मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #3 – कवितेवरची कविता ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  उनकी गजल यात्रा का एक और पड़ाव  “कवितेवरची कविता“। अब आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं । )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 3 ☆

 

 ☆ कवितेवरची कविता☆

कवितेमधला गझल हा प्रकार मनाला खुप भावला. १९९२ साली अनिल तरळे या अभिनेत्याने बालगंधर्व परिसरात गझलकार इलाही जमादार यांची ओळख करून दिली, कॅफेटेरियात आमची कविता-गझल अशी मैफल जमली,इलाहींच्या गझलांनी मी खुपच भारावून गेले, असे वाटले कविता लिहिणं सोडून द्यावं,वरचेवर इलाहींशी भेटी होत होत्या, इलाहींनी गझलतंत्र, गझलची बाराखडी या विषयी काहीच सांगितलं नाही, ते म्हणाले तुम्ही, “आपकी नजरोने समझा प्यारके काबील मुझे”.. ही ओळ गुणगुणत रहा, त्या मीटर मध्ये तुम्हाला गझल सुचेल! पण तसं काही झालं नाही!
बरेच दिवसांनी अचानक शब्द आले…गझल पूर्ण झाली! शरद पाटील हा कवी त्या काळात झपाटल्यासारखी गझल लिहित होता, त्याला दाखवली,त्यानी सांगितलं होतं पहिल्या शेरात गडबड आहे बाकी सगळे शेर बरोबर आहेत, पहिला शेर मी सुरूवातीला असा लिहिला होता,

“यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
ओळखीचा एकही पहेराव नाही”

काय गडबड आहे हे त्यालाही सांगता आलं नाही आणि मलाही समजलं नाही, एका खाजगी मैफलीत इलाही, दीपक करंदीकर यांच्या समोर सादर केली,त्यांनी ही ईस्लाह वगैरे केलं नाही, माझ्या पहिल्या संग्रहात मी तशीच छापली आहे, पुढे डाॅ. राम पंडितांचे लेख वाचून गझलची लगावली समजली मग मी सानी मिसरा बदलला….घेतलेले राज्य अन तो डाव नाही…आणि लक्षात आलं हे मंजुघोषा वृत्त आहे, अचानकच हातून लिहिलं गेलेलं!
पुढे गझलेवरची गझल ही झाली… *आज अचानक लेखणीस गवसली गझल, स्नेहभराने काळजात उतरली गझल*

माझी पहिली गझल

यायचे स्वप्नी तसे हे गाव नाही
घेतलेले राज्य अन तो डाव नाही

आज मज हाका नका मारू कुणीही
जे तुम्ही घेताय माझे नाव नाही

का असे डोळ्यात पाणी पावलांनो
स्वैर आभाळी तुम्हा का वाव नाही

जायचे वस्तीत चोरांच्या कशाला
सोबती येथे कुणीही साव नाही

सोनियाचे मुकुट डोई देवतांच्या
भक्तिला आता कुठेही भाव नाही

जाहल्या जखमा किती या काळजाला
मारणारा एकही मज घाव नाही

झुरत अंधारात आहे एकटी मी
सावलीला ही इथे शिरकाव नाही

संपता आयुष्य माझे भेटण्या ये
मरणयात्रेला कुणा मज्जाव नाही

 

(१९९३ साली रचलेली गझल आहे )

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #7 – देऊळ.…. ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(प्रस्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  सातवीं कड़ी देऊळ…. । आज के इस आध्यात्मिक विषय पर कदाचित गोस्वामी तुलसीदास जी की चौपाई “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी” अर्थात जिसकी जैसी दृष्टि होती है, उसे प्रभु की मूरत वैसी ही दिखाई देती है। किन्तु ,उस मूरत से अपने आप को कैसे जोड़ना है वह आपको तय करना है।सुश्री आरूशी जी का यह आलेख ईश्वर के सम्मुख अपनी भावनाओं को परत दर परत खोलता जाता है। इस शृंखला की  कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। ) 

 

? साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी  – #7  ? 

