मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ रंजना जी यांचे साहित्य #-13 – कविता – सांजवात ☆ – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे।  आज  प्रस्तुत है संध्या -वंदना पर आधारित कविता  “सांजवात । )

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 13? 

 

? सांजवात  ?

 

देवाजींच्या मंदिरात

तेवणारी सांजवात।

घोर अंधारल्या मना

देई उजाळा क्षणात।

 

प्रकाशली सांजवात

घरदार प्रकाशित ।

सायं प्रार्थना शमवी

विचारांचे झंजावात।

 

सांजवात लावूनिया

आळवावे योगेश्वरा।

विनाशावी शत्रू बुद्धी

सुख शांती येवो घरा।

 

मंद प्रकाश निर्मळ

धूप देई परिमळ।

सांजवात प्रकाशता

दूर पळे अमंगळ।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 4 ☆ अंगाराची साथ तुला… ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी  मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य  विधा की सशक्त हस्ताक्षर हैं ।  वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं।  उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी की  ऐसी ही एक संवेदनात्मक भावप्रवण मराठी कविता  ‘अंगाराची साथ तुला…’।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 4 ☆

☆ अंगाराची साथ तुला…

कोण हरतो ! कोण जिंकतो!
इथे कुणाची खंत कुणा,
जो धडपडतो, जो कळवळतो,
रोजच पडतो ही खंत मना..
अंगाराची साथ तुला…

अंधारातुन दिशा काढ तू,
हाच मानवा संदेश तुला,
हृदयातून पेटव मशाल तू,
मार्ग दाखवी रोज तुला..
अंगाराची साथ तुला…

वादळात जरी पडले घरटे,
जोमाने तू बांध पुन्हा,
थरथरणारे हात ही दबतील,
दगडाखालून काढ जरा..
अंगाराची साथ तुला…

सूर्य सोबती नसो तुझ्या,
ना चंद्र सोबती दिमतीला,
काजव्याची माळ ओवून,
बांध तुझ्या तू भाळाला…
अंगाराची साथ तुला…

लखलखणारा तारा नसू दे,
नशीब तारा चमकव ना,
वसंतातल्या रंग छटा या,
पानगळीत ही पसरव ना…
अंगाराची साथ तुला…

वितळूनी पोलाद स्वतःस बनव तू,
अंगाराची साथ तुला,
ढाल नसु दे चिलखताची,

छाती मधूनी श्वास हवा..
अंगाराची साथ तुला…

© सुजाता काळे ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 13 – मी……! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मैं श्री सुजीत जी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजीत जी की कलम का जादू ही तो है!  निश्चित ही श्री सुजित  जी इस सुंदर रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “मी….!”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #13 ☆ 

 

☆ मी….! ☆ 

 

एकटाच रे नदीकाठी या वावरतो मी

प्रवाहात त्या माझे मी पण घालवतो मी

 

सोबत नाही तू तरीही जगतो जीवनी

तुझी कमी त्या नदीकिनारी आठवतो मी

 

हात घेऊनी हातात तुझा येईन म्हणतो

रित्याच हाती पुन्हा जीवना जागवतो मी

 

घेऊन येते नदी कोठूनी निर्मळ पाणी

गाळ मनीचा साफ करोनी लकाकतो मी.

 

एकांताची करतो सोबत पुन्हा नव्याने

कसे जगावे शांत प्रवाही सावरतो मी .

 

©सुजित कदम

मो.7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #13 – माथी पत्थर ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता  “माथी पत्थर”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 13 ☆

 

? माथी पत्थर ?

