सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
🌹 मार्जाराचे आर्जव 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
आज माझी प्रिय सखी
बसे उंच मजवर रागावून,
अपराध काय घडे माझा
नकळे माझ्या हातून !
*
करुनी तुझी प्रेमाराधना
रग लागली हाता पाया,
वाकुल्या दावीत गवाक्षात
सावरून बसलीस काया !
*
मधू इथे आणि चंद्र तिथे
चालती प्रेमचाळे मानवात,
डोळे मिटून दूध पिणारी
असे आपली मार्जार जात !
*
बघता फासला दोघातला
विरह संपेल तव उडीत,
मिलन होता दोघे चाखू
गोडी प्रणयाची थंडीत !
…… गोडी प्रणयाची थंडीत !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
मकर संक्रांती…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
मकर राशीत | रवीचे भ्रमण |
तेजाचे कंकण | मकरेला ||१||
*
पुत्र शनी घरी | पिता आगमन |
पंचागाचे पान | ग्रहयोग ||२||
*
मकर संक्रांती | आकाशी पतंग |
तिळगुळ संग | गोडव्यासी ||३||
*
तिळगुळ घेत | गोड बोला मुखी |
रहा तुम्ही सुखी | जीवनात ||४||
*
भारत वर्षात | अनन्य महत्व |
सांस्कृतिक सत्व | जपतांना ||५||
*
सुवासिनी करी | सुगडी पूजन |
तन मन धन | संसारात ||६||
*
निसर्गाशी आहे | सुसंगत सण |
हिंदूंच जगणं | संस्कारांनी ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री नीलांबरी शिर्के
☆
रविराजाच्या रथाला
प्रकाशाचे शुभ्र अश्व
रथ जाई पुढे तसे
जागे होई सारे विश्व
*
गोपुरात घंटानाद
घराघरातून स्तोत्र
किरणात चमकते
सरितेचे शांत पात्र
*
कुणब्याचे पाय चाले
शेत वावराची वाट
झुळुझुळू वाहताती
पिकातुन जलपाट
*
सुवासिनी घालताती
माता तुळशीला पाणी
सुखसौख्य मागताती
वैजयंतीच्या चरणी
*
शुभ शकुनाने होई
दिन सनातनी सुरू
रविराजाला वंदता
पंचमहाभूता स्मरू
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
राजमाता जिजाऊ…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
स्वराज्याची जननी,
राजमाता जिजाऊ!
थोरवी त्यांची आज,
सारे मिळून गाऊ!
*
जाधवांची होती कन्या,
शुर आणि कणखर!
भोसल्यांची झाली सून,
कर्तव्यात होती तत्पर!
*
तीनशे वर्षाची होती,
काळीकुट्ट अमावस्या!
माय भवनीला साकडे
घातले, केली तपस्या!
*
पराक्रमी पुत्र शिवाजी,
येई जन्माला पोटी!
स्वराज्याचे बाळकडू
पाजले त्याच्या ओठी!
*
तावून सलखून केले,
संस्कार शिवबावर!
सोळाव्या वर्षी केला,
तोरणा किल्ला सर !
*
एक एक मावळ्यावर,
केली त्यांनी माया!
पाठीशी उभे ते राहिले,
बळ दिले शिवराया!
*
तीन तपे देव मस्तकी,
धरून केला हलकल्लोळ!
साऱ्या मुघलांनी घाबरून,
काढला स्वराज्यातून पळ!
*
स्वराज्याची गुढी उभारली,
हिंदवी स्वराज्य स्थापन केले!
दहा दिशातून अरुणोदय झाला,
छत्रपती शिवाजी महाराज झाले!
*
धन्य ते शिवाजी महाराज,
धन्य राजमाता जिजामाता!
त्यांच्या मुळेच हिंदुस्थानात,
हिंदूधर्म अभिमानाने पहाता!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री सुहास सोहोनी
चित्रकाव्य
– स्थितप्रज्ञ –
☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
वर्षे सरली, युगे उलटली,
काळ किती लोटला
स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत
शिलाखंड एकला
सजीव प्राणी पक्षी त्यांसी
स्वर्ग, नरक अन् मोक्ष
निर्जीवांसी गति न कोणती
केवळ अस्तित्व
घडले नाही कधीच काही
उबूनि गेला जीव
अंतर्यामी आंस उठे परि
जिवास भेटो शिव
शिल्पकार कुणि दैवी यावा
व्हावी इच्छापूर्ती
अंगांगातुन अन् प्रकटावी
सुबक सांवळी मूर्ती
मोक्ष हाच अन् हीच सद्गती
निर्जीवाचे स्वत्व
छिन्नीचे घन घाव सोसुनी
लाभतसे देवत्व…
☆
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चित्रकाव्य
खरं सुख … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री ए. के. मराठे ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
( १ )
एकमेकांची सोबत
हेच असतं खरं सुख
सोबत असल्यावर
सहज पेलवतं दुःख
*
जन्म गाठ बांधली की
बांधलकी येते आपसूक
विश्वासाची उशाला मांडी
उघड्यावर मिळे झोपसुख
*
खडतर कितीही असो वाट
हातात साथ देणारा हात
चालण्याची उमेद मिळते
यश येतच मग टप्प्यात
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆ ☆ ☆ ☆
( २ )
लोड, तक्क्ये हवेत कशाला
तुझी मांडी असतांना ??
सुख वेगळं काय हवंय
तुझी सोबत असतांना !!
☆ ☆ ☆ ☆
कवी : श्री ए के मराठे
कुर्धे, पावस, रत्नागिरी
9405751698
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
संध्याकाळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
पैलतीर दिसे
संध्या समयी
ऐकू येते बघ
मंजूळ सनई…
*
थकला भास्कर
जाई अस्तास विसावया
आपुले बिंब पाहूनी
लागला हसावया…
*
सुख दु:खाच्या
लाटांवरी जणू
सैरभैर मन
पैलतीराची ओढ जणू…
*
निरव शांतता
चलचित्र आठवांचा
साद घाली पैलतीर
शाश्वत आनंदाचा…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
जपावी वाचन संस्कृती…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
पुस्तकांचा मेळा | पुण्य नगरीत |
वाचनाची रीत | जगवाया ||१||
*
वाचन संस्कृती | वाढवते ज्ञान |
घालवी अज्ञान | माणसाचे ||२||
*
ग्रंथ हेच गुरु | बिंबवले मनी |
वाचुनिया ज्ञानी | घडवाया ||३||
*
प्राचीन भारत | प्रसिद्ध नालंदा |
ग्रंथांची संपदा | अगणित ||४||
*
आधुनिक जग | झालं डिजीटल |
ग्रंथांकडे कल | उदासीन ||५||
*
प्रकाशन झाला | आतबट्टा धंदा |
व्यवहारी वांदा | परिस्थिती ||६||
*
सुज्ञ वाचकांनो | जपावी संस्कृती |
वृद्धिंगत मती | वाचनाने ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के