☆ देऊळ….   ☆

 

पवित्रता, श्रद्धा, भक्ती ह्यांचा निवास… परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन, मीपणा दूर ठेवून, आपल्या मनातील भावना त्याला सांगण्याचे ठिकाण… आपले दुःख दूर व्हावे म्हणून त्याला साकडे घालायचे असेल तर इथेच येतो आपण…

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादे तरी देऊळ असते जिथे त्या व्यक्तीला खूप शांत, आनंदी, समाधानी वाटते… त्या जागी पोचताच क्षणी एकदम हलकं वाटतं…

काही जण रोज देवळात जातात, काही जण मनात आलं की जातात, तर काही जण देवळात जायचं म्हटलं की नाक मुरडतात… काही जण नेम म्हणून जातात, तर काही जण नवस फेडायला जातात… प्रत्येकाचा देव वेगळा, तसं प्रत्येकाचं देऊळ वेगळं… पण सरते शेवटी देवळात गेल्यावर शरणागती हाच एक भाव उरतो… त्याचा दिखावा करायची गरज नसते, तिथे फक्त तो आणि आपण असतो… एका दैवी पातळीवर संवाद घडतो, त्यात कोणाची ढवळा ढवळ नसते…

घरी दररोज पूजा केली तरी देवळात गेल्यावर जे हाती लागतं, ते शब्द बद्ध करणं मुश्किल आहे… ज्याला त्याला आयुष्य सुखकर करतांना आधार देण्याचं, धीर देण्याचं काम बऱ्याचवेळा देऊळ करतं… हे झालं बाह्य रुपी मंदिराबद्दल.. पण कधी अंतस्थ मंदिराबद्दल विचार केला आहे?

मीपण हल्ली हल्लीच असा विचार करू लागले आहे… म्हणजे तशा भावना जागृत व्हायला लागल्या आहेत… म्हणजे नेमकं काय हे सांगू शकत नाही, पण बऱ्याच वेळा बसल्या जागी त्याला शरण जाते आणि त्याच्याशी गप्पा मारते, मन मोकळेपणाने… शरीर रुपी मंदिरात तो कधी मित्र म्हणून असतो, कधी पिता म्हणून, कधी आई, कधी मोठा भाऊ, कधी जोडीदार बनून समोर येतो… सर्व भाव भावनांना त्याच्या पर्यंत पोचवताना, आपला भार आपण त्याच्यावर टाकून मोकळे होतो… सहजच अगदी…

तो हृदयस्थ असतो, फक्त त्याला ओळखायची गरज असते… जन्म, मृत्यू ह्याच्या पलीकडे जाताना तोच तर नेहमी बरोबर असतो, हो ना !

 

© आरुशी दाते

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #2 – मी मराठी कवितेला काय दिले ? ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(प्रत्येक  भाषा का अपना एक समृद्ध साहित्य होता है।  मेरी दृष्टि में एक कवि के लिए सभी भाषाएँ समान होती हैं। कवि  का किसी  भी भाषा में  समर्पित भाव से  कविता को उसका क्या योगदान है, यह महत्वपूर्ण है।  संभव है मेरे विचारों  से  सब सहमत न हों। किन्तु, यह प्रश्न अपनी जगह स्वाभाविक है कि कवि का उसकी  अपनी मातृभाषा में  कविता को क्या  योगदान  है ? संवेदनशील कवियित्रि सुश्री प्रभा सोनवणे जी  की  प्रतिष्ठित साहित्य  सृजन यात्रा में ऐसे कई पड़ाव आए होंगे। आज प्रस्तुत है उनके साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात”  में  “मी मराठी कवितेला काय दिले ? (मैंने मराठी कविता को क्या दिया?)” पर  उनकी  बेबाक राय।  आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं । )

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 2 ☆

 

 ☆ मी मराठी कवितेला काय दिले ? ☆

 

खुप चांगला प्रश्न  आहे  स्वतःच स्वतःला  विचारलेला !

आणि  उत्तर ही प्रांजळ पणे देण्याचा प्रयत्न–

कविता  मी वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षा पासून लिहितेय !

आठवीत असताना वर्गाच्या हस्तलिखितासाठी एक कथा  आणि कविता लिहिली त्या वेळी असं मुळीच  वाटलं नाही भविष्यात  आपला हात इतका काळ लिहिता राहील !

सासरी माहेरी अजिबात च पोषक वातावरण नसताना कविता टिकून राहिली!

कुठल्याही काव्य  मंडळात जायच्या  आधी मला छापील प्रसिद्धी भरपूर मिळाली होती,सुरूवातीला  मी हिंदी कविता लिहिल्या त्या रेडिओ पत्रिकांमधून प्रकाशित झाल्या!

मी एका बाबतीत  खुप  भाग्यवान  आहे की,माझ्या  हिंदी मराठी कवितांना खुप प्रशंसा पत्रे आली  आहेत! लोकप्रभा मधे प्रसिद्ध झालेल्या कवितेला महाराष्ट्रातल्या कुठून कुठून सुमारे 40 पत्रे आली होती. त्याआधी रेडिओ पत्रिकेत ल्याही हिंदी कविताना  नेपाळ, झुमरीतलैय्या वगैरे ठिकाणाहून पत्रे आली होती!

प्रामाणिक पणे सांगायचं तर मी आत्मलुब्ध व्यक्ती नाही! पण मला खुप प्रशंसा मिळालेली आहे, गजल चा तर मी फार खोलात जाऊन अभ्यास ही केलेला नाही पण गजल नवाज भिमराव पांचाळें च्या संमेलनात ही प्रशंसा मिळाली ! भिमरावांनी सकाळ  आणि पुण्य नगरी मधल्या सदरात ही माझ्या गजला निवडल्या आणि  त्या वाहवा मिळवून गेल्या!

ज्या काळात क्वालिटी जपणारे संपादक होते  त्याकाळात माझ्या कविता मनोरा, स्री, मिळून सा-याजणी, विपुलश्री इ इ मधे प्रकाशित झाल्या आहेत! “फेवरिझम” चा फायदा मी कधीच घेतला नाही! माझ्या कवितेत काही बदल कवी रवींद्र भट यांनी सुचवले होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, “मग ती माझी कविता रहाणार नाही तुमची होईल !” मोडकी तोडकी कशी ही असो माझी ती माझी ! त्या वेळी  मी परिषदेचा “उमलते अंकुर” कार्यक्रम नाकारला होता !

मी मराठी कवितेला काय देणार? ती मुळातच खुप संपन्न  आहे! पण मराठी कवितेने  “स्रीवादी कवयित्री” म्हणून खसखशी एवढी का होईना माझी नोंद घेतली आहे  !

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ समाजपारावर एक विसावा…. !#1 – पुष्प पहिले …. ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।  कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए कविराज विजय जी ने यह साप्ताहिक स्तम्भ “समाजपारावर एक विसावा…. !” शीर्षक से लिखने के लिए  हमारेआग्रह को स्वीकार किया, इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “पुष्प पहिले ….”

☆ साप्ताहिक स्तम्भ – समाजपारावर एक विसावा #-1 ☆

 ☆ पुष्प पहिले .. .  ☆

समाज पारावर माणूस माणसाला भेटतो. माणसाचे अंतरंग  उलगडून  एक समाज स्पंदन वेचण्याचा अनोखा प्रयत्न या स्तंभलेखनातून  करणार आहे संवादी माध्यमातून सोशल नेटवर्किंग साईट वरुन वैचारिक देवाणघेवाण होत आहे.

*अक्षरलेणी* या कवितासंग्रहाच्या  दोन यशस्वी  आवृत

माणूस माणसाला घडवतो,  बिघडवतो आणि सोबत घेऊन  अनेक विकासकामे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगवेगळे असतात. विचार पटले की संवाद घडतो. संवादातून नियोजन आखणी केली जाते.  कार्य कौटुंबिक  असो, सांस्कृतिक  असो,  साहित्यिक  असो परस्परांशी साधलेला संवाद महत्वाचा ठरतो.

हा संवाद व्यक्तीशी संस्कारीत जडण घडण त्याला जीवन प्रवासात नवनवीन वाटा उपलब्ध करून देतो. समाज प्रियतेच किंवा समाजाभिमुख रहाण्याच वरदान माणसाला जन्मजात लाभले आहे.

समाज समाज म्हणजे नेमके काय?  समाज म्हणजे कोणतीही जात नव्हे,  कोणताही पंथ नव्हे. व्यक्ती स जन्म देणारे त्याचे आई वडील हा पहिला समाज.

बालपणात संपर्कात  आलेले समवयस्क सवंगडी,  शाळू सोबती हा दुसरा समाज,  जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर ज्ञानदान करणारे गुरूजन हा तिसरा समाज,  बालपण, तारूण्य, वृद्धावस्था यात सुखदुःखात सामिल होणारा चौथा समाज,  आणि  आपल्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावाने प्रेरित होऊन त्याचे बरे वाईट परिणाम भोगणारा  पाचवा समाज माणसाला सतत जाणीव करून देतो. तो माणूस  असल्याची.

माणसाचं माणूसपण त्याच्या आचारविचारात, दैनंदिन लेखन कला व्यासंगात,त्याच्या कार्य कर्तृत्वात आणि माणसाने माणसावर ठेवलेल्या विश्वासात अवलंबून असते. हा विश्वास माणसाला धरून रहातो तेव्हा तो माणूस समाजप्रिय होतो. समाज प्रिय माणसे जीवनात यशस्वी झाली की आपोआप समाजाभिमुख होतात. हा समाज तेव्हा माणसाला नवा विचार देतो. विचारांची दिशा त्याला कार्यप्रवण ठेवते. त्याच्या या जीवनप्रवात कुठे तरी आपले माणूस सोबत  असावेसे वाटते.

