सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
सौ. मनीषा रायजादे पाटील – अभिनंदन
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
ई–अभिव्यक्तीच्या लेखिका, कवयत्री सौ. मनीषा पाटील रायजादे यांच्या काव्यमनीषा या कवितासंग्रहाचे प्रकाशन १२ सप्टेंबर रोजी प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी झालेल्या परिसंवादात श्री. सुधाकर ईनामदार, दयासागर बन्ने,व ई – अभिव्यक्तीचे लेखक श्री आनंद हरी आणि सौ मनीषा पाटील यांचा सहभाग होता. ई – अभिव्यक्तीतर्फे सौ. मनीषा पाटील रायजादे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. – संपादक मंडळ, ई – अभिव्यक्ती
आजच्या अंकात वाचा सौ. मनीषा पाटील रायजादे यांची कविता
घे जरासे
शृंगार आज केला निरखून घे जरासे
ओल्या मिठीत आता झिरपून घे जरासे
श्वासात श्वास माझे बेधुंद होत गेले
ओठास ओठ माझे बिलगून घे जरासे
बेभान मोग-याच्या फुलल्या कळ्या सुगंधी
गंधीत या क्षणाना कवळून घे जरासे
गंधाळल्या फुलांच्या त्या पाकळ्या गुलाबी
स्पर्शातले तराणे समजून घेऊ जरासे
फुलवित नभात माझ्या ही रात चांदण्याची
अधरातले उसासे समजून घे जरासे
(काव्यमनीषा काव्यसंग्रहातून)
मनीषा रायजादे-पाटील
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