 

चराचरावर तुझीच सत्ता जर आहे तर

चराचराला कशी लागली येथे घरघर

 

समृद्धीच्या दिल्यास चाव्या ज्यांच्या हाती

विज्ञानाच्या नावाखाली धरणी जर्जर

 

अतिरेकी अन् दारूगोळा करती गोळा

भीक मागती घरात त्यांच्या नाही भाकर

 

गगन व्यापुनी सारे येथे तिमिर बैसला

किती दिसांनी आज उगवला तेजोभास्कर

 

हिंस्त्र पशूंचे इथे टोळके फिरते आहे

धालत नाही कुणीच त्यांना येथे आवर

 

या देशाचे देणे घेणे नाही त्याला

लुटून देशा स्थावर जंगम केली जगभर

 

पुटीरवादी त्याला सवलत मिळते आहे

रक्षणकर्ता आहे त्याच्या माथी पत्थर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-12 – अभंग – महापूर ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। सम्पूर्ण देश में बाढ़ की प्राकृतिक विपदा और इस विपदा के मध्य सैनिकों और मदद के बढ़ते हाथ साथ ही उत्सवों की सौगात  इसके बीच मानवीय जिजीविषा।  आज प्रस्तुत है  “अभंग – महापूर । )

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 12 ? 

 

? अभंग – महापूर  ?

 

तुझी कोप दृष्टी।झाली अतिवृष्टी। जलमय सृष्टी

महापूर।

 

सोडुनिया माया। धरिलासे राग। प्रेमाला तू जाग ।

नदीमाय।

 

जीव वित्त हानी। झाली वाताहात।  जीवनाचा घात।

आकस्मित।

 

कोसळली घरे। पडली खिंडारे। उध्वस्त भांडारे।

क्षणार्धात।

 

अतोनात प्राणी। बांधल्या दावणी। मुकल्या जीवनी।

प्रलयात।

 

आस्मानी संकट। घटिका बिकट। धावले निकट।

सैन्य दल।

 

मदतीचा हात। देती प्रवाहात। संकटास मात।

दीनबंधू।

 

रक्षाबंधनाचे। मानकरी खरे। सैन्यदल सारे।

बहिणींचे।

 

जाऊ दे वाहून। जाती धर्म पंथ। भेदाभेद संथ।

सर्वकाळ।

 

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – रक्षाबंधन विशेष – ☆ बहिणीची माया. . . . ! ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(आज प्रस्तुत है रक्षा बंधन पर्व पर  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की   विशेष कविता बहिणीची माया. . . . !)

 

☆ बहिणीची माया. . . . ! ☆

 

बहिणीची माया, एक प्रयास

ठरते अगम्य  उत्कट प्रवास.

बहिणीची माया, स्वप्नील वाट

स्वतःच बनते निश्चल पायवाट.

बहिणीची माया,  प्रवाही भाषा.

नाजूक राखीची , साजूक रेषा.

बहिणीची माया, व्याकुळ वेदना

पावसाने जाणलेली धरणीची संवेदना.

बहिणीची माया, बकुळीचे फूल

वास्तवाच्या परिमलात, आठवणींचे मूल.

बहिणीची माया, आवर्त  भोवऱ्यात .

मनातले दुःख,   मनाच्या रानात .

बहिणीची माया, वास्तल्याचे वावर

संकटाच्या पाणवठ्यावर, सुखाची पाभर.

बहिणीची माया,  अवीट हौस

कधी न सरणारा ,  नखरेल पाऊस.

बहिणीची माया, रेशमी कुंपण

अलवार नात्याची,  हळुवार गुंफण.

बहिणीची माया, कधी कथा, कधी कविता

वाचायला जाताच, डोळ्यात सरीता

बहिणीची माया,  एक फुलवात

काळजाच्या दारात उजेडाची वात.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 12 – रिक्षा ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  

अक्सर हमारे रिश्तों के साथ कई क्षण, कई जीवित और अजीवित भी जुड़े होते हैं।  जो उनके जीवित रहते भी और जाने के बाद भी उनकी स्मृति दिलाते रहते हैं। मैं श्री सुजीत जी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ। पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजीत जी की कलम का जादू ही तो है!  निश्चित ही श्री सुजित  जी इस सुंदर रचना के लिए भी बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “रिक्षा ”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #12 ☆ 

 

☆ रिक्षा ☆ 

 

दारा समोर उभी असलेली

रिक्षा पाहीली की…

बाप आठवल्या शिवाय रहात नाही

आणि रिक्षा बरोबरच दिवस भर

राबणारा माझा बाप आजही

डोळ्यासमोरून जात नाही

कारण…

पहाटेच्या उशाला अंधार असतानाच

माझा बाप रिक्षा घेऊन घरातून

बाहेर पडायचा आणि

दिवसभराच्या खर्चाची

सारी गणित सोडवूनच

पुन्हा घराकडं परतायचा.

