सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ अभिव्यक्ती शतकपूर्ती☆
अंतरीचे भाव सारे शब्द येथे मांडती
कल्पनेचे वेल येथे शब्दसुमने सांडती
लेखणीच्या रूपाने नांदते श्रीसरस्वती
शतक करते पूर्ण,आपली ‘अभिव्यक्ती’
15.08.2020 ✒✒ 22.11.2020
स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहुर्तावर ई-अभिव्यक्ती च्या स्वतंत्र मराठी आवृत्ती ला सुरूवात केली.
बघता बघता शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात नवनवीन सदरे सुरू झाली. नवनवीन लेखक, कवी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अंक सर्वांग सुंदर बनवला. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिक्रियां वरून हे स्पष्ट होत आहे. असेच सहकार्य लाभत जावो आणि ‘अभिव्यक्ती’ बहरत जावो, ही संपादक मंडळाची अपेक्षा.!
आभार
संपादक मंडळ
मुख्य संपादक तथा मराठी आवृत्ती संपादक मंडळ.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