मराठी साहित्य – जीवन रंग ☆ संदेश (भावानुवाद) ☆ सुश्री माया महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ संदेश ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

मूक-बधिर असलेल्या त्या आकर्षक तरुणीने स्वत:चे बुटिक उघडले होते. ज्यात रेडिमेड कपडे, सोफा कव्हर्स, चादरी, टॉवेल्स वगैरे बरोबरच महिलांच्या प्रसाधनाच्याही वस्तु ठेवल्या होत्या. तिची छोटी बहीण, जी मेडिकल प्रवेशाची तयारी करत होती, नेहमी आपल्या मैत्रिणीबरोबर रमा बरोबर, बुटिकमध्ये यायची तिची मैत्रीण आली की काही न काही वस्तु खरेदी करायचीच गप्पा मारता-मारता एकदा तिने सांगितले की तिला फॅशन डिझायनर बनायची इच्छा आहे, पण आई-वडिलांची इच्छा तिला डॉक्टर बनवायची आहे. परीक्षा झाल्यावर असे समजले की रमाचे पेपर्स काही चांगले नाही गेले. तिला अंदाज आला होता की तिला मेडिकलला प्रवेश मिळणे अशक्यच आहे. दोनच दिवसांनंतर तिने फॅनला लटकून आत्महत्या केली.

मूक-बधिर तरुणीला फारच धक्का बसला. तिने आपल्या डायरीत लिहिले, ‘निसर्गाने ज्यांना स्वस्थ, सुंदर आणि पूर्ण शरीर दिले आहे, अशी माणसेदेखील लहान-मोठ्या अपयशांना घाबरून इतके कुंठित, अवसान घातकी, तणावग्रस्त होऊन जातात की आपली जीवन यात्राच संपवून टाकतात. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यच त्यांच्यात नसते. याउलट आमच्यासारखे विकलांग मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात, कदाचित जीवन-संघर्षाचा धडा आपल्या अपंगत्वामुळे ते लहानपणापासून शिकत असतात. कोणाचाही जरासा स्नेह, सहयोग आणि प्रोत्साहन मिळताच आम्ही स्वत:ला खूप सुखी मानून घेतो तुम्ही कधी ऐकले आहे का कोण्या विकलांग व्यक्तिने जीवनात निराश होऊन, तणावग्रस्त किंवा मतिकुंठित होऊन आत्महत्या केली?’

तिने डायरीत ते पान फाडले आणि डिंकाने आपल्या बुटिकाच्या प्रवेशद्वारावर चिकटवून टाकले.

 

मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गांधी ना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ गांधींना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

`वर्मा सर,  आपण या कार्यालयात सगळ्यात ईमानदार ऑफीसर म्हणून सुप्रसिद्ध आहात. म्हणूनच आपण आपल्या केबीनमध्ये गांधिजींच्या दोन तसबिरी लावल्या आहेत का?  एक मागे आणि एक पुढे?  वर्मांच्या हाताखाली काम करणारे शर्मा आपल्या वरिष्ठांना विचारत होते.

`ते अशासाठी शर्मा,  माझ्यासमोर बसलेल्या अपरिचिताने माझ्यामागे लावलेला गांधीजींचा फोटो बघून खोटे बलू नये आणि मी जेव्हा खोटे बोलेन, तेव्हा निश्चिंत असेन,  की मला खोटं बोलताना गांधीजी बघत नाही आहेत. ‘आता काय सांगायचं,  दहात आठ वेळा तरी मला खोटं बोलावं लागतं’  वर्मांच्या मनात आलं,  पण ते बोलले नाहीत.

`पण सर, गांधीजींचा फोटो तर आपल्या पुढेही लावलेला आहे. त्याचं काय?’

`त्याचं काय आहे,  मी. शर्मा, तुम्ही बघितलं असेल, की मी शिपायाला वारंवार बोलावून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो.’

