💐 अट्टहास के प्रधान संपादक श्री अनूप श्रीवास्तव जी नहीं रहे – विनम्र श्रद्धांजलि 💐
अभी हम स्मृति शेष जय प्रकाश पांडे जी के अवसान से उबर भी नहीं पाए और एक और दुःखद समाचार मिला. य़ह व्यंग्य के क्षेत्र की अपूरणीय क्षति है.
अभी नवंबर 24 में कादम्बरी सम्मान समारोह में अनूप जी जबलपुर आए थे तब 3 दिन स्मृति शेष व्यंग्यकार श्री जय प्रकाश पांडे जी तथा मैं उनके साथ रहे और अट्टहास पत्रिका हम लोगों को सौंप कर वे निश्चिंत होना चाह रहे थे। इस बाबत उन्होंने हम लोगों से गहन चर्चा भी की थी. इसके साथ ही व्यंग्य की स्थिति और उसके उन्नयन पर बहुत ही सार्थक चर्चा की. 10 नवम्बर 24 को एक भव्य आयोजन में उन्होंने जबलपुर के व्यंग्यकारों को अट्टहास और माध्यम परिवार की ओर से व्यंग्य गौरव अलंकार से सम्मानित किया था. आप अपनी अगली पीढ़ी को व्यंग्य की बारीकियां समझाते और उन्हें अपनी पत्रिका में स्थान भी देते थे.
व्यंग्य के प्रकाश पुंज को ईश्वर अपने श्री चरणों में स्थान दें.
प्रस्तुति – श्री रमाकांत ताम्रकार, जबलपुर
💐 ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से स्मृतिशेष अनूप श्रीवास्तव जी को विनम्र श्रद्धांजलि 💐
– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ. शैलजा करोडे यांचा “माणुसकी“ हा कथासंग्रह आणि “हुंकार काळजाचा“ हा कवितासंग्रह — अशी दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
यासाठी डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या यापुढील अशाच समृद्ध साहित्यसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा.💐
आजच्या अंकात करून घेऊ या त्यांच्या “माणुसकी“ या कथासंग्रहाचा परिचय — “पुस्तकावर बोलू काही“ या सदरामध्ये.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉ. ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को बाल साहित्य कार्यों के लिए मिला मानद डॉक्टरेट – अभिनंदन ☆
प्रसिद्ध बाल साहित्यकार डॉ. ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ को उनके उत्कृष्ट योगदान के लिए विश्व संस्कृति और पर्यावरण संरक्षण आयोग द्वारा मानद डॉक्टरेट से सम्मानित किया गया है। डॉ. क्षत्रिय को यह सम्मान बाल साहित्य के क्षेत्र में उनके अद्वितीय योगदान और समाज सेवा के लिए दिया गया है। उनकी कई बाल पुस्तकें बच्चों के बीच बेहद लोकप्रिय हैं और उन्होंने बच्चों के मन में पढ़ने की आदत डालने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।
डॉ. क्षत्रिय ने न केवल बाल साहित्य के माध्यम से बल्कि विभिन्न सामाजिक कार्यों के माध्यम से भी समाज सेवा की है। उन्होंने कई सामाजिक संगठनों के साथ मिलकर काम किया है और जरूरतमंद लोगों की मदद की है।
विश्व संस्कृति और पर्यावरण संरक्षण आयोग के निदेशक मंडल ने डॉ. क्षत्रिय के कार्यों को देखते हुए उन्हें यह सम्मान देने का निर्णय लिया। आयोग का मानना है कि डॉ. क्षत्रिय ने बाल साहित्य और सामाजिक कार्यों के क्षेत्र में एक मिसाल कायम की है।
इस अवसर पर डॉ. क्षत्रिय ने कहा, “मुझे यह सम्मान मिलना मेरे लिए बहुत बड़ी बात है। मैं इस सम्मान को समर्पित करता हूँ अपने सभी पाठकों को, जिन्होंने हमेशा मुझे प्रेरित किया है।”
ई- अभिव्यक्ति परिवार की ओर से श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ जी को इस विशिष्ट उप्लब्धि के लिए हार्दिक बधाई
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखक व कवी डाॅ. प्रा. प्रवीण जोशी यांना कोकण मराठी परिषद, गोवा यांचेकडून त्यांचे साहित्यिक कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना म्हापसा येथे आयोजित करण्यात आलेल्या विसाव्या शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला आहे.
