सुश्री मीरा जैन
☆ जीवनरंग : लघुकथा – तिरंगा ☆
त्या प्रौढ बाईच्या, वैजूच्या टोपलीत, दोन तासातच नोटांचा ढीग लागला. तिला कुणालाच काही सांगावं लागलं नाही की तिने कुणाची विनवणी पण केली नाही. तिच्या टोपलीत छोटे छोटे तिरंगी झेंडे होते. त्याच्याजवळ तिने एक पाटी लावली होती. त्यावर लिहिलेलं होतं, ‘तिरंगा विकू शकेल, अशी कुणाचीच हिम्मत नाही आणि तो विकत घेता येईल, अशी ताकदही कुणाची नाही. हा तिरंगा सगळ्या देशाचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या राज्यात कोण, कसा उपाशी राहील? तो आज तत्परतेने माझ्याजवळ उभा आहे. आपण हा सन्मानपूर्वक घेऊन जा आणि स्वेच्छेने आपल्याला जे द्यायचं असेल, ते द्या.’
© मीरा जैन
उज्जैन, मध्यप्रदेश
मूळ कथा – मीरा जैन अनुवाद – उज्ज्वला केळकर