुषांच्या बरोबरीने शिकतात. पण लग्नानंतर मात्र ‘आमच्यात बायकांनी नोकरी केलेली चालत नाही ‘असं अभिमानाने सांगत ‘चूल आणि मूल ‘करत बसतात. किती स्त्रीशक्ती वाया जातेय अशानं.”
“तू म्हणतेयस ना, आरती, ते मला पटतंय. तरीपण बायकोने नवऱ्याच्या पुढे जाणं हेही विचित्र वाटतं.”
“कारण लहानपणापासून आपल्या मनावर तसंच बिंबवलं गेलंय. नवरा बायकोपेक्षा उंच हवा,जास्त शिकलेला हवा, त्याचा पगार तिच्यापेक्षा जास्त हवा….”
“मग त्यात काय चूक आहे?”आईंनी विचारलं.
“चूक विचारधारणेची आहे, आई. पूर्वी अर्थार्जन पुरुषाने करायचं आणि स्त्रीने घर सांभाळायचं, अशी कामाची समान वाटणी होती. नंतर स्त्री नोकरी करायला लागली. सुरुवातीला तिला विरोध झालाच ना? विशेषतः नवऱ्याचा इगो आणि समाजाचंही ‘बायकोची कमाई खातो’ वगैरे वगैरे. हळूहळू स्त्रीचं नोकरी करणं समाजाच्या, विशेषतःमराठी समाजाच्या पचनी पडलं. आता तर ‘नोकरीवालीच बायको पाहिजे’ अशी अवस्था आलीय.हल्लीहल्ली नवऱ्यापेक्षा जास्त पगार असलेली बायको पत्करायचीही मानसिक तयारी झाली. इथपर्यंत ठीक होतं. कारण अर्थार्जन,म्हणजे पैसे मिळवणं, हाच स्त्रीच्या नोकरीचा एकमेव हेतू होता.”
“मग दुसरं काय असणार?” आईंना प्रश्न पडला.
“आता मुली शिकतात. अगदी पुरुषांच्या बरोबरीने एमबीए, डॉक्टर, इंजिनियर होतात. त्यांनाही पुरुषांसारखं स्वतःला प्रूव्ह करावंसं वाटणारच ना? त्यांच्याही कर्तबगारीचं चीज व्हायला हवं ना? हा सुरुवातीचा काळ असल्याने माझ्यासारखीला या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय. आणखी काही वर्षांनी या गोष्टी सगळ्यांच्याच अंगवळणी पडतील.”
तिने घड्याळाकडे बघितलं.
“बापरे! आई, किती वाजले बघा. मी आपली बडबडतच बसले. तुम्हाला त्रास व्हायचा उगीच जागरणाचा. चला. झोपायला जाऊया.”
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, ती आशेचे किरण घेऊनच.
उठल्याउठल्याच आईंनी आरतीला सांगितलं, “हे बघ. रात्री बराच वेळ झोप येईना. तुझ्या बोलण्यावर नीट विचार केला. अगदी उलटसुलट विचार केला आणि तुझे सगळे मुद्दे पटले मला. तू जा इंटरव्ह्युला. समरला प्रमोशन मिळो, न मिळो.त्याच्याशी तुझ्या प्रमोशनचा संबंध नाही. तू आणि मी त्यालाही पटवून देऊया हे सगळं. दुसरं म्हणजे मुलांची अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत. अगदी ट्रान्सफर झाली तरीही.”
आरती तृप्त झाली.. तिच्यातल्या स्त्रीशक्तीने घातलेली साद आईंची दाद मिळवून गेली होती.