☆ आनंद रंगरेषांचा – मधुबनी शैली/ पेंटिंग ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
चित्रकला हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. ज्या वेळी भाषा विकसित झाली नव्हती तेव्हा आदिमानव आपल्या भावना चित्राच्या माध्यमातून व्यक्त करीत होता. अश्मयुगातील गुहाचित्रातून हे स्पष्ट झाले आहे. आज ही चित्रकला आदिवासी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. लोककलेची ओळख करून घेऊ.
आबालवृद्धांना चित्र पाहणे आवडते. सरळ साधी सोपी चित्रे सहज समजतात.त्या चित्रातील रंग आकर्षक असतील तर ती चित्रे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. मधुबनी शैलीची चित्रे सर्वांग सुंदर आहेत.त्यातील विषय,आशय, रंग बघताक्षणी आपल्या खिळवून ठेवतात.
मधुबनी पेंटिंग हा बिहारचा सांस्कृतिक ठेवा आहे.हा चित्र प्रकार सुंदर आहे.ही चित्रे छान तेजस्वी रंगात रंगवलेली असतात. रेखांकन मुक्त असते. पाने, फुले, पक्षी, प्राणी, मासा, देवदेवता, किती सहजतेने काढलेली असतात. १९३४ साली बिहार मध्ये मोठा भूकंप झाला तेव्हा या भागाची पाहणी करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी तिथे आला तेंव्हा भूकंपात पडलेल्या घराचच्या भिंती वर सुंदर चित्रे दिसली.त्या चित्राचे त्यांनी फोटो काढले. हे फोटो या चित्र शैलीचे सर्वात जुने नमुने आहेत. ही चित्रे गावातून बाहेर कधी आलीच नव्हती. ही चित्रेशैली आजवर बिहार मधील महिलांनी जोपासली. बिहार मधील काही गावं चा गावं या चित्र शैलीने सजलेली दिसतात. प्रत्येक घरातील चार वर्षाच्या मुली पासून नव्वद वर्षांच्या महिले पर्यत सर्वजण ही चित्रे काढतात. जणू ही चित्र शैली त्यांच्या रक्तातून धावत आहे.
बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यात ही कला विकसित झाली. म्हणून याला मधुबनी पेंटिंग/शैली म्हटले जाते. मधुबनी बरोबर दरभंगा, पूर्णिया, सहसा, मुजक्कापूर व नेपाळचा काही भाग यातून ही चित्रे काढली जातात. ही कला पुरातन काळा पासून प्रचलीत आहे असे मानले जाते. जनक राजाने आपली कन्या सीता हीच्या विवाह सोहळ्याच्या वेळी संपूर्ण राजवाड्यात, गावात ही चित्रे काढून घेतली होती. म्हणून या कलेला मिथिला पेंटिंग/शैली म्हणून ही ओळखली जाते. रामायण काळापासून ही कला चालत आली आहे.
या चित्र शैलीचे दोन प्रकार
१) भिंती चित्रे
२)अरिपन चित्रे
१) भिंतीवर चित्रे काढण्याचे दोन प्रकार पडतात अ) गोसनी म्हणजे देवघराच्या भिंतीवर काढायची चित्रे यात दुर्गा, काली, गणेश, सूर्य, राधाकृष्ण या विषयावर चित्रे. काढतात.
ब) कोहबर म्हणजे शयन कक्ष इथे प्रमुख्याने कमळ,मासा,झाडे, शिवपार्वती,घोडा,सिंह इ.चित्रे रेखाटली जातात.
२)अरिपन म्हणजे रांगोळी. अल्पना ही म्हणतात. घरातील खोलीच्या फरशीवर, अंगणात, सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.त्यात रेषेला जास्त महत्त्व असते.
ही चित्रे काढण्यासाठी बांबूच्या काटक्या, काडेपेटीच्या काड्या यांचा उपयोग होत असे.ही चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो.हळदी पासून पिवळा,पळसा पासून लाल,काजळी पासून काळा,तांदळा पासून पांढरा.
