मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – प्रजासत्ताक दिन… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्रजासत्ताक दिन? श्री आशिष  बिवलकर ☆

प्रजासत्ताकाचा! रंगला सोहळा !

तिरंगा जिव्हाळा! देशप्रेम !!१!!

*

लोकशाही नांदे ! देशात सुखाने!

हो अभिमानाने ! सांगा जगा!!२!!

*

स्वातंत्र्य, समता ! बंधूता त्रिसूत्र !

मानवता मंत्र ! जोपासतो !!३!!

*

लाल किल्ल्यावर ! फडके तिरंगा!

विकासाची गंगा ! येथे वाहे !!४!!

*

राजपथ नव्हे ! हा कर्तव्यपथ !

त्यागाची शपथ ! देशासाठी !!५!!

*

त्रिदल सामर्थ्य! चाले संचलन !

अभिमाने मन ! भरे आता !!६!!

*

आशिष म्हणतो ! विकासाचा कित्ता !

होऊ महासत्ता ! भविष्यात!!७!!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ निसर्गनिर्मित… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

निसर्ग निर्मित सुंदर पेले

उमललेत तुमच्यासाठी

सदगुणांचे पेय भरूनी

हे चषक लावा ओठी

*

या पेयाची धुंदी देईल

नवचैत॔न्याची अनुभूती

करीता प्राशन पेया होई

सदविचारी ती व्यक्ती

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

(वरील सुंदर पेंटिंग पाहून आठवल्या शांताबाईंच्या काव्यपंक्ती…! — संग्राहक : चंद्रशेखर देशपांडे ) 

या वळणावर वळताना मज

आठवते, की हेच तुझे घर

कोनावरले झाड तेच ते

अजुन ढाळिते हळवा मोहर

*

या वळणावर वळतांना मी 

कितीदा झाले कंपित, कातर

वीज धावली तनूतुनी जरि –

क्षण अडखळले पाऊल आतुर !

*

ओठांवरचे अधीर हासू

धीट लाजही डोळ्यांमधली

पुन्हा पुन्हा मनी घुटमळणाऱ्या

कवितेतील भावोत्कट ओळी –

*

अता न उरले तसले काही

संथ जाहले डचमळुनी जळ

गहन एकदा जे गमले मज

आज तयाचा सहज दिसे तळ

*

वळणावर या वळता तरिही

भरते काही उरी अनावर –

सुन्या मनाच्या भूमीवरती

ढळत राहतो हळवा मोहर !

कवयित्री – शांताबाई शेळके

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ लाडाची गं लेक माझी… ☆ सुश्री त्रिशला शहा

लाडाची गं लेक माझी

आली माझ्या गं भेटीला

कशी दिसते साजिरी

द्रुष्ट लागू नये तिला

*

आला संक्रांतीचा सण

काय सांगू तिचा थाट

काळी नेसली चंद्रकळा

गोड हसू चेहऱ्यावर

*

सासूसासऱ्यांची आहे 

लाडाची ती सून

कौतुक करती तिचे सारे

पुरविती तिची हौस

*

कशी नटली सजली

हलव्याच्या दागिन्यांनी

गळा शोभतो हा हार

आणि कानातले डूल

*

अशी सदैव असावी

हसत रहावी तु बाळा

आस हिचं माझ्या मनीची

डोळा भरुन पाहते तुला

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दमलेला जीव… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ दमलेला जीव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

भुकेला कोंडा 

निजेला धोंडा

ही म्हणही इथे

बघा मागेच पडते

*

कष्ट करोनी

दमल्यावरती

मिरची ढिगावर

झोप लागते

*

दमल्या जीवा

आग न होते तिखटपणाने

ठसकाही नाही लागत याला

श्वास उच्छश्वासाने

*
निवांत झोपी 

जाई ऐसा

गिरद्यावरती

राजा जैसा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मार्जाराचे आर्जव ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🌹 मार्जाराचे आर्जव 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज माझी प्रिय सखी

बसे उंच मजवर रागावून,

अपराध काय घडे माझा

नकळे माझ्या हातून !

*

करुनी तुझी प्रेमाराधना

रग लागली हाता पाया,

वाकुल्या दावीत गवाक्षात

सावरून बसलीस काया !

*

मधू इथे आणि चंद्र तिथे

चालती प्रेमचाळे मानवात,

डोळे मिटून दूध पिणारी

असे आपली मार्जार जात !

