सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री अपर्णा परांजपे
चित्रकाव्य
विश्वनियंता… ☆ सुश्री अपर्णा परांजपे
☆
शांत, प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे….
*
आकर्षणाचा केंद्रबिंदू हा महाविष्णु पहुडला जरा
नेत्राला दिसताक्षणी हा माया कोलाहल विरला….
*
आदीशक्ती महालक्ष्मी सावरि भार जगताचा.
बालक होऊन भक्त बोलती गजर आदीमायेचा ….
*
विचार आता कसला करता विश्वाच्या संहाराचा?
“माझे कार्य सृजनाचे, विचार करतो भक्तांचा”…
*
“दयानिधी” हे नाव सार्थकी करणे माझे वचन असे
प्रेमाचे हे कार्य अविरत निद्रा जरि मम भासतसे….
*
सर्जन माझी धरा तशी सागर, पर्वत ह्या सरिता
मनुष्य प्राणी दुखवित मजशी त्रस्त करितसे मम गात्रा…
*
भाविक भक्त जन माझे हे कृतार्थ करिती मम हृदया
चिंतन त्यांचे करून होतसे मोदमय विश्राम सख्या…
*
आत्मशक्तीचे भान ठेवुनी गातिल गीते मम भक्त
हीच शांतता, असिम निळाई मिळे बालका अनुरक्त…
*
एक वचन हे, हाच धर्म ही पालन त्याचे मी करतो
ह्या वचनांवर जो विसावे रक्षण त्याचे मी करतो….
*
स्वधर्म पालन करण्यासाठी उत्पत्ती चे हे काम
पूर्ण करोनी ये तू सखया त्यासाठी हा विश्राम …
*
आस असे ही भेटीची रे जशी तुला मजही तशी
बालक हा असा बघोनी आठवती मज चकोर शशी
*
जाणिव माझ्या या लीलांची ज्या सद्भक्ता होत असे
त्या साठी विश्राम समज हा वाट सतत मी पहात असे…
*
शांत प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
… विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
– काय पावसा…–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
काय पावसा,
मुक्काम वाढवलास तू.
दसऱ्याला सीमोल्लंघन करता करता,
दिवाळीसाठी थांबलास तू.
काय पावसा,
शेतात पिकवलं होतंस तू.
तोंडात घास देता देता,
असं कसं हिसकावलंस तू.
काय पावसा,
तहान भागवलीस तू.
धरण भरता भरता,
काठ वाहून नेलास तू.
काय पावसा,
छान बरसला होतास तू.
पाय काढता काढता,
थयथयाट केलास तू.
काय पावसा,
सारं हिरवंगार केलंस तू.
पण.. उन्मत्त होऊन कोसळता कोसळता,
डोळ्यात पाणी आणलेस तू.
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री नीलांबरी शिर्के
☆
अंधार वाढतो आहे
नीत डोळे उघडे ठेवा
भिववितो बंद डोळ्यांना
तो अंधाराचा कावा – –
*
बंद पापण्या आत
स्वप्नांचा असतो गाव
कणभरही भीती नसते
धाबरण्या नसतो वाव – –
*
अंधारी डोळे मिटले
मन बागलबुवा होते
मग उगा भासते काही
जे अस्तित्वातच नसते – –
*
सरावता अंधारा डोळे
अंदाज बांधता येतो
अंधारात वावरायाला
तो साथ आपणा देतो – –
*
अंधार भोवती फिरतो
वेगळाली घेऊन रूपे
हिमतीचा प्रकाश असता
होते मग सार सोपे – –
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
कोजागिरी पौर्णिमा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
उजळे कृत्रिम प्रकाशाने
राजाबाईचा टॉवर सुंदर,
देवी सरस्वतीचा वरदहस्त
त्याच्या कायम शिरावर !
*
उभा थोड्या अंतरावर
ई. सी. जी. अर्थव्यवस्थेचा,
होती रावाचे रंक मोहाने
सल्ला देतो तुम्हां मोलाचा !
*
चमके गगनात दोघांमधे
कोजागिरीचा शुभ्र शशी,
सुंदर नजारा चंद्रकिरणांचा
अंधाऱ्या निळ्या आकाशी !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– गंधित समीर चैतन्याचा…–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
प्रकाश मांगल्य ! दिवाळीचा सण !
राहो आठवण ! वर्षभर !!१!!
*
सवत्स धेनूचे ! मंगल पूजन !
करती सज्जन ! भक्तीमय!!२!!
*
धन्वंतरी वंदय ! वैद्यकीय सेवा!