चित्राचे रेखांकन प्रथम काळ्या रंगाने करून घेतले जाते. मग त्यात लाल,पिवळा,हिरवा,निळा हे रंग भरले जातात.बार्डर दुहेरी असते.चित्रातील चेहरे व्दिमित एका बाजूला पाहणारे असतात.ही चित्रे सहज समजतात.त्यांतील भाव कळतात .चित्रे आपल्याशी बोलतात म्हणून तर ही चित्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावून पोहचली.परदेशातून या चित्रांना मोठी मागणी आहे.विशेषत: अमेरिका,जपान.जपान मध्ये मधुबनी कलेचे मोठे म्युझियम आहे.या कलेच्या प्रसार करण्यासाठी १५० महिला कलाकारांनी मधुबनी रेल्वेस्थानक विनामोबदला सुशोभित केले आहे.नंतर दरभंगा, पूर्णिया,सहसा,मुजक्कापुरही रेल्वे स्थानके ही सुशोभित केली.ही कला केवळ महिलांन मूळे जिवंत आहे.आज पर्यंत महिलांनी टिकवली आणि विकसित केली.या चित्राची वाढती मागणी पाहून पुरुष चित्रकार ही आता तयार झाले आहेत.पण या कलेच्या विकासाचे आणि संवर्धनाचे सारे श्रेय महिलांनाच जाते.
मधुबनी चित्रात साधेपणा दिसतो.बघता क्षणी मनाला भावतात.मनुष्य,पशुपक्षी,देवीदेवता, राधाकृष्ण, शिवपार्वती,फळे फुले,शुभचिन्हे,चित्रे काढली जातात.मातीच्या भिंतीवर, कागदावर, काॅन्व्हासवर, पिलोवर ही चित्रे काढली जातात. सीता देवी यांनी ही कला गावातून बाहेर काढली. दिल्लीत चित्रे पाठवली, प्रदर्शने मांडली, लोकांन समोर मांडली. लोकांना चित्रे समजू लागली मागणी वाढू लागली स्थानिक महिलांना रोजगार मिळू लागला.परदेशातील आर्ट गॅलरीत ही चित्रे पोहचली.चित्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली. सीतादेवींच्या या कामाची दखल घेवून त्यांना बिहार सरकारने पुरस्कार देवून १९६९ मध्ये सन्मानीत केले, तर भारत सरकारने १९८४ ला पद्मश्री देवून सन्मानित केले. ही कला विकसित होण्यास जगदंबा देवी,महासुंदरी देवी,बउआ देवी या महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांना ही पद्मश्रीने सन्मानीत केले आहे.
या कलेचे महत्त्व इतके वाढले आहे की स्टेट बॅक ऑफ़ इंडियाने आपले डेबीट कार्ड या चित्राने सुशोभित केले आहे. अनेक रेल्वेचे डबे या चित्राने सजत आहेत.ह्या चित्रातील साधेपण आपल्या आकर्षित करतो.ही कला कलाकारी न राहता आता कारागिरी झाली आहे. अनेक महिला या कलेवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही कला केवळ बिहार ची न राहता भारताचा सांस्कृतिक ठेवा झाली आहे. तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.
आज घरी लक्ष्मीपूजनाची गडबड चालू होती. लक्ष्मीची तसवीर ठेऊन पिवळ्या शेवंतीचा हार घातला. घरातल्या प्रत्येकाने पूजेला आपले पैशाचे पाकीट ठेवले.बँकांची पासबुक्स, चांदीची नाणी, सुवर्ण अलंकार, हळदी कुंकवानं भरलेले करंडे, पाच फळांची परडी, फुले, पंचामृत, धण्याच्या अक्षता, गूळ, पेढे सर्व तयारी जय्यत झाली. आदित्य, माझा मुलगा, सोवळे नेसून, कपाळी केशरी नाम ओढून तयार झाला. नारळ पानसुपारीचा विडा ठेऊन पूजा सुरू करणार, तोच मला आठवण झाली, अरे, तो लाल मखमली बटवा ठेवायचा राहिला की…. मी कपाटातला बटवा आणला आणि पूजेला ठेवला.