माझ्या खर्चा साठी त्यानं कधी

स्वतः ची मुठ आवळून धरलीच नाही

आणि माझ्या बापाकडं मी

कोणत्या गोष्टीसाठी हट्ट असा

केलाच नाही..कारण..

माझ्या मनातलं त्याला सारं काही

न बोलताच कळायचं आणि

त्याला रिक्षा चालवताना बघितलं की

माझं काळीज..

त्याच्या कपड्या सारखंच

मळकटलेलं वाटायचं…!

माझा बाप कधी कधी

रिक्षातचं अंगाची घडी करून

झोपायचा..

तेव्हा त्याच्या इतका साधा माणूस

मला दुसरा कुणीच नाही दिसायचा…!

घरासारखीच त्याला तेव्हा

रिक्षा ही जवळची वाटायची अन्

रिक्षात बसल्यावर त्याला

त्याची मायच भेटल्यासारखी वाटायची पण…

आता मात्र दारा समोर

उभी असलेली रिक्षा

दिवसेंदिवस खचत चाललीय

आणि…

बापाच्या आठवणीत ती ही आता

शेवटच्या घटका मोजू लागलीय…!

 

…©सुजित कदम

मो.7276282626

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #12 – पोत माझा ☆ – श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना  एक काव्य  संसार है । आप  मराठी एवं  हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं।  आज साप्ताहिक स्तम्भ  – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती  शृंखला  की अगली  कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता  “पोत माझा”।)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 12 ☆

? पोत माझा ?

 

फक्त दिसतो मी मवाल्यासारखा

पोत माझा हा फुलांच्यासारखा

 

गंध व्हावे अन् फिरावे वाटता

धुंद वारा हा दिवाण्यासारखा

 

सहज येथे गायिला मल्हार मी

नाचला मग मेघ वेड्यासारखा

 

सागराची गाज माझ्यावर अशी

आणि दिसला तू किनाऱ्यासारखा

 

पेटलेला कोळसाही वागतो

ऊब देते त्या मिठीच्यासारखा

 

मोरपंखी पैठणी तू नेसता

पदर वाटे हा पिसाऱ्यासारखा

 

जीवनाचा सपक वाटे सार हा

जीवनी तू या  मसाल्यासारखा

 

गोड कोठे बोलणे शिकलास हे

गायकीच्या तू घराण्यासारखा

 

तख्त ना हे ताज येथे राहिले

ना अशोका तू नवाबासारखा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? रंजना जी यांचे साहित्य #-11 – सावली ? – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  उनकी उनके भावप्रवण कविता   सावली।  यह कविता उनकी माँ  के प्रति  उनकी संवेदनाएं  व्यक्त करती है। निश्चित ही  यह कल्पनीय है  कि हम सब के जीवन में माँ  की छवि का क्या महत्व है और वह छवि सम्पूर्ण जीवन पर कैसे छाई रहती है। )

 

? साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #- 11 ? 

 

? सावली  ?

 

माय माऊली

माझी सावली।

सुख दुःखात

संगे धावली।

 

बालपणात

लहान झाली।

बोल बोबडे

बोलू लागली।

 

तारूण्यात ही

सखी साजणी।

प्रेम बेडीने

ठेवी बंधनी।

 

माया तोडुनी

धाडे सासरी।

छबी तिची ग

माझ्या अंतरी।

 

तोडली माया

जोडण्या नाती।

सासू सासरे

रूपं भोवती।

 

कधी पाठीशी

कधी सामोरी।

संकटी धीर

देतसे उरी।

 

साथ तुझी ग

पावला धीर।

भेटी साठी ग

मन अधीर ।

 