ही सोबत, हा विसावा  शब्दातून, अक्षरातून, विचारातून, मार्गदर्शनातून  ,प्रोत्साहनातून मनाला जेव्हा मिळते ना तेव्हा ही  अनुभवांची  शिदोरी माणसाला वैचारिक मेजवानी देते. एक निर्भेळ आनंद देते.  हे वैचारिक  खाद्य माणसाला आयुष्यभर पुरते.  त्याचा जीवनप्रवास समृद्ध  करते.  हा विसावा ही वैचारिक बैठक वेगवेगळ्या जीवनानुभुतीतून माणसाला विसावा देते. जगायचे कसे? याचे उत्तर देखील या पारावर सहजगत्या उपलब्ध होते.

माणूस जेव्हा माणसाच्या संपर्कात येतो ना  तेव्हा तो  ख-या अर्थाने विकसित होतो. त्याचे हे विकसन त्याला जगाची सफर घडवून  आणते.  कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे जगायला शिकवते. मान, पान, पद, पैसा ,  प्रतिष्ठा मिळवून देण्याचा राजमार्ग याच समाजपाराला वळसा घालून जातो.  इथे जगणे आणि जीवन यातला  सुक्ष्म फरक कळतो आणि माणसाचं जीवन प्रवाही बनते. हा जीवनप्रवाह या शब्द पालवीत जेव्हा विसावला तेव्हा नाविन्यपूर्ण  आणि वैविध्यविपूर्ण  आशय ,विषयांची लेखमाला  आकारास  आली हा विसावा रंजनातून सृजनाकडे वळतो तेव्हा हाच माणूस  माणसाला विचारांचे दान देतो. मानाचे पान देतो. हे  आठवणींचे पान समाज पारावर  रेंगाळते आणि

माणूस माणसाशी जोडला जातो.  हे  एकत्रीकरण,  हे  समाज सक्षमीकरण,  अभिव्यक्ती परीवाराशी या लेखमालेतून संलग्न झाले  आणि  विविध विषयांवरील लेख रसिक सेवेत दाखल  झाले. विविध विषयांवर लेख या लेखमालेतून देणार आहे. हे लेख केवळ  शब्द बंबाळ आलेख नव्हे तर हा  आहे. समाजपार. ह्रदयाचा परीघ. वास्तवाचा  आरसा  आणि शब्दांचे  आलय. . .

तुमच्या  आमच्या  अभिव्यक्ती साठी.. . . !

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ कवितेच्या प्रदेशात #1 – निर्मिती प्रक्रिया ☆ – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

 

(प्रत्येक कवि की कविता के सृजन के पीछे कोई न कोई तथ्य होता है, जो कवि को तब तक विचलित करता है, जब तक वह उस कविता की रचना न कर ले। और शायद यही उस कविता की सृजन प्रक्रिया है।  किन्तु, इसके पीछे एक संवेदनशील हृदय भी कार्य करता है। ऐसी ही संवेदनशील कवियित्रि सुश्री प्रभा सोनवणे जी  ने मेरे अनुरोध को स्वीकार कर “कवितेच्या प्रदेशात” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने हेतु अपनी सहमति दी है।  इसके लिए हम आपके आभारी हैं।  अब आप प्रत्येक बुधवार को उनकी रचनाओं को पढ़ सकेंगे।

यह सच  है कि- कवि को काव्य सृजन की प्रतिभा ईश्वर की देन है। उनके ही शब्दों में  “काव्य प्रतिभा ही आपल्याला मिळालेली ईश्वरी देणगी आहे हे नक्की!”  आज प्रस्तुत है  काव्य सृजन पर उनका आलेख “निर्मिती प्रक्रिया”)

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात ☆

 ☆ निर्मितीप्रक्रिया ☆

 

मला आठवतंय मी पहिल्यांदा कविता लिहिली ती इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी, *माँ पाठशाला*  या शीर्षकाची ती हिंदी कविता होती, आठवी ते अकरावी या काळात मी तुरळक हिंदी कविता लिहिल्या, त्या रेडिओ श्रीलंका- रेडिओ लिसनर्स क्लब च्या रेडिओ पत्रिकांमध्ये प्रकाशित ही झाल्या!