रीतसर पूजा झाली. आरती झाली. लक्ष्मीची स्तोत्रे म्हणून झाली. सर्वांनी कुंकू, फुले अक्षता वाहिल्या. तीर्थप्रसाद दिला. लक्ष्मीपूजन छान झाले.
न राहवून आदित्य नं विचारले, ” आई, त्या लाल बटव्यात काय आहे?” मी म्हटलं, ” सांगेन नंतर.”
परवा सहज आदित्य ला आठवण झाली. तेव्हा मी त्याला बटवा उघडून दाखवला.
” दहा रुपयाची नोट आईनं दिलेली.” चेह-यावर प्रश्नचिन्ह घेऊन गडबडीत तो ऑफिसला गेला. पण माझ्या मनातून आज ते दहा रुपये हटेनात. रात्री अंथरूणावर पाठ टेकली तसे सर्व प्रसंग video बघावा तसे डोळ्यांसमोरून सरकू लागले.
ह्यांच्या, ( आदित्य च्या पप्पांच्या) अकाली निधनानंतर मला नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ आणि शिक्षण हे माझं पहिलं कर्तव्य होतं. सुरवातीला अगदी तुटपुंजा पगार ( रू.975/- फक्त) होता. ह्यांच्या पश्चात आलेली रक्कम हात न लावता ठेवायची, असं ठरवूनही वापरावी लागे. माझी एकूण सगळी ओढाताण आई बाबांना न सांगताच समजत असे. आईची तळमळ मला जाणवत होती. बाबा नेहमीप्रमाणे ‘ हेही दिवस जातील, धीर धर, म्हणून पाठिंबा देत होते. ” फिरते रूपयाभवती दुनिया” याचा पावलो पावली प्रत्यय येत होता.
स्वतःच्या मेरीटवर घेतलेलं शिक्षण, मेरिटवर मिळालेली नोकरी, मेहनत करून मिळवलेला पैसाच खरा, तोच आपले चारित्र्य ठरवत असतो. हे आधी बाबांचे आणि नंतर ह्यांचे संस्कार. हाता- तोंडाची जुळवणी करता करता वर्षे उलटली.
आई आजारी होती म्हणून तिला बघायला गेले होते माहेरी. तेव्हा आईनं माझ्या हातात ती पुडी दिली. उघडून बघते तर एक दहा रूपयांची जुनी नोट. काय आई तरी! क्षणभर विचार आला, आईकडे कुठून आले हे पैसे? कारण आता धाकटा भाऊ आणि भावजय सगळे व्यवहार बघत होते. तिच्या समाधानासाठी घेतले मी ते पैसे. घरी आल्यावर कपाटात ठेऊन दिले.
पुढे 15च दिवसात आईनं या जगाचा निरोप घेतला. मला तिकडं पोचेपर्यंत पाच तास गेले. आईला तशी झोपलेली बघून मी तरी कोसळलेच.
” अशी कशी गेलीस ग आई? ” माझ्यातल्या वासरानं हंबरडा फोडला.
सर्व सोपस्कार झाल्यावर दुस-याच दिवशी परतावं लागलं. दिवसाला सुद्धा जायला जमलं नाही. तिचीच शिकवण, ” कर्तव्यात चुकारपणा करायचा नाही. कर्तव्य आपुलकीने करायचे. कर्तव्य आणि आपुलकी ची सांगड जबाबदारीने घालायची.” हे तिने आयुष्य भर केले, आम्ही ही नकळत तेच शिकलो.