*

बघता फासला दोघातला

विरह संपेल तव उडीत,

मिलन होता दोघे चाखू

गोडी प्रणयाची थंडीत !

…… गोडी प्रणयाची थंडीत !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मकर संक्रांती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मकर संक्रांती? श्री आशिष  बिवलकर ☆

मकर राशीत | रवीचे भ्रमण |

तेजाचे कंकण | मकरेला ||१||

*

पुत्र शनी घरी | पिता आगमन |

पंचागाचे पान | ग्रहयोग ||२||

*

मकर संक्रांती | आकाशी पतंग |

तिळगुळ संग | गोडव्यासी ||३||

*

तिळगुळ घेत | गोड बोला मुखी |

रहा तुम्ही सुखी | जीवनात ||४||

*

भारत वर्षात | अनन्य महत्व |

सांस्कृतिक सत्व | जपतांना ||५||

*

सुवासिनी करी | सुगडी पूजन |

तन मन धन | संसारात ||६||

*

निसर्गाशी आहे | सुसंगत सण |

हिंदूंच जगणं | संस्कारांनी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जागे होई सारे विश्व… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जागे होई सारे विश्व ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

रविराजाच्या रथाला

प्रकाशाचे शुभ्र अश्व

रथ जाई पुढे तसे

जागे होई सारे विश्व

*

गोपुरात घंटानाद

घराघरातून स्तोत्र

किरणात चमकते

सरितेचे शांत पात्र

*

कुणब्याचे पाय चाले

शेत वावराची वाट

झुळुझुळू वाहताती

पिकातुन जलपाट

*

सुवासिनी घालताती

माता तुळशीला पाणी

सुखसौख्य मागताती

 वैजयंतीच्या चरणी

*

 शुभ शकुनाने होई

 दिन सनातनी सुरू

 रविराजाला वंदता

 पंचमहाभूता स्मरू

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – राजमाता जिजाऊ… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? राजमाता जिजाऊ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वराज्याची जननी,

राजमाता जिजाऊ!

थोरवी त्यांची आज,

सारे मिळून गाऊ!

*

जाधवांची होती कन्या,

शुर आणि कणखर!

भोसल्यांची झाली सून,

कर्तव्यात होती तत्पर!

*

तीनशे वर्षाची होती,

काळीकुट्ट अमावस्या!

माय भवनीला साकडे

घातले, केली तपस्या!

*

पराक्रमी पुत्र शिवाजी,

येई जन्माला पोटी!

स्वराज्याचे बाळकडू

पाजले त्याच्या ओठी!

*

तावून सलखून केले,

संस्कार शिवबावर!

सोळाव्या वर्षी केला,

तोरणा किल्ला सर !

*

 एक एक मावळ्यावर,

 केली त्यांनी माया!

 पाठीशी उभे ते राहिले,

 बळ दिले शिवराया!

*

तीन तपे देव मस्तकी,

धरून केला हलकल्लोळ!

साऱ्या मुघलांनी घाबरून,

काढला स्वराज्यातून पळ!

*

स्वराज्याची गुढी उभारली,

हिंदवी स्वराज्य स्थापन केले!

दहा दिशातून अरुणोदय झाला,

छत्रपती शिवाजी महाराज झाले!

*

धन्य ते शिवाजी महाराज,

धन्य राजमाता जिजामाता!

त्यांच्या मुळेच हिंदुस्थानात,

हिंदूधर्म अभिमानाने पहाता!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ स्थितप्रज्ञ“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – स्थितप्रज्ञ – ? ☆ श्री सुहास सोहोनी

वर्षे सरली, युगे उलटली,

काळ किती लोटला

स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत

शिलाखंड एकला

 

सजीव प्राणी पक्षी त्यांसी

स्वर्ग, नरक अन् मोक्ष

निर्जीवांसी गति न कोणती

केवळ अस्तित्व

 

घडले नाही कधीच काही

उबूनि गेला जीव

अंतर्यामी आंस उठे परि

जिवास भेटो शिव

 

शिल्पकार कुणि दैवी यावा

व्हावी इच्छापूर्ती

अंगांगातुन अन् प्रकटावी

सुबक सांवळी मूर्ती

 

मोक्ष हाच अन् हीच सद्गती

निर्जीवाचे स्वत्व

छिन्नीचे घन घाव सोसुनी

लाभतसे देवत्व…

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares