मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 46 – वृत्त-उद्धव ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  “वृत्त-उद्धव।  निःशब्द हूँ । कर्म, आत्मा, शरीर और जीवन – मरण का चक्र। इन तथ्यों पर लेखन कदाचित वैराग्य और मोक्ष  पर लेखन है  जो जीवन की पराकाष्ठा ही तो है ।  इस स्तर की रचना लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 45 ☆

☆ वृत्त-उद्धव ☆ 

(करम च्या उपक्रमातील कविता) 

निरोप घेताना…..

 

मी नसेन तेव्हा येथे

तू शोधित मजला येता

पण माझ्यामधले काही

देऊन टाकते  आता……

 

परक्याच घरी मी होते

ठेवले प्राण ही तेथे

सोडून  आज जाताना

मी श्वास सुखाचा घेते…..

 

तू एक स्वप्न जगण्याचे

अन कारण या मरणाचे

आजन्म भोगले दुःखा

हे संचित भाळावरचे……

 

मी एकाकी अनिकेता

ना कोणी भाग्य विधाता

पाहुणीच होते  येथे

हे  कथिते  जाता जाता….

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 46☆ गर्भार प्रतिभा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत भावप्रवण कविता  “गर्भार प्रतिभा।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 46 ☆

☆ गर्भार प्रतिभा ☆

 

गर्भार प्रतिभा, कधी कुठे प्रसुत होईल

याची काही खात्री देता येत नाही

म्हणूनच तिचे डोहाळे पुरवण्यात

प्रज्ञाही कुठं कमी पडत नाही

 

तिच्या प्रसुतिचा काळ, असू शकतो

नऊ मिनिटे, नऊ तास, नऊ दिवस नऊ महिने किंवा आजूनही काही

उगाच चिरफाड करून

ती आपल्या आपत्याला जन्म देत नाही…

 

प्रसुतीवेदना सहन करण्याची ताकद

आणि जिद्द असते तिच्या मनात

म्हणून ती विहार करत असते

केतकीच्या वनात…

 

कधी प्रेम, कधी वात्सल्य, तर कधी क्रोध

अस एक एक जन्माला येतं आपत्य

आणि प्रत्येक आपत्य सांगतं

आपलं उघडं नागडं सत्य…

 

तिच्या जवळ असतात वजनदार शब्द

आणि प्रतिमा, प्रतीकांचे अलंकार

प्रत्येक आपत्याच्या गळ्यात ते अलंकार घालून

ती देत असते त्याला सौंदर्य अन् आकार

 

कुठलाही सोहळा न करता

ती आपल्या आपत्याला देते गोंडस नाव

देते त्याला वाढण्याचं बळ

मिळावे त्याला नाव, भाव आणि वाव

म्हणून सोसत असते वेदनेची कळ…

 

एक बिजातून जन्मा येते माता अथवा पिता

तरी कुळाचे नाव काढाते सांगे नाव कविता…!

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ उत्सव कवितेचा # 1 – वाटचाल ☆ श्रीमति उज्ज्वला केळकर

श्रीमति उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ति में  सुप्रसिद्ध मराठी साहित्यकार श्रीमति उज्ज्वला केळकर जी का हार्दिक स्वागत है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपके कई साहित्य का हिन्दी अनुवाद भी हुआ है। इसके अतिरिक्त आपने कुछ हिंदी साहित्य का मराठी अनुवाद भी किया है। आप कई पुरस्कारों/अलंकारणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। हम श्रीमति उज्ज्वला केळकर जी के हृदय से आभारी हैं कि उन्होने साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा के माध्यम से अपनी रचनाएँ साझा करने की सहमति प्रदान की है। हम आज प्रस्तुत कर रहे हैं उनकी एक भावप्रवण कविता वाटचाल। अब आप प्रत्येक मंगलवार को श्रीमति उज्ज्वला केळकर जी की रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

श्रीमति उज्ज्वला केळकर जी की संक्षिप्त साहित्यिक यात्रा उनके ही शब्दों में:-

माझा साहित्यिक प्रवास 

  • मासिके, वृत्तपत्रे यातून लेखनाला सुरवात
  • आकाशवाणी-चर्चा, परिसंवाद, कविता, कथावाचन ई.
  • कौटुंबिक श्रुतीका- प्रतिबिंब 100च्या वर भागांचे लेखन (10वर्षात)
  • नभोनाटये-5
  • प्रकाशित पुस्तके – कथासंग्रह 5, कवितासंग्रह 2, संकिर्ण 3
  • अनुवादित पुस्तके (हिन्दी) – उपन्यास 6, लघुकथा संग्रह 6, तत्त्वज्ञानपर 6, कथा संग्रह-14
  • माझ्या काही मराठी कथांचा हिन्दी अनुवाद विविध हिन्दी पत्रिकातून-समकालीन भारतीय साहित्य, मधुमती, प्राची, अक्षरपर्व, भाषा पत्रिका
  • अनुवादासाठी काही पुरस्कार व सन्मान

☆ साप्ताहिक स्तम्भ – उत्सव कवितेचा – # 1 ☆ 

☆ वाटचाल  

 

मध्यान्हीचं ऊन नवलाख धारांनी

येतं ओसंडून,

तेव्हा पायतळीची सावलीदेखील

जाते जळून कापूर बनून.

वाटतं तितकं सोपं नसतं, एकाकी चालण चकाकत्या वणव्यातून,

तुझी मेंदीची पावलं, केव्हाच गेली आहेत मातीने माखून.

मृगजळाकाठी डोलणारं रक्तफुलांचं बन खूपच दूर आहे इथून.

मंतरलेली कुणाची साद शीळ घालतीय अजून तिथून?

ती साथ शोधत फिरशील, तेव्हा जाईल सोनेरी संध्या मिटून.

तुझ्या डोळ्यातील सूर्यफुले मात्र

ढळू देऊ नकोस विकलांग बनून.

 

© श्रीमति उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री ‘ प्लॉट नं12, वसंत साखर कामगार भवन जवळ , सांगली 416416 मो.-  9403310170

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 44 – माझी बोली माझी कविता – सांगाल का बाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आज  प्रस्तुत है  आपकी एक अत्यंत भावप्रवण कविता ” माझी बोली माझी कविता – सांगाल का बाई”।  आज वास्तविकता यह है  कि वाचन संस्कृति रही ही नहीं । न पहले जैसे पुस्तकालय रहे  न पुस्तकें और न ही पढ़ने वाले।  आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। )

☆ रंजना जी यांचे साहित्य # 44 ☆

☆ माझी बोली माझी कविता – सांगाल का बाई ☆

मिळेल का पाठी थाप?

सांगाल का वो बाई?

मला बी तो गुरूर्ब्रह्मा

कधी दिसंल का नाई

 

मळले हत जरासे

हे फाटलेलं कापडं

अन् लाज झाकाया

माईने जोडलंत तुकडं।

 

येत असंल वास तरं

थोडं लांबच बसनं।

नजर टाका मायेनं

मीबी जरासं हसंन।

 

झोका बांधून झाडाला

माय राबती रानात ।

सांबाळ ग सोनुताई

गेली सांगून कानात ।

 

धाय मोकलून रडं

दुधाइना बाळ तान्हा।

गेला जळून ऊरात

मह्या मायीचा पान्हा।

 

कशी येऊ मी शाळंत

पाश मायेचं तोडून।

पोट भरंल का सांगा

समदी अक्षरे  जोडून ।

 

सुट्टी आईला मिळता

आवसे पुनवेला शाळा।

चिंध्या मनाच्याबी व्हती

नका मोडू नाक डोळा।

 

वही नसू दे बापडी

ध्यान धरून शिकणं।

बापाविन पोरं जरी

ज्ञान ज्योत मिरवीणं।

 

आठवा ना साऊ माय

वाड्या वस्तीत रमली।

म्हणूनच आबादानी

आज ज्ञानाअनं नटली।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……. भाग -2 ☆डॉ. रवींद्र वेदपाठक

डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी का मराठी के सुप्रसिद्ध साहित्यकार  स्व कृष्ण गंगाधर दीक्षित जो कि कवी संजीव उपनाम से  प्रसिद्ध हैं  के  व्यक्तित्व एवं कृतित्व पर सारगर्भित मराठी आलेख  कवी‌ संजीव यांची जयंती…..त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा……..। आदरणीय कवी संजीव जी का जन्म 12 अप्रैल को सोलापुर के वांगी गांव में हुआ था। मराठी साहित्य के इस महत्वपूर्ण दस्तावेज की लम्बाई को देखते हुए इसे दो भागों में प्रकाशित करने का निर्णय लिया है। आज प्रस्तुत है इस आलेख का प्रथम भाग। कृपया इसे गम्भीरतापूर्वक पढ़ें एवं आत्मसात करें। )