आई गेली. सवाष्ण असतानाच गेली. गळ्यात दोन सुवर्ण वाट्या असलेली काळ्या मण्यांची पोत, हातात दोन दोन काचेच्या बांगड्या, कपाळावर लाल कुंकू इतके अहेव लेणे आयुष्य भर लेवून अखंड सौभाग्यवती राहून गेली. तिचा पार्थिव देह हिरव्या साडीत झाकलेला होता. मुखावर डोळे दिपवून टाकणारे तेज पसरले होते. येणारे लोक आश्चर्याने बघत होते. देवीप्रमाणे नमस्कार करत होते. लोकांची गर्दी जमली होती. चेह-यावरून नजर हटत नव्हती.
इतकी वर्षे कुणाची नजर लागू नये म्हणून आम्हां मुलांवरून, नातवंडांवरून मीठमोह-या आईनं कितीतरी वेळा उतरल्या होत्या.आज मला तिची दृष्ट काढावीशी वाटली.
आई गेली. घर माणसं असून सुनं सुनं झालं. डोळ्यातलं पाणी पापण्यातून परतवत मी परतले. दुसरे दिवशी जड मनाने पुडी उघडून नोट हातात घेतली. ती देताना आई मला बोलली होती. ” बेटा, खूप अवघड डोंगर चढलीस, खूप त्रास, खूप दु:ख झेललेस. पण तोंडातून चकार शब्द काढला नाहीस. ” मी म्हटलं , ” आई तुझीच ना ग मी लेक, तुझ्याकडूनच शिकले.” तिनं माझ्या हातात पुडी दिली. जपून ठेव म्हणाली. ती नोट मी देवीसमोर ठेवली , नमस्कार केला आणि परत कपाटात ठेवली.
आईच्या जाण्याच्या दुःखानं मन आणि शरीर कमजोर आणि हळुवार झालं होतं. त्यातून बाहेर निघणं आम्हां भावंडांना जड जात होतं. महिनाच झाला जेमतेम, तोच बाबाही आम्हाला सोडून गेले. उरलासुरला आधार गेला. मातृछत्र, पाठोपाठ पितृछत्र ही हरवलं. आम्ही पार ढासळलो. मूकपणे एकमेकाला सावरू लागलो. दिवसामागून दिवस गेले. दुःखावर काळ हाच उपाय असतो.
आई गेल्यानंतर दोनच महिन्यात ध्यानी-मनी नसताना माझं प्रमोशन झालं. कमाईत थोडी सुधारणा झाली. डगमगणारी आर्थिक गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. पुढे पुढे तर कधीच आर्थिक चणचण जाणवली नाही. हा त्या दहा रुपयाच्या नोटेचा चमत्कार आणि आईचा आशीर्वाद. जाताना आई मला श्रीमंत करून गेली.
सहा फेब्रुवारी ला आईला जाऊन 13 वर्षे होतील. ती दहा रुपयांची नोट हीच आज माझी ताकद आहे आणि तीच माझी श्रीमंती.
मला आईच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं. बदलणारी परिस्थिती सहजपणे आणि सकारात्मकतेने स्वीकारण्याचे बाळकडू मला आईने पाजले. तिच्या विचारांच्या आणि मनाच्या श्रीमंतीने मलाही खूप शिकवले. आयुष्यात पैसाअडका, दागदागिने कशाचाच हव्यास न धरता तिने अनेक आयुष्ये घडवली.
दहा रूपयांच्या रूपात आईने लक्ष्मी माझ्या हातात दिली. लक्ष्मीच्या तसबिरीकडे पहाताना मला आईचाच भास होतो.
( डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं। आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक सार्थक एवं विचारणीय आलेख “इंसान का आदर्श होना जन्मजात नहीं है”. )
☆ किसलय की कलम से # 30 ☆
☆ इंसान का आदर्श होना जन्मजात नहीं है ☆
जब हम सामाजिक व्यवस्थाओं के दायरे में रहकर जीवनयापन करते हैं तब भी हमें अनेक तरह से सीख मिलती है। हमारे नेक सिद्धांत ही हमें आदर्श पथ पर चलने हेतु प्रेरित करते हैं, और यही सन्देश समाज में भी जाता है। हमारे द्वारा किये जाने वाले ऐसे आचार-व्यवहार दूसरों को इस दिशा पर चलने के लिए उत्प्रेरक का काम करते हैं। इंसान का आदर्श होना कोई जन्मजात गुण नहीं होता। हम समाज में रहकर ही सामाजिक गतिविधियों को निकट से देख पाते हैं। यदि हम अपने चिंतन और मनन से अच्छाई-बुराई एवं हानि-लाभ के प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम की सूक्ष्मता से थाह लें तो हम उचित एवं अनुचित के काफी निकट पहुँच जाते हैं। इन दोनों पहलुओं में हमें उचित पहलू पर सकारात्मक दृष्टिकोण अपनाने की आवश्यकता होती है तथा अनुचित पहलू के प्रति नकारात्मक रुख भी अपनाना होता है। सकारात्मक दृष्टिकोण ही हमारे आदर्श मार्ग का प्रथम चरण होता है। हमारी भावनायें, हमारे संस्कार, हमारी शिक्षा-दीक्षा और हमारी लगन का इसमें महत्त्वपूर्ण योगदान रहता है। हम प्रायः इनके द्वारा ही उचित और अनुचित का फर्क सहजता से समझ पाते हैं। अपने धीरज और विवेक से अनुचित का प्रतिकार नियोजित ढंग से कर सकते हैं। जैसे परिग्रह की प्रवृति मनुष्य को कहीं न कहीं लोभी और स्वार्थी बनाती है। आवश्यकता से अधिक संग्रह ही हमें वास्तविक कर्म से विलग करता है। एक सच्चे इंसान का कर्त्तव्य अपनी बुद्धि एवं विवेक का सदुपयोग करना माना गया है । समाज के काम आना और समाज में रहते हुए परस्पर भाईचारे का परिवेश निर्मित करना हर मनुष्य का सिद्धांत होना चाहिए। समाज का उत्थान हम सब की अच्छाईयों पर निर्भर करता है। बुराई समाज को पतन की ओर ले जाती है। हम सुधरेंगे तो जग सुधरेगा। तब हम स्वयं से ही शुरुआत क्यों न करें। कल हमारा परिवार, हमारा मोहल्ला और हमारा नगर इस हेतु प्रेरित होगा। दीप से दीप जलेंगे तो तिमिर हटेगा ही। जब हम एक से दो , दो से चार होंगे तब जग में सुधार की लहर बहना सुनिश्चित है और उसकी परिणति भी सुखद होगी। निश्चित रूप से हमारे मन में आएगा कि ऐसा कभी हो ही नहीं सकता कि संपूर्ण जग सुधर जाए? परंतु लोग ऐसा सोचते ही क्यों हैं? यदि पेड़ लगाने वाला सोचने लगे कि मुझे उसके फल चखने को मिलेंगे ही नहीं तो मैं पेड़ क्यों लगाऊँ? तब तो हमारे पूर्वजों ने पेड़ क्यों लगाये! यदि हम पेड़ नहीं लगाएँगे तो हमारी अगली पीढ़ी आपको कैसे याद करेगी । बस यही बात है आपको याद किए जाने की। आप के कर्त्तव्य और आपका सामाजिक योगदान ही आप की धरोहर है, जो पीढ़ी दर पीढ़ी हस्तांतरित होती है और हमारा समाज इसका संवाहक होता है।
हमारी गीता में लिखा है-
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’
जिसका आशय हमें यह लगाना चाहिए कि हम कर्म करेंगे तो उसका फल हमें अवश्य प्राप्त होगा। एक-एक बिंदु से रेखा निर्मित होती है, रेखाओं से अक्षर, अक्षरों से शब्द और यही शब्द अभिव्यक्ति के माध्यम बनते हैं। शब्दशक्ति से कौन अपरिचित है? विश्व की हर क्रांति के पीछे शब्दशक्ति का अहम् योगदान है। बड़ी से बड़ी क्रांति भी विफल हो गई होती यदि अभिव्यक्ति जन-जन तक नहीं पहुँचती। तात्पर्य यह है कि एक बिंदु या एक इंसान भी आदर्श मार्ग पर चलेगा तो वह रेखा जैसा बिंदु समूह या सकारात्मक सोच, यूँ कहें कि उस जैसे लोगों का समूह तैयार होगा जिसमें समाज को नई चेतना और विकास के पथ पर अग्रसर करने की सामर्थ्य होगी । जीवन में ऐसा नहीं है कि इंसान संपन्न एवं उच्च पदस्थ होकर आम आदमी के दुख दर्द का एहसास नहीं कर सकता। परिस्थितिजन्य विचार और दृष्टिकोण वह सब करने की इजाजत नहीं देते जो उसके अंदर विद्यमान एक ‘साधारण आदमी’ करना चाहता है । आखिर ऐसा क्यों करता है यह विशिष्ट वर्ग?
