मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ माझ्या गाईच हे गोरं… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? माझ्या गाईच हे गोरंसौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

माझ्या गाईच हे गोरं

दिसामासांनी वाढलं

खोंड देखणं झालेल

नांगराला मी जुंपलं

*

हत्तीवाणी रूप त्याचं

कामाचा उरक भारी

वसवंडीचा उंचवटा

शिंगं देखणीच न्यारी

*

झुलं मानाची घालून

बैलपोळे सजवले

वेशीतून मिरवत

केले देखणे सोहळे

*

आता पिकलं हे पान

चंगाळ्याच नाही गाणं 

जिवाभावाचं हे सोनं

माझ्या रानाची ही शानं

*

दात पडलेत त्याचे

देतो कुटलेला चारा

हिरव्याशा गवताचा

माऊ बसण्या निवारा

*

मुक्या जीवाच्या भावना

डोळ्यातून अश्रू गाळी

माझ्या लाडक्या नंदीचा

प्रेम भाव मी न्यहाळी

*

सेवा करून मी त्याची

फेडतोय आज ऋण

त्याच्या थकल्या जीवाला

विश्रांतीचे काही क्षण

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अस्तित्वाची लढाई / सृष्टीचे एकच उत्तर – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अस्तित्वाची लढाई / सृष्टीचे एकच उत्तर – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

(१) अस्तित्वाची लढाई

तनामनाच बळ

जेंव्हा एकवटत

एवढासा अंकूर

जमिनीतून येतो

*

नाजुक असतो

बीज फुटवा

कोमल नाजुक

जरी दिसतो

*

जगण्याचा प्रयत्न

अस्तित्वाची लढाई

याच सगळयाचा

तो परिणाम असतो

*

प्रयत्नापुढे त्याच्या

भूमीही नमते

मूळ ओटीपोटी धरून

वाढ पिल्ला म्हणते

*

अंकुर मुळे भू ला देते

वरती विस्तार करते

शेवट पर्यंत भूमातेची

 साथ धरूनच रहाते

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर

(२) सृष्टीचे एकच उत्तर 

अंकुरते बीज,

दूर सारून माती |

बीजात असते बळ,

जीवनाला मिळे गती |

*

मातीच्या गर्भात,

काळाकुट्ट अंधार |

थेंब थेंब जीवनाचे,

अंकुरण्यास आधार |

*

मोकळ्या आभाळाखाली,

उन वारा पाणी देई आशा |

उंच वाढवे आणि बहरावे,

उपजत सामर्थ्यांची भाषा |

*

वादळ वारा सोसत,

करी संकटावर मात |

पुढे पुढे वाढत जाई,

जीवनाचे गाणे गात |

*

चराचरात चाले,

बीजरोपण निरंतर |

नावीन्याची सुरवात,

सृष्टीचे एकच उत्तर |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांग परीक्षा कितीदा घेशील ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ सांग परीक्षा कितीदा घेशील ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

आभाळाला हात जोडूनी

केली होती मीच विनवणी

मशागत करूनी जे पेरले

तव येण्याने येई तरारुनी

*

 उशीर झाला जरी यायला

 धरती मनसोक्त भिजली

 पेरलेल्या सशक्त बीजाला

 पीकरूपाने देई भरूनी

*

 टपोर मोती रास शिवारी

 घरदार सारे हरखून गेले

भरून न्यायचे घरात आता

आभाळ ढगांनी भरून गेले

*

 हात जोडतो पुन्हा आभाळा

 आता मात्र तू पडू नको रे

 घरदार राबले इथे रातदिन

 इतकी परीक्षा पाहू नको रे

*

 पडशील शेतामध्ये जरी तू

 डोळ्यातून नित्य वाहशील

 प्रामाणिक कष्टाची आमची

 सांग परीक्षा कितीदा घेशील

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दोन काव्ये — (१) पुढच्या वर्षी लवकर या… श्री प्रमोद वामन वर्तक (२) संपदा… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पुढच्या वर्षी लवकर या… श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आपण येणार म्हणून

वर्षभर वाट पाहिली,

उद्या जाणार म्हणून 

आसवे डोळा दाटली !

*

 येत राहील आठवण

 दणदणीत आरत्यांची,

 खड्या सुरात म्हटलेल्या 

 मंत्र पुष्पांजलीची !

*

चव आता आठवायची 

रोजच्या गोड प्रसादाची,

डोळ्यासमोर आणायची 

आरास तुमची दिव्यांची !

*

 झालो आम्हीच लंबोदर 

 लाडू मोदक खाऊन,

 पुन्हा शेपमधे येणे आहे 

 दररोज जिमला जावून !

*

आपण जाताच घरी

मखर होईल सुने सुने,

माफी असावी गणराया

झाले असेल अधिक उणे !

