सुश्री नीलांबरी शिर्के
☆
एकरंगी रंगात रंगुनी
नवदुर्गेचे पुजन करा
श्रीसुक्त लक्ष्मीस्तोत्र
देवीचे जपजाप्य करा
*
एकरंगी वस्त्रे लेऊन
नको फक्त फोटोसेशन
सनातनी उत्सव मोठा
करूया धर्मवर्धीत वर्तन
*
वरवरच्या प्रसाधनाहून
आचरणी भक्ती मोठी
नवदुर्गेच्या नव रूपांची
नावे असोत आपल्या ओठी
*
नवरात्रीची नऊ रूपे ही
स्त्री वाढीची रूपे असती
कौमार्य ते परिपूर्णता
या रूपातून दर्शन देती
*
नारीशक्तीच्या या रूपाला
अंतःकरणी जपून घ्यावा
फक्त सनातन धर्मच जपतो
सणांमधून हा अमुल्य ठेवा
*
मोल सणांचे जाणून घेऊ
इव्हेंट नको दुर्गोत्सव हा
नवरूपातील देवी पुजुनी
नंतर दांडियात गर्क व्हा
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के