उपरोक्त विशेष वर्ग के आचरण ही समाज में दूरियाँ पैदा करते हैं। हम सदियों से देखते आ रहे हैं कि इस वर्ग की आयु बहुत ही कम होती है। हम जानते हैं कि झूठ और अनैतिकता की बुनियाद पर खडा इंसान कभी स्थायित्व प्राप्त नहीं कर सकता। बात तो तब है जब इंसान इंसान के काम आए। ऊँच-नीच, छोटे-बड़े और अमीर-गरीब के बीच की खाई पार्टी जाए। जीव अमर नहीं होता। संपन्नता और विपन्नता जब यहीं पर धरी रह जाना है तो फिर ये बातें लोगों की समझ के परे क्यों होती हैं, कम से कम हम अपने व्यवहार और वाणी से मधुरता तो घोल ही सकते हैं। मनुष्य जब जन्म लेता है तो उसे पेट के साथ दो हाथ और दो पाँव मिलते ही इसीलिए हैं कि वह इनसे अपना और अपने परिवार का भरणपोषण कर सके। यदि हम महत्त्वाकाक्षियों, ईर्ष्यालु और विघ्नसतोषियों को छोड़ दें तो शायद ही कुछ प्रतिशत लोग ऐसे होंगे जो उच्चवर्गीय लोगों के संबंधों से कोई विशेष उम्मीद करते हों। आम इंसान को अपनी मेहनत और लगन पर पूरा भरोसा रहता है, यह होना भी चाहिए। वह जीवन में आगे बढ़ना तो चाहता है परंतु अच्छी नियत से। बुराई तो घोली जाती है। ईश्वर तो हमें इस प्यारी धरती पर निश्छल ही भेजता है। आदमी छोटा हो या बड़ा, यदि उसमें निश्छलता भरी है तो वह सच्चे अर्थों में इंसान है।
इंसान को सदैव स्वयं के अतिरिक्त दूसरों के लिए भी जीना चाहिए। अपने लिए तो हर कोई जी लेता है। हमारे व्यवहार और हमारी भाषा ही हमें समाज में यथायोग्य स्थान पर प्रतिष्ठित कराते हैं। हमारे सत्कर्म हमें स्वयं यश-कीर्ति दिलाते हैं। निःस्वार्थभाव से की गई परसेवा का प्रतिफल सदैव समाज हितैषी और आत्मसंतुष्टिदायक होता है।
तुलसी-कबीर, राणा-शिवाजी, लक्ष्मीबाई, गांधी, विनोवा भावे, मदर टेरेसा ऐसे ही नाम हैं जो इतिहास के पन्नों में अमर रहेंगे। हम इतिहास उठाकर देख सकते हैं कि अधिकतर यादगार शख्सियतें सम्पन्नता या महलों में पैदा नहीं हुईं और पैदा हुई भी हैं तो शिक्षित होते होते वैभव और कृत्रिम चकाचौंध से निर्लिप्त होती गईं, क्योंकि सच्चरित्र, सद्ज्ञान और शिक्षा आपस में नजदीकियाँ बढ़ाते हैं। वैभव और प्रासाद सदैव आम आदमी को उच्चवर्ग से दूर रखता आया है। हमारा चरित्र और हमारा व्यवहार दिल दुखाने वाला कभी नहीं होना चाहिए। अपनी वाणी और सहयोगी भावना से दूसरों को दी गई छोटी से छोटी खुशी भी आपको चौगनी आत्मसंतुष्टि प्रदान कर सकती है। आप एक बार इस पथ पर कदम बढ़ाएँ तो सही। मुझे