१९७० सालापासून कविता सतत माझ्या बरोबर आहे, आयुष्याचा एक अविभाज्य घटक  बनली आहे!

चित्र काव्य, विषयावर आधारित काव्य रचताना, कुठली तरी घटना, स्थळ आपल्या मनात येतं आणि आपण कविता रचत जातो,

आपल्याला आवडलेलं, खुपलेलं, खदखदणारं कवितेत उतरत असतं, मी सकाळ नाट्यवाचन स्पर्धेसाठी ग्रामीण भागात परीक्षक म्हणून जात असताना, नुकतीच घडलेली जवळच्या नात्यातल्या तरूण मुलीच्या  आत्महत्येची घटना मनाला क्लेश देत होती, भोर च्या शाळेत नाट्यवाचनाचे परिक्षण करत असताना अचानक रडू कोसळले आणि तिथेच पहिला शेर लिहिला—

 

*तारूण्यातच कसे स्वतःला संपवले पोरी*

*आयुष्याला असे अचानक थांबवले पोरी*

 

काफिये रदीफ़ काहीच मनात योजले नव्हते, मी एकीकडे नाट्यवाचन ऐकत होते, विद्यार्थ्यांना, नाटकाला गुण देत होते आणि त्याचवेळी मला शेर सुचत होते….

 

बाईपण हे नसेच सोपे वाटा काटेरी

रक्ताने तन मृदूमुलायम रंगवले पोरी

 

आले होते मनात तुझिया स्वप्नांचे पक्षी

गोफण फिरवत कठोरतेने पांगवले पोरी

 

तळहातावर ठळक प्रितीची रेषा असताना

निष्प्रेमाचे दिवस कसे तू घालवले पोरी

 

सौंदर्याला दिलीस शिक्षा क्लेश जिवालाही

परक्यापरि तू स्वतःस येथे वागवले पोरी

 

संपवता तू तुझी कहाणी दोष दिला दैवा

अंगण आता पुन्हा नव्याने सारवले पोरी

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #5 – फोटो…. ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   पंचम  कड़ी  फोटो …।इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

 

? मी_माझी  – #5  – फोटो  …? 

 

ए तू फ्रेममध्ये येत नाहीयेस… संध्याचा अजून जवळ उभी राहा…

नीट घे रे फोटो, गोरी दिसली पाहिजे, बारीक डिसें ह्याची काळजी घेशीलच… पदर नीट येतोय ना…

पटकन काढ रे, किती वेळ लावतोस… रेड आय येणार नाही ना…

फ्लॅश हवाय का?

Instructions देऊन देऊन फोटोग्राफरला भंडावून सोडतो नाही…

हे सगळं झाल्यावर फोटोग्राफरने say cheese म्हटलं की आपले सुंदर हास्य चेहऱ्यावर आणतो आणि फोटो क्लिक केला जातो…

त्यानंतर जनरली फोटोग्राफर thank you म्हणतो… तो हे म्हणायच्या आधीच आपण, ए बघू बघू कसा आलाय फोटो?

ए काय रे, मी थोडी झाकली गेली आहे ना, पदर नीट नाहीये, अशी अनेक कारणं सांगून त्याला पुन्हा फोटो काढायला भाग पाडतो…

मला नेहमी प्रश्न पडतो, फोटोग्राफर thnq का म्हणत असेल?
आज लक्षात आलं बरं का !
पुन्हा माझ्याकडून फोटो काढून घेऊन नका, परवडणार नाहीत तुमच्या instructions … ???

असो, विनोद बाजूला ठेवू या… पण फोटो म्हटलं की सगळ्यांना किती उत्साह असतो नाही ! प्रत्येकाला तो क्षण capture करायचा असतो, कायमचा… त्यातील आनंद, उत्साह, जोश, सौन्दर्य…. सगळं हवंहवंसं असतं… आणि महत्वाचं म्हणजे कदाचित भविष्यात हे फोटो पाहून हे क्षण पुन्हा जगायचे असतात… खूप गुंतलेले असतो भावनिक, आर्थिक, शारीरिक दृष्ट्या… ज्याने कोणी फोटो काढण्याची concept निर्माण केली त्याला शतशः नमन !