 

☆  कवी‌ संजीव यांची जयंती….. त्या प्रित्यर्थ त्यांच्या काव्याचा घेतलेला आढावा…….. भाग -2 ☆

१९८० च्या गझलगुलाब नंतर, कवी संजीवांनी *मराठी साहित्य विश्वात नवीन प्रयोग केला,* उर्दु साहित्यात शायरीची अक वेगळी उंची आहे,  त्या उर्दु शायरीचे उन्मत्त सौदर्य व कल्पनाविलास आपण मराठी साहित्यातही दे्वु शकतो याची प्रचीती *१९८३ साली प्रकाशित झालेल्या मराठी शायरी ने साहित्यरसिकांना दिली.*  मराठीच्या प्रकृतीला केवळ भक्तीगीते व वीरगीतेच शोभुन दिसतात अशा विधानाला छेद देण्याचे काम *शाहिर राम जोशी होनाजी बाळा याच्या बरोबरीने कवी संजीवांनी केले.*

संजीवांनी रंगबहार या संग्रहात *कुपी घेतली उर्दुकडून पण तिच्यात अत्तर भरले ते मात्र स्वताच्या ह्रदयातुन…*

कवी संजीव रंगबहार मध्ये लिहीतात……

 

*पहाटेच्या पायऱ्या ऊतरून*

*सुर्य थोडा खाली आला*

*फुलानं विचारलं रात्र कशी ?*

*सुर्य लाजुन गुलाबी झाला*

 

या कवितेच्या तारुण्याचा गंध किती नाविन्यपुर्ण आहे..  *टवटवित आहे…. जणु एखादं तलम वस्त्र..*

शायरी लिहीताना *शृंगार, प्रेम, मीलन, विरह* या निरनिराळ्या छटांचे दिग्दर्शन संजीवांनी यामध्ये साधलेले आहे.

 

*खिडकी आता लावू नकोस*

*चंद्र जरी ढळला आहे*

*तोही सखे माझ्यासारखाच*

*तुझ्यासाठी जळला आहे……*

 

दुसरी शायरी….

याच्याहीपुढे जाते….

 

*बाटलीभर अत्तरासाठी*

*लाख फुलांचा जातो बळी*

*लाख शृंगार सांगुन जाते*

*गालावरची एकच खळी………*

 

शायरी,

*उर्दु शायरी पेक्षा ही मराठी कुठेही कमी वाटत नाही…….*

 

संजीवांच्या शायरीला *विनोदाची सुद्धा तितकीच सुंदर* झालर लाभली आहे….

 

*डॉ्क्टर साहेब औषध कशाला*

*मरणार नाही होईन बरा*

*माझ्या समोर एकदा तीला*

*गजरा घालुन हजर करा…,,*

 

अशा रितीने रंगबहार ची बहार कवी संजीवांच्या काव्यात दिसुन येते….

 

१९८६ साली कवी संजीवांच्या पत्नी *सौ. विमल दिक्षीत यांनी विनंती केली, नव्हे हट्ट केला असे म्हटले तरी चालेल,* आणी त्या स्त्री हट्टापुढे सपशेल शरणागती स्विकारत पत्नीच्या हट्ट पुर्ण करण्यासाठी संजीवांनी *देवाचिये द्वारी हा अभ्ंग संग्रह* प्रकाशीत केला….  या त्यांच्या अभंग संग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या वयाच्या *७४ व्या वर्धापनदिनानिमीत्त प्रकाशीत करण्याचा योगायोग साधला….* या अभंग रचनेत सुद्धा कवी संजीव त्यांचे वेगळेपण जपतात आणी जनतेलाच सवाल करतात…

 

*गाथा तुकोबारायाची बुडविता वर आली*

*ओवी ज्ञानेशाची कशी सांगा अमृतात न्हाली*

*मीरा लाडकी शामाची सांगा कसे विष प्याली*

*झाला वाल्मिकी महर्षी वाल्या पापाचा तो वाली*

*याचे द्यावया उत्तर झाले किती निरुत्तर*

*युगा युगांनी मांडला जन्म मरणाचा फेर….*

 

१९८६ साली प्रकाशित झालेला *”आघात हा काव्यसंग्रह,”* माणसाच्या मनावर आघात केल्याशिवाय रहात नाही….