विश्वास है कि आपकी जिंदगी में अनेक सकारात्मक परिवर्तन परिलक्षित होने लगेंगे, जिन पर आपको स्वयं विश्वास नहीं होगा। यह एक सच्चाई है कि नजदीकियों से गुणों का आदान-प्रदान होता है। हम अच्छाई के निकट रहेंगे तो अच्छे बनेंगे। बुराई के निकट रहेंगे तो बुरे बनेंगे। हम-आप जब अपनी स्मृति पर जोर डालते हैं तो बुरे लोगों की बजाए जेहन में अच्छे लोग ज्यादा आते हैं। सीधी सी बात है बुरे लोगों को कोई भी याद नहीं रखना चाहता। बुरे लोग केवल उदाहरण देने हेतु ही याद रखे जाते हैं। हमारा ध्येय स्पष्ट है कि सच्चाई, परोपकार और सौहार्द की दिशा में बढ़ाए गए कदम हमें आदर्श की ओर ले जाएँगे।
भातुकली हा शब्द ऐकताच आलं ना हसू ओठांवर आणि डोळ्यासमोर आलं की नाही बालपण?
किती गंमत असते नाही का ती मांडलेली भातुकली आपल्या डोळ्यासमोरून अशी सरकन जाते आणि जुन्या आठवणींना परत उजाळा देऊन जाते आणि काही काळ का होईना आपण त्या सुखद आठवणींमधे पार हरवून जातो. परत मांडावी सारखी वाटतात ती खेळणी आणि परत खेळावा सारखा वाटतो तो खेळ.
ती सुबक, सुंदर भांडी, काचेची कप बशी, रंगीत कळशी, ते छोटेसे पोळपाट लाटणे, ती इवलीशी खिसणी, छोटासा मिक्सर, ते चमचे, झारे, बापरे!!! केवढी ती भांडी.
हा खेळ खेळताना आपण इतके कष्ट घेऊन त्याची सुबक मांडणी करतो जणू खरा संसार थाटला आहे. मांडणी तरी झाली पण आता तो खेळण्यासाठी किराणा सामान हवं की. मग सुरू होतो आईला लाडीगोडी लावून तो मिळवण्याचा कार्यक्रम ज्यात आपण यशस्वी होतो. आता आई सारखं दिसायला हवं ना मग घेतो एखादी ओढणी गुंडाळून आणि साडी म्हणून आणि सुरू होतो एकदा स्वयंपाक.
लगबगीने कळशी भरली जाते. आई कडून मिळालेले दाणे, गूळ, चिंच, तिखट, मीठ, पोहे, चुरमुरे, थोडं दाण्याचे कूट आणि हट्टाने घेतलेली थोडी मळलेली कणीक कसं जागच्या जागी सजते.
प्रथम काय, तर काय करायचे हे न सुचल्यामुळे चहाचे आधण चढते आणि हा चहा प्यायला देण्यासाठी पहिला बकरा कोण तर अर्थात आपल्या हक्काचा बाबा,आणि तेही , तो चहा पिऊन म्हणतात वा काय फक्कड झाला आहे ग खूप मस्त अगदी आई सारखा. आता रोज तूच देत जा मला चहा करून. मग काय हे वाक्य ऐकल्यावर आपला आनंद द्विगुणित झालेला असतो. आता पुढे काय तर कढईत गरम पोहे शिजतात आणि ते कच्चे पोहे आता आजी, आजोबांच्या वाट्याला येतात. ते ही दोघ ते पोहे खाऊन इतके सुखावतात जणू नातीच्या हातचे खरे खरे गरम पोहे खात आहेत त्यांची शाबासकी मिळवून सुरू होतो खरा स्वयंपाक.