शेवटी काय, जे चांगलं आहे, आपलं आहे ते आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, असं नाही का वाटत… आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रसंग आपल्याला काही ना काही देऊन जातो, आणि तो आपल्या मुठीत पकडण्याचा अट्टहास असतो… पण… एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी… ह्या केसमध्ये फोटोग्राफर आपल्या समोर उभा नसतो, तर तो अंतस्थ असतो… त्यामुळे त्याला instructions देत असताना नक्की काय द्यायच्या आहेत हे ठरवायला वेळ नसतो, त्याची तयारी खूप वर्षांपासून करावी लागते, तेव्हा कुठे थोडं थोडं कळतं की फ्रेममध्ये काय पाहिजे, काय नको, angle कोणता असला पाहिजे, वगैरे… कारण इथे re take घेता येत नाही, एवढाच काय तो फरक… हो ना !

 

© आरुशी दाते

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ चिमणीचा दात ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इसके  अतिरिक्त आप एक आदर्श  एवं सम्माननीय शिक्षिका भी हैं । आपके शैक्षणिक अनुभव अनायास ही हमें अपने बचपन के दिन याद दिला देते हैं। इस संक्षिप्त आलेख में हम अपने समय एवं वर्तमान समय के पलकों और बच्चों की बदलती मानसिकता के सामाजिक प्रभाव /दुष्प्रभाव का अवलोकन करते हैं। 
यह आलेख पालकों के माध्यम से उनके बच्चों के लिए है। आज के ही अंक में हम श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी की बच्चों के लिए “लू की आत्मकथा” प्रकाशित कर रहे हैं।  आशा है आप सबको पसंद आएगी। हाँ अपने बच्चों/पोते/पोतियों /नाती/नातियों को यह कथा सुनाना मत भूलिएगा।  श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी एक प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं।)

 

? चिमणीचा दात ?

 

आजकाल डब्यात पोळी भाजी देण्यापेक्षा बरेचसे पालक मुलांना पाच दहा रूपये  देण्यात धन्यता मानतात मग ही मुल चीप्स कुरकूरे इत्यादी फास्टफूड आणून खाण्यात नुसती धन्यताचा नव्हे तर श्रीमंचे लक्षण समजतात कुणाला एक कण न देता खातात तेंव्हा आपले लहानपणीचे दिवस आठवाल्या शिवाय राहात नाहीत. एखादा चिंचेचा आकडा, एखादा आवळा कधीकधी एकच चिंचोका सुद्धा चिमणीच्या दाताने दोनचार जणांना नक्कीच पुरत असे. तो देताना देणाऱ्याला कधीही श्रीमंतीचा गर्व नसायचा किंवा खाणार्यालाही कधीच गरीबी जाणवत नसे. प्रत्येक मित्रा जवळची प्रत्येक वस्तू सर्वांनाच आपली वाटायची. अगदी पूर्ण बिस्कीट पुडा एकट्याने खाल्ला आणलेले पूर्ण फळ एकट्याने फस्त केले अससस अगदी अभावानेच होई.

जी वस्तू चिरून मोडून फोडून देता येत नसे ती नक्कीच चिमणीच्या दाताने दिली जाई कारण आई सांगायची एकट्याने खाल्ले  की वटवाघूळच्या जन्माला जाव लागत आणि मग असं एकट दिवसभर लटत राहावं लागतं.  तेंव्हा ते अगदी मनोमन पटायचं कारण वटवाघुळाला कधी कुणी  मजा करताना मित्रात बागडताना पाहिलेले नव्हते. म्हणूनच वाटून खाण्याची संस्कृती निर्माण झाली.परंतु वरचेवर ही संस्कृती लोप पावताना दिसते.

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #4 – भूक…. ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की   चतुर्थ कड़ी  भूक …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

(e-abhivyakti की ओर से सुश्री आरूशी दाते जी का ‘काव्यानन्द प्रतिष्ठान, पुणे’ की ओर से विश्व महिला दिवस पर आयोजित काव्य प्रतिस्पर्धा में प्रथम स्थान प्राप्त करने के उपलक्ष में हार्दिक अभिनंदन।)  

 

? मी_माझी  – #4 – भूक …? 

 

भूक हा शब्दच अनेक उलाढाली घडवून आणायला कारणीभूत ठरतो… हो ना!
शाळेत गेलं की आईने डब्यात काय दिलं असेल? किंवा घरी पोचल्यावर आई खायला काय देईल? हे विचार कायम ऑन असतात,

कशासाठी ? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी !
कमवतो कशाला? पोट भरण्यासाठीच ना !

पोट भरण्यासाठी की जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ?

इथे खरी गोम आहे, नाही का !

चमचमीत खायला मिळालं पाहिजे… माझा भाऊ नेहमी म्हणतो, तळीचा आत्माराम शांत झाला पाहिजे… !