 

कवी सहजच आपलं दुख सांगताना मनातील *सल बोलुन जातो…..

*धुंदीत आसवांच्या  दुखास भेटलो मी*

*आरक्तली फुले ही  काट्यात फाटलो मी*

 

*जखमा खिरापतीच्या    मी वाटील्या स्वहस्ते*

*सर्वांगी विद्ध होता       शौर्यास भेटलो मी*

 

*संघर्ष यात्रीकांचा   हल्ले छुपे कुणाचे*

*शब्दास धार येता  युद्धास पेटलो मी*

 

*सारे असेच आहे  स्पर्धा अशा अडाणी*

*त्याच्या कुठे पताका ?  चिंध्यास भेटलो मी ….*

 

तर कधी कधी हा कवी *माणसाच्या मानवतेवरच आघात* करतो आणी लिहीतो…..

 

*गर्दीत माणसांच्या    माणुस सापडेना*

*लाटेत सागराच्या   जलबिंदू सापडेना*

 

*अपुल्याच पालखिचे       सारे लबाड भोई*

*बेवारशी शवाला       खांदेकरी मिळेना….,*

 

*माणुसकी न येथे      मनी हाय हाय होई*

*देशात या कुठेही    काळीज सापडेना….*

 

आघात मांडताना हा कवी मानवतेपुढे हजारो प्रश्नचिन्ह उभे करतो…..,

 

कवी संजीव यांनी *कविता-लावण्या-अभंग* याबरोबरच काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या *‘भाऊबीज’* या चित्रपटातील बहारदार गाणी आजही सर्व अबालवृद्धांच्या ओठावर आहेत.

*‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’,*

*‘असा कसा खटयाळ तुझा,*

 *‘खुलविते मेंदी माझा रंग गोरापान गं’,*

*’चाळ माझ्या पायात पाय माझे तालात नाचते मी तो-यात मोरावानी’,*

*‘पडला पदर खांदा तुझा दिसतो गं कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो’,*

*‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे’,*

 

या गीतांना स्वरांचा साज *आशा भोसले* यांनी चढवला आहे.

 

संगीताचा साज *वसंतकुमार मोहिते* यांनी दिला आहे त्याचप्रमाणे *‘थोरातांची कमला’* या चित्रपटातील *‘कधी शिवराय यायचे’, ‘झुळझुळे नदी बाई’* ही गीतेही लोकप्रिय ठरली. या गीतांना *दत्ता डावजेकर* यांनी संगीतबदद्ध केले असून *उषा मंगेशकर* यांनी ही गीते गायली आहेत.

 

तसेच *‘आवाज मुरलीचा आला’* हे भावगीतही *माणिक वर्मा* यांच्या स्वरांनी लोकप्रिय झाले. या गीताला *डी. यू. कुलकर्णी* यांनी संगीतबद्ध केले आहे.

 

कवी संजीव यांनी एकंदर ५० वर्षे सातत्याने लिखाण करून सोलापूरच्या काव्यविश्वात *कवी कुंजविहारीनंतरचे ख्यातप्राप्त कवी म्हणून सर्वश्रृत झाले.* त्यामुळे सोलापूर हीच त्यांची जन्मभूमी व कर्मभूती आहे.

 

दि. २८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काव्यगगनातील एक तारा निखळला. पण ते त्यांच्या बहारदार गीतातून आजही अजरामर आहेत.

 

जेथे जेथे मराठी बाणा आहे, तेथे तेथे त्यांची गीते भविष्य

काळातही गायली जातील, यात शंका नाही; पण *मराठी साहित्य परिषदेला त्यांचा विसर पडला असून त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी होऊ नये,* हे दुर्दैव!

 

पुरोगामी महाराष्ट्रालाही याची आठवण होऊ नये, यात नवल ते काय?