तसेच, ‘ मराठी का शिकावी ‘ या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल ई अभिव्यक्ती समुहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका राधिका भांडारकर यांना तितिक्षा इंटरनॅशनल साहित्य समुहाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
तितिक्षा इंटरनॅशनल साहित्य समुहातर्फे आयोजित गणेशोत्सव २०२४ या दैनंदिन काव्यस्पर्धेत १६/०९/२०२४ दिवशीच्या त्यांच्या गिरीजात्मज या भक्तीगीतास सर्वोत्तम पुरस्कार मिळाला आहे. तसेच तितिक्षा ईंटरनॅशनल पुणे आयोजितदैनंदिन दशदिवसीय, आदिमाया आदिशक्ती या काव्यस्यर्धेत घटस्थापना या काव्यास विशेष पुरस्कार मिळाला आहे. शिवाय तितिक्षा ईंटरनॅशनल पुणे, बाबा काव्यस्पर्धेत (२०२४) त्यांच्या माझे बाबा या कवितेस लक्षवेधी कविता म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
राधिका भांडारकर यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचे ई अभिव्यक्ती समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या दशकपूर्ती संमेलनात आयोजित बक्षीस समारंभात आपल्या समुहातील ज्येष्ठ कवयित्री सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
१) गणेशोत्सवानिमित्त दहा दिवसीय विशेष काव्यलेखन स्पर्धा — भावस्पर्शी पुरस्कार
२) नवरात्रीनिमित्त आदिमाया आदिशक्ती काव्यलेखन महोत्सव – दहा दिवसीय विशेष काव्यलेखन स्पर्धा — तृतीय क्रमांक
दोन्ही स्पर्धांमध्ये दहा दिवस वेगवेगळे विषय आणि वेगवेगळा काव्यप्रकार लिहायचा होता. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
✒️✒️
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दिल्ली येथे आयोजित केलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झालेली आहे. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे. त्या उतम वक्त्या, लेखिका, नाट्यप्रेमी व नाट्य अभ्यासिका आणि संशोधिका आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. लिहिण्या- बोलण्यातील नेमकेपणा आणि ठाशीवपणा हे त्यांचे वैशिष्ट्य.
ई-अभिव्यक्तीवरून दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यांची मुलाखत क्रमश: ५ भागात प्रसारित केली होती. त्यांच्या निवडीबद्दल ई-अभिव्यक्तीच्या सर्व सभासदांना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन उत्कृष्टपणे पार पडणार यात शंकाच नाही. त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि संमेलनासाठी शुभेच्छा.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पाथेय साहित्य कला अकादमी का आयोजन – डॉ. तनूजा चौधरी को मिला डॉ. गायत्री कथा सम्मान ☆ साभार – डॉ भावना शुक्ल ☆
पाथेय साहित्य कला अकादमी का आयोजन – समाजोपयोगी होता है मूल्य परक सृजन…
जबलपुर। डॉ. तनूजा चौधरी का समग्र लेखन सामाजिक संचेतना का प्रतीक है। उनकी कहानियॉ नई पीढ़ी के भटकाव समाज और जीवन की बिडम्वना, स्त्री अस्मिता के प्रति चिंता प्रकट करती हैं। कथा लेखिका स्व. डॉ. गायत्री तिवारी की रचनाओं में भी ऐसा ही प्रेरक प्रभावी चिंतन है। डॉ. तिवारी ने समाज के अंतिम वर्ग की रक्षा के लिए सृजन किया।ऐसा सृजन जिससे सामाजिक जागृति और मूल्यों की रक्षा हो,वह समाज और राष्ट्र के लिए उपयोगी होता है।
तदाशय के उद्गार पाथेय साहित्य कला अकादमी द्वारा आयोजित गायत्री कथा सम्मान समारोह में अतिथियों ने कला वीथिका व्यक्त किए। वर्ष 2024 के गायत्री कथा सम्मान से डॉ. तनूजा चौधरी को नगद राशि अलंकरण, मानपत्र, शाल से अतिथियों सहित डॉ. भावना शुक्ल, प्रेमनारायण शुक्ल, नोएडा, डॉ. कामना कौस्तुभ, जगदीश कन्थारिया, किशनगढ़, डॉ. हर्ष तिवारी, मोहिनी तिवारी, आराध्या तिवारी ‘प्रियम’ ने सम्मानित किया।