सगळी धावपळ, अट्टाहास ह्याच साठी…

theoretically speaking, ह्याने पोटातली भूक भागते, बाकीच्या भुका आहेत, त्यांचं काय ? बाकीच्या म्हणजे काय हे कळलं नाही ना?

वैचारिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक… अहो, इतकंच काय, फेसबुक / व्हाट्सअप्प भूक, वगैरे, वगैरे… माणसाचं आयुष्य समृद्ध करण्यात ह्या सगळ्यांचा हातभार आवशयक आहे…

आता आठवलं न, बरोबर !

आता लक्षात ठेवा आणि मग बघू या प्रत्येक भूक कशी शमवता येते ते, चालेल ना!

बोलू या ह्या विषयावर, लवकरच !

© आरुशी दाते

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ दप्तर मुक्त  शाळा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। इसके  अतिरिक्त आप एक आदर्श  एवं सम्माननीय शिक्षिका भी हैं । आपका  यह  आलेख निश्चित ही इसका प्रमाण है कि माह में कम से कम एक दिन विद्यार्थियों के लिए “बस्ता मुक्त पाठशाला” प्रयोग उनके सर्वांगीण विकास के लिए कितना आवश्यक है।)

☆ दप्तर मुक्त  शाळा ☆

प्रचलित शिक्षण पद्धती ही कृती प्रधान व विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे ती विद्यार्थ्यांना आनंददायी कशी वाटेल यावर भर असून घोकंपट्टी, अभ्यास, शिक्षा, सक्ती, या गोष्टींना गौण स्थान प्राप्त झाले असून विद्यार्थी स्वछंदी राहून कृतितून शिकला पाहिजे ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात स्विकारली गेल्यामुळे .

दप्तर विना शाळा, बाल आनंद मेळावा, गणितीय बाजार सहल वनभोजन/निसर्ग सहल, परिसर भेट/ क्षेत्र भेट इत्यादी उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले..

या पैकीच एक उपक्रम  म्हणजे दप्तर विना शाळा महिन्यातून एक दिस आम्ही हा उपक्रम  घेतो. या दिवशी मुलांनी दप्तर न घेता शाळा करावयाची असते.

नुतन वर्षा निमित्त आम्ही आज हा उपक्रम घेतला. ससकाळी मुलांनी सर्व बोर्ड ताब्यात घेतले अगदी सुचना फलक सह सुंर हस्ताक्षरात मुलांनी सर्व फलकांवर शुभेच्छा लेखन केले सुंदर सजावट करून. अगदी रांगोळी काढण्या पासून ते सफाई पर्यंत सर्व कामे मुलांनी एकमेकांच्या सहकार्याने केली. सर्व शिक्षक विद्यार्थी यांना शुभेच्छा देऊन झाल्यानंतर लघु मध्यंतर घेतली. त्या नंतर त्या ऐतिहासिक पात्र ठरवून देण्यात आलेले होते त्या साठी लागणारे ढल तलवार इत्यादी भाला पट्टा , बिचवा वाघनखे इ प्रतिकृती  मुलांच्या मदतीने तयार केल्या त्यामुळे त्यांना हत्यारे व त्यांचे उपयोग समजले. मधल्या सुट्टी नंतर त्यांना ठरवून दिलेल्या पात्रांचे संवाद म्हणून घेतले. त्यांना यू ट्युब वरील व्हीडीओ दाखवल्यामुळे ते बर्याच प्रमाणात मुलांनी हुबेहूब वटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जे पाठांतर रागवून दडपशाहीने झाले नसते ते पाठांतार मुलांनी उत्तम प्रकारे व सहजतेने केले .शिवाय साभिनय सादरीकरण केल्याने वाचन अस्खलीत  केले योग्य स्वराघातासह केले .प्रत्येकाला वेगळा संवाद निवडून घेतलेला असल्यामुळे पूर्ण पुस्तकाची उजळणी झाली तिही न कंटाळता अगदी आनंददायी पद्धतीने. म्हणून महिन्यातून किमान एक दिवस अशी दप्तराविना परंतु नियोजन बद्ध शाळा आवश्य घ्यावी ज्यामुळे अभ्यास तर होतो परंतु तणाव रहीत वातावरणात. यात परस्पर  सहकार्य नेतृत्व धाडस सभाधीटपणा इ गुणांचे मूल्यमापन करता येईल अनेक चांगल्या सवई मुलांना लावता येतील.

शिवाय हा मुलांचा सर्वात आवडता उपक्रम ठरतो.