`होय! बर्‍याचवेळा… म्हणूनच आपल्या समोरील फोटावर कधी धूळ दिसत नाही. पण मागचा फोटो मात्र धुळीनं भरलेला आहे.’

`त्याचं असं आहे शर्मा,  जेव्हा मला खोटं बोलण्याची वेळ येते,  तेव्हा, त्यापूर्वी मी शिपायाला बोलवून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो. शिपाई तसंही कुठलंही काम दोन तासांच्या आधी करतच नाही. भिंतीवरून फोटो हटवला जाताच,  मी दोन-तीन फ्रॉड ठेके निपटून टाकतो.

‘वा:! काय बोललात! आता यावर चहा झालाच पाहिजे.’

`जरा थांबा. गांधीजी येऊ देत. तसंही कुठल्याही सरकारी कार्यालयात चहा पिण्याइतकं  खरं काम दुसरं कोणतं होत असेल?’  आणि दोघेही हास्य-विनोदात बुडून गेले.

मूळ हिंदी कथा – गांधी को आने दो         मूळ लेखिका- मृदुला श्रीवास्तव

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेमाचा रंग ☆ डाॅ. मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ जीवनरंग ☆ प्रेमाचा रंग ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆ 

आई, मी तुझीच मुलगी ना?” रियाच्या या प्रश्नाने निशा दचकली. तिने झटकन रियाला जवळ घेतले व विचारले,“का ग बेटा? असे का विचारतेस? तू तर माझे लाडके पिल्लू आहेस.” “शेजारची रिमाकाकू म्हणते की तू आईची खरी मुलगी नाहीस. तुझी आई बघ किती गोरी आहे आणि तू बघ किती काळी ते!” चिमुकल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत निशाने रिमाला अधिकच जवळ ओढून घेतले. वास्तविक रियाला तिने अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते आणि ती जरा मोठी झाली की तिला सर्व सांगणारच होती. पण शेजारच्या रिमाने त्या आधीच त्या बालमनाला घायाळ केले होते. तिला शांतपणे थोपटत निशा म्हणाली,“ बाळा, आपला रंग आपल्या हातात थोडाच असतो?आणि तुला आठवते?  परवा तुला पायाला ठेच लागली आणि रक्त आले होते. तसेच आज भाजी चिरताना माझे बोट कापले. तेव्हा रक्त आले. आपल्या दोघींच्या रक्ताचा रंग लालच होता किनई? मग तू माझी मुलगी कशी नाहीस?” त्या अजाण बालमनाला ते लगेच पटले आणि तिने आईला घट्ट मिठी मारली . निशा मनात म्हणाली,“ आमच्या बाह्यरंगात फरक असेल, पण माझ्या या पिल्लाच्या आणि माझ्या नात्यातील प्रेमाचा रंग नेहमी गहिराच असेल.”

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ || मानस कन्या || ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

शिक्षा – एम ए, बी एड

अनेक प्रसिध्द मासिकातून बक्षिस पात्र कथा प्रसिध्द झल्या आहेत.

‘परीसस्पर्श ‘ हा कथा संग्रह प्रकाशित.

☆ जीवनरंग ☆ || मानस कन्या || ☆ सौ. नीला देवल ☆

आज सरलाचे सुखदाच्या मानस कन्येचे लग्न लावून, तिची पाठवणी करून शांत तृप्त समाधानाने सुखदा घरी परतली पण एकटेपणाच्या जाणिवेने; सरला शिवाय हे घर, या विचारानेच सारे मोठ घर तिला खायला उठल.

दोन वर्षांपूर्वी दुपारी अखंड कर्कश्श वाजणाऱ्या बेलने  सुखदाची वामकुक्षी भंग पावली, दार उघडताच “आजी मला आसरा द्या, मला वाचवा. मी निराधार आहे मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही”. त्या वीस बावीस वर्षाच्या मुलीने सुखदाचे पाय घट्ट धरले. मुली थांब म्हणत सुखदाने फोन लावला.