 

*कवी संजीवांसारख्या उत्तुंग प्रतिभावान साहित्यिकांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदन!*

 

© ® डॉ. रवींद्र वेदपाठक

कवी, लेखक, प्रकाशक

सूर्यगंध प्रकाशन, पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 7 ☆ रती ☆ श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

श्री प्रभाकर महादेवराव धोपटे

ई-अभिव्यक्ति में श्री प्रभाकर महादेवराव धोपटे जी  के साप्ताहिक स्तम्भ – स्वप्नपाकळ्या को प्रस्तुत करते हुए हमें अपार हर्ष है। आप मराठी साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। वेस्टर्न  कोलफ़ील्ड्स लिमिटेड, चंद्रपुर क्षेत्र से सेवानिवृत्त अधिकारी हैं। अब तक आपकी तीन पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं जिनमें दो काव्य संग्रह एवं एक आलेख संग्रह (अनुभव कथन) प्रकाशित हो चुके हैं। एक विनोदपूर्ण एकांकी प्रकाशनाधीन हैं । कई पुरस्कारों /सम्मानों से पुरस्कृत / सम्मानित हो चुके हैं। आपके समय-समय पर आकाशवाणी से काव्य पाठ तथा वार्ताएं प्रसारित होती रहती हैं। प्रदेश में विभिन्न कवि सम्मेलनों में आपको निमंत्रित कवि के रूप में सम्मान प्राप्त है।  इसके अतिरिक्त आप विदर्भ क्षेत्र की प्रतिष्ठित साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं के विभिन्न पदों पर अपनी सेवाएं प्रदान कर रहे हैं। अभी हाल ही में आपका एक काव्य संग्रह – स्वप्नपाकळ्या, संवेदना प्रकाशन, पुणे से प्रकाशित हुआ है, जिसे अपेक्षा से अधिक प्रतिसाद मिल रहा है। इस साप्ताहिक स्तम्भ का शीर्षक इस काव्य संग्रह  “स्वप्नपाकळ्या” से प्रेरित है । आज प्रस्तुत है उनकी एक  भावप्रवण कविता “रती“.) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  – स्वप्नपाकळ्या # 7 ☆

☆ कविता – रती

 

मी मोहित झालो,लाजवंती तुजवरती

भासे जणू मज तू ,स्वर्गातील कामरती।।

मी मोहित झालो…,

 

तवा वदन सुकोमल, मंत्रमुग्ध हे हसणे

हासता खळाळून,रातराणी दरवळणे

ओल्या केसांतून,दवबिंदू कां झरती।।

मी मोहित झालो….

 

हरिणीसम भासे,मजला तव चालणे

किती मधुर मधूसम,लागे तव बोलणे

कंकणनादाच्या , स्मृती भान मम हरती ।।

मी मोहित झालो….

 

वाटते तुझा मज,सुखमय संग मिळावा

हा जीव तुझ्यावर,ओवाळूनी टाकावा

तव प्रतिक्षेत क्षण, आयुष्याचे सरती ।।

मी मोहित झालो…..

 

©  प्रभाकर महादेवराव धोपटे

मंगलप्रभू,समाधी वार्ड, चंद्रपूर,  पिन कोड 442402 ( महाराष्ट्र ) मो +919822721981

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे # 31– स्वच्छ वाहते कृष्णामाई ‘ ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है श्रीमती उर्मिला जी  की कोरोना विषाणु  पर  एक समसामयिक रचना  “स्वच्छ वाहते कृष्णामाई ‘”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ केल्याने होतं आहे रे # 31 ☆

☆ स्वच्छ वाहते कृष्णामाई ‘ ☆ 

 

गंगा यमुना कृष्णा वेण्णा आज सुंदर दिसताती !

पात्रात एकही प्लास्टिक पिशवी वाहात नाही ती !!

 

आम्ही सारे घरी स्वस्थ !

नदी घाट मोकळे स्वच्छ !

 

दगडी फरशा मस्त चमकती !

नद्या मोकळा श्वास घेती !

 

प्रीतिसंगमावरले वातावरण नयना सुख देई !

शांत वाहते कृष्णामाई आज आनंदी होऊनी !!धृ.!!

 

सागराच्या पुळणीवरती !

हरीण बागडे वेडे होऊनी !

 

बहुत दिसांची इच्छा पुरविली देशवासियांनी !!१!!

 

दिल्ली मुंबईचे रस्ते शांत शांत बघुनी !

वाघ सिंहही आले करण्या कोरोंटाईनची पाहणी !!२!!

 

कोकण केरळातल्या रस्त्यावर हत्ती रपेट हो करिती !!४!!