इस अवसर पर विविध क्षेत्रों में क्रियाशील श्री राजेन्द्र मिश्रा, श्री नीलेश रावल, डॉ. नीना उपाध्याय, इंजी दुर्गेश व्यौहार दर्शन, श्री समर सिंह, डॉ. मंजू गोरे, दीपचंद विनोदिया, मेहेर प्रकाश उपाध्याय, रामकिशोर सोनी को उनकी बहुआयामी सेवाओं एवं उपलब्धियों के लिए गायत्री विविधा सम्मान से अलंकृत किया गया। साथ ही ब्राह्मण स्वयंवर संस्कार महासभा एवं सुप्रभातम संस्था के पदाधिकारियों को सामाजिक जागृति के लिए सम्मानित किया।
डॉ राजेश पाठक प्रवीण ने सम्मानितजनों के व्यक्तित्व-कृतित्व पर प्रकाश डाला।
समारोह की मुख्य अतिथि डॉ. स्वाति सदानंद गोडवोले पूर्व महापौर रहीं। अध्यक्षता महाकवि आचार्य भगवत दुबे ने की। सारस्वत अतिथि डॉ हरिशंकर दुबे, डॉ. स्मृति शुक्ला प्राचार्य मानकुंवर महाविद्यालय थीं।
अध्यक्षता कर रहे महाकवि आचार्य भगवत दुबे ने कहा कि सम्मान देना संस्कारधानी की गौरवशाली परम्परा है। इससे सकारात्मक कार्यों की प्रेरणा मिलती है।
प्रारंभ में अतिथियों का स्वागत मथुरा जैन, यशोवर्धन पाठक, सुभाष शलभ, संतोष नेमा, विजय अनुज, विनोद नयन, गणेश प्यासा, अर्चना मलैया, डॉ सलमा जमाल, छाया त्रिवेदी, सलपनाथ यादव, साधना उपाध्याय, निर्मिला तिवारी, डॉ.मृदुला सिंह, डॉ छाया सिंह, डॉ. संजय तिवारी, गणेश प्यास, डॉ. सलपनाथ यादव, ने किया। संचालन राजेश पाठक प्रवीण एवं आभार डॉ. भावना शुक्ल ने व्यक्त किया।
साभार – डॉ. भावना शुक्ल
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
☆ 💐 अभिनंदन 💐 सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी – आणि त्यांची एक कविता. ☆
दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील “कवी-कट्टा” साठी आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांच्या कवितेची निवड झाली असून, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी या ‘ कवि-कट्टा ‘ मध्ये कविता-सादरीकरणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
“माझी माय मराठी“ ही त्यांची कविता त्यासाठी निवडली गेली आहे. विशेष सांगायचे म्हणजे कविता – सादरीकरणाच्या या खास कार्यक्रमासाठी एकूण १३४६ कविता प्राप्त झाल्या होत्या व त्यापैकी फक्त ३०० कवितांची निवड करण्यात आली आहे, आणि त्यात दीप्तीताईंची ही कविता आहे. ही त्यांच्यासाठी आणि आपल्या समूहासाठीही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे.
— आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या विशेष सादरीकरणासाठी असंख्य शुभेच्छा. आणखी एक विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करण्याची अशी संधी त्यांना तिसऱ्यांदा मिळते आहे… या ‘हॅटट्रिक’ साठीही त्यांचे खूप अभिनंदन.
आजच्या अंकात वाचू या त्यांची ही विशेष कविता…
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ माझी माय मराठी ☆
☆
माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ ||
*
कवितेसह हर्षे येते
भारुड,गवळण गाते
पोवाड्यांतुनी ही रमते
ओव्यामधुनी ती सजते ||१||
*
विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ||२||
*
कधी कादंबरी ही बनते
अन शब्दांसह डोलते
भेदक ,वेधक ती ठरते
सकलांना काबिज करते ||३||
*
लालित्ये ही मांडते
संवादानी उलगडते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते ||४||
*
सारस्वतांसी जी स्फुरते
विश्वाला स्पर्शही करते ||
☆
कवयित्री : दीप्ती कोदंड कुलकर्णी, हैदराबाद.
Mobile No-9552448461.
💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सुश्री दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