इवल्याश्या पोळपाटावर उमटू लागतात वेगवेगळे नकाशे, दाण्यात गूळ भरून भरून छान लाडू तयार होतात, पाण्यात तिखट मीठ घालून बनते तिखट आमटी, खोट्या कुकर मधे होतो चुरमुर्यांचा भात, आणि दाण्याच्या कुटाची चटणी अश्या नाना पाककृतीने सजते इवलेसे पान. आता हे सारे पहिले द्यायचे कोणाला? अरे अर्थातच आपल्या बंधुरायांना.
पण इतके सारे होई पर्यंत आईचा स्वयंपाक तयार असतो आणि आतून हाक येतेच चला जेवायला पान वाढलेली आहेत. की लगेच आपणही म्हणतो माझाही तयार आहे स्वयंपाक आज सगळ्यांनी मी केलेलेच जेवायचे आहे.
बाबा तर तयारच असतो लेकीच्या हातचे सुग्रास जेवायला. आणी बिचारा ती कच्ची पोळी, ती तिखट आमटी खाऊन सुद्धा तृप्तीची ढेकर देत म्हणतो वा खूप फक्कड झाला आहे हो सगळा स्वयंपाक. ते त्यांच्या चेहर्यावरचे भाव पाहून आई ही सुखावलेली असते आणि लेकीचा ऊर आनंदाने भरून आलेला असतो जणू आपण विश्वविक्रम केलेला आहे.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम दोहे । )
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 77 ☆
☆ आलेख – सहजीवन ☆
आमचं लग्न झालं तेव्हा मी वीस वर्षांची आणि हे बावीस वर्षाचे होते. वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय-म्हशींचे गोठे आणि गावाला शेती होती.ह्यांचा जन्म पुण्यातला,पदवीधर असूनही विचारसरणी सनातन- “न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति” अशी मनुवादी! खुप जुन्या वळणाचं सासर, एकत्र कुटुंब, सणवार, कुळधर्म, कुळाचार, रांधा,वाढा उष्टी काढा हेच आयुष्य असायला हवं होतं, पण मी त्यात रमले नाही.
बाहेर जायला विरोध होता, कविता करणं, ते सादर करायला बाहेर जाणं एकूणच उंबरठा ओलांडून बाहेर काही करणं निषिध्द !
प्रतिकुल परिस्थितीत बाहेर पडले,कुणीही प्रोत्साहन दिलं नाही तरी लग्नानंतर चौदा वर्षांनी एम.ए.ला अॅडमिशन घेतलं ….पुढे पीएचडी चं रजिस्ट्रेशन केलं…पूर्ण करू शकले नाही. स्वतःच्या अपयशाचं खापर मी इतर कोणावर फोडत नाही. नवरा डाॅमिनेटिंग नेचरचा आहे पण माझी जिद्द ही कमी पडली.
पण आज या वयात माझा नवरा आजारपणात माझी जी काळजी घेतो त्याला तोड नाही…..
चाकोरीबाहेरचे अनुभव घेतले, चारभिंती बाहेर पडले खुप प्रतिकुल परिस्थितीत थोडं मुक्त होता आलं याचं आज समाधान आहे.
आणि पतंगासारखं काही काळ आकाशात उंच उडता आलं हा आनंद, पतंगांचा मांजा कुणी पुरूष बाप, भाऊ, नवरा नसताना नियतीने ती दोर कवितेच्या रूपाने पाठवली. जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ।
ते पदवीधर मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं पण तो प्रश्न कधी आला नाही आमच्यात! प्रोत्साहन दिले नाही तरी शिक्षणाला विरोधही झाला नाही फारसा!
एका विशिष्ट वयानंतर “अभिमान” ची संकल्पना नाहीशी होते, कधीच पतंगाची दोर न बनलेल्या जोडीदाराविषयीही कृतज्ञताच वाटू लागते!