 

©  रंजना मधुकर लसणे✍

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ? मी_माझी – #3 – अथांग… ? – सुश्री आरूशी दाते

सुश्री आरूशी दाते

? मी_माझी  – #3 – अथांग…? 

(स्तुत है  सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की  तृतीय कड़ी  अथांग …। इस शृंखला की प्रत्येक कड़ियाँ आप आगामी  प्रत्येक रविवार को पढ़ पाएंगे। )

 

सहज डोकावले… तसं डोकावायचं काही कारणही नव्हतं… पण किती वर्षांपासून हे करायचं राहूनच गेलं होतं… राहून गेलं होतं की मी ते मुद्दामून करत नव्हते…?

त्याने काय फरक पडणार आहे? गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात… मग उगाच दोष, आरोप वगैरे कशाला…?

असो, तर मी काय म्हणत होते?

काहीच नाही गं, तू आता काही बोलूच नकोस… फक्त ऐक…

पण काय ऐकू?

शांत हो, गप्प बस, डोळे बंद कर आणि ऐक सगळं…

म्हणजे?
काहीच बोलायचं नाही?

…………………….

सगळं कसं शांत झालं होतं. थोडंसं कोरडं कोरडं वाटत होतं. मी जरा अस्वस्थच झाले होते. पण आज पर्याय नव्हता. एकेक आवाज नाहीसा होऊ लागला, तशी माझी उत्सुकता वाढू लागली. प्रत्येक क्षणी काय घडतंय ह्याकडे लक्ष जायला लागलं. हळू हळू रंगही नाहीसे झाले, तरंग शांत झाले, तसे शहारे बोलू लागले.

सुरुवातीला अर्थ लागत नव्हते, पण आता काठावर बसून समोरच्या डोहातील माझं प्रतिबिंम्ब दिसत होतं, ते माझं आहे ह्यावर विश्वास ठेवताना अनेक गोष्टींनी
मनाभोवती फेर धरायला सुरुवात केली आणि… आणि पुन्हा गोंधळ, आरडा ओरडा, कोलाहल… असं वाटायला लागलं जणू कडेलोट होतोय, त्या डोहात जर मी पडले तर नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरेल.
नाही, नाही, मला ह्यातून बाहेर काढा, मला जगायचं आहे, हा आक्रोश सुरू झाला… जगण्याच्या धडपडीमध्ये, गटांगळ्या खात खात, त्या थंड पाण्याची बोच सहन करत पोहत राहायचे होते, थांबले तर, होत्याचं नव्हतं होणार हेच माहीत होतं.

आजही नेमकं तेच झालं… हात पाय मारत राहिले, पण एक वेळ अशी आली की माझ्या संघर्षामध्ये मी कुठेच नव्हते… हे लक्षात आलं…

म्हणजे?

ह्याचं उत्तर शोधायलाच हवं. ह्या संघर्षात मी नाही, असं कसं होईल ?

म्हणजे, बघ हं, ह्या डोहाकडेच बघ ना… पाऊस पडला की ह्यात पाणी साठणार, मग लोकं ते पाणी वापरणार, कोणी दगड मारतील, कोणी पोहायची मजा घेतील, कोणी माझ्यासारखे असतील, जे पाण्यात उतरायला कदाचित घाबरतील. आणि पाण्यात उतरले तर त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहताना जीव मेटाकुटीला येईपर्यंत जीव वाचवायचा.

हाच डोह जेव्हा नदीला जाऊन मिळतो, तेव्हा आपल्याला फार कष्ट घ्यायला लागत नाहीत, नाही का! वाहणे आपोआप चालू राहते. तेव्हा एकच दिशा असते, समुद्राची अथांगता गाठणे, होय ना !

फारसं काही कळत नव्हतं. म्हणून मग पाण्यातून बाहेर येऊन काठावर बसले. आणि डोकावू लागले.

प्रपंचरूपी डोहाला सर्वस्व मानून, जगण्याच्या गर्दीत स्वतःला हरवून बसले होते. ह्यातून मार्ग काढत भक्तिमय नदीचा एक भाग बनून परमेश्वराच्या अथांगतेमध्ये झोकून द्यायचं आहे, ह्याची जाणीव झाली, आणि… सगळं शांत झालं, एक अनुभूती मनाचा ताबा घेऊ लागली, जीवाला सतत अस्वस्थ करणारी भावना नष्ट होऊन सगळं हलकं वाटू लागलं, जणू मी पाण्यावर तरंगते आहे. अथांग… !

© आरुशी दाते

 

Please share your Post !

Shares
image_print