 

ओरिसातल्या सागरकिनारी !

अष्ट लक्ष कासवे आली अंडी घालण्याती !!

कोटी कोटी पिल्ले त्यातून आता जन्म घेती !!

लुप्त होण्यापासून वाचल्या कासवांच्या प्रजाती !!३!!

 

कवच ओझोन वायूचे आता स्वत:च स्वत:त  सुधारणा घडविती !! ४  !!

 

अजब अजब या घटना आज कोरोंटाईनमुळे घडती !!

 

स्वच्छ वाहते कृष्णामाई आज आनंदी होऊनी !!

स्वच्छ वाहाते आज कृष्णामाई आनंदी होऊनी !!

 

©️®️ उर्मिला इंगळे

सातारा

दिनांक: १८-४-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 42 – शब्द पक्षी…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है  उनकी एक अत्यंत भावप्रवण कविता   शब्द पक्षी…!।  यह सत्य है कि जब तक शब्द पक्षी कागज पर न उतर जाये तब तक साहित्यकार छटपटाता ही रहता है। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #42 ☆ 

☆ शब्द पक्षी…!  ☆ 

मेंदूतल्या घरट्यात जन्मलेली

शब्दांची पिल्ल

मला जराही स्वस्थ बसू देत नाही

चालू असतो सतत चिवचिवाट

कागदावर उतरण्याची त्यांची धडपड

मला सहन करावी लागते

जोपर्यंत घरट सोडून

शब्द अन् शब्द पानावर

मुक्त विहार करत नाहीत तोपर्यंत

आणि ..

तेच शब्द कागदावर मोकळा श्वास

घेत असतानाच पुन्हा

एखादा नवा शब्द पक्षी

माझ्या मेंदूतल्या घरट्यात

आपल्या शब्द पिल्लांना सोडुन

उडून जातो माझी

अस्वस्थता ,चलबिचल

हुरहुर अशीच कायम

टिकवून ठेवण्या साठी…!

 

…©सुजित कदम

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 45 – चार कणिका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  “चार कणिका।  विभिन्न मनःस्थितियों पर आधारित  चारों  कणिकाएं अपने आप  में अद्भुत हैं और विभिन्न मनःस्थितियों की सहज विवेचना करती हैं । इन भावप्रवण  चारों कणिकाओं  की रचना के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 45 ☆

चार कणिका ☆ 

– १ –

उन्हाचा चढलाच आहे पारा,

उलघाल तनामनाची,

एक छोटासा शिडकावा

हवा आहे,

थंडगार पाण्याचा!

 

– २ –

सुख असंच निसटून जातं

हातातून पा-यासारखं

शाश्वत, आजन्म पुरणारं

हवं आहे काहीतरी…..

 

– ३ –

मी तुझ्या प्रेमात

आकंठ बुडालेली असताना,

तुझा पारा चढलेला,

आणि तू सज्ज,

शब्दांची शस्त्र पाजळून,

युध्दासाठी….

 

– ४ –

तू किती सुंदर आणि नाजूक,

प्राजक्तफुलावरच्या

दवासारखी ,

मी उगाचच म्हणते का तुला

“बेगम पारा”

कधी कधी!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 45☆ आपण सोबती ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

मानवीय एवं राष्ट्रीय हित में रचित रचना

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ  –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक समसामायिक भावप्रवण कविता  “आपण सोबती।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 45 ☆

☆ आपण सोबती☆

 

मूर्ख नाही आम्ही कसे लावणार दिवे

शतकोटी मूर्ख येथे साधतील दुवे

 

चार शहाणे बोलती येथे रोखठोक

घेती स्वतःचेच स्वतः ठेचून हे नाक

 

चंद्र नभातून पाही धर्तीचे अंगण

नऊ मिनिटांत उभे केले तारांगण

 

काय लावतात येथे लोक हे तर्कट

काही मशाली घेऊन निघाले मर्कट

 

कुठे पहातो कोरोना धर्म आणि जात

मुस्लिमाचे शव जळे हिंदू स्मशानात

 

उगा उन्मादाने देह करू नका माती

जगी हजारो देहाच्या विझल्यात वाती

 

काळ निघून जाईल काळाच्या सांगाती

काल होतो तसे राहू आपण सोबती

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

Please share your Post !

Shares