“पोलीस दादा तुम्ही आलात बर झाले, यांना सांगा माझी तक्रार तुम्हाला माहीतच आहे, निराधार आवास योजनेतून फुकट घर, गॅस, जनधन योजना फुकट मिळाला, पैसा नवऱ्याने जुगार, दारुमधे सारं फूंकून टाकल. डोक्यावरलं छप्पर गुंडांनी ताब्यात घेतलं, त्याच्या व्यसनाच्या कर्जापाई फुकट मिळाल्याची किंमत नाही म्हणून फुकापासरी फुंकून मला निराधार करून नवरा कुठे उलथला त्याचा पत्ता नाही. मला आसरा देऊन गुंडांपासून वाचवा. मी तुमचे सारे काम करीन, कामाला मी वाघ आहे. तुम्हाला तोशिष नाही लावू देणार.

निराधार योजनेतून फुकट मिळणारं काही नको मला, मला स्वतः राबून कष्ट करून जे मिळेल त्यात स्वाभिमानाने जगायचयं, माझ्या हाताला काम द्या, आसरा द्या, साऱ्याच चीज करेन मी, माझी एवढी नड काढा आजी”.

पोलीसांच्या मध्यस्थीने सरलाला सुखदाने ठेऊन घेतले. चाळीस वर्षाच्या सहजीवनानंतर इथला धागा तुटला गेला बाकी पुढील नात्यांचे बंध परदेशी बांधले गेले होते. सुखदाच्या एकाकी जीवनात आता सरलेच्या अस्तित्वाने नवेच अतूट नात्याचे बंध निर्माण झाले, दोघींनी एकमेकीस आधार दिला. सुखदाच्या घरचे सारे करून फिरून इतर बिल्डिंगमधे कामे करून सरला महिन्याला पंधरा वीस हजार मिळवू लागली.

पण आपल्यासाठी या तरुण मुलीचे आयुष्य असे खर्ची पडून उपयोगी नाही. तिलाही तिचे आयुष्य, हौस, उत्तम भविष्यकाळांतील उत्तम जोडीदार मिळायला हवा या विचाराने सुखदाच्या मनाने उचल खाल्ली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सालस सत्वशील सुरेशशी तिचे लग्न लावून दिले. आता तिचा उज्वल भविष्यकाळ व सुखी संसाराचे चित्र सुखदाच्या दृष्टीपुढे स्पष्टपणे तरळू लागले.

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मूर्ती ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ मूर्ती ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

तो एक कलाकार होता. त्याने खूप सुंदर सुंदर मूर्ती घडवल्या होत्या. मातीच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती,  खडकांवर भीत्तीचित्राप्रमाणे कोरलेल्या मूर्ती. काही मूर्ती लहान होत्या. काही खूपच भव्य होत्या. पण सगळ्याच मूर्ती सुंदर होत्या. मूर्ती जीवंत आहेत , एकमेकींशी बोलताहेत, असं वाटत होतं. किती प्रकारच्या मूर्ती बनवल्या होत्या त्याने. दंतविहीन निरागसबालके. त्यांची फुलांसारखी कोमलता मनाला मोहून टाकायची. काहींमध्ये उफाळणारं तारुण्य,  प्रणयाचं आमंत्रण असायचं. प्रकाशाची चमक त्यात असायची. काही विरह व्यथा प्रकट करणार्‍या असायच्या. काही मूर्ती जरा-जर्जर वृद्धांच्याअसायच्या. भूतकाळाचीआठवणकरणारे त्यांचे डोळे पाणवलेले असायचे.

फुलांचा मोसम होता. सगळ्या मूर्ती आपल्या लावण्याच्या तोर्‍यात होत्या. पण लवकरच मौसम बदलला. फुले आणि ऊबदार वातावरण दूर सारत ढग गडगडू लागले. विजा चमकू लागल्या. धो धो पाऊस सुरू झाला. मातीच्या मूर्तीरडू लागल्या. रडता-रडता  हळूहळू विरघळून गेल्या. त्यांचं नामोनिशाणही राहीलं नाही.