आरोग्याचा ठेवा ! आयुर्वेद !!३!!
*
अभ्यंग स्नानाने ! देह मन शुद्ध !
अष्टलक्ष्मी बद्ध! कृपा दृष्टी !!४!!
*
बली प्रतिपदा! मंगल पाडवा !
नात्यात गोडवा! वृद्धिंगत !!५!!
*
बहीण भावाचा! दिन भाऊबीज!
नाती सुख चीज! ओवाळणी !!६!!
*
बिब्बा दीपावली ! सारती तिमिर !
गंधित समीर ! चैतन्याचा !!७!!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
शुभ दीपावली…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
दीपावली आला हा पवित्र सण!
आनंदाने साजरा करूया आपण!
*
श्री गणेश कृपेने मिळू दे सद्बुद्धी!
सरस्वती कृपेने होऊ दे ज्ञानात वृद्धी!
*
ज्ञानाचा दीप अखंड उजळू दे!
अज्ञानाचा तिमिर दूर जाऊ दे!
*
धन्वंतरी कृपेने सुदृढ राहू दे आरोग्य!
निरोगी दीर्घायुष्याचे लाभू दे सौभाग्य!
*
लक्ष्मी कृपेने मिळे दे धन!
आत्मकृपेने शुद्ध राहू दे मन!
*
हातून घडू दे सदैव शुभ कर्म!
शुद्ध अचारणाने रक्षु दे स्वधर्म!
*
किर्ती वाढून मिळू दे समाजात मान!
हातून राखला जाऊ दे सर्वांचा सन्मान!
*
प्रगती साधण्यासाठी सार्थ होवो दे कष्ट!
विश्वगुरू होऊ आपण बलवान करू राष्ट्र!
*
व्यक्ती, कुटुंब,जात,धर्म या पेक्षा श्रेष्ठ देश!
राष्ट्र अभिमान बाळगावा बहरू दे उन्मेष!
*
दीपावलीच्या या शुभेच्छा देई हा आशिष!
ईश्वर कृपा परमात्म्याचे राहो शुभाशिष!
*
शुभ दीपावली 🪔🏮🙏
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डॉ. माधुरी जोशी
चित्रकाव्य
झिरमिळता प्रकाश…
डॉ. माधुरी जोशी ☆
☆
अजून अंधारात विश्व
गर्द काळोखाची दाटी
तरी देखील कुठे कुठे
झिरमिळता प्रकाश भेटी
*
कुठे नाद फटाक्यांचा
आणि फुटती प्रकाशरेषा
आवाजाने भयभीत
मूक मधुर पक्षी भाषा
*
कितीही होवो झगमगाट
कितीही लखलख घरी बाजारी
पहाटेची गुलाबी आभा
सांगे आली सूर्याची स्वारी
☆
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री अपर्णा परांजपे
चित्रकाव्य
भगवंत हृदयस्थ आहे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे
☆
तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा
मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…
*
“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात
“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..
*
अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात
कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..
*
सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा
तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…
*
महाजन, साधू संत सज्जन काय वेगळे असे तिथे?
प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…
*
“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।
वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…
*
निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता
आतच होता, आहे, असशी
जाणीव याची तू देता…
*
कृतार्थ मी अन् कृतार्थ तू ही
जन्माचा या अर्थ खरा
आनंदाचा कंद खरा तू
(मम)हृदयाचा आराम खरा…
*
कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या
अयोनिसंभव बीज अंकुरे
सात्विक, शुद्ध हृदयी सख्या..
*
प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा
प्राणांवर अधिराज्य तुझे रे
केशव देतो (जसा) प्रिय पार्था…
*
आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे
त्याच शक्ती ने जाणीव होते भगवंत असे जेथे…
*
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– वसुबारस …–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
सवत्स धेनूचे | प्रथम पूजन |
करूया वंदन | दिवाळीत ||१||
*
गाय सर्वश्रेष्ठ | हिंदू शिकवण |
धर्म आचरण | वदंनाने ||२||
*
बहु उपयोगी | असते ही गाय |
फक्त पशु नाय | धर्म सांगे ||३||
*
गाईवर श्रद्धा | तेहतीस कोटी |
देव तिच्या पोटी | पृथ्वीवर ||४||
*
पशुधन दारी | गाय हंबरते |
वंश वाढवते | शेतीसाठी ||५||
*
गोमाता वात्सल्य | वासराशी लळा |
नात्यात जिव्हाळा | नैसर्गिक ||६||
*
वसुबारसचे | जाणावे महत्व |
मातेचे ममत्व | लेकरासी ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