झाले असेल अधिक उणे !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? संपदा☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त : केशवकरणी)

सोनसळी ते रान जाहले भरले दाणे कुणी

लोंबले तुरे टपोरे तृणी

*

निर्माता तो या सृष्टीचा अगाध लीला खरी

तोचि बघ उदरभरण हो करी

*

सूर्य उगवतो प्रकाश देतो जलधारा बरसती

वावरे मोदभरे डोलती

*

पर्वत शिखरे नद्या धबधबे सागराची भरती

सर्व ही त्या एकाची कृती

*

वृक्ष लता अन् तृणपुष्पे ही देवाची लेकरे

मानवा तुझ्याचसाठी बरे

*

घाव कशाला घालतोस तू जाळतोस जंगले

कळेना काय तुला जाहले

*

बंधुत्वाचा भाव असूदे तुझ्या मनी रे सदा

जपावी निसर्ग ही संपदा

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पितृपक्ष…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – पितृपक्ष…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार ! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध ! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान !

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाडे गेले इमल्या गेल्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ वाडे गेले इमल्या गेल्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

वाडे गेले इमल्या गेल्या

काही वास्तू दुर्लक्षित झाल्या 

मोक्याच्या ठिकाणच्या वास्तू

पाडून तिथे सदनिका झाल्या

*

वाड्यातला लळा जिव्हाळा

वडीलकीचा रुबाब आगळा

नात्यामधली ऊब नी माया

त्यावर बसला सारा धुरळा

*

गायी गुरांचे हंबर घुमती

दुधा तुपाची गेली श्रीमंती

काळाचा हा महिमा दाखवी

दुरावली सारी नातीगोती

*

 काळासह चालायचे तर

 मान्य करावे होईल ते ते

 जडण घडण घराची बदले

 मानसिकता का उगा बदलते

*

 सदनिका असो वा छोटे घर

 माणूस वसतो त्यात निरंतर

 वागण्यातले बोलण्यातले

 वाढत जाते कशास अंतर?

*

 जो तो पाही आपल्यापुरते

 मी माझे अन आमच्या पुरते

आई बापही अडचण होई

 संस्कार संस्कृती मागे पडते 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झुल्यावरी ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? झुल्यावरी ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

अशी झोकात झुलते झुल्यावरी 

तनाचा झोका येई मनावरी |

मन हे धावे म्होर पाठी 

वर खाली ते होतंय उरी||

*

 मोद झुळूक अंगावरी

भय मग दावी कशापरी|

मिटले नयन घट्ट तरी

खळबळ का हात धरी ||

*

दोलायमान होई क्षिती

चंद्र सूर्य ते घ्यावे करी |

आनंदाच्या या लहरीवरी

हेलकावे ते कितीतरी ||

*

झाकोळ येई नेत्रा म्होरी 

झंकारे वीणा कशी शिरी|

झोक हा जाई भूमीवरी

सावर तू मला येते घेरी ||

*

पाठीशी उभा तू माझ्या राही 

हळूच कर तो धरसी करी|

तुझ्या सवे या हिंदोळ्यावरी

मनात उठती भाव सरी ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – विसर्जन…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – विसर्जन…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

गौरी महालक्ष्मी | झाले आगमन |

सुखावले मन | सणासुदी ||१||

विदर्भात लक्ष्मी | कोकणात गौरी |

येती घरोघरी | आगत्याने ||२||

माहेर वाशीण | सोन पावलांत |

आली आनंदांत | भेटावया ||३||

महालक्ष्मी गौरी | अखंड सावध |

असुरांचा वध | रक्षणासी ||४||

गौराई सजते | विविध रूपात |

वसे मखरात | आशिर्वादा ||५||

सुवासिनी हाती | मंगल पूजन |

नैवेद्य भोजन | भक्तीभावे ||६||

डोळे पाणावती | येता विसर्जन |

विराहत मन | निरोपासी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कुणाला काय सांगावे ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ कुणाला काय सांगावे ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कुणाला काय सांगावे !

कुणाला काय बोलावे !

सनातन संस्कृतीसाठी

आता आयुष्य तोलावे .

*

विश्वविख्यात हा धर्म

तयाची संस्कृती मोठी

तीला सुरूंग लावाया

किती चालल्या लटपटी

*

स्वतःहून देश हा मोठा

देशाचा धर्मही मोठा

खुर्चीसाठी देश पणाला

लावणार्यांचा नाही तोटा 

*

 डोळे उघडून वागायाला

 शिका आतातरी व्हा जागे

 देशाला कुरतडणार्यांना

 लोकशाहीने खेचू मागे

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सांग पावसा सांग मला… ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सांग पावसा सांग मलासौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सांग पावसा सांग मला

काय देऊ मी सांग तुला

फुललेला तू ऋतू दिला

रंग गुलाबी फुला फुला

*

पाकळी मजला मोहविते

कळी कळी उमलून देते

हिरव्या हिरव्या पर्णपाचुच्या

देठासंगे घेई झुला

सांग पावसा……

*

कधी मी बावरुनी जाते

गोड खळी गाली येते

प्रेम झुल्यावर घेताना

हिंदोळा हा खुला खुला

सांग पावसा……..

*

अवचित लाली आलेली

सर ओलेती न्हालेली

कुंतलात मग अलगद माळून

छेड छेढतो कानडुला

सांग पावसा………..

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print