दुसर्‍या दिवशी ऊन पडलं. टणक दगडावरच्याआणि खडकांवर कोरलेल्या मूर्तींनाआपल्या दृढतेचाआणि लावण्याचा अभिमान वाटूलागला. दूर दूर विखुरलेल्या छिन्न-भिन्न झालेल्या मूर्तींना त्यांच्या अभिमानाची तीक्ष्ण धार अधीकच वेदना देऊन गेली.

एक दिवस धरतीच्या पोटातून एक विलक्षण थरथर, भयानक, विचित्र आवाज ऐकू  येऊ लागला. जमीन सरकली. तिचा वक्ष भग्न होऊन विदीर्ण झाला. मोठमोठ्या शीलाखंडांसमवेतलोखंडासारख्या टणक मूर्ती त्यात सामावल्या.

दुसर्‍याच दिवशी तो कलंदर कलाकार पुन्हा तिथे आला. नव्या उगवत्या सूर्याबरोबर तिथलं वातावरण त्याला इतकं अद्भूत वाटलं, की तोपुन्हाआपल्याकामाला लागला. बघता मूर्तींची एक भव्य सृष्टी पुन्हा तिथे स्थापित झाली. काही कच्च्या मातीच्या मूर्ती, काही दगडांच्या, लोखंडासरख्या टणक… पण सगळ्याच सुंदर… अति सुंदर…

 

मूळ हिंदी कथा – मूर्तियाँ    मूळ लेखिका – सुश्री शकुन्त दीपमाला

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणित ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ गणित ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

माणसाचे आयुष्य हे एक गणितच आहे नाही का? माणसाने जन्मभर नुसती गणितच तर सोडवायची असतात. कधी बेरीज तर कधी गुणाकार करायचा असतो कधी वजाबाकी तर कधी भागाकार, पण कधी आणि कुठे कोणती सूत्रे वापरायची हे मात्र त्याला समजले पाहिजे.

काय गंमत आहे नाही का? माणसाच्या आयुष्याची सुरवात होते ती गणिताने आणि शेवट ही गणितानेच होतो..

शाळेत आपण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार सारे काही शिकतो. अंकांशी खेळायला शिकतो. पण प्रत्यक्षातही आपल्याला जन्मभर तोच खेळ खेळायचा असतो ह्याचा आपण विचारही केलेला नसतो.

अंकांची बेरीज करता करता आपण अनेकांशी कळत न कळत बेरजेच्या रुपात कधी जोडले जातो हेच कळत नाही. हां अर्थात बेरजेच्या रुपात रहायचे की वजाबाकी व्हायचे हे आपल्यावर आहे म्हणा.

शाळेत गुणाकार, भागाकार करताना ती सूत्रे शिकताना खूप कंटाळा यायचा, वैताग येई नुसता, पण आज लक्ष्यात येते आपले सारे आयुष्य सूत्रांवर तर आधारलेले आहे.

आई म्हणायची माणसाचे पाढे कसे तोंडपाठ पाहिजेत, गणितात पैकीच्या पैकीच पाहिजेत. तेव्हा नाही पण आता पटते एकदा काही गणित चुकले की आयुष्याचे सारे गणित चुकत जाते. मग बेरजेची कधी वजाबाकी होती तेच कळत नाही आणि गुणाकाराचा भागाकार व्हायला ही वेळ लागत नाही.

आपल्या आयुष्याचे गणित कसे पाहिजे तर आपल्याला दुसर्‍यांच्या आनंदाचा गुणाकार करता आला पाहिजे तर दुःखाचा भागाकार. नात्यांची बेरीज करता आली पाहिजे तर त्यांच्या अडचणींची वजाबाकी करता आली पाहिजे.

शेवटी आयुष्य हा एक गणिताचाच तर खेळ आहे. जो मांडायचाही आपणच आणि खेळायचाही आपणच आहे. आपल्यालाच तर ठरवायचे आहे की कशाची बेरीज करायची आणि कशाची वजाबाकी.

ज्याला हे जमले त्याला आयुष्याचे गणित उत्तम जमले नाही का??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️6.8.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मुलगा-मुलगी (भावानुवाद) ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ मुलगा-मुलगी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

रेल्वेत आमच्या समोर सीटवर एक मध्यमवयीन जोडपे त्यांच्या तीन मुली व एक मुलगा असे बसलेले होते. ती भावंड कधी खाण्याच्या वस्तुवरून, नाही तर एखाद्या खेळण्यावरून आपसात भांडत होती. मुलगा सर्वात मोठा म्हणजे बारा-तेरा वर्षांचा असेल त्यानंतरच्या तिघी मुली दोन-तीन वर्षांच्या अंतराने दिसत होत्या. भावाच्या पाठची मोठी मुलगी दहा वर्षाची वाटत होती. सुंदर, निरोगी, कानात बहुतेक नुकतेच टोचून घेऊन डूल घातलेले होते, कारण कानांच्या पाळीवर तेल हळद लावलेले दिसत होते. खेळता-खेळता मुलांच्यात परत भांडण झाले आणि मुलाने बहिणीच्या कानावरच जोरात थप्पड मारली. मुलगी किंचाळली. तिच्या कानाच्या पाळीवरून रक्ताचे थेंब ओघळले. आईने जरा रागानेच मुलाकडे पाहिले. पण तोपर्यंत मुलीने भावाच्या मनगटाचा चावा घेतला, दात उमटले अगदी.

तो पण किंचाळला मनगटावर व्रण पाहून आईने लेकीलाच जोरात चापट मारली,

‘‘का गं? लाज नाही वाटत? भावाला इतक्या जोराने चावलीस? तो काय शत्रू आहे का तुझा?’’

‘‘त्याने का इतक्या जोराने मारले मला?’’

‘‘त्याच्या मारण्याने काय मरत होतीस का लगेच? येऊन-जाऊन एकुलता एक मुलगा आहे, त्याच्याच मागे अगदी हात धुऊन लागता तुम्ही सगळ्या,’’ आई अजूनही रागाने बडबडत होती.

‘‘मी चावल्यानेदेखील तो काय मरणार होता?’’

 

मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आशीर्वाद सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

 

“आजी नमस्कार करते ग,”

” ये ये. दीर्घायुषी हो बाळ. देवीमातेच्या आशिर्वादाने तुला रामासारखा नवरा मिळू दे “.

आजी नातीला आशिर्वाद देत म्हणाली.

” नको आजी. मुळीच नको. ज्याने कोणा त्रयस्थाच्या सांगण्यावरून स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, आणि पदोपदी ठेचकाळत जगण्यासाठी जंगलात सोडून दिलं, त्याच्या सारखा नवरा अजिबात नको आहे मला.”

“बरं बाई, तुला कृष्णासारखा नवरा मिळू दे. आता तरी खूश?”

“नको ग , तसा तर मुळीच नको.  जो कुठल्या एकाच स्त्रीचा नवरा होऊन राहिला नाही, त्याच्यासारख्या मुलाशी लग्न करून काय करू मी? तसा नवरा तर नकोच.”

“कमाल आहे तुझी. रामासारखा नको, कृष्णासारखाही नको, मग नेमका कसा नवरा पाहिजे बाई तुला?”

” हे बघ, मला असा नवरा पाहिजे जो मला एखादी निर्जीव पाषाणमूर्ती समजणार नाही. किंवा एखादं खेळणंही समजणार नाही. माझ्या नवऱ्याने माझ्याकडे एक माणूस

म्हणून पहावं- वागावं….बस… एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे माझी. ”

 

मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल

अनुवाद :…… सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पहिला डाव घटस्फोटाचा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग : पहिला डाव घटस्फोटाचा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर  

 

“हाय! कशी आहेस? ”

“मस्त! तू कसा आहेस? ”

“मजेत. एकटीच? ”

“नवरा दिल्लीला गेलाय. ”

“नेहमी ट्रॅव्हल करावं लागतं त्याला? ”

“आताचे जॉब्स असेच असतात ना! तुझी बायको? ”

“पुण्याला. पुण्याला शिफ्ट झालो आम्ही. माझा नवा जॉब पूना-बेस्ड आहे. ”

“या जॉबमध्येही ट्रॅव्हलिंग…. ”

“महिन्यातून एक -दोन दिवस. पूर्वीसारखं वीस-बावीस दिवस नाही. ”

“अच्छा! म्हणजे आत्ता जमलं तुला जॉब चेंज करायला? ”

“कूल! आपण घरी नाही आहोत एवढा आवाज चढवायला. आणि आता नवरा-बायकोपण नाही आहोत. ”

“सॉरी!”

“…….”

“यू मे स्मोक. आय वोन्ट माइन्ड. ”

“मी सोडलंय स्मोकिंग. ”

“काsssय?”

“हे लग्न, त्याला चांगलं आरखून-पारखून केलं असशील ना?  स्मोकिंग न करणारा वगैरे.”

“……”

“दॅट मिन्स ही स्मोक्स? ”

“इट्स ओके. अदरवाईज ही इज अ गुड गाय.”

“म्हणजे मी…. ”

“तसा तूही चांगला होतास. दोष असलाच तर सिस्टीमचा होता.”

“सिस्टीमचा? ”

“हो. आपण एकमेकांकडे कधी स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलंच नाही. माझ्यासाठी तू फक्त माझा नवरा होतास. त्यामुळे  तुला मी सतत त्या चौकटीत कोंबायचा आटापिटा करायचे. तुझी फिरतीची नोकरी, स्मोकिंग वगैरे गोष्टी त्या मॅट्रिक्समध्ये सामावणाऱ्या नव्हत्या.”

“मग आता? ”

“आता नात्याचं मॅट्रिक्स बाजूला ठेवून मी त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघते. त्यामुळे तेवढा त्रास नाही होत त्याच्या वागण्याचा. सगळे गुंते सुटून जगणं सोपं झालंय त्यामुळे.”

“यू सेड इट.”

“तू कसा काय बदललास एवढा?”

“अरुणा खूप समंजस आहे. मी जसा आहे, तसा तिने मला एक्सेप्ट केलाय – माझ्या  दोषांसकट. आय एम सॉरी टू से ;पण कोणी आपल्याला  डिवचत राहिलं, तर आपलाही अहंकार फणा काढतो.तिने कधीच डिवचलं नाही मला. मग मीही माझ्या बाजूने समजूतदारपणा दाखवायचा प्रयत्न केला. दॅट्स ऑल.”

“एकंदरीत आपण दोघेही आता शहाणे झालो आहोत, असं म्हणायला हरकत नाही.”

“यू सेड इट!”

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खरच माझं चुकलच ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ खरच माझं चुकलच ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