कालचक्राचे

रूपं भीषण।

लुप्त सावली

सोसेना ऊन।

 

तुटता छत्र

कैसी सावली।

तुझी छबी मी

लाख शोधली।

 

सुटला धीर

खचले पाय।

वाटे संगती

न्यावे तू माय।

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 11 – मित्रा…! ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।  मेरे विचार से हम मित्रता दिवस वर्ष में एक बार मनाते हैं किन्तु,  मित्रता वर्ष भर ही नहीं आजीवन निभाते हैं। श्री सुजित जी की यह कविता इतनी संवेदनशील और भावुक है कि पढ़ते हुए मित्रों के मिलन का सजीव चित्र नेत्रों के समक्ष अपने आप आ जाता है और नेत्र नम हो जाते हैं।  मुझे अनायास ही मेरी निम्न पंक्तियाँ याद आ रही हैं जो आपसे साझा करना चाहूँगा –

सारे रिश्तों के मुफ्त मुखौटे मिलते हैं जिंदगी के बाजार में

बस अच्छी दोस्ती के रिश्ते का कोई मुखौटा ही नहीं होता।

निश्चित ही श्री सुजित  जी इस सुंदर रचना के लिए बधाई के पात्र हैं। हमें भविष्य में उनकी ऐसी ही हृदयस्पर्शी कविताओं की अपेक्षा है। प्रस्तुत है श्री सुजित जी की अपनी ही शैली में  हृदयस्पर्शी  कविता   “मित्रा…!”। )

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #11 ☆ 

 

☆ मित्रा…! ☆ 

 

आज ब-याच वर्षानंतर तो घरी आला

दारावरची बेल वाजवली .

आणि बघता क्षणी आम्ही एकमेकांना

कडकडून मिठी मारली .

अगदी श्रीकृष्ण सुदाम्या सारखी

दोघांच्याही डोळ्यांत .. . .

शाळा सोडताना दाटून आलेलं पाणी

आज पुन्हा एकदा दाटून आलं.

आणि..आमच्या भेटीनं

आज माझ घर सुध्दा हळव झालं.

बालपणीच्या सा-याच आठवणीं

डोक्यात भोव-या सारख्या फिरू लागल्या.

अन् वयाच अंतर पुसून ,

चिंचेखाली धावू लागल्या.

शाळेत जाताना दोघांत मिळून

आमची एक पिशवी ठरलेली

अन् पिशवी मधली अर्धी भाकर

रोज दोघांत मिळून खाल्लेली..

मी जिंकाव.. म्हणून तो

कितीदा माझ्यासाठी हरलेला. . . . !

त्याच्यासाठी मी कितीदा

मी बेदम मार खाल्लेला.. . . !

त्याच्या इतका जवळचा मित्र

मला आजपर्यंत कुणीच भेटलाच नाही.

गाव सोडून आल्यापासून

आमची भेट काही झालीच नाही…..!

बराच वेळ एकमेकांशी

आमचं बरंच काही बोलणं झालेलं

तो निघतो म्हणताना त्याच्या डोळ्यांत

एकाएकी आसवांच गाव उभं राहिलेलं

तो म्हंटला..,

माय गेली परवा दिवशी .. . .

तेव्हापासून एकट एकट वाटत होतं

मनमोकळ रडायला कोणी

आपलं असं मिळत नव्हतं..

शाळेत असताना बाप गेला

तेव्हाही मित्रा

तुझ्यापाशीच रडलो होतो..!

खरंच सांगतो मित्रा

माय गेली तेव्हापासून

तुझाच पत्ता शोधत होतो..

मित्रा..,तुझ्या

खांद्यावरती डोकं ठेऊन

मला एकदा मनमोकळं रडू दे

जगण्यासाठी नवी जिद्द घेऊन

पुन्हां घराकडं जाऊदे..!

जगण्यासाठी नवी जिद्द घेऊन

पुन्हां घराकडं जाऊदे..!

© सुजित कदम

Please share your Post !

Shares
image_print