मी मिसेस प्रधान. मी माझ्या बद्दल जरा विस्तार पूर्वक सांगते. माझा जन्म एक संपन्न कुटुंबात झाला.मी एकूलत एक जरास लाडावलेल कन्यारत्न. कलकत्याला आमची मोठी बाडी म्हणजे बंगला होता. आसपास सतत नोकरांचा वावर. कॉलेज चे शिक्षण होस्टेल मधे झाले. स्वभावाने मी हेकेखोर आणि घमंडी म्हटले तरी चालेल. माझे लग्न आमच्या स्टेटसला शोभतिल असे प्रधान यांच्याशी झाले. येथे पण मी माझ्या टर्मस एन्ड कंडीशन प्रमाणे राहू लागले. आमचं अगदी व्यवस्थित चालले होते. यथोचित वेळेला ‘सोहम ‘ चा जन्म झाला. माझे  सोशियल वर्क, जिम, क्लब वगैरे चालू होते. मला कधी डाउन क्लास माणसं आवडली नाहीत. त्यांचे ते मध्यमवर्गीय परंपरा जपण मला आजिबात पसंत नह्वते. सोहम सॉफ्टवेअर इन्जिनियर होउन जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी ला लागला आणि अमेरिकाला स्थायीक झाला. आता आम्ही दोघे येथे आमच्या साम्राज्यात मज्जेत रहात होतो. आत्ता पर्यंत माझे अस ठाम मत होतं की पैसा आणि हुशारी असली की काही अडत नाही. आमच्या शेजारी कुलकर्णीबाई आणि कुटुंबीय राहत आहे. टिपीकल मिडलक्लास  कुटुंब.  मी नेहमी त्यांचाशी अंतर ठेवून होते. कुलकर्णी बाई रिटायर्ड लायब्ररीयन आहेत. त्यांना पुढे पुढे करायची सवय आहे.मी तर त्यांना खडसावून सांगितले

” मला असे कोणी उगाच लुडबुड केलेली आवडत नाही.” असो. हे असे आमचं हाई स्टँडर्ड जीवन चालले होते. आणि एके दिवशी कोरोना ची साथ आपल्या देशात येउन ठेपली!…

भारतात लॉक डाउन जाहीर केले तसे आमच्या कडे असणारे स्वयंपाकी, मोलकरीण, ड्राइवर,माळी सगळ्यांनीच येण बंद केले. जास्त पैसे देऊन सुद्धा कोणी काम करायला तैयार नह्वत. आणि आमची हुशारी साधा चहा बनवायला पण कामास येणार नाही!! कसे बसे कोर्न फ्लेक्स, ऑट्स हे खाउन एक दिवस निभावून काढला. दुसरा दिवस लॉक डाउन चा, मी सकाळी उठले आणि टेरेस बाल्कनीे मध्ये गेले जरा फूल झाडानं कडे बघावे म्हणून. पाहते तर काय सगळ्या कुंड्याची माती ओली! जसे कोणी आत्ता च पाणी घातले असावे ! देवा समोर सुद्धा कधी न झुकणारी मी चक्क आकाशाकडे पाहिलं आणि हात जोडून नतमस्तक झाले. तेवढ्यात दारावरची बॅल वाजली. मी दार उघडलं तर समोर कुलकर्णी बाई हातात कॅसरॉल घेउन उभ्या होत्या.त्या सरळ आत जाऊन डबा ठेवत म्हणू लागल्या ” गरम मेथी चे पराठे आहे ते खाउन घ्या.”  मी आश्चर्याने बघत राहिले. “तुम्हाला कसे कळले की आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे?”   “अहो त्यात न कळण्यासारखे काय आहे. तुमच्या   फूल झाडांना पण काल पासून पाणी मिळाले नाही नोकर माणसं नसल्याने, तर तुम्ही पण नीट काही खाले नसेल च. आधी झाडांना आमच्या बाल्कनीतुन च पाइपने पाणी शिंपडले. नंतर सुनबाईंनी केलेले पराठे तुमच्या साठी घेउन आले. ”  ” तुम्ही अश्या कशा हो!” असे म्हणत मी त्यांचा कडे आभारित होउन पहात होते. “मी म्हटलं तुम्ही तुमचा ताठरपणा सोडणार नाही च अहात  तर मग मी पण माझा मनमिळाऊपणा का सोडायचा?   आम्ही मध्यमवर्गीय माणसं साधी जीवन शैली आणि उच्च विचारसरणी जपतो. ” मी त्यांचा  समोर हात जोडले “खरंच माझ चुकलंच आत्ता पर्यंत हाई स्टँडर्ड च्या मोहात मी आपलेपण विसरले.”

© सौ. स्मिता माहुलीकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print